नमस्कार मित्रांनो,
आरोग्य हा मोठा शब्द आहे. तो केवळ शरीरच नाही तर मन आणि आत्मा या दोघांनाही आलिंगन देतो..!!
आरोग्यलाभ जर शरीराला नाही तर जवळचा पैसा काहीच उपयोगाचा नाही, स्वतःला निरोगी ठेवणं म्हणजे परमेश्वराची सेवा करणं होय.आपल्या दिवसाची सुरूवात सकारात्मक विचारांनी करा.विचार सकारात्मक असतील तर मनही निरोगी राहते...
मन आणि शरीर या दोघांच्याही आरोग्याचे रहस्य म्हणजे भूतकाळाबद्दल शोक न करणे, भविष्याची चिंता न करणे, भविष्याचा अंदाज न घेणे, तर वर्तमान क्षण हुशारीने आणि मनापासून जगणे...माणसाचे सगळयात महत्वाचे धन हे उत्तम आरोग्य आहे, आरोग्याशिवाय बाकी सर्व व्यर्थ आहे.कशाला वाया घालवता तुमचे आयुष्य चांगले आरोग्यासाठी द्या स्वत: कडे लक्ष वय वाढले तरी दिसाल तुम्ही चिरतरुण जर ठेवाल तुमच्या शरीराकडे लक्ष...