Indian Bhakti Channel


E-Bhakti | E-भक्ति

Likho Ram ram😇

1 day ago | [YT] | 16

E-Bhakti | E-भक्ति

‼️ श्री गुरुदेव दत्त ‼️

🌹 आजचे बोधप्रवचन*🌹

🟧🟪🟧 भगवंताला शरण जावे 🟧🟪🟧

💮 "मी जे काही करतो ते सर्व भगवंतासाठीच करतो" अशी भावना ज्याच्या मनात असते, तोच खरा भक्त होय. भगवंतप्राप्तीशिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे हे भक्ताचे लक्षण आहे.

🔸 कोणतेही कार्य करताना भगवंताचे स्मरण असावे. भगवंताच्या स्मरणात गेलेला प्रत्येक क्षण हा आनंदमय असतो. विषयांमध्ये आपण स्वतःला विसरतो, तर भगवंताच्या नामस्मरणात का नाही?

❄ जोपर्यंत सगुण भगवंतावर प्रेम जडत नाही, तोपर्यंत सगुण भक्ती करत राहावी.

🏵️ गुरूच्या आज्ञेप्रमाणे वागणे म्हणजे स्वतःचा अहंकार कमी करणे. "मी"पणा सोडल्याशिवाय गुरुआज्ञेचे पालन होत नाही.

🛟 आपली इच्छा वारंवार डोके वर काढते, पण गुरुआज्ञेचा दृढ आधार घेतल्यास ती हळूहळू नाहीशी होते.

🪞 देहापेक्षा आपण वेगळे आहोत, ही जाणीव दृढ करण्यासाठी नामस्मरण आणि गुरुआज्ञापालन याहून श्रेष्ठ मार्ग नाही.

🔸 आपला धर्म, नीती आणि सत्संग यांचे जतन करावे.

🌀 संत आणि सामान्य माणूस दोघेही संसार करतात; पण संत म्हणतात – "राम कर्ता" आणि त्यामुळे सुख-दुःखाच्या बंधनात अडकत नाहीत.

⭕ भगवंतासाठी तळमळ निर्माण झाली की साधना सहज होते.

❄ समर्थ रामदास स्वामी म्हणतात – "ज्या क्षणी भगवंतस्मरणात स्वतःला विसराल, त्या क्षणी मुक्ती प्राप्त होईल."

♦️ विद्वत्तेचा अभिमान न ठेवता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा. सहवासाने प्रेम वाढते, मग भगवंतावरील प्रेम का वाढणार नाही?

🔹 भगवंताला शरण जावे आणि त्याचे होऊन राहावे, यातच सर्व धर्म आणि शास्त्रांचे सार आहे.*🔹

🍁 बोधवचन 🍁
"देह आणि मन यांच्यापासून आपण निराळे आहोत. म्हणून अखंड नामस्मरण करत राहा. जे इतर कोणत्याही साधनेने साध्य होत नाही, ते भगवंताच्या नामाने साध्य होते."

🌲 प्रवचनसार : श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज 🌲

🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏

#eBhakti #ShriGurudevDatta #GondavalekarMaharaj #DattaBhakti #NamSmaran #Spirituality #MarathiPravachan

1 week ago | [YT] | 13

E-Bhakti | E-भक्ति

नामस्मरणात नामाची संख्या महत्त्वाची आहे की नाही, हे तुमच्या साधनेच्या टप्प्यावर अवलंबून असते. याचे उत्तर खालील दोन दृष्टिकोनातून पाहता येईल:
१. संख्या महत्त्वाची आहे (सुरुवातीच्या साधकांसाठी)
शिस्त (Discipline): सुरुवातीला मन खूप चंचल असते. मनाला एका जागी खिळवून ठेवण्यासाठी 'संख्या' एक ध्येय (Target) म्हणून काम करते. उदा. "आज मला १० माळा जप करायचा आहे," असे ठरवल्यामुळे आपण न विसरता तो पूर्ण करतो.
पुरश्चरण: शास्त्रानुसार, कोणत्याही मंत्राचे फळ मिळण्यासाठी त्याची एक ठराविक संख्या (उदा. १ लाख किंवा सव्वा लाख) पूर्ण करावी लागते. याला 'पुरश्चरण' म्हणतात.
संस्कार: ठराविक संख्येत जप केल्यामुळे अंतर्मनावर त्या नामाचे खोल संस्कार होतात.
२. संख्या महत्त्वाची नाही (प्रगत साधकांसाठी)
भाव आणि प्रेम (Devotion): जर तुम्ही फक्त संख्या मोजण्यातच गुंतलात आणि देवावर प्रेम किंवा भाव नसेल, तर त्या जपाचा परिणाम कमी होतो. तुकाराम महाराज किंवा नामदेव महाराजांसारख्या संतांनी 'भावाला' महत्त्व दिले आहे.
एकाग्रता: १००० वेळा यंत्रासारखे नाव घेण्यापेक्षा, १० वेळा पूर्ण एकाग्रतेने आणि श्रद्धेने घेतलेले नाव जास्त शक्तिशाली असते.
अखंड नामस्मरण: जेव्हा जप मोजणे थांबते आणि तो श्वासागणिक आपोआप सुरू होतो (अजपा जप), तेव्हा संख्या गौण ठरते.
निष्कर्ष (सुवर्णमध्य)
सुरुवातीला: संख्या मोजा (उदा. माळेवर जप करा). यामुळे तुमच्या साधनेत नियमितता येईल.
नंतर: हळूहळू संख्येपेक्षा 'नामातील गोडी' वाढवण्यावर भर द्या.
थोडक्यात सांगायचे तर, संख्या ही 'शिस्त' लावण्यासाठी आहे, तर भाव हा 'परमेश्वर' मिळवण्यासाठी आहे.

2 months ago | [YT] | 3

E-Bhakti | E-भक्ति

मैं गणेश भगवान की बहुत सी प्रतिमाएं मूर्ति और तस्वीरें देखी हैं मगर सच कहूं कि यह तस्वीर जब मैं एक पंडित जी के यहां गाजियाबाद में दी थी तुमसे विशेष निवेदन किया कि मुझे यह तस्वीर की फ्रेम दे दे इसे बनाने वाले ने निसंदेह अलग दृष्टि से सोचा है जैसे गजानन भगवान की कंधों पर किसी बालक गज के सर को स्थापित किया गया था तो रंग का यहां स्पष्ट जो अंतर है वह उस घटना को अत्यंत व्यावहारिक और सहज रूप देता दिख रहा है जहां श्याम रंग का गज का सर जो किसी गज के सर से मेल खाता साबित होता है और श्वेत रंग का भगवान गजानन का धड़ उन दोनों को जोड़ने से जो रंग की वैविध्यता आनी चाहिए वह इस तस्वीर में साफ दृष्टिगोचर हो रही है यह मेरा सोचने का एक नजरिया है आप इससे कितने सहमत हैं कृपया अपने विचार जरुर व्यक्त करें जय गणेश ,ओम गन गणपतए नमः।

2 months ago | [YT] | 5

E-Bhakti | E-भक्ति

"ICU च्या बेडवर 'मृत' घोषित केलेला माझा मुलगा... आणि आईची ती 'अखंड' स्वामी सेवा! डॉक्टरांच्या हातातील रिपोर्ट बघून त्यांचा थरकाप का उडाला?"

पुण्याच्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये रात्रीचे २ वाजले होते. ICU च्या बाहेर सुधा ताई दगडासारख्या बसल्या होत्या. आत त्यांचा एकुलता एक मुलगा, रोहन, मृत्यूशी झुंज देत होता.
दोन दिवसांपूर्वी रोहनचा बाईकवरून भीषण अपघात झाला होता. त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता. मेंदूमध्ये रक्तस्राव (Brain Hemorrhage) झाला होता.
डॉ. देसाई बाहेर आले. त्यांनी मास्क खाली घेतला. त्यांचा चेहरा गंभीर होता.

त्यांनी सुधा ताईंना बाजूला घेतलं आणि निष्ठुर सत्य सांगितलं:
"सुधा ताई, आम्ही खूप प्रयत्न केले. पण रोहनच्या मेंदूने काम करणं थांबवलं आहे. तो 'ब्रेन डेड' (Brain Dead) होण्याच्या मार्गावर आहे. व्हेंटिलेटरवर असल्यामुळे श्वास चालू आहे, पण आशा संपली आहे. तुम्ही नातेवाईकांना बोलावून घ्या. कदाचित २-३ तास उरले आहेत."
हे शब्द ऐकून कोणत्याही आईने हंबरडा फोडला असता. पण सुधा ताई रडल्या नाहीत.

त्यांच्या डोळ्यात एक विचित्र आग होती. त्या डॉक्टरांना म्हणाल्या:
"डॉक्टर, तुमचं विज्ञान जिथे संपतं, तिथे माझ्या स्वामींची सत्ता सुरू होते. जोपर्यंत माझा स्वामी म्हणत नाही, तोपर्यंत यमदूत सुद्धा माझ्या लेकाला नेऊ शकत नाही."
डॉक्टर हताशपणे मान हलवून निघून गेले. त्यांना वाटलं, आईला धक्का बसलाय म्हणून ती असं बोलतेय.

सुधा ताईंनी बॅगेतून स्वामींची एक छोटी तसबीर काढली. थोडी 'अक्कलकोटची विभूती' (Udi) काढली.

त्यांनी ICU च्या काचेच्या खिडकीतून आत पाहिलं. रोहन निपचित पडला होता. फक्त मशीनचे आवाज येत होते. बीप... बीप... बीप...
सुधा ताईंनी तिथेच जमिनीवर बसून 'तारक मंत्र' म्हणायला सुरुवात केली.

"निशंक हो निर्भय हो मना रे... प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे..."
१ तास झाला... २ तास झाले... सुधा ताईंचा जप थांबला नाही. त्या एका वेगळ्याच तंद्रीत होत्या.

रात्रीचे ३:३० वाजले (ब्रह्म मुहूर्त).
अचानक ICU मधून सायरन वाजायला लागला.
टी.... टी.... टी.... (Continuous Beep)
मशीनची लाईन फ्लॅट झाली होती (Flatline). रोहनचं हृदय थांबलं होतं.

नर्सेस धावल्या. डॉ. देसाई धावत आत गेले.
त्यांनी शॉक (Defibrillator) द्यायला सुरुवात केली.
"चार्ज... क्लिअर... शॉक!"
शरीर उडालं, पण हृदय सुरू झालं नाही.

डॉक्टरांनी दुसऱ्यांदा शॉक दिला. काहीच हालचाल नाही.
डॉ. देसाईंनी घड्याळाकडे पाहिलं आणि मान हलवली.
"Time of death... 03:35 AM." त्यांनी नर्सला मशीन बंद करायला सांगितलं

सस्पेन्स आणि चमत्कार (The Suspense & Miracle):
इकडे बाहेर सुधा ताईंना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना आतून हाक आली.

त्या धावत ICU च्या दरवाजावर गेल्या आणि त्यांनी नियम तोडून आत प्रवेश केला.
डॉक्टर ओरडले, "मावशी, बाहेर चला! तो गेला आहे!"
पण सुधा ताईंनी ऐकलं नाही. त्या वाघिणीसारख्या बेडकडे धावल्या.

त्यांनी आपल्या हातातील स्वामींची विभूती रोहनच्या कपाळावर आणि छातीवर लावली.
आणि त्याच्या कानात जोरात ओरडल्या:
"रोहन! उठ! स्वामी आलेत बघ तुला न्यायला! उठ म्हणतेय ना!"
आणि त्याच क्षणी...
डॉक्टर जे मशीन बंद करायला हात पुढे करत होते, त्या मशीनवर अचानक एक हिरवी लाईन वर खाली झाली.

बीप...!
डॉक्टर दचकले. "हे काय?"
पुन्हा आवाज आला. बीप... बीप... बीप...
ज्या हृदयाचे ठोके पूर्णपणे थांबले होते, ते अचानक सामान्य माणसासारखे चालू लागले!
रोहनच्या हाताची बोटे हलली.
त्याने एक जोरात श्वास घेतला. हुश्श...!
डॉ. देसाईंना घाम फुटला. ते थरथरत्या हाताने मॉनिटर चेक करू लागले.
हे वैद्यकीय शास्त्रात अशक्य होतं. 'ब्रेन डेड' झालेला माणूस आणि ज्याचं हृदय ५ मिनिटं बंद होतं, तो अचानक जिवंत कसा झाला?

सकाळी रोहनला शुद्ध आली. तो धोक्यातून पूर्णपणे बाहेर होता.
डॉ. देसाई आपली ड्युटी संपवून केबिनमध्ये बसले होते. ते अजूनही धक्क्यात होते.
सुधा ताई त्यांचे आभार मानायला गेल्या.
तेव्हा डॉ. देसाई जे बोलले, ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल.

ते म्हणाले:
"सुधा ताई, आभार माझे मानू नका. मी तर त्याला मृत घोषित केलं होतं. पण आज मी जे पाहिलं, ते मी कोणाला सांगू शकत नाही, लोक मला वेडा म्हणतील."
सुधा ताई म्हणाल्या, "काय पाहिलं तुम्ही?"

डॉक्टर म्हणाले:
"जेव्हा रोहनचं हृदय थांबलं होतं आणि मी मशीन बंद करायला गेलो... तेव्हा मला एका सेकंदासाठी दिसलं की, रोहनच्या बेडच्या मागे एक १० फुटांचा, धिप्पाड, भगवे कपडे घातलेला माणूस उभा होता. त्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते (आजानुबाहू). त्याने आपला हात रोहनच्या छातीवर ठेवला होता आणि दुसऱ्या हाताने यमदूताला रोखल्यासारखा इशारा करत होता. जेव्हा तुम्ही विभूती लावली, तेव्हा ती आकृती हसली आणि गायब झाली... आणि त्याच सेकंदाला रोहनचं हृदय सुरू झालं."
डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी होतं. ते नास्तिक डॉक्टर सुधा ताईंच्या पाया पडले.

"ताई, तुमचं 'स्वामी रसायन' काय आहे मला माहित नाही, पण त्याने आज मृत्यूला हरवलं आहे."

त्या दिवशी हॉस्पिटलच्या त्या खोलीत सिद्ध झालं की,
ICU मधील Ventilator माणसाचा श्वास चालू ठेवू शकतो, पण गेलेला श्वास परत आणण्याची ताकद फक्त 'स्वामी नामात' आहे.
||| भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ||
☘️सुप्रभात☘️स्वामी ॐ☘️

3 months ago | [YT] | 5

E-Bhakti | E-भक्ति

प्रसाद हा मज द्यावा देवा,
प्रसाद हा मज द्यावा देवा |
सहवास तुझाची घडावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा...||ध्रु||

निशिदिनी तव मी नाम स्मरावे,
वियोग ना तव व्हावा देवा,
प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा ||१||

हरिभजनामृत निशिदिनी पाजुनी,
जन्म मृत्यू चुकवावा देवा,
प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा ||२||

हृदय मंदिरी तुवा बैसूनी,
ज्ञानयोग शिकवावा देवा,
प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा ||३||

आत्म सुखास्तव प्रसाद द्यावा,
विसर तुझा न पडावा देवा,
प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा
सहवास तुझाची घडवा देवा, प्रसाद हा मज द्यावा ||४||

4 months ago | [YT] | 5

E-Bhakti | E-भक्ति

🙏 नया Logo और Banner लॉन्च 🙏
आप सभी के आशीर्वाद से हमारे E-Bhakti चैनल का नया रूप तैयार हो गया है।
अब और भी सुंदर, साफ और दिव्य रूप में भक्ति का प्रसार होगा।
आपका साथ और प्यार यूँ ही बना रहे ❤️
Har Har Mahadev 🔱

5 months ago | [YT] | 3

E-Bhakti | E-भक्ति

दिपावली पुजन "मुहूर्त"
दि.१७|१०|२५ शुक्रवार...एकादशी सह वसुबारस सायं ६.नंतर सवत्स गाईचे पूजन करावे.(गुळाचा नैवेद्य)
दि. १८|१०|२५ शनिवार धनत्रयोदशी पूजेची वेळ.. सायं.६.१३मि. ते ८.रात्री १० ते १२.३० पर्यंत...
दि. २०|१०|२०२५ सोमवार ...नरक चतुर्दशी अभ्यंगस्नान पहाटे ५.२० ते ६.४० पर्यंत.
दि. २१|१०|२०२५ मंगळवार... लक्ष्मी कुबेर पूजन अभ्यंगस्नान... लक्ष्मी गादी पूजन.. सकाळी ९ ते १२.३० पर्यंत.. लक्ष्मी कुबेर पूजन... वेळ दुपारी ३ ते ४.३०, सायं. ६ ते ८.३० रात्री १०.३० ते १२ पर्यंत.
दि. २२|१०|२०२५ बुधवार दिवाळी पाडवा अभ्यंगस्नान, वही पूजन, गोवर्धन पूजन, अन्नकोट,वही पूजन पहाटे ३ ते ६ व सकाळी ६.३० ते ९.३० व ११ ते १२.३० गोवर्धन पूजन, सकाळी ६.३० ते ९.३० व ११ ते १२.३० पर्यंत.. ऑफिस दुकान उघडणे .. सकाळी ६.३० ते ९.३० पर्यंत...
दि. २३|१०|२०२५ गुरुवार भाऊबीज (यमद्वितीया)...सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, शुभ दीपावली
***

7 months ago | [YT] | 1

E-Bhakti | E-भक्ति

*🌝 कोजागिरी पौर्णिमा 🌝*

*(दिंडोरी प्रणित उत्सव)*

*(आश्विन शु.१५.) (दि.०६ ऑक्टोबर २०२५)*

शरद पौर्णिमेची रात्र,चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते.
*अश्विन शुद्ध पौर्णिमा 🌕 म्हणजे कोजागिरी पौर्णिमा*.
अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे. *हा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक १२:०० ते १२:३९ या ३९ मिनिटात करायचा असतो.*

*भगवान इंद्र,लक्ष्मी,चंद्र,कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते.*
शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकरांनी *'आपल्या घरीच करावा'.*
उपरोक्त वरील देवता या दिवशी पृथ्वीतलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात *त्यांना अमृताचा (दूध )नैवेद्य करावा.*

*👉 पूजाविधी मांडणी....*

*मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर*.…

१) लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोड पानावर *श्री गुरुपीठातून घेतलेले सिद्ध श्री यंत्र ठेवावे.*
हे यंत्र उपलब्ध नसल्यास *सुपारी* ठेवावी.

२) दुसऱ्या जोडपानावर कुबेराचे प्रतीक म्हणून *श्री गुरु पिठातून घेतलेले सिद्ध लक्ष्मी कुबेर यंत्र* ठेवावे.
हे यंत्र उपलब्ध नसल्यास *सुपारी* ठेवावी.

३) तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला *तांब्याचा तांब्या किंवा गडवा त्यात आंब्याचा डगळा इंद्राचे प्रतीक* म्हणून घ्यावा.

४) 🌕 *चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवावा.*
अशी मांडणी रात्री बारा वाजेपर्यंत करून ठेवावी.
*रात्री ठीक १२:०० ते या १२:३० तीस मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवावे. जेणेकरून चंद्रदेवता शलाका रुपात अमृताचा प्रसाद देतात.*

५) १२:३० वा.पूजेच्या पाटा समोर पाण्याचे भरीव चौकोनी मंडल करून त्यावर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळदीकुंकू पांढरी फुले अक्षता अष्टगंध वाहून पूजा करावी. दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवावे. त्यात एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा व खालील प्रार्थना म्हणावी.
*ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय l*
*शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा l l*
*दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा.*
जर पूजनासाठी सुपारींचा वापर केला असेल तर याच सुपार्‍या जपून दरवर्षी पुजाव्यात.
व दर कोजागिरीस व लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्यांची पूजा करावी.
*१२ ते १२:३० या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी*

*लक्ष्मी प्राप्तीची सेवा....*

(१) श्री स्वामी समर्थ मंत्राचा ११ माळा जप
(२) श्री लक्ष्मी गायत्री मंत्र १ माळ
(३) श्री विष्णू गायत्री मंत्र १ माळ
(४) श्री कुबेर मंत्र १ माळ
(५) १६ वेळा श्री सूक्त
(६) व्यंकटेश स्तोत्र १ वेळा
(७) गीतेचा पंधरावा अध्याय वाचावा.
*ही अतिशय महत्त्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे.*
लक्ष्मी म्हणजे श्री,शोभा लक्ष्मी! अनेक प्रकारची आहे वित्त लक्ष्मी,गुणलक्ष्मी,लक्ष्मी,भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही.देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे.कृपाळू आहे ती हित करणारी आहे.पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते त्रास देते कटकटी निर्माण करते.अशी कल्पना आहे.
मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात तिची अवकृपा झाली की,लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला.ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर रागवते.पण जे जागरण करतात,वरील सेवा करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते.कोण जागतो आहे? को जागर्ती ? यावरून या पौर्णिमेला कोजागिरी असे नाव पडले.याच पौर्णिमेचे रात्री राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो.आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे पहात असतो.वारंवार तो *'कोजागर्ता'* असे विचारतो यावरून हे नाव रूढ झाले आहे.

.....*श्री स्वामी समर्थ सेवा,दिंडोरी प्रणित मासिक*

8 months ago | [YT] | 2