Karad Today
You Tube News Channel
by Raju Sanadi Freelance Journalist-Photojurnalist in Karad...
I myself Raju Sanadi Karad have started a YouTube channel called Karad Today to provide some news about Karad city and its surroundings on YouTube. Please subscribe to this YouTube channel.
I entered the field of journalism in 1995. Started working as a press photographer in a Marathi daily. Currently I am working as a freelance photojournalist for national news agency and some national media.
www.facebook.com, instagram.com/ youtube.com/@karadtoday
karadtodaynews.blogspot.com,
Karad Today News,
Karad Today Facebook Page,
Raju Sanadi Karad
#rajusanadi #rajusanadikarad #karadtodaynews #karadtoday #karadtodaynewschannel #youtube #youtubechannel #karad #mh50 #satara #nh48 #maharashtra #koyna #krishna #karadnews #marathinews
Karad Today
कराड–उंब्रज सिंगल पिलर उड्डाणपुलासाठी; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून आभार....
कराड, दि. 6 : कराड शहर व कराड तालुक्यातील उंब्रज ही महत्वाची बाजारपेठ असून या दोन्ही गावांतून राष्ट्रीय महामार्ग (NH-48) जातो. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यामुळे वाहतूक कोंडी व अपघातांची समस्या निर्माण होत होती. कराड शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार कराड शहरातील विद्यमान भरीव उड्डाणपूल पाडून त्याठिकाणी सिंगल पिलर उड्डाणपूल उभारण्याचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले आहे.
याच धर्तीवर उंब्रज येथेही सिंगल पिलर उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यानुसार पृथ्वीराज चव्हाण यांनी उंब्रज येथे प्रत्यक्ष भेट देऊन पुलाची पाहणी केली तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांची ही मागणी रास्त असल्याचे लक्षात आल्याने २४ ऑगस्ट २०२३ पासून त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे तसेच फोनवरून सातत्याने पाठपुरावा केला.
या पत्राच्या आधारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी विचारात घेऊन उंब्रज येथील पुलाची व्यावहारिकता तपासण्याचे निर्देश दिले. त्यानुसार NHAI च्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उंब्रज येथे येऊन पुलाची पाहणी केली. त्यानंतर या अधिकाऱ्यांसमवेत पृथ्वीराज चव्हाण यांची बैठक होऊन पुलाच्या आराखड्याबाबत सविस्तर चर्चा झाली होती.
अधिकाऱ्यांच्या व्यावहारिकता तपासणीनंतर विकासकामांना प्राधान्य देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कराड व उंब्रज येथे सिंगल पिलर उड्डाणपूल उभारण्यासाठी भरघोस निधी मंजूर केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून संभाव्य जीवितहानी टाळण्यासही हातभार लागणार आहे. याबाबतचा निधी मंजूर झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्राद्वारे पृथ्वीराज चव्हाण यांना दिली आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “कराड व उंब्रज या दोन्ही ठिकाणी वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत होती. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार या दोन्ही ठिकाणी सिंगल पिलर उड्डाणपूल होणे अत्यंत आवश्यक होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक निर्णय घेत निधी मंजूर केल्यामुळे भविष्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होईल. कराड तालुक्याच्या विकासासाठी हे अत्यंत महत्वाचे पाऊल आहे.”
कराड व उंब्रज येथील सिंगल पिलर उड्डाणपुलासाठी निधी मंजूर केल्याबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कराड तालुक्यातील जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.
2 months ago (edited) | [YT] | 78
View 2 replies
Karad Today
माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याने उंब्रजला सहापदरी उड्डाणपूल;नितीन गडकरींनी सांगितली माहिती...
कराड, दि. 6 ; माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पुणे-कागल राष्ट्रीय महामार्गावरील महत्वाचे शहर असलेल्या उंब्रज (ता.कराड) येथील नव्या पारदर्शक उड्डाण पूलासाठी सुमारे १३३.४५ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. तशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना पत्राद्वारे कळवली आहे.
उंब्रज येथे वाढत चाललेले नागरीकरण व शहराच्या मध्यातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग यामुळे स्थानिक लोकांना सुरक्षित वाहतुकीसह अन्य सुविधांचा बोजवारा उडत आहे. याकडे लक्ष वेधून तत्कालीन खासदार श्रीनिवास पाटील यांनी याठिकाणी पारदर्शक उड्डाणपूल करावा अशी मागणी लावून धरली होती.
उंब्रज हे जवळपासच्या ३० ते ४० गावांसाठी एक प्रमुख बाजारपेठेचे ठिकाण आहे. त्याची लोकसंख्या सुमारे ४५ हजार आहे. या शहरात अनेक सरकारी आणि खाजगी कार्यालये, बँका पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस, टेलिफोन एक्सचेंज ऑफिस, एमएसईबी ऑफिस, सिटी सर्व्हे ऑफिस, सब रजिस्ट्रार ऑफिस, कृषी ऑफिस, धोम सिंचन ऑफिस, महाविद्यालये, शाळा आणि रुग्णालये आहेत. हे शहर वेगाने वाढत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ उंब्रजमधून जातो आणि शहराला दोन भागात विभागतो. चिपळूण-पंढरपूर राज्य महामार्ग १४३ देखील उंब्रज येथे राष्ट्रीय महामार्ग ४ ओलांडतो. त्यामुळे उंब्रज हे जास्त वाहतूक आणि अपघाताचे ठिकाण बनले आहे. सध्या, राष्ट्रीय महामार्ग ४ महामार्गावर फक्त एकच अंडरपास असलेला एक उड्डाणपूल आहे, जो अत्यंत अपुरा आणि अयोग्यरित्या स्थित आहे. पावसाळ्यात अंडरपासमध्ये पाणी साचते ज्यामुळे अधिक गैरसोय होते. म्हणूनच, सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय महामार्गावर अनेक अंडरपाससह पारदर्शक उड्डाणपूल बांधण्याची नितांत आवश्यकता असल्याचे पटवून देत श्रीनिवास पाटील यांनी ही मागणी सातत्याने लावून धरली होती.
याबाबत लोकसभेत देखील मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच उंब्रज येथील ग्रामस्थांनी श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन याठिकाणी पारदर्शक उड्डाणपूल व्हावा अशी मागणी याअगोदर केली होती. त्यानुसार श्रीनिवास पाटील यांनी वेळोवेळी केंद्रीय पातळीवर पत्र व्यवहार करण्यासह प्रत्यक्ष पाठपुरावा केला होता. त्यानंतर संबंधित विभागाने प्रशासकीय पातळीवर पूलाच्या कामाचा सर्व्हे करून तांत्रिक बाबी तपासल्या गेल्या होत्या. आता या उड्डाण पूलासाठी निधी मंजूर झाल्याने सदर कामाचा मार्ग मोकळा झाल्याची माहीती माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.
2 months ago | [YT] | 27
View 1 reply
Karad Today
कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपुलाच्या भराव भिंतीच्या कामात कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून अडथळा...
कराड, दि. 25 - पुणे बेंगलोर महामार्गावर कोल्हापूर नाका येथे सध्या उड्डाणपूल चालू करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या टप्पा हा पुलाच्या भरावाच्या भिंतीमुळे थांबला आहे. आणि याच साडेबारा मीटर भिंतीच्या उभारणीसाठी मुख्य महामार्गावर सातारा बाजूकडे जाणारे लेनवर भिंतीसाठी खोदकाम करावे लागणार आहे. याची तयारी संबंधित ठेकेदार कंपनी करत असताना कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून या कामाला विरोध होताना दिसत आहे.
वास्तविक या ठिकाणी बारावी भिंतीचे काम सुरू झाल्यानंतर सातारा बाजूकडे जाणाऱ्या मार्गाची रुंदी साहजिकच कमी होणार असली तरी संबंधित वाहतूक सुरळीत करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेची आहे. मात्र संबंधित ठेकेदार कंपनीला या कामाच्या अनुषंगाने सहकार्य न करता ठेकेदार कंपनीने सुरू केलेल्या कामात वाहतुकीच्या नावाखाली अडथळा आणला जात असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सातारा, जिल्हा पोलीस प्रमुख व वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी या मध्ये लक्ष घालने गरजेचे आहे.
दरम्यान या ठिकाणी उड्डाणपुलाच्या भराव भिंतीचे काम करण्यासाठी व सातारा बाजूकडे जाणाऱ्या वाहतुकीला रस्ता रुंद करण्यासाठी साई हॉस्पिटल, शहा मिळकत, माळी हॉटेल, नलवडे मिळकत परिसराततील अतिक्रमणे काढून, जुने विद्युत खांब काढून, जुने गटर काढून त्या ठिकाणी नवीन गटार बांधून रस्ता रुंदीकरण करून त्यावरती डांबरीकरण करण्यात आले आहे जेणेकरून वाहतूक सातारा बाजूकडे सुरळीत होईल.
कोल्हापूर नाक्यावर सदर उड्डाणपूलाच्या मुख्य भिंतीचे अपूर्ण काम पूर्ण करण्यात कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखाप्रमुख अडकाटी करत असल्याने या कामावर मोठा परिणाम होणार आहे. सदरचे काम महिन्याभरात पूर्ण न झाल्यास पुढे मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. यामध्ये वाहतुकीचा मोठा गंभीर प्रश्न व त्यामुळे उड्डाण पुलावरून सुरू होणारी वाहतूक लांबणीवर पडणार आहे.
ठेकेदार कंपनीला वाहतूक नियंत्रण शाखेचा अजब सल्ला...
कोल्हापूर नाक्यावर सध्या उड्डाणपुलापासून भरावाचे काम सुरू आहे. या सुरू असलेल्या भराव कामातून सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक पुढे काढावी असा अजब सल्ला कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखाप्रमुख संबंधित ठेकेदार कंपनीला देत आहेत. ज्या भरावाचे काम सध्या 40 टक्के हून अधिक झाले आहे, शिवाय भराव कामात मुरूम टाकण्यासाठी येणाऱ्या ठेकेदारांच्या वाहनांसाठी (मुरूम डंपर) ही वाहतुकीची मोठी समस्या असताना वाहतूक नियंत्रण शाखेचा हा अजब सल्ला म्हणजे 'बालिश बहु बायकात बडबडला' असाच म्हणावा लागेल.
कोल्हापूर नाक्यावर भराव पुलाच्या कामास प्रचंड गती....
कोल्हापूर नाक्यावर उड्डाणपुलाच्या मुख्य कामानंतर भराव भिंतीसह अन्य कामे गेल्या नऊ महिन्यापासून काम ठप्प होती. मात्र गत महिन्यात या भराव कामाला सुरुवात करण्यात आली. याशिवाय गता आठवड्यात नांदलापूर येथील भरावकाम पूर्णत्वाकडे गेल्याने त्या ठिकाणची संपूर्ण यंत्रणा कोल्हापूर नाका येथे आणून भरावकाम प्रचंड गतीने सुरू करण्यात आले आहे. सध्या या भराव कामात दोन्ही बाजूला पॅनेलची भिंत उभी करून मोठ्या प्रमाणात मुरूम टाकून हा भराव कोयना पुलापर्यंत पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या दृष्टीने ठेकेदार कंपनी सदरचे काम वेगाने सुरू ठेवले आहे.
दरम्यान काल व आज कोल्हापूर नाका येथे आदानी, डी पी जैन कंपनीचे अधिकारी उड्डाणपूलाच्या भराव भिंत उभारणीच्या अनुषंगाने कोल्हापूर सातारा लेनवर कोल्हापूर नाका येथे माळी हॉटेल समोर मुख्य महामार्गावर सात मीटर हून अधिक महामार्ग वाहतुकीला सोडून इतर साडे बारा मीटर अंतरावर खुदाई करून भिंत उभी करण्याचे काम सुरू करण्याच्या तयारी करीत होते मात्र सातारा बाजूकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होईल असे कारण पुढे करून कराड शहर वाहतूक शाखाप्रमुख सदरचे काम थांबवत असल्याचे दिसून येत आहे.
...तर मोठा गंभीर प्रश्न निर्माण होणार...
वास्तविक पाहता या ठिकाणी काम सुरू झाल्यानंतर साहजिकच वाहतूकीवर परिणाम होणार आहे. मात्र ती वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेची आहे. मात्र या परिसरात माळी हॉटेल पासून अमित हॉटेलपर्यंत कोणत्याही प्रकारची वाहतूक सुरळीत न करता केवळ वाहतूक शाखाप्रमुख त्यांच्या कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यात व्यस्त ठेवण्यात धन्यता मानत आहेत. या परिसरात एसटी बस थांबा, लक्झरी व अन्य खाजगी प्रवासी वाहने थांबण्यास तातडीने मनाई केल्यास उड्डाण पुलाच्या भिंतीसह अन्य कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहेत अन्यथा याचा त्रास महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांसह कराडकर यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.
उड्डाणपूला नजीक 29.5 मीटर लांबीची भरावाची भिंत...
कोल्हापूर नाक्यावर उड्डाणपूल उड्डाणपूल नजीक शेवटच्या पिलर च्या बाजूस भरावासाठीची 29.5 मीटर लांबीची भिंत उभारली जाणार आहे. यापैकी 17 मीटर लांबीची भिंत आठ महिन्या पूर्वी गेली आहे. उर्वरित 12.5 मीटर लांबीची अर्धी भिंत उभारणी बाकी आहे मात्र ही भिंत उभारणी करताना सातारा बाजूकडे जाणाऱ्या वाहतुकीला रस्ता काही प्रमाणात कमी पडणार आहे. त्यामुळे ठेकेदार कंपनीने तातडीने गत महिन्यापासून कोल्हापूर नाक्यावर अतिक्रमणे काढून नवीन गटार बांधत रस्ता रुंदीकरण केले आहे. सदर भिंत पूर्ण उभी केल्यानंतरच भरावाचे काम पूर्ण होऊन उड्डाण पुलावरील वाहतूक पावसाळ्यापूर्वी खुली करता येणार आहे. मात्र सदर भिंत व भराव कामात विलंब झाल्यास चालू वर्षात हा उड्डाणपूल वाहतुकीला खुला होण्याची शक्यता कमी आहे.
सध्या उड्डाणपुलाची अशी आहे स्थिती....
मूळ साडेतीन किलोमीटर उड्डाणपूल पूर्णपणे उभा राहिला आहे. पूलावर सध्या एक किलोमीटर अंतरापेक्षा अधिक डांबरीकरण झाले आहे. पूलावर दोन्ही बाजूला संरक्षक कठडे, मध्यभागी दुभाजक उभारणीचे कामही पूर्णत्वास गेले आहे. स्ट्रीट लाइट्स बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नांदलापूर नजीक एक किलोमीटरचा भराव सद्यस्थितीला पूर्णत्वाकडे गेला आहे. या ठिकाणी भराव पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षक कठडे उभारणी सुरू आहे. याशिवाय उड्डाण पुलावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी पाईपलाईन जोडण्याचे काम सुरू आहे. उड्डाण पुलाखालील गटर, दुभाजक बांधणे ही सुरू आहे. एकंदरीत हा उड्डाणपूल कोयना पुलापासून नांदलापूर पर्यंत पाच किलोमीटर अंतराचा होणार आहे. उड्डाणपुलाखाली कोयना औद्योगिक वसाहत, कृष्णा हॉस्पिटल व ढेबेवाडी फाटा नजीक केवळ वाहतुकीच्या गंभीर नियोजना अभावी उड्डाणपुलाखालून वाहतूक मात्र सध्या बंद आहे.
उड्डाणपूल हद्दीतील वाहतुकीला वाहतूक नियंत्रण शाखेचे असहकार्य...
कराड मलकापूर नांदलापूर हद्दीत पाच किलोमीटर अंतरात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. सुरुवातीला वाहतूक शाखेला सक्षम अधिकारी कार्यरत होते मात्र त्यानंतर त्याप्रमाणे अधिकारी वाहतूक शाखेला अजून मिळाले नाहीत. काम सुरू असलेल्या ठिकाणी, महामार्ग पोलीस, कराड वाहतूक नियंत्रण शाखा अधिकारी, कर्मचारी, ट्राफिक वार्डन, होमगार्ड कायम तैनात असणे गरजेचे आहे. मात्र उड्डाण पुलाची उभारणी सुरू असल्यापासून आजतागायत कोणत्याच महत्त्वाच्या कामा ठिकाणी वरील यंत्रणा तत्परतेने कार्यरत दिसली नाही. संपूर्ण पुलाच्या कामात वाहतुकीची संपूर्ण जबाबदारी ठेकेदार कंपनीच्या पीआरओ, मार्शल, सुरक्षारक्षक, सुरक्षा विभागाने अजून पर्यंत घेतलेली आहे. मात्र कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखाप्रमुखांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना केवळ सर्व ठिकाणी कारवाई करण्यावरच भर दिला. (महामार्गावर वाहतूक जाम झाल्यानंतर लोकप्रतिनिधीसह, जागरूक नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांनी फोन केल्यानंतरच वाहतूक कर्मचारी पळापळ करत होते)
राजू सनदी,
कराड टुडे न्यूज, कराड
2 months ago | [YT] | 38
View 2 replies
Karad Today
कराड नगरपरिषदेचा ऐतिहासिक निर्णय : पहिली विशेष सभा स्व. यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या समाधी परिसरात...
कराड, दि. 24 : कराड हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथे कृष्णा-कोयना संगम (प्रितीसंगम) हे प्रसिद्ध ठिकाण आहे, जिथे कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम होतो. कराड हे शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र मानले जाते.
स्व. यशवंतरावजी चव्हाणसाहेब (१९१३-१९८४) हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी १ मे १९६० रोजी स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व केले. ते पुढे भारताचे संरक्षणमंत्री, अर्थमंत्री व परराष्ट्रमंत्रीही होते. आधुनिक महाराष्ट्राच्या घडणीत त्यांचे मोठे योगदान मानले जाते. कराड हे त्यांचे कर्मभूमी मानले जाते. यशवंतरावजी चव्हाण साहेब यांचे समाधीस्थळ कराड (जि. सातारा) येथील कृष्णा-कोयना संगम परिसरात आहे. या ठिकाणाला "प्रीतिसंगम" असेही म्हटले जाते. हे स्थळ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस समर्पित आहे. अनेक दिग्गज नेते मंडळी, नागरिक, अभ्यासक व पर्यटक येथे आदरांजली वाहण्यासाठी भेट देतात. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात या स्थळाला विशेष महत्त्व आहे.
ज्यांनी महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती केली अशा स्व. यशवंतरावजी चव्हाणसाहेबांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनकही मानले जाते.
कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदी निवडून आलेल्या राजेंद्रसिंह यादव यांनी नगरपालिकेच्या इतिहासातील पहिली व नुकत्याच निवडून आलेल्या जनरल बॉडीची पहिली अर्थसंकल्पीय सभा शुक्रवार दि.२७/०२/२०२६ रोजी दु.४.०० वाजता आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी परिसरात घेण्याचा निर्णय घेतला आहे. कराडचे नाव महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक पार्श्वभूमीवर नेहमी अग्रेसर राखण्यासाठी ज्यांचे अनेक प्रयन होते ते स्व. यशवंतरावजी चव्हाणसाहेबांच्या समाधी परिसरात त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवाद करून शुक्रवार दि. २७/०२/२०२६ रोजी दु.४.०० वाजता पहिली व २०२६-२०२७ साली पहिली अर्थसंकल्पीय सभा कराड नगरपरिषदेची पहिली विशेष सभा घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
कराडचे सुपुत्र व स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रणेते स्व. यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या समाधी परिसरात घेण्याचा निर्णय नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी घेतला आहे. २०२२ सालापासून नगरपालिकेवर प्रशासक राज होते. ते संपुष्टात आले आहे. नगरपालिकेत नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आले असून लोकनियुक्त प्रतिनिधी कारभारास प्रारंभ करणार आहेत. हा कारभाराचा प्रारंभ स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करून होणार आहे.
यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचा आदर्श, आपण कोणतेही शुभ कार्य हातात घेताना आई-वडिल व थोरांना वंदन करतो. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब तर केवळ कराडचेच नसून अखंड महाराष्ट्राचे आदर्श आहेत. त्यामुळे त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून व त्यांच्या विचारांच्या मार्गदर्शनाने आणि आशिर्वादाने कराड नगरपालिकेच्या कारभारास प्रारंभ करणार आहे. स्व. यशवंतरावजी चव्हाणसाहेबांच्या वैचारिक वाटचालीने कराड नगरपालिका भविष्यात काम करेल.
यानिर्णयावेळी कराडचे उपनगराध्यक्ष श्री. प्रतापराव साळुंखे, नगरसेवक श्री. जयंतकाका पाटील व मुख्याधिकारी श्री. प्रशांत व्हटकर देखील उपस्थित होते. सर्वत्र या विचाराचे व निर्णयाचे कौतुक होताना दिसून येत आहे.
2 months ago (edited) | [YT] | 75
View 2 replies
Karad Today
निवडणुकीच्या बदलत्या चाली आणि रीतीमुळे लोकशाहीला धोका - विश्वास पाटील...
कराड, दि. 18 - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व थोर हुतात्म्याने भारतीय लोकशाही निकोप व्हावी म्हणून निवडणुकीची पद्धत दिली .मात्र कदाचित भारताच्या आजूबाजूच्या शत्रूकडून भारतीय लोकशाहीला धोका पोहोचणार नाही. मात्र निवडणुकीच्या बदलत्या चाली आणि रीतीमुळे लोकशाहीला धोका निर्माण होईल की काय ? अशी भीती थोर साहित्यिक पानिपतकार विश्वासराव पाटील यांनी व्यक्त केली. तर अशा पार्श्वभूमीवर लोकांना स्पष्टपणे न्याय देणाऱ्या भूषण गवई एका झुंजार न्यायमूर्तीचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार हा जणू थोर हुतात्म्याचा आशीर्वादच आहे.
उंडाळे येथील स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या ५२ व्या स्मृतिदिनानिमित्त व ४३ वा स्वातंत्र्य संग्राम सैनिक व माजी सैनिक मेळावा आणि यावर्षीचा स्वातंत्र्य दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह सन्मानपत्र व रोख ५१ हजार रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. या कार्यक्रमास मेघालय हायकोर्टाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती रणजीत मोरे, मुंबई हायकोर्टाचे सेवानिवृत्ती न्यायमूर्ती प्रदीप देशमुख पाटील, अँड उदयसिंह उंडाळकर, अँड विजयराव पाटील उंडाळकर, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विश्वासराव पाटील म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात थोर हुतात्म्यांने त्यागाचे बलिदान दिले.आज त्यांच्या त्यागामुळे समाजव्यसस्था उभारली असली तरी सामाजिक विषय आहेत.त्याचा आशय आपण विसरता कामा नये अन्यथा आपण आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची आपल्या आजादीच्या लढाईची प्रथरणा केली असे ठरेल. पूर्वी तुझी जात कोणती? हे विचारले जायाचे . आता तुझा धर्म कोणता म्हणून विचारले जात आहे.भगवान बुद्ध, भगवान महावीर ,शिवाजी महाराज, महात्मा गांधी ते डॉ बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या दृष्टीने माणूसकीचा धर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. त्यामुळे कुठलाही धर्म मोठा असू शकत नाही.
लोकशाही मधील अनिष्ट प्रथा आहेत. लोकशाही निकोप व्हावी म्हणून मतदानाचा हक्का दिला.कुणाला ही एकट्या व्यक्तीला लोकशाहीचा अधिकार जाऊ नये म्हणून गावाच्या ग्रामपंचायती पासून पार्लमेंट पर्यंत लोक निवडून द्यावेत हे डॉ बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं पण आता निवडणूक आली की पोटात गोळा उठतो ? कधी एकदा संपते निवडणूक अशी स्थिती निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या काळात हिंसाचार ,भ्रष्टाचार आणि अत्याचार होतात की ?नको ही निवडणूक ? अशी मानसिकता निर्माण होऊ लागली आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर व थोर हुतात्म्याने भारतीय लोकशाही निकोप व्हावी म्हणून निवडणुकीची पद्धत दिली .मात्र कदाचित भारताच्या आजूबाजूच्या शत्रूकडून भारतीय लोकशाहीला धोका पोहोचणार नाही. मात्र निवडणुकीच्या बदलत्या चाली आणि रीतीमुळे लोकशाहीला धोका निर्माण होईल की काय ? अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
सेवानिवृत्त सर न्यायाधीश भूषण गवई म्हणाले, स्वतंत्र भारतीय लढ्यात अग्रणी असणाऱ्या दादासाहेब उंडाळकर यांचे योगदान मोलाचे आहे.त्यांनी महात्मा गांधींच्या व यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कराड येथे २४ ऑगस्ट रोजी काढलेला मोर्चा हा स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचा दिवस ठरला आहे. सत्याग्रह व भूमिगत आशा दोन पद्धतीने स्वातंत्र्य लढ्याची उभारणी करणेत आली होती. यशवंतराव चव्हाण साहेब हे भूमिगत तर दादासाहेब उंडाळकर हे सत्याग्रह पध्दतीने लढा देत होते.
स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असताना ही विभागातील शिक्षण पाणी या सारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले.शिक्षणाची त्यांनी कधीच कास सोडली नाही.म्हणून त्यांनी आपल्या तीन मुलांना उच्च शिक्षित करणे बरोबर सर्वसामान्य लोकांना मुलांना शिक्षण मिळवे म्हणून शिक्षण दालन उभे केले हे त्यांचे कार्य कधीच पुसले जाणार नाही.स्वर्गीय विलासकाका पाटील यांचे माझ्या जीवन घडणेत मोलाचे योगदान असून त्यांचे आणि माझ्या कुटुंबाचे कौटुंबिक संबंध होते.आज त्यागाची भूमी असणाऱ्या उंडाळे गावात थोर स्वातंत्र्य सैनिक दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने देण्यात आलेला दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार हा थोर साहित्यिक विश्ववासराव पाटील यांचे हस्ते प्रदान केला त्याबद्दल त्यांनी स्मारक समितीचे आभार मानून पुरस्काराची रोख रक्कम ५१ हजार इतक्या रक्कमेचा धनादेश स्मारक समितीला देण्याचे जाहीर करून ही रक्कम दहावी च्या विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात देण्यासाठी स्मारक समितीला धनादेश दिला.
प्रास्ताविक व स्वागत अँड उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे परिचय करून देण्यात आले तर आभार प्रा धनाजी काटकर यांनी मानले.या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी सैनिक ,वकील रयत संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
2 months ago (edited) | [YT] | 24
View 4 replies
Karad Today
स्वा. दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार यंदा भूषण गवई यांना जाहीर...
कराड, दि. 13 - स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर स्मारक समिती यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा "स्वा. दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार" यावर्षी देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांना जाहीर करण्यात आला आहे. समितीचे विश्वस्त व जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी समितीचे विश्वस्त प्राचार्य गणपतराव कणसे उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या ५२ व्या स्मृतिदिनानिमित्त उडाळे येथे दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या ४३ व्या स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळाव्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 51 हजार रुपये रोख शाल श्रीफळ व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वासराव पाटील यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार असून, यावेळी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष व मेघालय उच्च न्यायालय चे निवृत्त न्यायमूर्ती रणजीत मोरे तसेच मुंबई उच्च न्यायालय चे निवृत्त न्यायमूर्ती प्रदीप देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
उंडाळे येथे दरवर्षी दादासाहेब उंडाळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशन आयोजित करण्यात येते. सन १९७६ पासून लोकनेते विलासकाका पाटील उडाळकर यांच्या संकल्पनेतून या अधिवेशनाची परंपरा सुरू असून, राष्ट्रीय पातळीवरील नामवंत विचारवत, साहित्यिक व मान्यवराच्या उपस्थितीत समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने केले जाते.
यापूर्वी या पुरस्काराने एन. जी. गोरे, उषा मेहता, गोविंदभाई श्रॉफ, निर्मला देशपांडे, जी. पी. प्रधान, प्रभाकरराव कुंटे, मोहन धारिया, वसंतराव गोवारीकर, अण्णा हजारे, पी. बी. सावंत, जयंत पाटील, अभय बंग, प्रकाश आमटे, निळकंठ रथ, यशवंतराव थोरात तसेच उज्ज्वल निकम यांच्यासह अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे.
दादा उंडाळकर स्मारक समितीच्या प्रांगणात बुधवार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार असून, स्वातंत्र्यसंग्राम सैनिक, त्यांचे वारसदार, माजी सैनिक तसेच नागरिकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दादा उंडाळकर सामाजिक ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.
2 months ago (edited) | [YT] | 20
View 2 replies
Karad Today
जिल्हा परिषद पंचायत समितीची मतमोजणी उद्या सकाळी 10 वाजता सुरू होणार...
कराड, दि. 8 - सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने सर्व मतमोजणीची सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, अति. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील यांच्यासह सर्व यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हेत्रे म्हणाले, मतमोजणी कामासाठी 230 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ईव्हीएम मशीनवरील मतमोजणीसाठी 24 टेबल तर टपाली मत मोजणीसाठी 12 टेबल सज्ज ठेवण्यात आले आहेत. टपाली मतमोजणी सकाळी १० वाजता तर ईव्हीएम मशीनद्वारे 10.15 मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक टेबलवर मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक व अन्य एक चतुर्थश्रेणी कर्मचारी अशा ३ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. एकाच वेळी १२ गट व त्याअंतर्गत येणारे गण यांची मतमोजणी सुरू होईल. मतमोजणीसाठी वेगवेगळ्या मतमोजणी प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान निकाल हाती येण्यासाठी पाल गट 25, उंब्रज गट 22, मसूर गट 23, कोपर्डे हवेली गट 20, सैदापूर गट 20, वारुंजी गट 19, तांबवे गट 20, विंग गट 19, कार्वे गट 21, रेठरे बु. गट 23, काले गट 22, येळगाव गट 24 अशा फेऱ्या होणार असून सायंकाळी पाच वाजलेपर्यंत सर्व निकाल हाती येतील.
चौकट
दरम्यान नियुक्त कर्मचाऱ्यांच्या अचूक कामकाबाबतचे प्रशिक्षण रविवारी दुपारी पार पडले. यामध्ये कर्मचाऱ्यांना अत्यंत काळजीपूर्वक व पारदर्शक काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
2 months ago | [YT] | 20
View 0 replies
Karad Today
कराड तालुक्यात 69.34 टक्के मतदान....
कराड, दि. 7 - सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने कराड तालुक्यातील सर्व ४८६ मतदान केंद्रांवर आज काही किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत, निर्भय वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. प्रशासनाच्या काटेकोर व नियोजनबद्ध कामकाजामुळे ही निवडणूक सुरळीत पार पडली आहे.
संपूर्ण कराड तालुक्याचे एकूण मतदान 69.34 झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे, अति.सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी प्रताप पाटील उपस्थित होते.
आज सकाळी 7.30 पासून सुरू झालेल्या मतदानाच्या पहिल्या दोन तासात 9.30 वाजेपर्यंत केवळ 7.23 टक्के एवढे मतदान झाले होते. यामध्ये पुरुषांचा वाटा स्त्रियांपेक्षा दुप्पट होता. त्यानंतरच्या दोन तासांमध्ये 11.30 वाजेपर्यंत 21.63 टक्के मतदान झाले. तर 1.30 वाजेपर्यंत या मतदानाची टक्केवारी 37.54 एवढी झाली दरम्यान साडेतीन वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 52.20 एवढी झाली होती.
त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार कराड तालुक्यात एकूण 146045 पुरुषांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तर 135879 स्त्रियांनी व इतर 4 अशा एकूण 281928 स्त्री-पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आणि मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवाची यशस्वी सांगता केली. एकूण 69.34 टक्के मतदान झाले.
2 months ago | [YT] | 15
View 2 replies
Karad Today
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज : निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांची माहिती...
कराड, दि. 4 - सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समितीसाठी दि. ७ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या निवडणुका शांततेत व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी झाल्याचे सांगून निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीचा सुरू असलेला उत्सव शांततेने पार पाडून जनतेने प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केले आहे. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी प्रताप पाटील उपस्थित होते.
निवडणुकीच्या संपूर्ण व्यवस्थेची माहिती देताना प्रांताधिकारी म्हेत्रे म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत मतदान होत असून मतमोजणी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. पासून सुरू होणार आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या १२ व पंचायत समितीच्या २४ गणांसाठी ४८६ मतदान केंद्रे असून एकूण ४ लाख ६ हजार ६०६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष मतदार २ लाख ६ हजार ४४९, महिला मतदार २ लाख १३४ तर इतर २३ मतदार मतदार आहेत.
या ४८६ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पूर्ण करणेकामी २१४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे पहिले व दुसरे प्रशिक्षण संपन्न झाले आहे. तिसरे प्रशिक्षण ६ फेब्रुवारी २०२६ रोजी शासकीय धान्य गोदाम कराड येथे सकाळी ९ वा. होणार आहे. ४८६ मतदान केंद्रावर मतदानासाठी पाठविण्यात येणारी ४८६ मतदान यंत्रे व दहा टक्के राखीव ५० अशी एकूण ५३६ मतदान यंत्रे सुसज्ज ठेवण्यात आली आहेत.
वरील सर्व मतदान केंद्रावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तिसरे प्रशिक्षण झाल्यानंतर ६६ एसटी बस, १८ मिनी बस व ८ जीप अशा एकूण ९२ वाहनांमधून नियुक्त कर्मचारी केंद्राकडे रवाना करण्यात येणार आहेत. मतदान केंद्रावरील मूलभूत सुविधा लाईट, पाणी, फर्निचर व रॅम्प इत्यादी परिपूर्ण करण्यात आल्या आहेत. निवारा नसलेल्या ग्रामपंचायतींच्या बाहेर मंडप उभारणी करून निवाऱ्याची सोय करण्यात येणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रचार व प्रसार करणे कामी स्वीप पथकाच्या माध्यमातून कामकाज राबविण्यात आले असून नेहमीप्रमाणे यावेळीही कराड तालुक्याची मतदानाची टक्केवारी वाढेल अशी मला खात्री असल्याचे सांगून निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी प्रशासन, पोलीस यंत्रणा, राजकीय पक्ष, उमेदवार, मतदार व समाज माध्यमे अशा सर्वच घटकांनी परस्पर सामंजस्याने आपली भूमिका पार पाडून निवडणूक हा संघर्ष नसून लोकशाहीचा उत्सव आहे, अशा भावनेतून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले.
2 months ago | [YT] | 11
View 0 replies
Karad Today
कराड शहरातील पाण्याचे मीटर चोरणारी टोळी जेरबंद...
कराड, दि. 3 - कराड शहरात चालू असलेल्या 24x7 पाणी योजनेचे पाण्याचे मीटर जानेवारी महिण्यामध्ये सोमबार पेठ, बालाजी मंदीर परिसर, शुक्रवार पेठ तसेच कराड शहरातील इतर परिसरातुन चोरी झाल्याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडीयाचे विवीध माध्यमांतून व्हायरल झालेले होते. सदरबाबत मुख्याधिकारी कराड नगरपालिका यांचेकडुन कराड शहर पोलिस ठाण्यास गुन्हा दाखल झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील तसेच कराड शहर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय दराडे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनिरी अशोक भापकर व त्यांचे टीमला सदर अनुषंगाने आवश्यक त्या सुचना दिल्या होत्या.
सदर सीसीटीव्ही फुटेज तसेच तात्रिंक माहितीच्या आधारे दिनांक 02/02/2026 रोजी सायंकाळी साईमंदीर दत्त चौक कराड येथे आरोपी नामे (1) दिपक बाबासो पवार वय 19 वर्ष रा. पाटण कॅलनी कराड व (2) अविनाश गणेश अवघडे वय 22 वर्ष शुक्रवार पेठ, कराड यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे सखोल तपास केला असता त्यांनी पाण्याचे मीटर चोरी केलेचे कबुल केले असुन त्यांचेकडुन 37,500/- रुपयाचे एकुण 15 पाण्याचे मीटर जप्त केले आहे. नमुद आरोपींकडे आणखी सखोल तपास करुन इतर चोरीचे आणखी गुन्हे किंवा अन्य कोणी साथीदार आहेत याबाबत अधिक तपास करीत आहे.
2 months ago | [YT] | 18
View 0 replies
Load more