गाव भटकंती #gavbhatkanti
चला निसर्ग आणि माणुसकीची शाळा शिकायला!
- ही शर्यत नाही… हा एक सुंदर प्रवास आहे – "गावभटकंती" चा!
- जुन्या परंपरा आणि आठवणी.
- या गाव आपलेच आहे.
- गावातील संस्कृती निसर्ग अप्रतिम फोटो आणि खाद्यपदार्थ पाण्यासाठी आताच फॉलो करा.
- आठवणी गावाकडच्या । लोककला । सण-उत्सव.
- follow बटणावर क्लिक करा आणि चला गाव भटकंतीला.
Gav Bhatkanti
डॉक्टरकीच स्वप्नं रंगवत - जंगलात चिमुरडी विकतेय ताक आणि सरबत !
पिशवीत सरबत आणि पुस्तक देखील
कोंडाबाई आजी केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी गड चढत नाहीत, तर त्यांना कोणासमोर हात पसरलेलं आवडत नाही. आजही किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना त्या मायेने दही-ताक देतात.
गड चढून थकलेल्या प्रवाशाला जेव्हा आजींच्या हातचं थंडगार लिंबू सरबत मिळतं, तेव्हा तो थकवा कुठल्या कुठे पळून जातो.
मिळणारे चार पैसे कदाचित खूप मोठे नसतील, पण त्या पैशांमागे असणारा प्रामाणिकपणा आणि घाम हा कोणत्याही करोडपतीच्या संपत्तीपेक्षा मौल्यवान आहे.
आज सकाळी 09:09 वाजता
गाव भटकंती – विकास ओंबळे
2 months ago | [YT] | 14
View 0 replies
Gav Bhatkanti
मंडळी नमस्कार 🙏
चांदवणे गाव… निसर्गाच्या कुशीत वसलेलं, पण कधी काळी जगापासून थोडंसं दूर राहिलेलं.
एकेकाळी इथल्या सीमांना आकार देत होत्या त्या नद्या आणि कच्चे रस्ते. तो जुना, अरुंद पूल—आमच्या संपर्काचं एकमेव, पण अतिशय कमकुवत साधन.
शिक्षण असो किंवा काम, पायी चालणं हा नशिबाचा भाग होता. साध्या बसस्टॉपपर्यंत पोहोचायलाही दोन-अडीच किलोमीटरची पायपीट करावी लागायची.
पण आता चित्र पूर्णपणे बदललंय!
आज सकाळी 11:11 वाजता
गाव भटकंती – विकास ओंबळे
3 months ago | [YT] | 18
View 0 replies
Gav Bhatkanti
मंडळी नमस्कार 🙏
विकासाने विसरलेली एक अदृश्य वस्ती
"जानु दादा असोत किंवा पांडुरंग दादा... त्यांचं आयुष्य या डोंगराच्या कुशीत आणि कच्च्या रस्त्याच्या धुळीत हरवून गेलंय. पांडुरंग दादांना फिट आली की घरच्यांची जीवाची घालमेल होते. रानात कुठे पडले असतील का? त्यांना काही लागलं असेल का? ही भीती प्रत्येक क्षणाला त्यांच्या सोबतीला असते. त्यांना फक्त रस्ता नकोय, तर त्यांना त्यांच्या हक्काचं सुरक्षित आयुष्य हवंय."
आज सकाळी 11:11 वाजता
गाव भटकंती – विकास ओंबळे
3 months ago | [YT] | 14
View 2 replies
Gav Bhatkanti
मंडळी नमस्कार 🙏
🌿 सह्याद्रीच्या कुशीतलं वेगळं जग
सह्याद्रीच्या कुशीत, घनदाट जंगलात गवताच्या छोट्याशा घरात आजही एक काकू एकट्याच राहतात. साधं जीवन, निसर्गाशी घट्ट नातं आणि वर्षानुवर्षे जपलेल्या जुन्या वस्तू — या सगळ्यांतून खऱ्या ग्रामीण जीवनाचं दर्शन घडतं.
उद्या सकाळी 11:11 वाजता
गाव भटकंती – विकास ओंबळे
Link - https://www.youtube.com/watch?v=hyqHd...
4 months ago (edited) | [YT] | 22
View 0 replies
Gav Bhatkanti
तोरणा किल्ल्याची वाघाची मावशी दिर्घ आजारामुळे हरपली…🥹
तोरणगड परिसरातील जिव्हाळ्याचं, आपुलकीचं आणि सर्वांच्या मनात घर करून राहिलेलं व्यक्तिमत्त्व — सगुणा आज्जी — यांच्या दुःखद निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक आहे.
त्यांचा प्रेमळ स्वभाव, माणुसकी, आणि गडाशी असलेली घट्ट नाळ कायम स्मरणात राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 🙏
5 months ago | [YT] | 53
View 4 replies
Gav Bhatkanti
लेक गेला… मुलगी गेली… आजारी बायको…
हिंजवडीजवळच भुकेशी लढणारा संसार…
कासार साई धरणाच्या पोटात, हाडं गोठवणाऱ्या थंडीत, काडी-कागदाच्या आधारावर कसंबसं उभं असलेलं घर,
आणि त्या घरात उदरनिर्वाहासाठी सुरू असलेली अखंड झुंज…
ही हकीकत आहे जिच्याकडे आपण पाहूनही दृष्टीआड करतो,जिच्या शेजारून जाताना आपण नजर वळवतो…
फक्त पाहण्यासाठी नाही, तर मनाला लागण्यासाठी… आणि माणूस म्हणून थोडंसं थांबून विचार करण्यासाठी…
उद्या संध्याकाळी 07:07PM
गाव भटकंती – विकास ओंबळे
5 months ago (edited) | [YT] | 17
View 0 replies
Gav Bhatkanti
मंडळी नमस्कार 🙏
Happy New Year 🎉 | Goodbye 2025
इंग्रजी नववर्षाचा पहिला व्हिडिओ येतोय…
६० वर्षांत एकदा येणारं ते ‘बी’, ज्याने बाबांना आजही तरुण ठेवलंय!
ज्या वयात माणसं चष्म्याचा नंबर आणि औषधांच्या गोळ्या मोजत बसतात, त्या वयात बाबा आजही —
९३ व्या वर्षीही तितक्याच चपळ बुद्धीचे!
जुनी चौथी शिकलेले बाबा, पण पावकी–निमकीच्या गणितात आजही तरुणांना हरवतात!
👉 उद्या शुक्रवारी सकाळी 11:11 वाजता
हा प्रेरणादायी व्हिडिओ नक्की पहा.
6 months ago (edited) | [YT] | 8
View 1 reply
Gav Bhatkanti
🙏 मंडळी नमस्कार 🙏
हे सह्याद्रीचे कडे... जिथे फक्त वारा आणि निसर्ग अधिराज्य गाजवतो. पण याच कड्यांमध्ये, एका कोपऱ्यात श्वास घेतोय एक 'जिवंत' संघर्ष!
ह्या आहेत फुलाबाई डेबे आजी. वय थकलेलं, पण पाय मात्र थांबत नाहीत. कारण प्रश्न पोटाचा नाही, तर तहानलेल्या घशाचा आहे.
👉 आज शुक्रवारी सकाळी 11:11 वाजता हा प्रेरणादायी व्हिडिओ जरूर पहा.
https://www.youtube.com/watch?v=DBcVL...
— गाव भटकंती | विकास ओंबळे
6 months ago (edited) | [YT] | 19
View 0 replies
Gav Bhatkanti
मंडळी नमस्कार 🙏
खालील लिंक वर क्लिक करून नक्की पहा. आज शुक्रवार सकाळी ११.११ वाजता
https://www.youtube.com/watch?v=5h86C...
जे जगण्यासाठी अत्यावश्यक आहे, तेही नाही…
...................................
हेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून चला ......
Gav bhatkanti
@GavBhatkanti
6 months ago | [YT] | 11
View 1 reply
Gav Bhatkanti
🙏 मंडळी नमस्कार 🙏
मोठा बदल घडवण्यासाठी मोठी मदतच लागते असं नाही, तर लागते फक्त माणुसकीची भावना…
आपली छोटीशी मदत
एका कुटुंबाच्या आयुष्याला नवी सुरुवात देऊ शकते.
👉 उद्या बुधवार सकाळी 11:11 वाजता हा प्रेरणादायी व्हिडिओ जरूर पहा.
चला, चांगुलपणाची एक साखळी सुरू करूया 💫
— गाव भटकंती | विकास ओंबळे
6 months ago | [YT] | 22
View 1 reply
Load more