Shankar Hiraman Mandekar



Shankar Hiraman Mandekar

पुणे विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री.विक्रम काकडे यांचा उमेदवारी अर्ज पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या सन्माननीय नेत्यांच्या उपस्थितीत आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आला.

माजी खासदार श्री.संजयजी काकडे आणि श्री.विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे पुणे शहरातील पक्षाची ताकद अधिक मजबूत झाली आहे. याप्रसंगी त्यांचे पक्षामध्ये मनःपूर्वक स्वागत केले.

उमेदवारीबद्दल श्री.विक्रम काकडे यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील राजकीय प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

#vikramkakade #ncp #sunetrapawar #पक्षप्रवेश #shankarmandekar

2 days ago | [YT] | 7

Shankar Hiraman Mandekar

मुळशी तालुक्यातील कोंढूर येथील अमृतेश्वर मंदिर परिसरात आयोजित ३०१ व्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित राहून राजमाता अहिल्यादेवींच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले.

अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कुशल प्रशासनातून, न्यायप्रियतेतून आणि जनकल्याणाच्या कार्यातून आदर्श राज्यकारभाराचा वस्तुपाठ घालून दिला आहे.

यावेळी कार्यक्रमाचे आयोजक जय मल्हार तरुण मंडळ, कोंढुर यांच्या वतीने करण्यात आलेल्या स्वागतपर सत्काराचा स्वीकार केला. याप्रसंगी तालुक्यातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर #अहिल्यादेवी_होळकर_जयंती #ahilyadeviholkar #shankarmandekar #ncp

3 days ago | [YT] | 5

Shankar Hiraman Mandekar

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मुळशी आदत चॅम्पियन २०२६ या बैलगाडा शर्यतील मुळशी तालुक्यातील मुलखेड येथे उपस्थित राहून बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवला.

या प्रकारच्या स्पर्धांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि क्रीडा संस्कृतीला एक नवी ऊर्जा मिळते. अत्यंत शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात या शर्यतीचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे मनापासून कौतुक करतो.

या प्रसंगी मुळशी पंचायत समितीच्या सभापती मंदाताई बाबाजी शेळके, मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुखदेव मांडेकर, यांच्यासह परिसरातील अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी, सहकार क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आणि बैलगाडा शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#बैलगाडा_शर्यत #मुळशी #बैलगाडा #bailgada #shankarmandekar

3 days ago | [YT] | 18

Shankar Hiraman Mandekar

काल मध्यरात्री १ च्या सुमारास नांदे चौक (ता.मुळशी) येथे सुरू असलेल्या रस्ते डांबरीकरण कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.

नागरिकांच्या करातून उभे राहणारे हे रस्ते दीर्घकाळ टिकणारे असावेत, यासाठी कामाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड केली जाणार नाही ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी ठाम भूमिका आहे.

#workinprogress #roaddevelopment #shankarmandekar #ncp #development

4 days ago | [YT] | 18

Shankar Hiraman Mandekar

📍व्ही. जे. हॅपीनेस स्ट्रीट, हिंजवडी फेज २ इन्फोटेक पार्क

हिंजवडी फेज २ येथील व्ही. जे. हॅपीनेस स्ट्रीट येथे रशईट (RushEat) या नूतन हॉटेलचा शानदार उद्घाटन सोहळा आज माझ्या हस्ते संपन्न झाला.

आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात ऋषिकेश किशोर झगडे या तरुणाने सुरू केलेला हा व्यवसाय कौतुकास्पद आहे. आजचा तरुण केवळ नोकरीच्या मागे न धावता, स्वतःचा उद्योग सुरू करून इतरांना रोजगार देत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.

युवा उद्योजक ऋषिकेश झगडे आणि त्याच्या संपूर्ण टीमला या नवीन व्यवसायाच्या प्रगतीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

#newbusiness #hotelindustry #inaugurationceremony #shankarmandekar #hinjawadi

4 days ago | [YT] | 11

Shankar Hiraman Mandekar

📍शितोळे पेट्रोलियम उद्घाटन सोहळा, कासारसाई (ता.मुळशी)

आज शितोळेबाग, कासारसाई येथे शितोळे पेट्रोलियम या नूतन CNG पंपाचे उद्घाटन माझ्या आणि इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

या नवीन CNG पंपामुळे कासारसाई, हिंजवडी परिसरातील वाहनधारकांची मोठी सोय होणार असून, पर्यावरणाच्या दृष्टीनेही हे एक चांगले पाऊल ठरेल. या व्यवसायाच्या भरभराटीसाठी शितोळे परिवाराला मनस्वी शुभेच्छा प्रदान केल्या.

या उद्घाटन सोहळ्यास परिसरातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, संपूर्ण शितोळे परिवार, त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, हितचिंतक आणि कासारसाईचे ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

#उद्घाटन #cngpump #कासारसाई #inauguration #shankarmandekar

4 days ago | [YT] | 6

Shankar Hiraman Mandekar

आज नसरापूर (ता. भोर) येथे विविध विकासकामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी गावातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या कामाचा आढावा घेतला. सदर इमारतीचे काम अत्यंत दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असावे, जेणेकरून रुग्णांना उत्तम सुविधा मिळतील, असे कडक निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.

​तसेच, नसरापूर येथील कातकरी वस्तीतील आपल्या बांधवांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. कातकरी वस्तीच्या घरकुलासाठी वन विभागाकडून १२ गुंठे जागा उपलब्ध झाली आहे. आज या जागेची पाहणी करून वनविभाग व प्रांत कार्यालयाकडून लवकरात लवकर संयुक्त मोजणी पूर्ण करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मोजणी पूर्ण होताच घरकुलाचे काम तातडीने सुरू केले जाईल.

​या पाहणी दौऱ्याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, भोर पंचायत समितीचे उपसभापती विशाल कोंडे, गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, नसरापूरच्या सरपंच उषा कदम, माजी उपसरपंच संदिप कदम यांच्यासह विविध पक्ष पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

#nasrapur #developmentwork #healthcare #gharkulyojana #shankarmandekar

5 days ago | [YT] | 13

Shankar Hiraman Mandekar

आज कापूरहोळ ते भोर-मांढरदेवी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.

सद्यस्थितीत या रस्त्याची दुरवस्था झाली असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या रस्त्याच्या दुरुस्तीची कामे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने मार्गी लावण्याच्या सक्त सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

​या पाहणी दौऱ्याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, भोर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष रामचंद्र नाना आवारे, भोर पंचायत समितीच्या सभापती मनिषाताई संतोष कंक, उपसभापती विशाल कोंडे, पंचायत समिती सदस्य राजेश बोडके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता राजेसाहेब आगळे उपस्थित होते. तसेच खानापूर, भोलावडे, आणि संगमनेर गावातील स्थानिक नागरिकांसह इतर आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

#भोर_राजगड_मुळशी #bhor_rajgad_mulshi #development #shankarmandekar #पाहणी_दौरा

5 days ago | [YT] | 25

Shankar Hiraman Mandekar

कोळवण-वाळेण (ता.मुळशी) येथील नादुरुस्त पुलाची पाहणी आणि मंजूर पुलाच्या निविदा प्रक्रियेचे निर्देश

कोळवण वाळेण गावांना जोडणाऱ्या नादुरुस्त पुलामुळे स्थानिक ग्रामस्थांना होणारी गैरसोय आणि संभाव्य धोका लक्षात घेता, आज प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पुलाची पाहणी केली.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या लोकहितवादी विचारांचा वारसा सक्षमपणे पुढे घेऊन जाणाऱ्या राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मा.ना.श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांच्या माध्यमातून या पुलासाठी ४ कोटी १५ लक्ष रुपये मंजूर झाले आहेत.

या कामाची निविदा प्रक्रिया (Tender Process) युद्धपातळीवर राबवून, प्रत्यक्ष कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्याच्या सूचना व पुल दुरुस्तीचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

या पाहणी दौऱ्यादरम्यान कार्यकारी अभियंता राजेंद्र डुबल, तहसीलदार विजयकुमार चोबे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजय मडगे, जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अंकुश मोरे, मुळशी तालुका पंचायत समितीचे सदस्य प्रवीण धनवे, मुळशी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबाजी शेळके, मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुखदेव मांडेकर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक यशवंत गायकवाड यांच्यासह विविध मान्यवर, पक्ष पदाधिकारी व कोळवण-वाळेण परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

#मुळशी #पाहणी_दौरा #shankarmandekar #ncp #mulshi

6 days ago | [YT] | 9

Shankar Hiraman Mandekar

आज राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा.ना.श्रीमती सुनेत्रा वहिनी पवार यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी मतदारसंघातील प्रमुख विकासकामे, पक्ष संघटन आणि आगामी काळातील ध्येयधोरणांबाबत विस्तृत चर्चा केली. आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या मार्गदर्शनाखाली भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघाच्या विकासाची घोडदौड अशीच जोमाने सुरू राहील.

#sunetrapawar #dcm #shankarmandekar #ncp #ajitpawar

1 week ago | [YT] | 34