Hello, welcome to kusti hech jivan youtube channel. Wrestling is the lifeblood of a digital media company that is always on the lookout for important news and developments in the field of wrestling. Our entire team is working to grow our soil games and promote these games on digital media platforms.
mail id- kustihechjivan@gmail.com
कुस्ती हेच जीवन kusti hech jivan
कोण होणार हिंद केसरीचा मानकरी..?
Mahend Gaikwad Vs Pruthaviraj Mohol
#hindkesari
1 week ago | [YT] | 39
View 0 replies
कुस्ती हेच जीवन kusti hech jivan
कुस्ती क्षेत्रासाठी एक धक्कादायक बातमी...
युवा कुस्तीपटू, महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान राहुल कोरडे यांचे दुःखद निधन झाले आहे.
ही बातमी समजताच संपूर्ण कुस्ती विश्वावर शोककळा पसरली असून, एक होतकरू आणि दमदार खेळाडू काळाच्या पडद्याआड गेला आहे.
त्यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्राची मोठी हानी झाली असून, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व परिवाराला हे दुःख सहन करण्याची ताकद देवो, ही भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻
1 month ago | [YT] | 138
View 2 replies
कुस्ती हेच जीवन kusti hech jivan
महाराष्ट्र केसरी 2026 : रंगतदार लढतींकडे लक्ष
महाराष्ट्रातील मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा स्पर्धेचा थरार शिगेला पोहोचला असून यंदाच्या किताबासाठी अव्वल पैलवानांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. माती आणि गादी या दोन्ही विभागांतील सामने अत्यंत तोडीस तोड होणार असल्याने कुस्ती रसिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
माती विभागात आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध सिकंदर शेख याचा सामना तंत्रशुद्ध आणि संयमी महेन्द्र गायकवाड याच्याशी होणार आहे. दोन्ही पैलवानांचा अनुभव आणि ताकद लक्षात घेता ही लढत अत्यंत चुरशीची ठरणार आहे.
तर गादी विभागात वेगवान आणि आक्रमक हर्षद सदगिर याचा मुकाबला धक्कादायक निकालासाठी ओळखल्या जाणाऱ्या पैलवान जयदीप पाटील याच्याशी होणार आहे. या सामन्यातही निकाल शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चित राहण्याची शक्यता आहे.
दोन्ही विभागांतील विजेते अंतिम फेरीत आमनेसामने येणार असून, याच लढतीतून महाराष्ट्र केसरी 2026 चा मानकरी ठरणार आहे. विजेत्याला मानाची चांदीची गदा आणि Fortuner गाडी प्रदान करण्यात येणार आहे.
धन्यवाद
पैलवान रामदास देसाई
सकल्पक: कुस्ती हेच जीवन
#maharashatrakesari
2 months ago | [YT] | 240
View 5 replies
कुस्ती हेच जीवन kusti hech jivan
" दरवर्षी महाराष्ट्रात फक्त एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हावी, यासाठी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील हे लवकरच सरकार दारी साकडं आंदोलन करणार आहेत.
या आंदोलनाला कुस्ती हेच जीवन परिवार तर्फे जाहीर पाठिंबा देत आहोत. महाराष्ट्राच्या पारंपरिक कुस्ती संस्कृतीचे जतन व्हावे आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मान व प्रतिष्ठा कायम राहावी, हीच आमची भूमिका आहे.
2 months ago | [YT] | 89
View 1 reply
कुस्ती हेच जीवन kusti hech jivan
" दरवर्षी महाराष्ट्रात फक्त एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हावी, यासाठी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील हे लवकरच सरकार दारी साकडं आंदोलन करणार आहेत.
या आंदोलनाला कुस्ती हेच जीवन परिवार तर्फे जाहीर पाठिंबा देत आहोत. महाराष्ट्राच्या पारंपरिक कुस्ती संस्कृतीचे जतन व्हावे आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मान व प्रतिष्ठा कायम राहावी, हीच आमची भूमिका आहे.
2 months ago | [YT] | 120
View 2 replies
कुस्ती हेच जीवन kusti hech jivan
*कोल्हापूरला यजमानपद मिळाल्यास महाराष्ट्र केसरी विजेत्यास १ कोटी ११ लाखांचे बक्षीस – धनंजय महाडिक*
राज्यात यंदा चार वेगवेगळ्या संघटनांकडून चार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होण्याची शक्यता व्यक्त होत असताना, या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी मोठी घोषणा केली आहे.
सर्व संघटनांनी एकमत करून शासनाच्या परवानगीने एकच अधिकृत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यात यावी आणि त्या स्पर्धेचे यजमानपद कोल्हापूर जिल्ह्याला मिळाल्यास विजेत्या पैलवानास रोख १ कोटी ११ लाख रुपये बक्षीस देऊ, अशी घोषणा त्यांनी केली.
दरम्यान, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शासनाला विनंती करून राज्यात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी व ती सांगली जिल्ह्यात भरवावी, अशी मागणी केली होती. तसेच विजेत्या महाराष्ट्र केसरीस १ कोटी रुपये बक्षीस देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.
दोन दिवसांपूर्वी बानगे (ता. कागल) येथे कुस्तीगीर संघातर्फे जिल्हा निवड चाचणी पार पडली. तसेच आशियाई सुवर्णपदक विजेते व उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १४ व १७ वर्षांखालील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रहार पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना त्यांनी शासनाने हस्तक्षेप करून एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी व ती सांगली येथे भरवावी, अशी मागणी पुन्हा केली.
त्यावर खासदार धनंजय महाडिक यांनी प्रत्युत्तर देताना स्पष्ट केले की, “जर चंद्रहार पाटील एक कोटी रुपये देत असतील, तर आम्ही कोल्हापूरकर विजेत्याला एक कोटी अकरा लाख रुपये देऊ; मात्र स्पर्धेचे यजमानपद कोल्हापूर जिल्ह्यालाच मिळाले पाहिजे.”
राज्यात चार संघटनांच्या चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत असतील, तर ही बाब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या निदर्शनास आणून देऊन त्यातून तोडगा काढण्याची विनंती करणार असल्याचेही महाडिक यांनी सांगितले.
एकच अधिकृत महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेऊन कुस्ती क्षेत्रातील संभ्रम दूर व्हावा, अशी अपेक्षा आता कुस्तीप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
धन्यवाद
*पैलवान रामदास देसाई*
संकल्पक: कुस्ती हेच जीवन
Mob no- 9594995065
2 months ago | [YT] | 69
View 3 replies
कुस्ती हेच जीवन kusti hech jivan
*वादळ, की केवळ आवाज? — पैलवान सिकंदर शेख यांच्यावर एक थेट प्रश्न*
*मनोज मस्के* पत्रकार
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या कुस्ती मैदानावर एक नाव प्रचंड गाजलं — सिकंदर शेख.
गावागावांत फड रंगले, लाखोंची बक्षिसं लागली, आणि “सिकंदर आला म्हणजे मैदान भरलं” अशी स्थिती निर्माण झाली. ताकद, आक्रमक डावपेच आणि आत्मविश्वास यामुळे त्यांनी अनेकांना अक्षरशः आसमान दाखवलं — हे नाकारता येणार नाही.
पण प्रश्न इथेच संपत नाही.
खरा प्रश्न इथूनच सुरू होतो.
लोकप्रियतेचा आलेख का घसरतो आहे?
अलीकडच्या काळात सिकंदर शेख यांच्या लोकप्रियतेत घट दिसते आहे, अशी चर्चा कुस्तीप्रेमींमध्ये ऐकू येते. त्यामागे काही मुद्दे वारंवार पुढे येतात:
महाराष्ट्राबाहेरील पैलवानांशी लढण्यासाठी एक रक्कम,
पण महाराष्ट्रातील काही पैलवानांसाठी वाढलेली मानधनाची अपेक्षा,
लाखो रुपयांच्या मैदानांत सातत्याने सहभाग,
परंतु समाजासाठी, नवोदित पैलवानांसाठी किंवा गरजूंसाठी उघडपणे मदतीचे उदाहरण फारसे न दिसणे.
हे सर्व आरोप-प्रत्यारोप असतील, कदाचित काही गैरसमजही असतील. पण धुराविना आग नसते — ही लोकमानसातील भावना आहे.
*वाद का वारंवार त्यांच्याभोवतीच*?
महाराष्ट्रात अनेक नामांकित पैलवान खेळतात. त्यांच्याही कुस्त्या तितक्याच तडाखेबंद असतात. तरीही वारंवार वादाच्या भोवऱ्यात अडकताना नाव पुढे येतं ते सिकंदरचं — असं अनेकांना वाटतं.
सोशल मीडियावर त्यांच्यासाठी तात्काळ उभं राहणारं एक गट दिसतो. व्हॉट्सअॅप स्टेटस, पोस्ट, व्हिडिओ — जणू वादळच उठतं. पण नंतर जेव्हा वस्तुस्थिती वेगळी निघते, तेव्हा शांतता पसरते.
मग प्रश्न पडतो — आपण व्यक्तीच्या बाजूने उभे आहोत, की सत्याच्या?
*महाराष्ट्राने काय दिलं — आणि परत काय अपेक्षित*?
महाराष्ट्राच्या मातीने अनेक मल्ल घडवले. लाखोंची बक्षिसं, दणदणीत स्वागत, चाहत्यांचा ओघ — हे सर्व सिकंदर शेख यांनाही मिळालं.
पण महाराष्ट्राला आता फक्त मैदानावरील करमणूक नको आहे.
महाराष्ट्राला हवा आहे —
देशासाठी लढणारा सिकंदर
आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक जिंकणारा सिकंदर
नवोदितांना डाव शिकवणारा, मार्गदर्शन करणारा सिकंदर
*आजपर्यंत महाराष्ट्र केसरी स्पर्धेत एखादा अपवाद वगळता जास्त काही दिसलेलं नाही* — हा आकडा बोलका आहे. मोठ्या फडात लाखोंची कुस्ती आणि राज्य-राष्ट्रीय पातळीवरील पदकं — या दोन्हींत फरक आहे.
पैसा, प्रसिद्धी आणि जबाबदारी
भारतीय सेनेची नोकरी सोडून पूर्णवेळ मैदानात उतरायचा निर्णय त्यांनी घेतला — हा त्यांचा वैयक्तिक निर्णय. त्यात धाडस आहे.
पण जेव्हा एखादा खेळाडू लाखोंची कमाई, अफाट प्रसिद्धी आणि लोकांची निष्ठा मिळवतो, तेव्हा त्याच्याकडून अपेक्षा वाढतात.
प्रेक्षक म्हणून आम्हाला फक्त पैशाची कुस्ती पाहायची नाही.
आम्हाला पाहायचं आहे —
तिरंगा खांद्यावर घेतलेला सिकंदर
महाराष्ट्रासाठी अभिमानाचं पदक जिंकलेला सिकंदर
आणि आपल्या मातीला परत काहीतरी देणारा सिकंदर
*शेवटचा प्रश्न — आणि विचार करण्याची वेळ*
हा लेख कोणावर टीका करण्यासाठी नाही.
हा लेख आहे आत्मपरीक्षणासाठी — सिकंदरसाठी, त्यांच्या चाहत्यांसाठी आणि आपल्यासाठीही.
वादळ उठवणं सोपं असतं.
पण इतिहास घडवण्यासाठी शांतपणे, सातत्याने, राष्ट्रासाठी घाम गाळावा लागतो.
सिकंदर शेख यांनी मने जिंकली — हे निर्विवाद.
आता वेळ आहे पदक जिंकण्याची.
कारण लोकप्रियता तात्पुरती असते, पण देशासाठी जिंकलेलं पदक कायमस्वरूपी असतं.
महाराष्ट्र वाट पाहतो आहे —
मैदानावरच्या सिकंदरची नाही,
तर देशाला पदक देणाऱ्या सिकंदरची.
#sikandarshaikh
2 months ago | [YT] | 152
View 2 replies
कुस्ती हेच जीवन kusti hech jivan
लाल मातीची मशागत... गंगावेश तालमीच्या मल्लांनी खासबाग आखाड्याच्या मातीत लिंबू, हळद, तेल, कापूर, काव ई साहित्य वापरून लाल मातीची मशागत केल.
#कुस्ती #खासबाग #maulijamadade
5 months ago | [YT] | 139
View 5 replies
कुस्ती हेच जीवन kusti hech jivan
6 months ago | [YT] | 16
View 0 replies
कुस्ती हेच जीवन kusti hech jivan
*अखेर लाल मातीच्या लढ्याला यश...*
*जानेवारी महिन्यात गोकुळ केसरी कुस्ती स्पर्धेचा रंगणार थरार..i*
अनेक वर्षापासून खंडित असलेली गोकुळ केसरी व मानधनधारक कुस्ती स्पर्धा सुरू करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त पैलवान, वस्ताद मंडळीनी 25 ऑक्टबर 2025 रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण जाहीर केले होते. मात्र गोकुळच्या संचालक मंडळाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ साहेब यांनी आज कागल येथे समस्त पैलवान मंडळींना कुस्ती स्पर्धेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी निमंत्रण देण्यात आले होते. यावेळी नाविद मुश्रीफ यांनी बोलताना सांगितले की गोकुळ संघ नेहमीच कुस्तीच्या पाठीशी असेल व खंडित असलेली गोकुळ केसरी व मानधन धारक कुस्ती स्पर्धेला माझ्या कार्यकाळात पुन्हा सुरुवात झाली तर या गोष्टीचा मला जास्त आनंद होईल. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व नगर पालिकेच्या निवडणूकीमुळे स्पर्धा जानेवारी महीन्यात घेवू असे सांगण्यात आले. यावेळी पैलवान नंदू आबदार, समीर देसाई, मारुती पवार (वस्ताद), तानाजी कुराडे, वैभव तेली, सागर शिंदे, जितेंद्र सावंत, अभी पाटील, अक्षय पाटील इ. उपस्थीत होते.
*पैलवान रवींद्र पाटील यांची यशस्वी मध्यस्थी.*
गोकुळ केसरी' ही कोल्हापूर येथील जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने आयोजित केली जाणारी एक प्रतिष्ठेची कुस्ती स्पर्धा आहे. अनेक वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन न झाल्यामुळे कुस्तीप्रेमी आणि पैलवान नाराज आहेत आणि ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्याच्या मागणी साठी जिल्ह्यातील तमाम कुस्ती शौकिन व पैलवान मंडळीनी उपोषणाचे अस्त्र हाती घेतले होते. त्यामुळें गोकुळ संघा बरोबरचा संघर्ष अटळ होता पण आशियाई सुवर्ण पदक विजेते व उप महाराष्ट्र केसरी पैलवान रवींद्र पाटील व श्री. अशोक सातुसे यांनी सदर माहिती नविद मुश्रीफ साहेबांना सांगितली व त्यांनी देखील वेळ न घालवता सर्व पैलवान मंडळींना चर्चेचे निमंत्रण देण्यास सांगितले व चर्चेतून तोडगा काढत स्पर्धा जानेवारी महीन्यात घेणार असल्याचे जाहीर केले.
कुस्ती हेच जीवनची *लढा लाल मातीच्या हक्कासाठीची चळवळ* कुस्ती पंढरीसाठी ठरतेय वरदान...
कोल्हापूर जिल्ह्यातील बंद पडलेले अनेक कुस्ती मैदाने, स्पर्धा सुरू करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम कुस्तीप्रेमी, पैलवान व वस्ताद मंडळींना हाताशी धरून कुस्ती हेच जीवन समूहाने सोशल मीडिया व्दारे *लढा लाल मातीच्या हक्कासाठी* या टॅग लाईनखाली मोठी चळवळ उभी करत कुंभी, शाहू, बिद्री सारख्या ठिकाणी लढा यशस्वी केला आहे. यापुढेही हा लढा असाच चालू राहणार असुन गोकुळ नंतर आता लवकरच जवाहर साखर कारखान्याच्या कुस्ती स्पर्धा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.
धन्यवाद.
*पैलवान रामदास देसाई*
संकल्पक: कुस्ती हेच जीवन महासंघ
Mob no- 9594995065
7 months ago | [YT] | 17
View 0 replies
Load more