कृष्णगजल- जयेश पवार

नमस्कार
रसिक मायबाप😊💐

माझ्याबद्दल सांगण्यासारखं असं काहीच नाही... जितकं तुम्हाला गजलेतून मला वेचता येईल तितका मी..
पारिजातकाच्या सड्याप्रमाणे..

विसरत गेलोय धून जी पाठांतर होती ,
वाऱ्यावर फिरवून बासरी काय लिहावे ?

एवढे लिहून झाल्यावरी काय लिहावे ?
पाऊस, वादळ, वारा, सरी.. काय लिहावे ?..

~~~~~~~
बासरी आहे तुझ्यासोबत तुझी केवळ ,
पण दिसत नाही इथे राधा ...कुठे गेली ?..

जी मला भेटायच्या आधी तुला होती ,
ती तुझी उत्सूकता आता कुठे गेली !..

★★★★

फारसे नव्हते कुणी माझ्याबरोबर
कृष्ण होता भोवताली फक्त माझ्या..

© जयेश पवार

Poet& performer/video editing - जयेश पवार
All promotion poster credit - सचिन चौरे
Google meeting credit - अनिरुद्ध वासमकर
ALL social media advertising - "team कृष्णगजल via गजलेबद्दल "

चॅनल नक्की subscribe करून बेल आयकॉनवर क्लिक करा👍👍😊म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील😊💐



कृष्णगजल- जयेश पवार

काही निवडक मराठी गजलेतील शेर- भाग (२)

पुढील भागात तुम्हाला कुठले शेर वाचायला आवडतील.. किंवा वरील पोस्टमधील कुठले शेर जास्त आवडलेत आणि त्याच गजलेतील पुढील शेर लक्षात असतील तर ते कमेंट करून नक्की सांगा..

★ आवडलेले शेर ज्यांच्यासाठी आहेत असे वाटतंय
◆ त्यांना बिनधास्त पाठवा❤️🤣😘😍..

◆ Share Your Favourite Lines and
★ mention me in your story


कवी/गजलकार - जयेश पवार @jayesh_pawarofficial2010

#jayeshpawargazal #marathimeme #MarathiKavita #marathilove #marathimotivational

3 hours ago (edited) | [YT] | 2

कृष्णगजल- जयेश पवार

तुम्हाला चांगलं माहीत आहे अशी रोमॅंटीक कविता कुणाला पाठवायची❤️😘👍..
Tag/share/ Mention With Your love❤️❤️😘


तुला वाटलंय का कधी
की 'स्पर्शाने बोलायला हवं'
किंवा असं बघ की..
'बोलायलाच हवं का?'

दोन हात एकत्र येतात
तेव्हा एक ऊब जाणवते..
आपल्याला ती ऊब होणं
जमायला हवं..

तळहाताच्या रेषांची गणित
चुकतातच म्हणा..
पण त्यासाठी कुणी हातांना
उपटून फेकून देत नाही..
"तू माझा हात पकडायचीस.. भरपावसात !.."

दिवसाच्या घडामोडींचा हिशोब
रात्रीने लावायचा नसतो..
कारण आपल्या गैरहजेरीत
वर्गात काय घडलं?
हे फक्त कल्पनेने सांगता येत .
आणि
हिशोबाची कल्पना


'अरे लोक वेड्यात काढतील आपल्याला'
तू म्हणायचीस
'अरे लोक वेड्यात काढतील आपल्याला..'
तेव्हा तुझ्या उरलेल्या शहाणपणावरही
हसू यायचं..

'लाजून हासणे अन हासून ते पहाणे..'
तुझं आवडतं गाणं..
तुला तशी खूपशी गाणी
आवडतात..
.
.
मी गाणं असतो तर ?..

आवडलो असतो नसतो माहित नाही
पण तू गुण गुणायला हवं होतंस..
तू एकदा माझ्याशी बोलायला हवं होतंस

पण ना तू स्पर्शाने बोललीस..
ना अशी....
म्हणून विचारावंस वाटलं
की

तुला वाटलंय का कधी
"स्पर्शांनी बोलायला हवं होतं ?"
किंवा..
"बोलायलाच हवं होतं का ?

कवी- जयेश पवार ‪@jayeshpawargazal‬

#jayeshpawargazal #marathimeme #MarathiKavita #marathilove #marathimotivational

1 day ago | [YT] | 12

कृष्णगजल- जयेश पवार

पुढील भागात तुम्हाला कुठले शेर वाचायला आवडतील.. किंवा वरील पोस्टमधील कुठले शेर जास्त आवडले ते कमेंट करून नक्की सांगा..

★ आवडलेले शेर ज्यांच्यासाठी आहेत असे वाटतंय
◆ त्यांना बिनधास्त पाठवा❤️🤣😘😍..

◆ Share Your Favourite Lines and
★ mention me in your story

काही निवडक मराठी गजलेतील शेर- भाग एक (१)

कवी/गजलकार - जयेश पवार
Subscribe 💝👉 ‪@jayeshpawargazal‬

#jayeshpawargazal #marathimeme #MarathiKavita #marathilove #marathimotivational

2 days ago | [YT] | 12

कृष्णगजल- जयेश पवार

बाप-❤️
मित्रांना शेअर करतोच प्रत्येक गोष्ट आपण But आज आपल्या वडिलांना पाठवायची आपण ही कविता❤️😘👍..
Tag/share/ Mention With Your Dad❤️

एक कविता वडिलांसाठी- बाबा

प्रिय बाबा,
आजवर तुमच्याशी कधी
नीट बोलणं जमलंच नाही
सगळ्या कविता आईवर
पण तुमच्यासाठी ?

ना कधी आम्ही भरभरून बोललो
ना भरभरून लिहिले
पण आज लिहिणार
आज बोलणार..

बाबा,
इतक्या जवळ असूनही
कसे हो इतके अंतर ठेवून
प्रेम करता माझ्यावर?..

कधी कळू ही देत नाही
की, आई जितकी काळजी घेते
तितकीच तुम्ही घेता
आणि प्रेमही.. पण

पण, आम्हाला आई ईश्वर
आणि बाबा परमेश्वर हे
कळायला इतका वेळ
आणि वय गेलं..

स्वतः उन्हात राहून
आमची सावली झालात
संसाराच्या खेळात कायम
बाहुली झालात...

आम्हाला तुमच्या
खांद्यावर खेळवलत
आणि आम्ही आज सोबत
चालायला लाजतो..

तुमच्याच पैशांनी
मज्जा करतो.. आणि
तुमच्याशीच बोलायला
इतके कसे माजतो?..

बाबा,
तुम्हाला एक मिठी
मारायची आहे
पण अवघड वाटते..

कदाचित जन्माचे सुख आणि
रहस्य दडले असेन त्या मिठीत..
पाया पडणे सोप्पे आणि
मिठी अवघड वाटते

तसे तुम्ही सर्वात जवळ आणि
तरीही थोडे लांब वाटत आलात..
आमच्या पदरी कायम सुखे
आणत आलात

आजही फार नाही जमणार
सवयच नाही अहो,
तुम्हाला सर्व काही सांगण्याची
जे हवं ते खरंच काही मागण्याची
कारण..

तुम्ही न मागता सर्वच काही
देत आलात आम्हाला..
लांबूनच पण मायेच्या
कुशीत घेत आलात आम्हाला..

कवितेवर कविता काय लिहावी
तुमची थोरवी कशी मांडावी
आमच्यासाठी राबताना इतके राबता की प्रत्येक घामाच्या
थेंबाची शाई व्हावी

त्याच शाईने लिहिन मी बाबा
मग सुटला तरी चालेल
मनावरचा ताबा..
पण..

जितके प्रेम आईवर
तितकेच तुमच्यावर आहे..
आईप्रमाणेच माझा
बाबसुद्धा ईश्वर आहे..

कवी- जयेश पवार ‪@jayeshpawargazal‬

#jayeshpawargazal #marathimeme #MarathiKavita #marathilove #marathimotivational

3 days ago | [YT] | 14

कृष्णगजल- जयेश पवार

मित्रांना शेअर करतोच प्रत्येक गोष्ट आपण But आज आपल्या आईला पाठवायची आपण ही कविता❤️😘👍..
Tag/share/ Mention With Your Mom❤️

मी सुंदरतेची व्याख्या
करायला गेलो तर
मला आई सुचली..
आणि..

आईची व्याख्या करायला
गेलो तेव्हा मला
ईश्वर सुचला

आता मी
ईश्वराची व्याख्या केली
तर ती फारच सुंदर सुचली..

मी पुन्हा
सुंदरतेची व्याख्या करण्याच्या
भानगडीत नाही
पडलो, कारण..

मला इतकं तरी
कळून चुकलं की
आई हीच ईश्वराने निर्माण
केलेलं ईश्वरी सौंदर्य आहे...

कवी- जयेश पवार @jayesh_pawarofficial2010

#jayeshpawargazal #marathimeme #MarathiKavita #marathilove #marathimotivational

3 days ago | [YT] | 19

कृष्णगजल- जयेश पवार

एक कविता अशीही..🔥🔥🔥
ही कविता जास्तीत जास्त शेअर होणे काळाची गरज आहे वाचकहो..

पूर्ण कविता वाचा आणि आवडलेल्या ओळी कमेंटमध्ये सांगा

आम्हाला कवी म्हणा..

कारण आम्ही पुस्तकं जरी वाचत नसलो
तरी सोशल मीडियावरच्या कविता वाचून, आमची कविता बनतेच !..

कारण, आम्हाला चार जुने कवी पाठ नसले
तरी आताच्या चार नवख्या कवींसोबत आमची सेल्फी आहे.

कारण...
आम्हाला नव्या जुन्या कविता जरी पाठ नसल्या तरी,
आम्ही स्वताचे कार्यक्रम लावतो..
आणि स्वतः सादर करतो

कारण,
आम्ही ज्या भाषेत लिहितो
तिचं व्याकरण, तिची परंपरा, कवितेची वृत्त, यमक यांचा
आम्हाला अभ्यास नसला तरी
आम्ही लिहिलेल्या कवितेवर (गाण्यावर)
पब्लिक नाचतात..

कारण
आम्ही मंचावरून कुठल्याही कवीचे, लेखकाचे नाव घेत नसलो तरी, स्वतःचे नाव या क्षेत्रात मोठं करण्याचे टॅलेंट आणि प्रायोजक आहेत आमच्याकडे..

कारण..

आम्ही पुस्तके जरी विकत घेऊन वाचली नसतील तरी आमचे कार्यक्रम आम्ही तिकीट लावूनच करतो..
पैसा महत्वाचा!

कारण..
आमच्याकडे कंटेंट, अनुभव, वाचन, अभ्यास जरी नसला
तरी पैसे, प्रायोजक, lights, कॅमेरा, मीडिया टीम, मॅनेजमेंट टीम आणि चातुर्य आहे

फक्त एकदा म्हणा... आम्हाला कवी

मग त्या कवीपुढे 'सुप्रसिद्ध' आम्ही
स्वतःच लावू!

©® जयेश पवार

पुढील पोस्टमध्ये जयेश दादांची, कुठली कविता किंवा गजल तुम्हाला पूर्ण वाचायला आवडेल ते ही कळवा❤️😍🙏

मराठी वाचत राहू, ऐकत राहू आणि लिहीत राहू..

अशाच सुंदर मराठी कविता आणि गजल वाचण्यासाठी Follow करा आपलं पेज कृष्णगजल ‪@jayeshpawargazal‬

धन्यवाद

#jayeshpawargazal #marathilove #MarathiKavita #MarathiGhazal #marathiviralpost

5 days ago | [YT] | 21

कृष्णगजल- जयेश पवार

तुम्हाला माहितीय कुणाला पाठवायची ही कविता❤️😘👍..
Tag/share/ Mention With Your Love ❤️

कवी- जयेश पवार ‪@jayeshpawargazal‬

#jayeshpawargazal #marathimeme #MarathiKavita #marathilove #marathimotivational

6 days ago | [YT] | 13

कृष्णगजल- जयेश पवार

पूर्ण गजल वाचा आणि आवडलेला शेर कमेंटमध्ये सांगा
पुढील पोस्टमध्ये जयेश दादांची, कुठली गजल तुम्हाला पूर्ण वाचायला आवडेल ते ही कळवा❤️😍🙏

मराठी वाचत राहू, ऐकत राहू आणि लिहीत राहू..

अशाच सुंदर मराठी कविता आणि गजल वाचण्यासाठी Follow करा आपलं पेज कृष्णगजल ‪@jayeshpawargazal‬

धन्यवाद

#jayeshpawargazal #marathilove #MarathiKavita #MarathiGhazal #marathiviralpost

6 days ago | [YT] | 25

कृष्णगजल- जयेश पवार

गोंडस तसा निरागस होता किती गुलाबी
पण बाहुलाच ठरला काचेत राहिल्यावर

©® जयेश पवार ‪@jayeshpawargazal‬
#jayeshpawargazal #MarathiKavita #MarathiGhazal

1 week ago | [YT] | 13

कृष्णगजल- जयेश पवार

शेवटी विझला दिवाही स्वाभिमानाने
घेतला होता वसा तेवून जाण्याचा

हो मलाही आठवत नाहीस तू आता
हा पुरावा मी मला विसरून जाण्याचा

©® जयेश पवार ‪@jayeshpawargazal‬

#jayeshpawargazal
#MarathiGhazal #MarathiKavita

1 week ago | [YT] | 25