Tejomay News Network

Media News Company
तेजस्विनी भगीरथ (बिऱ्हाडे)
तेजोमय न्युज
मुख्य संपादिका
व्हॉटसअप/मो.नंबर - (९६७३७६६२०८)

भूषण बिऱ्हाडे
तेजोमय न्युज
सह संपादक व
तेजभूषण फाऊंडेशन
संस्थापक/संचालक
व्हॉटसअप/मो.नंबर - (८६०५८९७४०८)

तेजोमय मराठी न्युज चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मनःपुर्वक स्वागत आहे.संपूर्ण देशातील घडामोडी,बातम्या आम्ही आपणास या युट्यूब चॅनल व्दारे सतत देत आहोत.सर्वसामान्य जनतेचे प्रश्न,हक्क सोडवण्यासाठी प्रयत्न करून देणे हेच आमचे ध्येय आहे.
Subscribe 💥👈☝️ करा..
तेजोमय मराठी न्युजला📢 आणि बेल🔔 आयकॉन ला क्लिक करा...
धन्यवाद...
🔰📢🔰📢🔰📢🔰📢🔰
आपल्या परिसरातील विविध प्रकारचे बातम्या आणि जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधावा..
📢✔️📢✔️📢✔️📢✔️📢

आमचे इतर चॅनल
Tejaswini Bhagirath Official
TB Loveline Studio
Tejbhushan Maharashtra YouTube Channel




Tejomay News Network

📰 तेजोमय न्यूज नेटवर्क | विशेष वृत्त 📰

🚨 शिक्षण क्षेत्राला हादरवणारा प्रकार! 🚨

📍 धारवाड, कर्नाटक

एका विद्यापीठातील प्राध्यापकाविरुद्ध संशोधक विद्यार्थिनीने गंभीर आरोप केल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकरणात विद्यार्थिनीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

⚖️ आरोप आणि प्रत्यारोपांदरम्यान सत्य काय आहे, हे चौकशीअंतीच स्पष्ट होणार आहे.

👉 कोणत्याही प्रकरणात न्यायालयीन निर्णय येईपर्यंत संबंधित व्यक्ती दोषी असल्याचे मानले जात नाही.

🗣️ शैक्षणिक संस्थांमध्ये सुरक्षित, सन्मानजनक आणि विश्वासार्ह वातावरण निर्माण होणे ही काळाची गरज आहे.

📰 तेजोमय न्यूज नेटवर्क
"जनतेचा आवाज, सत्याचा ध्यास"

👩‍💼 मुख्य संपादिका : तेजस्विनी भगीरथ

📞 संपर्क : 9673766208

#तेजोमयन्यूजनetwork #MarathiNews #BreakingNews #EducationNews #Karnataka #Dharwad #UniversityNews #NewsUpdate #TejaswiniBhagirath #SocialAwareness #LatestNews #TejomayNewsNetwork #ViralNews #EducationalNews #JusticeForAll

3 weeks ago | [YT] | 0

Tejomay News Network

⚖️ हुंडा मागणे आणि सुनेच्या कुटुंबाचा अपमान करणे हे केवळ चुकीचेच नाही, तर सामाजिकदृष्ट्याही गंभीर कृत्य आहे.

विवाह हा दोन कुटुंबांमधील सन्मान, विश्वास आणि प्रेमाचे नाते आहे. कोणत्याही महिलेचा किंवा तिच्या माहेरच्या लोकांचा अपमान स्वीकारार्ह नाही.

सन्मान द्या, अपमान नाही! ✨

#हुंडामुक्तसमाज #महिलाअधिकार #कायदेशीरमाहिती #सन्मान #विवाह #महिलासुरक्षा #LegalAwareness #AdvTejaswiniKBhagirath #Justice #RespectWomen

3 weeks ago | [YT] | 3

Tejomay News Network

'टीसी'साठी पैसे मागितल्यास शाळा-कॉलेजवर कारवाई !

विद्यार्थी आणि पालकांना लुटणाऱ्या शाळा-महाविद्यालयांना शिक्षण विभागाने दणका दिला आहे. शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) आणि गुणपत्रिका (मार्कलिस्ट) देताना कोणतीही रक्कम आकारू नये, असे स्पष्ट करीत बेकायदेशीर वसुली करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

शिक्षण उपसंचालक डॉ. वंदना वाहूळ यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, काही शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांची अडवणूक सुरू केली होती. जिल्ह्यातील काही नामांकित शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रति विद्यार्थी तब्बल २०० रुपये उकळले जात असल्याच्या तक्रारी पालकांनी थेट ई-मेल आणि लेखी स्वरूपात शिक्षण विभागाकडे केल्या होत्या. कोणत्याही शाळेने अशा

पैसे परत करा !

महत्त्वाची प्रमाणपत्रे मोफत देणे बंधनकारक आहे, तरीही नियमांची पायमल्ली करणाऱ्या संस्थांनी विद्यार्थ्यांकडून घेतलेली रक्कम तात्काळ परत करावी; अन्यथा आर्थिक दंडासह थेट प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागेल, असा दम माध्यमिक शिक्षण विभागाने दिला आहे.

प्रकारे अतिरिक्त पैशांची मागणी केली, तर त्याची तक्रार तात्काळ स्थानिक शिक्षण अधिकारी किंवा थेट शिक्षण संचालनालयाकडे लेखी अथवा ई-मेलद्वारे करावी, असे आवाहन वाहूळ यांनी केले आहे.

तेजोमय न्यूज नेटवर्क
मुख्य संपादिका: तेजस्विनी भगीरथ

#BreakingNews #TCNews #EducationNews #SchoolNews #CollegeNews #StudentRights #ParentAwareness #MaharashtraNews #MarathiNews #LatestNews #EducationDepartment #TC #Marksheet #ViralNews #TrendingNow #NewsUpdate #TejomayNews #TejaswiniBhagirath #PuneNews #AlandiNews #विद्यार्थी #पालक #शिक्षण #मराठीबातम्या #शाळा #महाविद्यालय #टीसी #गुणपत्रिका #शिक्षणविभाग #तेजोमयन्यूज

3 weeks ago | [YT] | 3

Tejomay News Network

ठाण्यात धक्कादायक प्रकार!
"रस्त्यावर थुंकू नका" म्हणणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला रिक्षाचालकाची बेदम मारहाण

ठाणे : शहरात संतापजनक घटना घडली असून, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीला विरोध करणे एका ज्येष्ठ नागरिकाला महागात पडले. रस्त्यावर घाण करणाऱ्या आणि थुंकणाऱ्या रिक्षाचालकाला एका ज्येष्ठ नागरिकाने जाब विचारला. याचा राग मनात धरून संबंधित रिक्षाचालकाने भररस्त्यात ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सार्वजनिक स्वच्छतेबाबत जागरूकता दाखवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकावर झालेल्या हल्ल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

#ठाणे #ThaneNews #CrimeNews #SeniorCitizenAttack #MarathiNews #BreakingNews #ThanePolice #SocialMediaViral

3 weeks ago | [YT] | 1

Tejomay News Network

🛑 ब्रेकिंग न्यूज | मोठा राजकीय निर्णय

राघव चड्डा यांना उपनेतेपदावरून हटवण्यात आले असून, त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आम आदमी पक्षने घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, चड्डा यांच्या राज्यसभेतील भूमिकेवरही काही मर्यादा घालण्यात आल्याची चर्चा आहे.
या घडामोडींमुळे पक्षातील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा समोर आले असून, आगामी काळात याचे मोठे परिणाम दिसू शकतात.

#RaghavChadha #AshokMittal #AAP #RajyaSabha #BreakingNews #PoliticalUpdate #DelhiPolitics #IndianPolitics

3 months ago | [YT] | 0

Tejomay News Network

नगरसेवक निवडण्याचा अधिकार जनतेचा असतो निवडून गेलेल्या नगरसेवकांमधून महापौर उपमहापौर निवडण्याची जबाबदारी किंवा अधिकार हा त्या त्या राजकीय पक्षाचा असतो आणि स्वीकृत नगरसेवक निवडण्याचा अधिकार किंवा नेमण्याचा अधिकार हा आयुक्तांना असतो हे नीट लक्षात घ्या. चांगला समाज घडवण्याची पुढील पिढीला भविष्य देण्याची जी आवश्यकता आहे त्यासाठी समाजातील बुद्धिमान विद्वान विविध क्षेत्रात चमक दाखवणाऱ्या लोकांची सुद्धा हा समाज पुढे नेण्यासाठी गरज असते म्हणून विशेष लोकांना एक्सपर्ट लोकांना एक्सपर्ट लोकांना स्वीकृत नगरसेवक होऊन विकासासाठी आपले योगदान देता यावे यासाठी स्वीकृत नगरसेवक नामनिर्देशित नगरसेवक नॉमिनेटेड नगरसेवक अशी संकल्पना आहे. त्यामुळे ज्यांना स्वीकृत नगरसेवक होण्याची इच्छा आहे ते निवडून गेलेल्या राजकीय पक्षाचेच असावेत किंवा विरोधी पक्षाचे नसावेत असा कायदा नसून ते भारतीय नागरिक असावेत ते त्या पालिका क्षेत्रात राहणारे असावेत आणि कोणत्याही क्षेत्रात मग ते डॉक्टर असेल वकील असेल इंजिनिअर असेल प्राध्यापक असेल अगदी कोणतीही डिग्री नसेल परंतु सामाजिक कार्य उल्लेखनीय असेल अशा सर्वांना स्वीकृत नगरसेवक करण्याची जबाबदारी ही त्या ठिकाणी नियुक्त असलेल्या आयुक्तांची असते आणि या संदर्भातील योग्य तो जीआर लपवून पहा पालिकेचे अधिकारी कशा प्रकारचे प्रसिद्धी पत्रक काढत असतात. चलाखी हात चलाखी का काम चुकारपणा काय काय म्हणावे.?

4 months ago | [YT] | 2

Tejomay News Network

अजित पवारांच्या विमान अपघातावर ममता बॅनर्जींचा संशय; सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी

बातमी:
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनास कारणीभूत ठरलेल्या विमान अपघातावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संशय व्यक्त केला आहे. त्यांनी या घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करत सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली तपास करण्याचे आवाहन केले आहे. देशात कुणीही सुरक्षित नसल्याचे सांगत, सर्वोच्च न्यायालयाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही यंत्रणेवर विश्वास नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

#AjitPawar #MamataBanerjee
#PlaneCrash #PoliticalNews
#BreakingNews #SupremeCourt
#IndependentInquiry #IndianPolitics
#MaharashtraPolitics #WestBengalPolitics
#NationalNews #ViralNews
#NewsUpdate

👉 अशाच ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या पेजला Subscribe करा!
📰 राजकारण, सामाजिक घडामोडी आणि ब्रेकिंग न्यूज सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आत्ताच जोडलेले राहा.
🔔 अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका!

5 months ago | [YT] | 0

Tejomay News Network

#बारामतीविमानअपघात या दुर्दैवी घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री #अजितपवार यांच्यासह आणखी चार जणांचा मृत्यू झाला.
या अपघातातील मृतांमध्ये विमानाचे वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, सहवैमानिक कॅप्टन शांभवी पाठक, वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदित जाधव आणि केबिन क्रू सदस्य पिंकी माळी यांचा समावेश आहे.
दिल्लीचे रहिवासी असलेले कॅप्टन सुमित कपूर हे अत्यंत विश्वासार्ह आणि वरिष्ठ जेट कमांडर म्हणून ओळखले जात होते. विशेष म्हणजे त्यांचा मुलगाही त्याच कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत आहे.
केबिन क्रू सदस्य पिंकी माळी या मुंबईतील बीडीडी चाळ परिसरातील रहिवासी होत्या. त्यांचे वडील शिवकुमार माळी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी (NCP) संबंधित आहेत.

#BaramatiPlaneCrash #AjitPawar
#BreakingNews #MaharashtraNews
#PlaneCrash #RIP
#Condolences #MumbaiNews
#PoliticalNews #IndianNews
#ViralNews #TrendingNow
#PrayForVictims #RestInPeace
#NewsUpdate

5 months ago | [YT] | 10

Tejomay News Network

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असून ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही बारामतीसाठी रवाना. राज्यात आज शासकीय सुटी जाहीर करण्यात आली असून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

5 months ago | [YT] | 1