We all carry stories within us — the good, the bad, and even the uncomfortable truths we rarely speak about. This channel is not just mine… it is a reflection of your story, our story, and the journey we are walking together.
If you’re already a part of this community, I am truly grateful for your support. And if you haven’t subscribed yet, I warmly invite you to join us. One small click from you can fuel my passion in a thousand different ways and help this journey grow stronger every single day.

Let’s continue building something meaningful — together. ❤️

दुनिया गोल है. तुमच्या माझ्या जगण्यातला समान धागा दाखवणारं चॅनल..
तुमच्या माझ्या जगण्याची गोष्ट..
आपले प्रश्न मांडणारं, त्यावर उत्तर शोधणारं चॅनल..
दोन टोकांवर उभ्या मनांना जोडणारी कहाणी,
मतभेदांतूनही शोधणारी सामंजस्याची निशाणी.
व्यक्त होण्यासाठी तुमचं हक्काचं व्यासपीठ,
- Harshada Swakul ❤️


Harshada Swakul

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुढचा दौरा ठरला - ऑस्ट्रेलिया...
तुमची एका वाक्यात (संविधानिक भाषेत 😊) प्रतिक्रिया द्या..

2 days ago | [YT] | 61

Harshada Swakul

26 मे ला पंतप्रधानपदी नरेंद मोदी येऊन 12 वर्ष होतील.. त्यातल्या 10 वर्षांची balance sheet ऐकायची असेल तर हा वीडियो जरूर बघा

3 days ago | [YT] | 71

Harshada Swakul

किती लाजिरवाणी परिस्थिती आहे बघा... 👇

1 week ago | [YT] | 32

Harshada Swakul

टूर निघाली... कुणाची कुठे काय होणार... नवीन वीडियो जरूर बघा

2 weeks ago | [YT] | 26

Harshada Swakul

NEET परीक्षा देऊनही आता रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे किती मोठे नुकसान झाले आहे हे एक विद्यार्थीच समजू शकतो.. सांगू शकतो. आपल्या यूट्यूब subscribers मध्ये ही परीक्षा दिलेले कुणी असतील तर कमेन्ट बॉक्स मध्ये सांगा रद्द होण्याचा फटका कसा बसलाय ते..

2 weeks ago | [YT] | 150

Harshada Swakul

हा व्हिडिओ आकडे, धोरणं आणि आर्थिक वास्तव समजून घेण्यासाठी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की नागरिकांनी फक्त प्रतिक्रिया न देता अर्थकारण समजून घेतलं पाहिजे — तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.

2 weeks ago | [YT] | 77

Harshada Swakul

International Mother's Day Special Episode.. आई म्हणून जगताना जे जे मनात आलं ते बोलत गेले.. जरूर ऐका..

2 weeks ago | [YT] | 14

Harshada Swakul

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..

मी महाराष्ट्राची आहे, मराठी आहे—हे माझं ओळखपत्र नाही, तर माझा जन्मजात अभिमान आहे.

पण महाराष्ट्राचा अभिमान नेमका कशात आहे?
सह्याद्रीच्या डोंगररांगांत? दर कोसावर बदलणाऱ्या मायबोलीत? रानावनांतून डोकावणाऱ्या विविध संस्कृतीत? की संथ वाहणाऱ्या गोदावरीत?

माझ्यातला खरा अभिमान कुठून येतो?
तो येतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निर्भयतेतून.
तो येतो ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणक्रांतीतून.
तो येतो राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समतेच्या विचारातून.
तो येतो माणूस म्हणून प्रगल्भ करणाऱ्या संतपरंपरेतून.

हा महाराष्ट्राचा खरा पाया आहे—आणि तोच अभिमान मला पुढच्या पिढीकडेही सोपवायचाय.

हा पाया आपण मान्यही करतो, हे विचार बोलूनही दाखवतो. पण आज प्रखर होत चाललेल्या राजकीय गोंगाटात हे विचार जगायचे म्हटलं तर गुदमरायला का होतं?

शिवरायांना फक्त जपायचं, पण त्यांचा विचार मात्र सोयीस्करपणे बाजूला ठेवायचा—असं चित्र वारंवार का दिसतंय? सोयीस्कर राजकीय दैवतीकरणाच्या आडून त्यांच्या मूल्यांचा अपमान का होतोय?


शिवरायांचा विचार किल्ल्यांपुरता मर्यादित नव्हता—तो होता पारदर्शक प्रशासनाचा, न्यायाचा आणि लोककल्याणाचा.फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार फक्त स्मरणापुरता नव्हता—तो होता शिक्षण, समता आणि सन्मानाचा.

सध्याच्या राजकीय घडामोडी, गोंगाट आणि वास्तव पाहिलं तर शिवरायांचे विचार जगण्यापासून आपण किती दूर गेलो आहोत याची जाणीव अधिक तीव्र होते.

हा तोच महाराष्ट्र आहे का ज्याचं स्वप्न संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राण अर्पण केलेल्यांनी पाहिलं होतं?


आज महाराष्ट्र सहासष्ठीचा झाला. 66 वर्षांचं होणं-या वयाचा अंदाज येणं अवघड. पण हा काळ साधारपणे आत्मचिंतन आणि नव्या जबाबदाऱ्यांचा असतो म्हणतात. या वयात अस्तित्वाची लढाईही तीव्र असते म्हणतात.

पुढच्या वर्षांत ही अस्तित्वाची लढाई महाराष्ट्राच्या नशीबात यावी अशी राजकीय व्यवस्था उभी राहिला नको. आणि याची जबाबदारी प्रत्येक मराठी, महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचीये.

मला माझ्याच राज्यात, माझ्याच भाषेसाठी, माझ्याच भूमीसाठी नाही लढायचंय. ही वेळ माझ्यावर का यावी याचं आत्मचिंतन करण्याचा हा काळ नक्कीये.


त्यामुळे खरंतर आज महाराष्ट्र ‘प्रतिज्ञा’ करायला हवी, महाराष्ट्र फक्त ‘विकसित’ होऊ नये, तर तो मूल्यांनी समृद्ध व्हावा. राजकीय गोंधळापेक्षा पारदर्शकता मोठी व्हावी. आणि शिवरायांची फक्त आठवण नाही तर त्यांचा विचार प्रत्येक निर्णयात जिवंत असेल.
- हर्षदा स्वकुळ

3 weeks ago | [YT] | 377

Harshada Swakul

2 राज्यात उद्या मतदान होईल. पण आता हे फक्त राज्यापुरतंच मर्यादित आहे? NEW VIDEO OUT

1 month ago | [YT] | 20

Harshada Swakul

ऐसे कैसे चलेगा?.. नवीन वीडियो नक्की बघा.. पुढच्या काही तासात जे बदल होतील.. त्या आधी.. जरूर. धन्यवाद

1 month ago | [YT] | 66