Shakti News Marathi

"शक्ती न्यूज मराठी | Shakti News Marathi

"शक्ती जनसामान्यांसाठी, शक्ती जनसामान्यांची"

शक्ती न्यूज मराठी हे महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, पर्यावरणीय आणि जनहिताच्या प्रश्नांवर निर्भीडपणे आवाज उठवणारे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे. जनसामान्यांच्या समस्या, स्थानिक ते राज्यस्तरीय घडामोडी, सखोल विश्लेषण, विशेष मुलाखती आणि सत्याधारित वृत्तांकन यांद्वारे आम्ही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहोत.

आमचे ध्येय केवळ बातम्या देणे नाही, तर समाजातील मूलभूत प्रश्नांवर चर्चा घडवून आणणे, जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि विकासाच्या प्रक्रियेत सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवणे आहे.

🔹 विश्वासार्ह बातम्या
🔹 राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण
🔹 सामाजिक प्रश्नांवर लक्ष
🔹 आर्थिक व विकासविषयक घडामोडी
🔹 जनहितासाठी निर्भीड पत्रकारिता

आपला विश्वास हेच आमचे बळ आहे.

शक्ती जनसामान्यांसाठी, शक्ती जनसामान्यांची!

Subscribe करा आणि महाराष्ट्राच्या घडामोडीशी जोडलेले रहा.

#शक्ती_न्यूज_मराठी #ShaktiNewsMarathi



Shakti News Marathi

देवकुंड धबधब्यावर दुर्दैवी घटना; बुडालेल्या दोन्ही पर्यटकांचे मृतदेह सापडले

रायगड (प्रतिक मोरे)

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या देवकुंड धबधब्यावर घडलेल्या दुर्दैवी घटनेत बुडालेल्या दोन्ही पर्यटकांचे मृतदेह अखेर शोध पथकाला सापडले आहेत. आज (१३ जुलै) सकाळपासून सुरू करण्यात आलेल्या शोधमोहीमेत SVRSS बचाव पथक, शेलार मामा रेस्क्यू टीम, स्थानिक पोलीस आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील चाकण येथील एका खासगी कंपनीतील सुमारे २० कर्मचारी पावसाळी सहलीसाठी रविवारी (१२ जुलै) देवकुंड धबधब्यावर आले होते. दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास त्यापैकी दोन तरुण कुंडात पोहण्यासाठी उतरले. पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याची घटना घडली.

या घटनेतील मृत पर्यटकांची नावे गोपाळ राठोड आणि विष्णु डोके अशी असून, ते पुणे येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास होते. त्यापैकी एक नांदेड जिल्ह्यातील तर दुसरा हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि बचाव पथकाने शोधमोहीम सुरू केली. मात्र अंधार आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे रविवारी रात्री शोधकार्य थांबविण्यात आले होते. आज सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. अत्यंत दुर्गम आणि अवघड मार्ग पार करत बोट कुंडाच्या दिशेने नेण्यात आली आणि अखेर दोन्ही पर्यटकांचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले.

#Devkund #DevkundWaterfall #Raigad #Mangaon #GroundReport #BreakingNews #RescueOperation #MarathiNews #ShaktiNewsMarathi #PratikMore

Shakti News Marathi | Pratik More

3 days ago | [YT] | 11

Shakti News Marathi

महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना मारहाण; भाजप नगरसेवक सुरज बामणे यांच्यावर गुन्हा दाखल

महाड | प्रतिनिधी (जुनेद तांबोळी)

महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय सदाशिव कोळेकर यांच्यावर त्यांच्या दालनात झालेल्या मारहाणीप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत कोळेकर जखमी झाले असून त्यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर हे महाड नगरपालिकेच्या प्रशासकीय भवनातील त्यांच्या दालनात कामकाज करत असताना भाजपचे नगरसेवक सुरज बामणे, राकेश पाटील व त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती तेथे आली. प्रभागातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर वादाचे रूपांतर कथित मारहाणीत झाले.

तक्रारीनुसार, मुख्याधिकारी कोळेकर यांना मारहाण करण्यात आली तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या घटनेनंतर त्यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जखमी झालेल्या कोळेकर यांना वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी महाड शहर पोलिसांनी सुरज बामणे, राकेश पाटील आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, १२१(२), २२१, ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

या घटनेचा पुढील तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते करीत आहेत.

Shakti News Marathi | Pratik More

1 week ago | [YT] | 2

Shakti News Marathi

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांना जीवे मारण्याची धमकी

व्हॉट्सअॅपवरून जीवे मारण्याची धमकी, अभिजित दीपके यांनी शेअर केला स्क्रीनशॉट

Abhijit Deepke, Cockroach Janata Party, BJP, Threat Message, WhatsApp Threat, Social Media News, Political News, Maharashtra News, Viral Message, X Platform, Breaking News, Marathi News, Shakti News Marathi, Political Controversy, Threat Allegation

#AbhijitDeepke #CockroachJanataParty #BreakingNews #MaharashtraNews #PoliticalNews #ViralNews #ThreatMessage #MarathiNews #BJP #ShaktiNewsMarathi

1 month ago | [YT] | 4

Shakti News Marathi

आज गुरुवार दिनांक ७ मे २०२६ रोजी म्हसळा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. यामध्ये शिवसेना आणि कॉंग्रेस यांनी एकत्र येत १७ पैकी ९ जागांच्या बहुमताने सत्ता मिळवली आहे.

#mhasla #bharatgogavale #Shivsena #NCP #Congress

2 months ago | [YT] | 7

Shakti News Marathi

दिवेआगर ग्रामपंचायत निवडणूक; राष्ट्रवादीला धक्का

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत दिवेआगर विकास आघाडीचे विजय सुदाम तोडणकर ९१३ मते मिळवून चक्क सरपंचपदी विजयी.
राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवाराचा दारुण पराभव.

#shaktinews #shaktinewsmarathi #shriwardhan

2 months ago | [YT] | 5

Shakti News Marathi

रायगड लोणेरे येथे झालेल्या हत्याकांडातील आरोपी
अनिस मोहम्मद खान मालदार याला काल रात्री उशिरा
अटक करण्यात आली असुन त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

#ShaktiNewsMarathi #ShaktiNews #CrimeNews

2 months ago | [YT] | 10

Shakti News Marathi

रायगड लोणेरे हत्याकांडातील आरोपीला नवी मुंबई येथुन अटक करण्यात आली आहे.
#ShaktiNewsMarathi #NewsMarathi #CrimeNews

2 months ago | [YT] | 7

Shakti News Marathi

महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील खरवली येथील सुरज धोत्रे हा १ एप्रिलपासून बेपत्ता होता. त्याची तक्रार ३ एप्रिल रोजी दाखल करण्यात आली होती. दरम्यान, वरंध गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला त्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अपघात की घातपात, याबाबत पोलीस तपास सुरू असून घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

#mahad #murder #Policecase #accident #shaktinewsmarathi

3 months ago | [YT] | 2

Shakti News Marathi

तुम्हाला शिवसेनेचा रायगड जिल्हा परिषदेत युतीचा निर्णय पटला का?

4 months ago | [YT] | 5