Our Channel Basically its all About Kalyan City Like Daily News & Updates in Kalyan, Encourage & Motivate new Talents, Businesses, Events etc in Kalyan.
कल्याणमधील व्यापारी आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले माजी काँग्रेस नेते विमल ठक्कर यांची शिवसेना व्यापारी सेलच्या कल्याण शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते, नगरसेवक सचिन पोटे यांच्या उपस्थितीत ठक्कर यांना हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
महत्त्वाचे मुद्दे:
राजकीय महत्त्व: विमल ठक्कर यांचा गुजराती आणि मारवाडी व्यापारी समाजात मोठा प्रभाव आहे. या नियुक्तीमुळे व्यापारी वर्गात शिवसेनेची पकड अधिक मजबूत होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.
पार्श्वभूमी: ठक्कर हे आधी काँग्रेसचे कल्याण शहराध्यक्ष होते. शिंदे सरकारच्या विकासकामांनी प्रभावित होऊन त्यांनी गेल्या वर्षी शिवसेनेत प्रवेश केला होता.
नियुक्तीनंतर बोलताना, व्यापारी बांधवांच्या समस्या सोडविणे आणि शिवसेनेची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याचा निर्धार विमल ठक्कर यांनी व्यक्त केला.
News Credit: @localnewsnetwork
For More Such News & Updates Follow https://www.instagram.com/welcometokalyan/ Follow https://www.facebook.com/welcometokalyan/
मान्सून उशिरा सुरू होण्याची शक्यता आणि जलसाठ्यावरील वाढता ताण लक्षात घेता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शहरातील काही भागांमध्ये टप्प्याटप्प्याने 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
12 जून 2026 पासून पाणीपुरवठा कपातीची अंमलबजावणी सुरू होणार असून नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा व पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
निळजेती जलशुद्धीकरण केंद्राच्या कार्यक्षेत्रातील डोंबिवली (पूर्व) मधील "फ" आणि "ग" प्रभागांमध्ये 12 जून 2026 आणि 17 जून 2026 रोजी रात्री 12 वाजल्यापासून पुढील रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
शहरात भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी ही उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

डोंबिवली | ८ जून :
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघ ‘आध्यात्मिक कॉरिडॉर’ म्हणून विकसित होत असल्याचे सांगितले. पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या ४ एकर २५ गुंठे जागेचा प्रश्न महायुती सरकारने मार्गी लावला असून, मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पिंपळेश्वर महादेव मंदिराला नाममात्र दरात जागा हस्तांतरित करण्याच्या निर्णयानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात बोलताना त्यांनी मंदिराच्या जागेसाठी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर यश मिळाल्याचे सांगितले.
यावेळी त्यांनी खिडकाळी मंदिर, अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर, मलंगगड आणि दुर्गाडी मंदिर परिसरातील विकासकामांचा उल्लेख करत धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध प्रकल्प राबवले जात असल्याचे सांगितले. कल्याण लोकसभा मतदारसंघात मोठ्या धार्मिक पर्यटन कॉरिडॉरची संकल्पना प्रत्यक्षात येत असून श्रद्धा, संस्कृती आणि विकासाचा संगम घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले
News Credit: @localnewsnetwork
For More Such News & Updates
Follow @welcometokalyan
Follow @welcometokalyan
प्रत्येकाने एक झाड लावल्यास कल्याण-डोंबिवली स्वच्छ, सुंदर आणि हरित बनेल – आयुक्त अभिनव गोयल
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बिर्ला कॉलेजशेजारील नव्या रस्त्यावर चेरी ब्लॉसम वृक्षारोपण
कल्याण, ५ जून :
कल्याण-डोंबिवलीतील प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संवर्धन केल्यास शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित बनू शकते, असा विश्वास कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी व्यक्त केला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालय आणि बिर्ला शाळेजवळ नव्याने विकसित करण्यात आलेल्या रस्त्यावर चेरी ब्लॉसम प्रजातीच्या वृक्षारोपण कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना आयुक्त गोयल यांनी सांगितले की, यंदा केडीएमसीने शहरात *दीड लाख वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट* निश्चित केले आहे. महापालिकेचे कचरा प्रक्रिया प्रकल्प, मोकळ्या जागा, उद्याने, स्मशानभूमी तसेच इतर सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
या मोहिमेत विविध प्रजातींची झाडे, तसेच **मियावाकी, स्कॅटर्ड प्लांटेशन** यांसारख्या आधुनिक पद्धतींचा वापर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहरातील गृहनिर्माण संस्था, सामाजिक संस्था आणि प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होऊन किमान एक झाड लावावे, असे आवाहनही त्यांनी केले.
बिर्ला महाविद्यालय शेजारील नव्या रस्त्यावर केडीएमसी आणि विकासकांच्या सहकार्याने **चेरी ब्लॉसम प्रजातीची तब्बल ४०० झाडे** लावण्यात येणार आहेत. या वृक्षांमुळे येत्या काही महिन्यांत हा संपूर्ण परिसर अधिक आकर्षक, निसर्गरम्य आणि पर्यावरणपूरक होणार असून शहराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे.
विशेष म्हणजे या वृक्षारोपण मोहिमेत बिर्ला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
या कार्यक्रमाला बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र, शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील, भिवंडी लोकसभा समन्वयक सुनील वायले, उद्यान अधीक्षक संजय जाधव, नगरसेविका अनघा देवळेकर, डॉ. तनुजा वायले, प्रमिला पाटील, नगरसेवक किरण भांगले, केडीएमसीचे ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील, बिर्ला महाविद्यालयाचे वरिष्ठ उपप्राचार्य हरीश दुबे, मनिंदर कौर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पर्यावरण संरक्षण आणि हरित शहर उभारणीच्या दिशेने केडीएमसीने सुरू केलेली ही व्यापक वृक्षारोपण मोहीम शहराच्या पर्यावरणीय समतोलासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
Why settle for the ordinary when your jewelry can tell a story? Break away from traditional designs and step into the world of something different with our latest modern diamond jewelry collection.
we are redefining everyday luxury with striking pieces like our multi-layered contemporary diamond ring and the intricately crafted, diamond-studded key bracelet. Perfect for the modern woman who loves to blend sophistication with a unique, edgy flair. 🌸💎
Whether it's a gift for yourself or a statement piece for your next big event, find designs that match your vibe only at Kalyan's favorite destination for contemporary elegance.
✨ Visit us today and experience diamond jewelry like never before!
📍 Location & Contact Details
Store: Gargi by PNG (P. N. Gadgil & Sons)
Sun Soman Square, Sahajanand Chowk, Kalyan West
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलरच्या खाली आल्याने अनेक देशांनी पेट्रोलचे दर कमी केले आहेत. पाकिस्तान, चीन, नेपाळ आणि म्यानमारमध्ये जून महिन्यात पेट्रोल स्वस्त करण्यात आले. मात्र, भारतात पेट्रोलची सरासरी किंमत अद्याप ₹108.21 प्रति लिटरवर स्थिर आहे.
कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतींचा फायदा भारतीय ग्राहकांना अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांमध्ये एकच प्रश्न चर्चेत आहे — "भारतात पेट्रोल कधी स्वस्त होणार?"
तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारातील परिस्थिती आणि कर धोरणांचा आढावा घेऊन केंद्र सरकार आगामी काळात पेट्रोल दरांबाबत महत्त्वाचा निर्णय घेऊ शकते. आता देशभरातील नागरिकांच्या नजरा सरकारच्या पुढील घोषणेकडे लागल्या आहेत.
News Credit: @tv9marathilive
For More Such News & Updates
Follow @welcometokalyan
Follow @welcometokalyan
डोंबिवलीतील ५२ चाळ रेल्वे मैदान वाचले; काम थांबवून मैदान नागरिकांसाठी खुले
डोंबिवली:
डोंबिवली पश्चिमेतील ऐतिहासिक ५२ चाळ रेल्वे मैदानावर रेल्वे प्रशासनाकडून सुरू असलेले गेमिंग झोनचे काम अखेर तातडीने थांबवण्यात आले असून मैदान पुन्हा नागरिकांसाठी खुले झाले आहे. वाढत्या नागरीकरणामुळे शहरात मोकळ्या जागांची कमतरता असताना हे मैदान वाचवण्यासाठी स्थानिक नागरिक, खेळाडू आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन छेडले होते.
या आंदोलनाची दखल घेत खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आमदार राजेश मोरे आणि अभिजित दरेकर यांनी रेल्वे प्रशासनाच्या विभागीय व्यवस्थापकांची (DRM) प्रत्यक्ष भेट घेऊन नागरिकांच्या भावना मांडल्या. या यशस्वी पाठपुराव्यामुळे रेल्वेने काम थांबवण्याचा सकारात्मक निर्णय घेतला.
हे मैदान क्रीडा व सार्वजनिक हितासाठी कायमस्वरूपी जतन व्हावे, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे लवकरच दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार आहेत. मैदानावर आलेले संकट टळल्यामुळे डोंबिवलीकरांनी लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.
News Credit: @localnewsnetwork
For More Such News & Updates
Follow @welcometokalyan
Follow @welcometokalyan
दिवसाप्रमाणे रात्रीही उष्णतेचा कहर; कल्याण-डोंबिवलीत रात्रीच्या सर्वाधिक 30.4 सेल्सिअस तापमानाची नोंद
कल्याण डोंबिवली | ३० मे :
एकीकडे दिवसा सूर्यदेव अक्षरशः आग ओकत असताना दिवसाप्रमाणेच आता रात्रीच्या तापमानावरही त्याचा मोठा परिणाम झालेला दिसत आहे. मुंबईसह संपूर्ण एमएमआर रिजनमध्ये गेल्या 13 वर्षांतील रात्रीचे सर्वाधिक तापमान 29 मे 2026 म्हणजेच काल नोंद झाले असून कल्याण डोंबिवली हे रात्रीच्या तापमान वाढीचे हॉट स्पॉट ठरल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएनशी बोलताना दिली आहे.
विशेष म्हणजे हा उष्णतेचा प्रभाव केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश (MMR) आणि उत्तर कोकण पट्ट्यात जाणवला. ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल, अंबरनाथ, विरार, कर्जत आणि कर्जत परिसरात गेल्या अनेक वर्षांतील सर्वाधिक उष्ण रात्रींपैकी काही रात्रींची यावर्षी नोंद झाली आहे.
हवामान तज्ज्ञ अभिजीत मोडक यांच्या मते वातावरणातील वाढलेला आर्द्रतेचा स्तर, ढगाळ वातावरण आणि रात्रीच्या वेळी वाहणारे वारे यामुळे दिवसभर साचलेली उष्णता वातावरणात सहजपणे विरून जात नाही. परिणामी रात्रीचे तापमान अपेक्षेप्रमाणे खाली येत नसल्याने नागरिकांना दिवसाप्रमाणे रात्रीही प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
उत्तर कोकणातील अनेक शहरांमध्ये किमान तापमान हे २९ अंशांच्या वर राहिले. कल्याण-डोंबिवली येथे सर्वाधिक ३०.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल पनवेल-पलावा ३०.३ अंश, बिरवाडी ३०.२ अंश, अंबरनाथ-विरार ३०.१ अंश आणि ठाणे-नवी मुंबईमध्ये ३० अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
बदलापूरमध्येही रात्रीच्या तापमानाचे विक्रम यंदा दोनदा मोडले...
तर बदलापूरमध्येही गेल्या 13 वर्षांतील उच्चांकी रात्रीच्या तापमानाची नोंद झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार 2013 नंतरची सर्वाधिक किमान तापमानाची नोंद 29.8 अंश सेल्सिअस अशी 30 मे 2026 रोजी झाली. यापूर्वीचा विक्रम 29.4 अंश सेल्सिअस हा 26 मे 2026 रोजी नोंदवण्यात आला होता. विशेष म्हणजे अवघ्या चार दिवसांतच हा विक्रम मोडला गेला. त्याआधी 27 मे 2024 रोजी 29.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे बदलापूरमध्ये याच वर्षी दोनदा रात्रीच्या तापमानाचे विक्रम मोडले गेल्याचे स्पष्ट झाल्याचे मोडक यांनी सांगितले.
हवामानाच्या अंदाजानुसार, नैऋत्य मोसमी वारे (SWM) सक्रिय होईपर्यंत अशाच प्रकारच्या उष्ण आणि दमट रात्रींचा अनुभव नागरिकांना येण्याची शक्यता आहे.
News Credit: @localnewsnetwork
For More Such News & Updates
Follow https://www.instagram.com/welcometokalyan/
Follow https://www.facebook.com/welcometokalyan
केडीएमसीकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार, ०३ जून २०२५ रोजी कल्याण-डोंबिवली परिसरात तब्बल १२ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवावे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा.
बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांवरील कामांमुळे हा निर्णय घेण्यात आला असून कल्याण पूर्व, डोंबिवली पूर्व-पश्चिम तसेच ग्रामीण भागातील अनेक परिसरांवर याचा परिणाम होणार आहे.
दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून उशिरा येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Follow https://www.facebook.com/welcometokalyan/
An evening where music meets meditation and hearts unite in celebration.
Join us for a soulful gathering filled with divine vibrations, joyful singing, rhythmic beats, and positive energy. Let’s come together to sing, meditate, celebrate, and experience the bliss of togetherness.
Welcome to Kalyan
कल्याणमधील व्यापारी आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले माजी काँग्रेस नेते विमल ठक्कर यांची शिवसेना व्यापारी सेलच्या कल्याण शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते, नगरसेवक सचिन पोटे यांच्या उपस्थितीत ठक्कर यांना हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
महत्त्वाचे मुद्दे:
राजकीय महत्त्व: विमल ठक्कर यांचा गुजराती आणि मारवाडी व्यापारी समाजात मोठा प्रभाव आहे. या नियुक्तीमुळे व्यापारी वर्गात शिवसेनेची पकड अधिक मजबूत होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.
पार्श्वभूमी: ठक्कर हे आधी काँग्रेसचे कल्याण शहराध्यक्ष होते. शिंदे सरकारच्या विकासकामांनी प्रभावित होऊन त्यांनी गेल्या वर्षी शिवसेनेत प्रवेश केला होता.
नियुक्तीनंतर बोलताना, व्यापारी बांधवांच्या समस्या सोडविणे आणि शिवसेनेची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याचा निर्धार विमल ठक्कर यांनी व्यक्त केला.
News Credit: @localnewsnetwork
For More Such News & Updates
Follow https://www.instagram.com/welcometokalyan/
Follow https://www.facebook.com/welcometokalyan/
#KalyanNews #MaharashtraPolitics #ShivSena #VimalThakkar #MarathiNews
18 hours ago | [YT] | 1
View 0 replies
Welcome to Kalyan
कल्याण-डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची सूचना
मान्सून उशिरा सुरू होण्याची शक्यता आणि जलसाठ्यावरील वाढता ताण लक्षात घेता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शहरातील काही भागांमध्ये टप्प्याटप्प्याने 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
12 जून 2026 पासून पाणीपुरवठा कपातीची अंमलबजावणी सुरू होणार असून नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा व पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
निळजेती जलशुद्धीकरण केंद्राच्या कार्यक्षेत्रातील डोंबिवली (पूर्व) मधील "फ" आणि "ग" प्रभागांमध्ये 12 जून 2026 आणि 17 जून 2026 रोजी रात्री 12 वाजल्यापासून पुढील रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
शहरात भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी ही उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
News Credit: @localnewsnetwork
For More Such News & Updates
Follow https://www.instagram.com/welcometokalyan/
Follow https://www.facebook.com/welcometokalyan/
#KalyanDombivli #KDMC #WaterSupplyUpdate #WaterCut #DombivliEast #KalyanNews #PublicNotice #WaterManagement #MonsoonUpdate #MaharashtraNews #Dombivli #Kalyan #BreakingNews
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
Welcome to Kalyan
डोंबिवली | ८ जून :
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघ ‘आध्यात्मिक कॉरिडॉर’ म्हणून विकसित होत असल्याचे सांगितले. पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या ४ एकर २५ गुंठे जागेचा प्रश्न महायुती सरकारने मार्गी लावला असून, मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पिंपळेश्वर महादेव मंदिराला नाममात्र दरात जागा हस्तांतरित करण्याच्या निर्णयानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात बोलताना त्यांनी मंदिराच्या जागेसाठी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर यश मिळाल्याचे सांगितले.
यावेळी त्यांनी खिडकाळी मंदिर, अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर, मलंगगड आणि दुर्गाडी मंदिर परिसरातील विकासकामांचा उल्लेख करत धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध प्रकल्प राबवले जात असल्याचे सांगितले. कल्याण लोकसभा मतदारसंघात मोठ्या धार्मिक पर्यटन कॉरिडॉरची संकल्पना प्रत्यक्षात येत असून श्रद्धा, संस्कृती आणि विकासाचा संगम घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले
News Credit: @localnewsnetwork
For More Such News & Updates
Follow @welcometokalyan
Follow @welcometokalyan
3 days ago (edited) | [YT] | 1
View 0 replies
Welcome to Kalyan
प्रत्येकाने एक झाड लावल्यास कल्याण-डोंबिवली स्वच्छ, सुंदर आणि हरित बनेल – आयुक्त अभिनव गोयल
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बिर्ला कॉलेजशेजारील नव्या रस्त्यावर चेरी ब्लॉसम वृक्षारोपण
कल्याण, ५ जून :
कल्याण-डोंबिवलीतील प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संवर्धन केल्यास शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित बनू शकते, असा विश्वास कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी व्यक्त केला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालय आणि बिर्ला शाळेजवळ नव्याने विकसित करण्यात आलेल्या रस्त्यावर चेरी ब्लॉसम प्रजातीच्या वृक्षारोपण कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना आयुक्त गोयल यांनी सांगितले की, यंदा केडीएमसीने शहरात *दीड लाख वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट* निश्चित केले आहे. महापालिकेचे कचरा प्रक्रिया प्रकल्प, मोकळ्या जागा, उद्याने, स्मशानभूमी तसेच इतर सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
या मोहिमेत विविध प्रजातींची झाडे, तसेच **मियावाकी, स्कॅटर्ड प्लांटेशन** यांसारख्या आधुनिक पद्धतींचा वापर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहरातील गृहनिर्माण संस्था, सामाजिक संस्था आणि प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होऊन किमान एक झाड लावावे, असे आवाहनही त्यांनी केले.
बिर्ला महाविद्यालय शेजारील नव्या रस्त्यावर केडीएमसी आणि विकासकांच्या सहकार्याने **चेरी ब्लॉसम प्रजातीची तब्बल ४०० झाडे** लावण्यात येणार आहेत. या वृक्षांमुळे येत्या काही महिन्यांत हा संपूर्ण परिसर अधिक आकर्षक, निसर्गरम्य आणि पर्यावरणपूरक होणार असून शहराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे.
विशेष म्हणजे या वृक्षारोपण मोहिमेत बिर्ला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
या कार्यक्रमाला बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र, शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील, भिवंडी लोकसभा समन्वयक सुनील वायले, उद्यान अधीक्षक संजय जाधव, नगरसेविका अनघा देवळेकर, डॉ. तनुजा वायले, प्रमिला पाटील, नगरसेवक किरण भांगले, केडीएमसीचे ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील, बिर्ला महाविद्यालयाचे वरिष्ठ उपप्राचार्य हरीश दुबे, मनिंदर कौर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पर्यावरण संरक्षण आणि हरित शहर उभारणीच्या दिशेने केडीएमसीने सुरू केलेली ही व्यापक वृक्षारोपण मोहीम शहराच्या पर्यावरणीय समतोलासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
News Credit: @localnewsnetwork
6 days ago | [YT] | 3
View 0 replies
Welcome to Kalyan
Unconventional. Elegant. Distinctly YOU. ✨💍
Why settle for the ordinary when your jewelry can tell a story? Break away from traditional designs and step into the world of something different with our latest modern diamond jewelry collection.
we are redefining everyday luxury with striking pieces like our multi-layered contemporary diamond ring and the intricately crafted, diamond-studded key bracelet. Perfect for the modern woman who loves to blend sophistication with a unique, edgy flair. 🌸💎
Whether it's a gift for yourself or a statement piece for your next big event, find designs that match your vibe only at Kalyan's favorite destination for contemporary elegance.
✨ Visit us today and experience diamond jewelry like never before!
📍 Location & Contact Details
Store: Gargi by PNG (P. N. Gadgil & Sons)
Sun Soman Square, Sahajanand Chowk, Kalyan West
Call 📞 9271155722
#GargiByPNG #PNGJewellers #KalyanWest #KalyanJewellers #DiamondJewelry #ModernDiamonds #UniqueJewelryDesign
1 week ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
Welcome to Kalyan
पेट्रोल दर कमी होणार का? देशभरात चर्चेला उधाण
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलरच्या खाली आल्याने अनेक देशांनी पेट्रोलचे दर कमी केले आहेत. पाकिस्तान, चीन, नेपाळ आणि म्यानमारमध्ये जून महिन्यात पेट्रोल स्वस्त करण्यात आले. मात्र, भारतात पेट्रोलची सरासरी किंमत अद्याप ₹108.21 प्रति लिटरवर स्थिर आहे.
कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतींचा फायदा भारतीय ग्राहकांना अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांमध्ये एकच प्रश्न चर्चेत आहे — "भारतात पेट्रोल कधी स्वस्त होणार?"
तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारातील परिस्थिती आणि कर धोरणांचा आढावा घेऊन केंद्र सरकार आगामी काळात पेट्रोल दरांबाबत महत्त्वाचा निर्णय घेऊ शकते. आता देशभरातील नागरिकांच्या नजरा सरकारच्या पुढील घोषणेकडे लागल्या आहेत.
News Credit: @tv9marathilive
For More Such News & Updates
Follow @welcometokalyan
Follow @welcometokalyan
1 week ago (edited) | [YT] | 3
View 0 replies
Welcome to Kalyan
डोंबिवलीतील ५२ चाळ रेल्वे मैदान वाचले; काम थांबवून मैदान नागरिकांसाठी खुले
डोंबिवली:
डोंबिवली पश्चिमेतील ऐतिहासिक ५२ चाळ रेल्वे मैदानावर रेल्वे प्रशासनाकडून सुरू असलेले गेमिंग झोनचे काम अखेर तातडीने थांबवण्यात आले असून मैदान पुन्हा नागरिकांसाठी खुले झाले आहे. वाढत्या नागरीकरणामुळे शहरात मोकळ्या जागांची कमतरता असताना हे मैदान वाचवण्यासाठी स्थानिक नागरिक, खेळाडू आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन छेडले होते.
या आंदोलनाची दखल घेत खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आमदार राजेश मोरे आणि अभिजित दरेकर यांनी रेल्वे प्रशासनाच्या विभागीय व्यवस्थापकांची (DRM) प्रत्यक्ष भेट घेऊन नागरिकांच्या भावना मांडल्या. या यशस्वी पाठपुराव्यामुळे रेल्वेने काम थांबवण्याचा सकारात्मक निर्णय घेतला.
हे मैदान क्रीडा व सार्वजनिक हितासाठी कायमस्वरूपी जतन व्हावे, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे लवकरच दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार आहेत. मैदानावर आलेले संकट टळल्यामुळे डोंबिवलीकरांनी लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.
News Credit: @localnewsnetwork
For More Such News & Updates
Follow @welcometokalyan
Follow @welcometokalyan
1 week ago (edited) | [YT] | 3
View 0 replies
Welcome to Kalyan
दिवसाप्रमाणे रात्रीही उष्णतेचा कहर; कल्याण-डोंबिवलीत रात्रीच्या सर्वाधिक 30.4 सेल्सिअस तापमानाची नोंद
कल्याण डोंबिवली | ३० मे :
एकीकडे दिवसा सूर्यदेव अक्षरशः आग ओकत असताना दिवसाप्रमाणेच आता रात्रीच्या तापमानावरही त्याचा मोठा परिणाम झालेला दिसत आहे. मुंबईसह संपूर्ण एमएमआर रिजनमध्ये गेल्या 13 वर्षांतील रात्रीचे सर्वाधिक तापमान 29 मे 2026 म्हणजेच काल नोंद झाले असून कल्याण डोंबिवली हे रात्रीच्या तापमान वाढीचे हॉट स्पॉट ठरल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएनशी बोलताना दिली आहे.
विशेष म्हणजे हा उष्णतेचा प्रभाव केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश (MMR) आणि उत्तर कोकण पट्ट्यात जाणवला. ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल, अंबरनाथ, विरार, कर्जत आणि कर्जत परिसरात गेल्या अनेक वर्षांतील सर्वाधिक उष्ण रात्रींपैकी काही रात्रींची यावर्षी नोंद झाली आहे.
हवामान तज्ज्ञ अभिजीत मोडक यांच्या मते वातावरणातील वाढलेला आर्द्रतेचा स्तर, ढगाळ वातावरण आणि रात्रीच्या वेळी वाहणारे वारे यामुळे दिवसभर साचलेली उष्णता वातावरणात सहजपणे विरून जात नाही. परिणामी रात्रीचे तापमान अपेक्षेप्रमाणे खाली येत नसल्याने नागरिकांना दिवसाप्रमाणे रात्रीही प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
उत्तर कोकणातील अनेक शहरांमध्ये किमान तापमान हे २९ अंशांच्या वर राहिले. कल्याण-डोंबिवली येथे सर्वाधिक ३०.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल पनवेल-पलावा ३०.३ अंश, बिरवाडी ३०.२ अंश, अंबरनाथ-विरार ३०.१ अंश आणि ठाणे-नवी मुंबईमध्ये ३० अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
बदलापूरमध्येही रात्रीच्या तापमानाचे विक्रम यंदा दोनदा मोडले...
तर बदलापूरमध्येही गेल्या 13 वर्षांतील उच्चांकी रात्रीच्या तापमानाची नोंद झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार 2013 नंतरची सर्वाधिक किमान तापमानाची नोंद 29.8 अंश सेल्सिअस अशी 30 मे 2026 रोजी झाली. यापूर्वीचा विक्रम 29.4 अंश सेल्सिअस हा 26 मे 2026 रोजी नोंदवण्यात आला होता. विशेष म्हणजे अवघ्या चार दिवसांतच हा विक्रम मोडला गेला. त्याआधी 27 मे 2024 रोजी 29.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे बदलापूरमध्ये याच वर्षी दोनदा रात्रीच्या तापमानाचे विक्रम मोडले गेल्याचे स्पष्ट झाल्याचे मोडक यांनी सांगितले.
हवामानाच्या अंदाजानुसार, नैऋत्य मोसमी वारे (SWM) सक्रिय होईपर्यंत अशाच प्रकारच्या उष्ण आणि दमट रात्रींचा अनुभव नागरिकांना येण्याची शक्यता आहे.
News Credit: @localnewsnetwork
For More Such News & Updates
Follow https://www.instagram.com/welcometokalyan/
Follow https://www.facebook.com/welcometokalyan
1 week ago (edited) | [YT] | 1
View 0 replies
Welcome to Kalyan
🚨 कल्याण-डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची सूचना 🚨
केडीएमसीकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार, ०३ जून २०२५ रोजी कल्याण-डोंबिवली परिसरात तब्बल १२ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवावे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा.
बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांवरील कामांमुळे हा निर्णय घेण्यात आला असून कल्याण पूर्व, डोंबिवली पूर्व-पश्चिम तसेच ग्रामीण भागातील अनेक परिसरांवर याचा परिणाम होणार आहे.
दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून उशिरा येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
News Credit: @localnewsnetwork
For More Such News & Updates
Follow https://www.instagram.com/welcometokalyan/
Follow https://www.facebook.com/welcometokalyan/
#Kalyan #Dombivli #KDMC #WaterCut #WaterSupply #KalyanDombivli #MaharashtraNews #Titwala #DombivliNews #KalyanNews
2 weeks ago | [YT] | 2
View 0 replies
Welcome to Kalyan
Sattvik Beats – Kalyan
An evening where music meets meditation and hearts unite in celebration.
Join us for a soulful gathering filled with divine vibrations, joyful singing, rhythmic beats, and positive energy. Let’s come together to sing, meditate, celebrate, and experience the bliss of togetherness.
📅 31st May 2026
⏰ 6:30 PM onwards
📍 Saxena Dream Lawns, Kalyan
✨ Open to all
Bring your friends & family for an unforgettable evening of joy and devotion.
#SattvikBeats #ArtOfLiving #MeditationMusic #KalyanEvents
2 weeks ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
Load more