'नागरिक शास्त्र' हा 'अमुक तमुक'चा knowledge प्लॅटफॉर्म आहे, जिथे आपण नागरिकांशी संबंधित सर्व मूलभूत विषयांवर चर्चा करणार आहोत. पक्षीय राजकारणापासून लांब राहून, केवळ नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांचं सामान्य नागरिकांच्या आयुष्यातील स्थान समजून घेण्याचा आणि अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे.
#NagarikShastra #AmukTamuk
Nagarik Shastra
आपले कायदे समजून घेण्यासाठी घेऊन आलो आहोत नवी सिरीज..
2 months ago | [YT] | 97
View 3 replies
Nagarik Shastra
भारताच्या घटनेचे शिल्पकार म्हणजे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पण त्यांची शिकवण हि फक्त इतिहासपुरतीच मर्यादित आहे का?
जातिव्यवस्थेकडे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे आपण एक आजचे नागरिक म्हणून काय शिकू शकतो?
आरक्षणाविषयी त्यांचे विचार नक्की काय होते?
१०६ घटना दुरुस्त्यांनंतरच्या आत्ताच्या संविधानाबद्दल त्यांना काय वाटले असते?
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खरंच कळले आहेत का?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्याचा प्रयत्न ह्या भागात केला आहे.
पूर्ण एपिसोड नक्की पाहा!
3 months ago | [YT] | 5
View 0 replies
Nagarik Shastra
स्वतंत्र भारतातली सगळ्यात मोठी ट्रेन रॉबरी. ३४२ कोटींच्या नोटा, १८ सशस्त्र पोलीस, आणि चालत्या ट्रेनच्या छताला भगदाड पाडणारे ५ चोर. प्लॅन परफेक्ट होता, हात साफ केला, पण नियतीचा खेळ बघा चोरीच्या ३ महिन्यांनंतर करोडोंचा माल रातोरात रद्दी झाला! सीआयडी, नासा आणि सॅटेलाईट इमेजेसचा थरार. एका फिल्मी चोरीची स्टोरी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
3 months ago | [YT] | 1
View 0 replies
Nagarik Shastra
२०१५ साली अखख्या देशाला आणि कलकत्त्याला हादरवून टाकणाऱ्या 'हाऊस ऑफ हॉरर'ची ही सुन्न करणारी गोष्ट. एका आलिशान बंगल्यात ६ महिने आपल्या स्वतःच्या बहीण आणि पाळीव कुत्र्यांच्या सांगाड्यांसोबत राहणाऱ्या पार्थो डे याच्या आयुष्याचा हा विषण्ण करणारा प्रवास आहे. ज्या घराबाहेरून हजारो लोक रोज जात होते, त्याच घराच्या बंद दारांमागे नक्की काय शिजत होतं आणि पोलिसांना हादरवून सोडणाऱ्या या 'कंकाल कांडा'चा माणुसकीला काळीमा फासणारा उलगडा पाहण्यासाठी एपिसोड नक्की पहा.
3 months ago | [YT] | 3
View 0 replies
Nagarik Shastra
अंधश्रद्धा म्हंटलं कि आपल्याला सर्वात आधी वाटतं कि हे आपले प्रश्न नव्हे. अंधश्रद्धा फ़क्त अडाणी आणि अशिक्षित समजताच फक्त अंधश्रद्धा बोकाळतात का?
शहरांमध्ये अंधश्रद्धेचं प्रमाण आहे का? नागरिक शास्त्र ह्या दृष्टीने हा विषय का महत्त्वाचा आहे?
राज्यात जादूटोणा विरोधी कायदा आहे पण तो राबवण्याची यंत्रणा काय आहे?
या सर्व महत्त्वाच्या विषयांवर या व्हिडिओमध्ये चर्चा केली आहे.
पूर्ण एपिसोड लगेच बघा !
3 months ago (edited) | [YT] | 8
View 0 replies
Nagarik Shastra
पूर्ण एपिसोड लगेच बघा !
7 months ago | [YT] | 4
View 0 replies
Nagarik Shastra
१९६० च्या दशकातली मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी, पण त्या स्वप्नांच्या आड दडलेला होता एक भयानक काळा अध्याय .... रमण राघव! हा माणूस साधा दिसायचा, गरीब होता, रस्त्यावर जगायचा, पण त्याच्या डोक्यात सुरू होता वेडेपणाचा खेळ. त्याने १९६६ ते १९६८ दरम्यान फूटपाथवर झोपलेल्या निरपराध लोकांचे एकामागून एक खून केले. पोलिसांनी शहर पालथं घातलं, पण त्याला शोधणं म्हणजे अंधारात सुई शोधण्यासारखं होतं. अखेर तो पकडला गेला आणि त्याने ४१ खुनांची कबुली दिली. न्यायालयाने सुरुवातीला त्याला फाशी ठोठावली, पण नंतर तो पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचं स्पष्ट झालं. फाशी रद्द करून त्याला आजन्म कारावासाची शिक्षा झाली आणि तो येरवडा तुरुंगात १९९५ मध्ये मरण पावला. रमण राघवचं प्रकरण हे केवळ एका सीरियल किलरचं नव्हतं , ते आपल्या समाजातील बेघर, गरीब, आणि मानसिक आजारांकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यवस्थेचं प्रतिबिंब होतं. ही आहे त्या मायानगरीची कहाणी, जिथे भीतीने रात्री झोप उडाली , आणि अंधारात एक शिकारी फिरत होता !
https://youtu.be/wY9FMrMUKTk
8 months ago | [YT] | 0
View 0 replies
Nagarik Shastra
आपल्याला वाटतं लाच घेणारा दोषी असतो… पण देणारा? आपण म्हणतो, “अहो नाहीतर कामच झालं नसतं!” पण हीच तर सवय झाली आहे ! आपण सगळं बघतो, ऐकतो… पण गप्प बसतो. कारण “काय फायदा बोलून?” अशी मानसिकता झाली आहे. खरंच आपल्यामध्ये भ्रष्टचार इतका खोलवर रुजलाय का ? भ्रष्टाचार का होतो ? आपण नागरिकच भ्रष्टाचाराला खतपाणी घालतो का ? भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणं म्हणजे धाडसाचं नाही, तर जबाबदारीचं काम आहे. पण आज बोलणाऱ्याला 'Trouble maker’ म्हटलं जातं, आणि गप्प बसणाऱ्याला ‘समजूतदार नागरिक’ !
भ्रष्टाचाराच्या या भिजत राहिलेल्या प्रश्नावर आम्ही श्री.संदीप पाटील यांच्याशी या भागात चर्चा केली आहे
https://youtu.be/bJhvBbzHRNo
8 months ago | [YT] | 5
View 0 replies
Nagarik Shastra
असं म्हणतात कि कोर्टाची पायरी चढू नये आणि त्यासाठी कारणही आहे ! विचार करा कि फक्त एका चुकीच्या निकालामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्याची बावीस वर्ष तुरुंगात घालवावी तर ? संदीप (सनी भराडिया) यांना २००१ मध्ये खोट्या आरोपांमुळे २२ वर्ष तुरुंगात राहावं लागलं. अनेक वर्षांनी डीएनए चाचणीने तो निर्दोष आहे हे पण तोवर त्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं होतं. Georgia Innocence Project ने मदत करून त्याला न्याय मिळवून दिला.
न्याय मिळाला पण त्याच्या आयुष्याचं जे नुकसान झालं , त्याची भरपाई कोण करणार ? आणि कशी ? संदीप सारखे कितीतरी निर्दोष लोक कधी कोर्टाच्या , कधी पोलिसांच्या चुकीमुळे विनाकारण दोषी ठरवले जातात आणि जे खरे गुन्हेगार असतात त्यांना मात्र शिक्षा होत नाही.
मग यात निर्दोष लोकांना न्याय न देऊ शकलेली सिस्टिमच गुन्हेगार ठरते ?
9 months ago | [YT] | 1
View 0 replies
Nagarik Shastra
गणेशोत्सव आला की लाईटिंग, डीजे, सोशल मीडियावर फोटोशूट – पण मूळ उद्देश? टिळकांनी जो उत्सव एकतेसाठी आणि समाजजागृतीसाठी सुरू केला, तो आज फक्त स्पर्धा आणि दिखाव्याचं साधन झालाय का? मूर्ती समुद्रात, प्लास्टिक रस्त्यावर, आणि जबाबदारी? कुठेच नाही! आपण बाप्पाला सन्मानाने विराजमान करतो, पण शहराला, निसर्गाला सन्मान देतो का? आपल्या परंपरांचे पालन केले पाहिजे. सण-उत्सव खूप उत्साहाने साजरे केले पाहिजेत पण थोडा Civic sense पाळला तर खरंच ' विघ्नहर्ता ' आपल्या आजूबाजूची सामाजिक विघ्न दूर करायला मदतच करेल !
पूर्ण एपिसोड लगेच पहा, महानगर भाग १ , नागरिक शास्त्रच्या YouTube channel वर
10 months ago | [YT] | 6
View 1 reply
Load more