NishantAwadeVlogs..!!
मराठमोळा YouTuber🚩🫡
घरबसल्या माझ्या सोबत सफर करा आपल्या अशक्य, अभेद्य आणि अजिंक्य अशा सह्याद्रीची..⛰️
तसेच अनुभवा सुंदर प्रवासवर्णन सह्याद्रीतील दुर्गम दुर्गांचे, सुळक्यांचे, गावखेड्यांचे, मंदिरांचे आणि दऱ्याखोऱ्यातील रानवाटांचे..
जाणून घ्या आपला जाज्वल्य इतिहास..!!
त्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा.🙏🏼
तसेच जवळच असलेला 🔔 दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नव-नविन व्हिडीओचे अपडेटस सर्वप्रथम येत राहतील..!!
धन्यवाद..!!❤️
जय शिवराय..!
जय महाराष्ट्र..!
#NishantAwadeVlogs
NishantAwadeVlogs
नमस्कार मंडळी🙏🏼
आज रात्री एक वेगळा व्हिडिओ येत आहे.
गावचा दरा आणि या दऱ्यात दूरवर एकटेच राहणारे, वयाची ८५ गाठलेले खंडे बाबा.
या बाबांना भेटून त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या नंतर अनेक गोष्टींचा नव्याने उलगडा झाला.
या दऱ्यात असणारे त्यांचे हे एकमेव घर आणि या घरात वाट्याला आलेले एकाकी आयुष्य.
असे असले तरीही या घरात बाबांना अनेक सोबती आहेत, तसेच बाबांनी अनेक कला आत्मसात केल्या आहेत, त्यांचा वापर करून या वयात आजही ते काम करून स्वाभिमानाने जीवन जगत आहेत.
या बाबांचा थक्क करणारा संपूर्ण जीवन प्रवास वर्णन करणारा व्हिडीओ आज रात्री ठिक ८ः३० वाजता आपल्या युट्यूब चॅनेल @nishantawadevlogs वर येत आहे तो नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच लाईक व कमेंट जरूर करा.
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🙏🏼
#NishantAwadeVlogs #villagelife #ruralmaharashtra
1 month ago | [YT] | 150
View 20 replies
NishantAwadeVlogs
१००० एकर परिसरात पसरलेले विस्तीर्ण पठार आणि तितकाच त्यावरील विस्तीर्ण असा जंगल परिसर.
जैवविविधता आणि अनेक औषधी वनस्पतींचे माहेरघर असलेल्या या पठारावर आजही वास्तव्यास असलेले एकमेव आखाडे कुटुंबीय आणि त्यांचे सातपिढ्यांचा वारसा सांगणारे सुमारे २५० ते ३५० वर्षांपूर्वीचे एकमेव चिरेबंदी दगडी बांधणीचे घर.
या पठारावरील हे एकमेव घर आणि येथील कुटुंबाचा आणि आसपासच्या परिसराचा इतिहास व माहिती सांगणारा संपूर्ण व्हिडिओ आज रात्री ठिक ८ः३० वाजता आपल्या युट्यूब चॅनल @nishantawadevlogs वर येत आहे सर्वांनी तो नक्की पहा आणि आवडल्यास या व्हिडिओस जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच लाईक आणि कमेंट नक्की करा.
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🙏🏼
3 months ago | [YT] | 85
View 9 replies
NishantAwadeVlogs
नमस्कार मंडळी,
आजचा हा प्रवास असणार आहे महाराष्ट्राच्या कुशीत वसलेल्या एका निसर्गरम्य गावाचा जेथे घडतो निसर्गाचा अक अद्भुत चमत्कार,
या गावाच्या चहुबाजूंनी असलेल्या डोंगररांगा, गावाशेजारून वाहणारी नदी, उन्हाळ्यातही येथे असणारे थंड वातावरण आणि गावाला लाभलेला ऐतिहासिक वारसा हे सगळे आपण अनुभवणार आहोत.
या गावाचे सौंदर्य इतके समृद्ध आहे कि कोण्याएकेकाळी चक्क एक ब्रिटिश अधिकारी या गावाच्या येथील वातावरणाच्या, येथील निसर्गाच्या प्रेमात पडला होता आणि कदाचीत त्याच प्रेमात ऋणी राहून आजही हे गाव या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नावाने ओळखले जात आहे.
हा सारा थक्क करणारा प्रवास आणि या गावचे निसर्गसौंदर्य वर्णन करणारा संपूर्ण व्हिडिओ आज रात्री ठिक ८ः३० वाजता आपल्या युट्यूब चॅनल @nishantawadevlogs वर येत आहे, सर्वांनी तो नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कृपया आपल्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.
धन्यवाद..!!🙏🏼
#NishantAwadeVlogs #Villagelife #Maharashtra #Mountains #Sahyadri
3 months ago | [YT] | 79
View 9 replies
NishantAwadeVlogs
नमस्कार मंडळी 🙏🏼
आजचा प्रवास हा निसर्गाच्या कुशीत, ऊंच डोंगरावर, कुंजरगडाच्या पायथ्याला, विस्तीर्ण पठारावर असलेले एकच घर आणि त्या घरात राहणाऱ्या दोघाच आजी-आजोबांचा, सुखी व समृद्ध जीवनप्रवास आज आपण अनुभवणार आहोत, या ठिकाणी त्यांचे जीवन जगणे, दावणीच्या जनावरांप्रती त्यांना असणारे जीवापाड प्रेम आणि दारात आलेल्या प्रत्येक वाटसरूचा, ट्रेकर मंडळींचा योग्य सन्मान आणि बरेच काही..!!
येथे आसपास असणारा निसर्ग, चहुबाजूने असलेल्या डोंगररांगा आणि थंडगार वातावरण या ठिकाणास आणखीन खास बनवते,
आयुष्याच्या दगदगीत एक दिवस सवड काढून या ठिकाणी निवांत मुक्काम करण्यासाठी, येथील निसर्ग सौंदर्य, कुंजरगडाचा इतिहास अनुभवण्यासाठी हे ठिकाण नक्कीच उत्तम पर्याय आहे.
या सुखी जीवन जगणाऱ्या आजी-आजोबांचा जीवनप्रवास आणि आसपासचे निसर्गसौंदर्य वर्णन करणारा संपुर्ण व्हिडीओ आज रात्री ठिक ८ः३० वाजता आपल्या युट्यूब चॅनल @nishantawadevlogs वर येत आहे, सर्वांनी तो नक्की पहा व आवडल्यास लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करा.
जय शिवराय, जय महाराष्ट्र 🚩🙏🏼
4 months ago | [YT] | 127
View 1 reply
NishantAwadeVlogs
📢🚨नवीन व्हिडिओ ची लिंक👇🏽नक्की पहा.
लोहगडाच्या जंगलातील समृद्ध जीवन जगणारे ९० वर्षांचे बाबा | Lohgad | Forest | Village Life🛖🌳
https://youtu.be/-brECa_UqEQ
5 months ago | [YT] | 106
View 0 replies
NishantAwadeVlogs
लोहगडाचे घनदाट जंगल, उंचच उंच झाडं, त्यावर चिकटलेली शेवाळं, सकाळचे धुके.
पक्ष्यांचा किलबिलाट आणि घोंगावणाऱ्या वाऱ्याचा सुसाट आवाज.
या जंगलातील पायवाटेवर आजही चालत आहेत ९० वर्षांचे धानवले बाबा.
मुळचा पैलवानी बाणा त्यामुळे वयाच्या नव्वदितही मजबूत शरीरयष्टी, डोक्यावर नेहरू टोपी, हातात लाकडी काठी, खांद्यावर जुनी झोळी, पायात चप्पल,आणि मुखात सतत पांडुरंगाचे नाव.
थकलेले शरीर, तरी चालण्यात एक शांत ताकद.
बाबा जंगलात एकटे फिरतात परंतु या जंगलातील आयुष्यातील असंख्य आठवणी, अनुभव त्यांच्या सोबत आहेत.
त्यांच्या डोळ्यांत कसलीच भीती दिसत नाही, कसलीच घाई नाही, फक्त अनुभव…आणि चेहऱ्यावर समाधान.
लोहगडाच्या घेऱ्यातील या बाबांची भेट घेऊन त्यांचा समृद्ध जीवन प्रवास आपण जाणून घेतला, त्याचा व्हिडिओ आज संध्याकाळी ठिक ८ः३० वाजता आपल्या यूट्यूब चॅनल @nishantawadevlogs वर सर्वांनी नक्की पहा.🙏🏼
5 months ago | [YT] | 124
View 13 replies
NishantAwadeVlogs
🌸सगुणा आजी – एक मायेचं पान 🌸
सगुणा नाव, पण माया त्याहून गहिरी,
साऱ्या गुणांचं मूर्त रूप, ज्यांचं प्रेम अगदी शुद्ध आणि अखंड होतं.
या माऊलीसाठी खूप काही करायच्या गोष्टी आज अर्धवट राहिल्या, याची खंत आता आयुष्यभर मनात कायम राहिल,
लवकरच त्यांचे डोळ्यांचे अॅापरेशन पुण्यातील नामवंत जहांगीर रुग्णालयात करायचे नियोजित होते आणि ते होताच घराची डागडुजी करायची हे देखील ठरले होते परंतू काळाच्या मनात काही वेगळेच होते,
प्रदीर्घ आजारामुळे, आज आजींची प्राणज्योत मालवली आणि त्यांनी आज दिनांक ०८/०१/२०२६ रोजी सायंकाळी वेल्हे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला.
सगुणा आजी,
आज तुम्ही गेलात – पण आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही,
तुमचं प्रेम, तुमचे शब्द, आणि तुमचे संस्कार आम्हाला पुढे नेतील, नेहमी प्रेरणा देत राहतील, तुमचं तोरणगडाच्या रहाळातील ज्वलंत अस्तित्व आमच्या प्रत्येकाच्या ह्रदयात सदैव जिवंत राहील..🥺
भावपूर्ण श्रद्धांजली प्रिय सगुणा आजी…💐🙏🏼🙏🏼🙏🏼
6 months ago | [YT] | 822
View 119 replies
NishantAwadeVlogs
धुक्याच्या पडद्यामागे उभा असलेल्या या डोंगररांगांचा अफाट विस्तार,
वाऱ्याच्या झुळुकीसोबत अलगद हलणारी गवताची पाती आणि त्या नागमोडी रानवाटेवरून शांतपणे पुढे सरकणारा गुरांचा कळप.
या साऱ्या निसर्गाच्या साक्षीने, सर्वांसोबत एक माणूस चालतो — संथ, स्थिर, निर्धास्त.
हातात बासरी… आणि ओठांवर जीवनाचा सुर.
चला आज रात्री ठिक ८ः३० वाजता, या डोंगररांगांत स्वच्छंदी जीवन जगणाऱ्या कवठे बाबांच्या कलेचा अनुभव घेऊयात, आपल्या युट्यूब चॅनेल @nishantawadevlogs वर, संपूर्ण व्हिडिओ आज रात्री नक्की पहा, आवडल्यास लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राइब करा.🙏🏼
6 months ago | [YT] | 90
View 6 replies
NishantAwadeVlogs
📢🚨नवीन व्हिडिओ ची लिंक👇🏽नक्की पहा.
गुहेतील जीवन | गुहेत राहणारे आजी-आजोबा | ६० जनावरांसोबतचा गुहेतील संसार | Cave life #maharashtra
https://youtu.be/0iGBiCEy2Ps
6 months ago | [YT] | 113
View 6 replies
NishantAwadeVlogs
नमस्कार मंडळी 🙏🏼
आज २१ व्या शतकात मानव वेगाने प्रगती करीत आहे, जगण्यासाठी नवनवीन संसाधने निर्माण करत आहे, परंतु तरीही या सर्वांत तो स्वतःचे समाधान आणि सुखी जीवन हरवून बसला आहे.
परंतु आजही काही लोक जगातील या क्षणभंगुर गोष्टींपासुन दुर राहत सुखी व समृद्ध जीवन जगत आहेत,
निसर्गाच्या कुशीत, ऊंच डोंगरात असलेल्या गुहेत राहणाऱ्या अशाच एका आजी-आजोबांचा सुखी जीवनप्रवास आज आपण अनुभवणार आहोत, या गुहेतील त्यांचे समृद्ध जीवन, दावणीच्या जनावरांप्रती त्यांना असणारे जीवापाड प्रेम आणि दारात आलेल्या प्रत्येक वाटसरूचा योग्य सन्मान आणि बरेच काही..!!
या सुखी जीवन जगणाऱ्या आजी-आजोबांचा जीवनप्रवास वर्णन करणारा संपुर्ण व्हिडीओ आज रात्री ठिक ८ः३० वाजता आपल्या युट्यूब चॅनल @nishantawadevlogs वर येत आहे, सर्वांनी तो नक्की पहा व आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा.
जय शिवराय, जय महाराष्ट्र 🚩🙏🏼
6 months ago | [YT] | 107
View 24 replies
Load more