नमस्कार मंडळी !! मी रसिका वैद्य…..माझ्या channel वर तुमच खुप स्वागत आहे.या चॅनेल च्या माध्यमातून मी तुमच्या बरोबर संवाद साधणार आहे. मी गेली बरीच वर्ष अमेरिकेत आहे मला इथे आलेले अनुभव, इथलं राहणीमान,इथली संस्कृती, इथले खाद्यपदार्थ, आमचं दैनंदिन जीवन ,अमेरिकेतील प्रेक्षणीय स्थळं इथल्या विविध गोष्टी तुमच्याबरोबर share करायच्या आहेत.प्रत्येकाचं स्वप्न असत अमेरिकेत किंवा इतर कोणत्या foreign country मध्ये फिरायला जायचं पण सगळ्यांनाच ते शक्य होत नाही तर या चॅनेलद्वारे तुम्हाला मी अमेरिका दर्शन करवणार आहे . तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारु शकता.माझे videos तुम्हाला आवडले तर नक्की channel ला subscribe करा.धन्यवाद!!🙏🏻
Hello Everyone!! I am Rasika…Welocome to my channel.I am going to share my experiences, my lifestyle and lots of other things with you through this channel. If u have any questions u can ask me and if u like my videos please Like 👍🏻 share and subscribe. Thank you 😊 🙏🏼
Email: rasislifeinamerica@gmail.com
Instagram: rasislifeinamerica
Life With Rasika
“आज महिलादिन आहे…
पण खरं सांगायचं तर, महिलांसाठी एकच दिवस पुरतो का?
कारण एक स्त्री…
ती दिवसाची सुरुवात सगळ्यांपेक्षा आधी करते
आणि अनेकदा दिवस संपल्यानंतरही तिची कामं संपत नाहीत.
ती घर सांभाळते…
मुलांची काळजी घेते…
कुटुंबासाठी प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीची काळजी करते.
आणि जर ती काम करत असेल,
तर घराबरोबरच ऑफिसची जबाबदारीही तितक्याच ताकदीने निभावते.
पण हे सगळं करताना
ती स्वतःचा थकवा लपवते
आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू ठेवते.
भारत असो… किंवा अमेरिका…
स्त्रीची भूमिका कधीच सोपी नसते.
पण एक गोष्ट मात्र नक्की —
स्त्रिया फक्त घर सांभाळत नाहीत,
त्या घर घडवतात, संस्कार घडवतात आणि भविष्य घडवतात.
म्हणून आजच्या या खास दिवशी
प्रत्येक आईला… प्रत्येक बहिणीला…
प्रत्येक मैत्रिणीला… आणि आयुष्यात भेटलेल्या
प्रत्येक मजबूत महिलेला
मनापासून सलाम.
Happy Women’s Day!
तुमच्यामुळेच हे जग अधिक सुंदर, उबदार आणि प्रेरणादायी आहे.” 🌸
3 months ago | [YT] | 26
View 4 replies
Life With Rasika
मराठी भाषा दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा!
https://youtu.be/HLmsjHt8g_4?si=cs8uW...
3 months ago | [YT] | 11
View 1 reply
Life With Rasika
हे चॅनेल तुमच्या प्रेम आणि विश्वासामुळेच अस्तित्वात आहे🤗
प्रत्येक व्हिडिओत माझ्या मनाचा एक तुकडा गुंफलेला असतो,
आणि तुमचा पाठिंबा त्याला नवी ऊर्जा देतो.
येणारं नवीन वर्ष तुमच्या घरात यश, समाधान आणि शांतता घेऊन येवो 🙏🏼
माझ्या लाडक्या YouTube परिवाराला
नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा! 🌼✨🫶
5 months ago | [YT] | 38
View 5 replies
Life With Rasika
खरा आनंद . . . . . . .
एकदा श्री कृष्ण आणि अर्जुन फिरायला बाहेर पडले. वाटेत त्यांना एक माणूस भीक मागताना दिसला. अर्जुनाला त्याची दया आली आणि त्यांनी त्याला सुवर्णमुद्रांनी भरलेले एक पोते दिले.
या अचानक धनलाभाने तो माणूस अतिशय प्रसन्न झाला. मनात आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवत आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागला. पण त्याचे दुर्भाग्य त्याची सोबत सोडायला तयार नव्हते. वाटेत चोरांनी त्याला अडवले आणि सुवर्णमुद्रांनी भरलेले ते पोते चोरून घेऊन गेले.
तो माणूस दुःखी मनाने आपल्या चरितार्थासाठी पुन्हा भीक मागू लागला.
अर्जुनाला जेव्हा तो भीक मागताना दिसला तेव्हा त्यांनी त्याचे कारण विचारले.
सर्व हकिकत ऐकल्यानंतर अर्जुनाला त्याची दया आली. आणि त्याला एक मौल्यवान माणिक दिले. ते घेवून तो घरी पोहोचला. त्याच्या घरात एक जुने मडके होते. त्याचा वापर गेल्या कित्येक दिवसात झाला नव्हता.
चोरीच्या भीतीने त्याने ते माणिक त्या मडक्यात लपवून ठेवले.
अजूनही त्याचे दुर्भाग्य त्याची सोबत सोडायला तयार नव्हते. दमल्यामुळे त्याला गाढ झोप लागली. त्याच वेळी त्याची पत्नी नदीवर पाणी भरण्यासाठी गेली होती. वाटेत धक्का लागून तिचे मडके पडून फुटले.
तिने विचार करुन घरी असलेले जुने मडके घेऊन पाणी भरायला नदीवर गेली. मडके स्वच्छ धुऊन चांगले पाणी भरून घरी आली. माणिक पाण्यात पडले.
माणसाला जेव्हा हे कळले तेव्हा तो खूप दुःखी झाला.
चरितार्थासाठी पुन्हा भीक मागू लागला.
अर्जुन आणि श्री कृष्णाला जेव्हा तो भीक मागतांना दिसला तेंव्हा त्यांनी त्याचे कारण विचारले.
सर्व हकिकत ऐकल्यानंतर त्यांना वाटले की यांच्या नशिबात सुख नाही आहे. आपण काही तरी करुया की जेणे करुन हा यातून बाहेर पडेल.
आता यापुढे देवाची कृपा सुरु झाली. श्रीकृष्णाने त्या माणसाला दानात फक्त दोन रुपये दिले.
अर्जुन म्हणाला "प्रभू मी दिलेल्या सुवर्णमुद्रा आणि माणिक या माणसाचे दारिद्रय घालवू शकले नाही तर या दोन रुपयांनी काय होणार ?
हे ऐकून श्रीकृष्ण फक्त हसले आणि अर्जुनाला त्या माणसाच्या मागावर जायला सांगितले.
तो माणूस चालता चालता विचार करू लागला की दोन रुपयात धड एका माणसाचे जेवण पण होत नाही आणि देवाने असे कसे केले? ही देवाची कसली कृपा ?
चालत असतांना त्याची नजर एका मासेमा-यावर गेली. त्याच्या जाळ्यात एक
छोटा मासा तडफडत होता. माणसाने विचार केला की दोन रूपयात आपले पोट भरणार नाही पण या माश्याचा जीव वाचू शकतो.
सौदा करुन त्याने दोन रूपयांना तो मासा विकत घेतला. त्याला आपल्या कमंडलूत घेतले. त्यात पाणी भरले आणि त्याला नदीत सोडायला निघाला.
प्रभूची लीला पाहा.... माश्याच्या तोंडातून काहीतरी बाहेर पडले. निर्धन माणसाने ते पाहिले तर काय आश्चर्य, माश्याने गिळलेला तोच माणिक होता तो की जो त्याने मडक्यात ठेवला होता. तो माणूस अत्यानंदाने ओरडू लागला सापडला, सापडला नेमका त्याबाजूने तो चोर चालला होता. ज्याने याच्या सुवर्णमुद्रा लुटल्या होत्या. त्याने माणसाला "सापडला सापडला" असे ओरडताना पाहिले. चोर घाबरला. चोराने विचार केला की याने मला ओळखले आहे आणि आता हा राजाकडे माझी तक्रार करील. घाबरुन त्याने चोरलेल्या सर्व सुवर्ण मुद्रा त्याला परत आणून दिल्या आणि क्षमा मागू लागला. हे पाहाताच अर्जुनाने श्रीकृष्णाला नमस्कार केला. अर्जुन म्हणाला "जे काम पोतेभर सुवर्णमुद्रा आणि मौल्यवान माणिक करू शकले नाही ते आपल्या दोन रुपयांनी करुन दाखवले"
श्रीकृष्ण म्हणाले “अर्जुना हे सर्व आपल्या मनाचे खेळ आहेत. जेंव्हा तू पोतेभर सुवर्णमुद्रा आणि मौल्यवान माणिक त्याला दिलेस तेंव्हा त्याने फक्त स्वतःचा विचार केला पण दोन रुपये दिल्यानंतर त्याने दुस-याचा विचार केला. म्हणून जेंव्हा आपण दुस-याच्या दुःखाचा विचार करतो, दुस-याचे भले करतो तेंव्हा आपण देवाचे काम करतो. आणि तेंव्हा देव आपल्या सोबत असतो".
फेसबुक वरच्या अज्ञात लेखकाच्या सौजन्याने 🙏🏼
6 months ago | [YT] | 35
View 0 replies
Life With Rasika
‘द राँग ट्रेन थिअरी‘ नावाचे एक गृहीतक जपानमध्ये प्रसिद्ध आहे. कधीकधी चुकीचे लोक आपल्याला योग्य दिशेने घेऊन जातात मात्र तो प्रवास सहनशीलतेचा अंत पाहतो! ‘द राँग ट्रेन थिअरी‘मध्ये एक सुंदर आणि तितकीच दुःखद गोष्ट आहे.
कधीकधी आपण चुकीचा मार्ग स्वीकारतो, चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करतो किंवा चुकीच्या जागी खूप वेळ थांबून राहतो. चुकीचे करिअर निवडतो, चुकीच्या गावी स्थलांतरित होतो, चुकीच्या नात्यात - भावनांत गुंतून पडतो, चुकीच्या कल्पनांना आपलं विश्व मानतो, चुकीच्या शब्दांना भुलतो - बळी पडतो, असं बरंच काही चुकीचं आपल्यापैकी अनेकांनी आयुष्यात स्वीकारलेलं असतं.
हे आपल्यासोबतच का घडतं? खरे तर आपण जेव्हा या निर्णयाचा स्वीकार केलेला असतो तेव्हा सुरुवातीला हे सगळं आपल्याला खूप भारी वाटत असतं. हे सर्व आपल्या मनासारखं घडतंय या आनंदात आपण मग्न होतो.
मात्र जसजसा काळ पुढे जाऊ लागतो तसतसे आपल्याला उमगते की, आपला हा निर्णय चुकलेला आहे. तरीही आपल्याला वाटत राहतं की, होतं असं कधीकधी, म्हणून आपण निराश व्हायचं का? लवकरच परिस्थिती बदलेल असं आपण स्वतःला बजावू लागतो.
आणखी काही काळानंतर स्थिती बदलते, मात्र ती पहिल्यापेक्षा खराब झालेली असते! माणूस हतबल होतो! इथे काहीजण निराशेच्या गर्तेत जातात, डिप्रेशनमध्ये खोल बुडून जातात. तर बरेच जण आलेल्या दिवसांना तोंड देत संघर्ष करत राहतात.
स्थिती बदलण्याचे विचार आता सोडून दिलेले असतात आणि आपण आहे त्या स्थितीचा सामना करण्यात गढून जातो. दिवसामागून दिवस जातात आणि मोठ्या कालखंडानंतर एक वेळ अशी येते की परिस्थिती आमूलाग्र बदललेली असते. आपल्या नकळत हे आस्ते कदम घडलेले असते. आपण थोडेसे सुखावतो, स्थिरावतो!
आपण मागे वळून पाहतो तेव्हा, स्वतःचा संघर्ष पाहून थक्क होऊन जातो! जग आपली पाठ थोपटतं, कालपर्यंत ज्यांनी आपल्याला दूर लोटलेले असते तेही जवळ येतात! सारं काही मनासारखं घडू लागतं.
जे निराशेच्या गर्तेत खोल बुडून गेलेले असतात, ते देखील अपवाद वगळता बाहेर पडतात, त्यांचेही दिवस बदलतात!
मग आपल्या मनात विचार येतो की, आपण 'ते' जे निर्णय घेतले होते ज्यांच्यामुळे आपण कोलमडून गेलो होतो, आता सारे काही संपले म्हणून हतबल झालो होतो; ते सर्व नेमकं काय होतं? हे जे काही घडतं, ते म्हणजे 'द राँग ट्रेन थिअरी'!
जीवनात बहुतांश लोक निर्णय घेण्यात चुकतात, जे चुकत नाहीत ते जिनियस असतात; त्यांचा सवालच येत नाही. मात्र ज्यांचे निर्णय चुकलेले असतात त्यांच्यापैकी काही मोजक्या लोकांना लगेच कळते की, आपला हा निर्णय चुकलेला आहे!
जग काय म्हणेल, आपली गणना हाराकिरी पत्करणारा माणूस म्हणून होईल का, असले गैरलागू विचार फाट्यावर मारत ते तात्काळ आपली चूक मान्य करून झालेले नुकसान, तोटा, हानी स्वीकारून दुसरा उचित निर्णय घेतात आणि द्रुतगतीने पुढे जातात!
आणि बहुसंख्य लोक ज्यांना कळलेलं असतं की आपलं चुकलं आहे, तरीही ती चूक ते पुढे रेटतच नेतात, त्यांना अपार संघर्ष करावा लागतो मग बऱ्याच काळानंतर ते देखील नव्या उत्तम स्थितीत पोहोचतात!
हा सर्व प्रकार काय सांगतो? आपल्या वकुबाचे हे मोजमाप नसते. आपल्याला चपखल बसेल असा काळ-वेळ येईपर्यंत, आपल्याला जगाच्या व्यवहाराची समज येईपर्यंत, काही अंशी तरी कठोरता अंगी बाणेपर्यंत, नकार देण्याची हिंमत अंगी येईपर्यंत, व्यवहारी नियम आपल्या ठायी रुजेपर्यंत आपण संघर्षरत असतो!
जेव्हा हे सारे बदल घडलेले असतात, तेव्हा आपण त्या स्थितीत पोहोचलेले असतो, ज्याची वाट पाहिलेली असते! हा जीवनप्रवास चुकीच्या गाडीत बसून केला तरीही, आपण जर संघर्ष करत राहिलो तर इप्सित ठिकाणी पोहोचतोच!
किंबहुना आपल्या दुर्गुणांपायी, स्वभावापायी, कर्मापायी, कमतरतेपायी आपण मागे राहिलेले असतो! मात्र जेव्हा याची भरपाई होते तेव्हा ध्येय गाठतो! 'राँग ट्रेन' योग्य जागीच घेऊन जाते मात्र त्यासाठी ती आपली अग्नीपरीक्षा घेते.
खरे हुशार चलाख ते लोक असतात ज्यांना लगेच लक्षात आलेलं असतं की, आपली ट्रेन चुकीची आहे, म्हणजेच आपला निर्णय चुकलेला आहे; हे कळताच त्यांनी ती ट्रेन, म्हणजेच तो निर्णय बदलून नवा मार्ग स्वीकारलेला असतो!
आपण खडतर मार्ग स्वीकारतो तरीही आपलेही इप्सित गंतव्य स्थळ येतेच, त्यासाठी आपली कसोटी घेतलेली असते. 'राँग ट्रेन'मधला जीवन प्रवास विलक्षण दमवणारा असला तरी, याचे सिंहावलोकन सुखावणारे असते हे नक्की! अर्थातच, त्यासाठीची सगळी लढाई आपण एकट्यानेच लढलेली असते! आपल्या भल्यासाठीच हे घडलेलं असतं!
या दरम्यान, नकळत आपले सगळे दंभ गळून पडतात, दुर्गुण घटतात, चार चांगल्या गोष्टींचा आपण अंगीकार करतो. परिस्थिती अशीच का आहे, हे माझ्याबरोबरच का घडतेय असे प्रश्न विचारत बसण्याऐवजी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरु केलेल्या दिवसापासूनच आपलं परिवर्तन सुरु झालेलं असतं, मात्र आपला फोकस केवळ लक्ष्यावर असल्याने आपल्याला ते उमगत नाही!
कितीही वाईट दिवस आले तरी खचून चालत नाही नि हातावर हात धरून बसूनही चालत नाही, आपण आशावादी प्रयत्नवादी राहिलं की दिवस बदलल्याशिवाय राहत नसतात! आपली गाडी जरी चुकीची असली तरी आपणही ईप्सित गाठतोच!
- समीर गायकवाड (फेसबुक)
6 months ago | [YT] | 27
View 3 replies
Life With Rasika
आपल्या आयुष्यातील खऱ्या संपत्तीचा अर्थ पैशात नाही…
तो आपल्या लोकांमध्ये असतो.काळजी घेणाऱ्या कुटुंबात, साथ देणाऱ्या मित्रमैत्रिणींमध्ये,आणि मनापासून शुभेच्छा देणाऱ्या शुभचिंतका मध्ये.
आज थँक्सगिव्हिंगच्या या खास दिवशी
मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार मानते.तुमच्या प्रेमामुळे, आधारामुळे आणि विश्वासामुळे
माझा प्रवास आणखी सुंदर होत जातो आहे.
मनापासून Thank You…
तुमच्या अशाच प्रेम आणि साथीत माझा छोटासा प्रवास पुढे जात राहो.
Happy Thanksgiving!🤎✨
6 months ago | [YT] | 48
View 4 replies
Life With Rasika
✨शुभ दसरा ✨
8 months ago | [YT] | 64
View 7 replies
Life With Rasika
#कथा-> गौराई आणि माहेरपण..
©तनुजा बागडे धामणे
आज गौरी गणपतीचं विसर्जन झालं. घर अगदी सुनंसुनं झालं. उमाच्या मनाला त्याची हुरहुर लागली होती. ती मनाशीच विचार करू लागली.. किती धावपळीचे गेले हे काही दिवस. पण किती आनंद होता ते सगळं करण्यात.. आधी गणपती बाप्पांचं आगमन झालं. त्यांची प्रतिष्ठापना, सजावट,नैवेद्य,आरती, घरभर पसरलेला मोदकांचा सुवास, गणपतीची गाणी यामुळे घर कसं भरून गेलं. त्यानंतर चौथ्या दिवशी गौरींचं आगमन झालं. सोन्याच्या पावलांनी गौरी आपल्या घरी आल्या माहेरवाशीण म्हणून. त्यांना नैवेद्य,हळदीकुंकू, जागरण, बायकांची गाणी सगळं कसं साग्रसंगीत झालं. या सगळ्यात दोन तीन दिवस कसे निघून गेले कळले देखील नाही.. गौरी आपल्याबरोबरच घरात सुख, समृद्धी,आनंद घेऊन आल्या.
माझ्या माहेरी गौरी नव्हत्या. फक्त गणपतीच असायचा. आम्ही खूप धमाल करायचो गणपतीत. पण आपल्या घरी गौरी का नाहीत हा प्रश्न मला नेहमी पडायचा. आईला दरवर्षी गौरींच्या हळदी-कुंकवाचं आमंत्रण आलेलं असायचं. आईसोबत मी आवर्जून जायचे. मला खूप आवडायचं ते सगळं बघायला. गौरींचा साजशृंगार, त्यांच्या साड्या, त्यांच्या नैवेद्यासाठी केलेले विविध पदार्थ, सजावट, आणि मध्यभागी विराजमान असलेले गणपती बाप्पा हे सगळं दृश्य अगदी नयनरम्य असायचं.
महेश सोबत लग्न करुन या घरात आले. त्यावेळी सासूबाईंनी इथल्या सगळ्या रीतीभाती समजून सांगितल्या. तेव्हा कळलं की, आपल्या घरी गौरी असतात. त्यावेळी किती आनंद झाला होता ते ऐकून. तेव्हापासून सासूबाईंच्या हाताखाली मीदेखील तयार झाले. सगळं काही शिकून घेतलं त्यांच्याकडून. सासूबाईंना मुलगी नव्हती. महेश एकटाच असल्यामुळे त्या म्हणायच्या,"अगं,गौरी येतात ना घरी, तेव्हा मला माझ्या मुलीच आल्या आहेत असं वाटतं. त्यामुळे त्यांच्यासाठी काय करु आणि काय नको असं होऊन जातं. तीन दिवसाच्या पाहुण्या असतात त्या. पहिल्या दिवशी आपल्या लेकराबाळांना घेऊन येतात. घर कसं भरून जातं.. दुसऱ्या दिवशी त्यांचा पाहुणचार, किती आनंद मिळतो ते सगळं करण्यात. आणि तिसऱ्या दिवशी लगेच जातात. तेव्हा डोळे अगदी भरून येतात"...
गौरींचे आगमन झाल्यावर त्यांना साडी नेसवून त्यांचा साजशृंगार,सजावट हे सगळं मी आवडीने करायचे. अगदी डोळ्यात साठवून ठेवावं इतकं सुंदर दिसतं त्यांचं ते रूप.त्यांच्या नैवेद्याचा स्वयंपाक,त्यात पुरणपोळ्या, विविध प्रकारच्या चटण्या,कोशिंबीर,भाज्या,तळलेले पदार्थ, वेगवेगळे लाडू,करंजी चकली,शेव,भजी,पापड लोणचे हे सगळं आम्ही दोघी मिळून करायचो.
ह्यावेळी मात्र सासुबाई नेमक्या कामानिमित्ताने गावी गेल्या आणि त्यांना तिकडे राहावं लागलं. त्यांना विचारून मी अगदी त्यांच्यासारखंच सगळं करण्याचा प्रयत्न केला. क्षणोक्षणी मला त्यांची उणीव भासत होती. त्यांचही सगळं लक्ष इकडेच लागलेलं होतं. माझ्या लेकी आल्या आणि मी नाही याची खंत त्यांना वाटत होती. आमच्या गौरींनाही कुठेतरी आईची कमतरता भासली असावी कारण, विसर्जनाच्यावेळी जणूकाही त्यांचेही डोळे भरून आले होते..
खरंच..आई ती आईच असते.तिची जागा कोणीच नाही घेऊ शकत..माझी आईपण अशीच. मी आणि ताई घरी गेलो की, ती असंच म्हणते.." माझ्या गौरी आल्या आपल्या लेकरांना घेऊन." मग आम्ही पण असंच दोन-तीन दिवस राहतो. तिला काय करु आणि काय नको असं होऊन जातं. एक दिवस यायचा दुसऱ्या दिवशी आमचा पाहुणचार आणि तिसऱ्या दिवशी सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही भरलेल्या डोळ्यांनी निघतो.अगदी गौराईसारखंच.... आता जाणवतंय, आईला कसं वाटत असेल आम्ही परतल्यावर...
असा विचार करत असतानाच उमाचा फोन वाजला. सासूबाईंचा फोन होता. तिने पटकन उचलला. तिकडून भरल्या आवाजात सासूबाईंनी विचारलं," उमा, गेल्या का ग माझ्या लेकी परत?"..." हो आई आत्ताच." असं म्हणत असताना उमाच्याही डोळ्यातून नकळत अश्रू ओघळले.....
9 months ago (edited) | [YT] | 229
View 5 replies
Life With Rasika
⛱ *वीकेंड*🎣
आज माझा वैतागलेला एक कलीग भेटला. म्हणाला "समीर साला एक लॉंग विकेन्ड मिळाला खूप दिवसांनी म्हणून आनंदी होतो तर बायकोने हट्ट धरला की फिरायला जाऊ!
मग गेलो दोनशे किलोमीटर प्लस वन वे ड्राईव्ह करत. साला रस्ते जाम, बीचवर प्रचंड गर्दी, हॉटेल फुल!
What's the point? माझ्यासाठी ते सर्व दिवस ट्राफिक, गर्दी आणि टेंशनचे होते. जरा आराम नाही!"
मग सहज मनात विचार आला कि हल्ली जरा सुट्टी मिळाली कि जगबुडी झाल्यासारखे लोक "विकेन्ड" साजरा करायला कुटुंबकबिला घेऊन निघतात. जाण्यायेण्यात सात आठ तास (ट्रॅफिक नसेल तर), तिथे जाऊन गर्दीत मिसळून थातुर मातुर साईट सिईंग करायचं किंवा रिसॉर्टच्या रूम मध्ये टीव्ही पहात झोपून राहायचं.
सुट्टी संपवून दमून यायचं आणि दुसर्या दिवशी कामाला जुंपायचं! आपण नक्की का जातो वीकएंडला?
कशापासून लांब पळतो?
मला वाटत रोजची चाकोरी मोडणे हा त्यामागील महत्वाचा हेतू असतो.
चाकोरी म्हणजे काय?
नवऱ्याची नोकरी, मुलांच्या शाळा आणि बायकोचे घरकाम?
चाकोरी म्हणजे रोजची मेल्स, व्हाट्सअँप, फेसबुक, टीव्ही, गर्दी, ट्रॅफिक? मग हे मोडायला, ह्यापासून आराम मिळवायला परत त्यातच का जायचं?
सुट्टीच्या दिवशी घरातलं वायफाय आणि टीव्ही बंद करून टाकावे. फोन स्वीचऑफ करून कपाटात ठेवावा. मुलांची अभ्यासाची पुस्तके दप्तरात भरून ठेवावी. किचनचा गॅस बंद ठेवावा. खूप गप्पा माराव्या. मुलांशी खेळावे, वयस्कांना वेळ द्यावा, बाहेरून ब्रेकफास्ट सकट सर्व मिल्स मागवावी.
सर्वांना मान्य असेल तर जवळचे भावंड किंवा जिवलग मित्रांना सहकुटुंब घरी बोलवावे. गप्पांचे फड जमवावे, पत्ते खेळावे, गाणी ऐकावी, वाद्यावरची धूळ झटकून त्यावर एखादा साज छेडावा, मस्त पुस्तक वाचावे.
बायकोला सकाळी सायंकाळी स्वहस्ते चहा करून द्यावा.
नको ती गर्दी, नको ते ट्रॅफिक, नको ते ड्रायव्हिंग!
विकेन्ड कधी एन्ड होईल ते कळणार सुद्धा नाही. एन्ड न होणाऱ्या अनेक आठवणी देत!
अनावश्यक प्रवास तसेच प्रदूषण टाळा ! आनंद मिळवण्यासाठी लांबचा प्रवास किंवा पैसे खर्च केलेच पाहिजेत असे नाही.
आपणच पुढील पिढीला चुकीच्या सवयी लावत आहोत अस नाही ना ?
*Try it.*
~अज्ञात लेखकाचे आभार 🙏🏼
9 months ago | [YT] | 139
View 8 replies
Life With Rasika
*नांदत्या घराची किंमत ....*
....दोन दिवसापूर्वी मी एका कंपनीचा सामाजिक उपक्रम म्हणून मेळावा आयोजित केला होता तो एका वृद्धाश्रमात.
त्या कार्यक्रमाचे फोटो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पेनड्राईव्ह मध्ये पाठवतो असे व्यवस्थापकांनी सांगितले. वाटलं ..कोणी ऑफिसबॉय येईल पेनड्राईव्ह घेऊन म्हणून मी दुसऱ्या दिवशी वाट बघत होते.
7.30 ला मोबाईल वरून फोन आला . जरा थकलेला ..पण मार्दवपूर्ण असा एका आजींचा आवाज होता . " मी आलेय फोटो घेऊन . डेक्कन च्या बस स्टॉप वर उतरलेय. पत्ता समजावून सांगता का ?"
अरे बाप रे ..एवढ्या वयस्क आजी . मी माझ्या लेकीला गाडीने पिटाळले त्यांना आणायला . झक्कपैकी टू व्हिलर वर बसून आजी आल्या . फिकटस नऊवारी पातळ , सुपारीएवढा अंबाडा , हसतमुख चेहरा आणि हातात मोबाईल आणि पेनड्राईव्ह छोट्याशा बटव्यात .
ब्रेकफास्ट ची वेळ होती . नवरा ग्राऊंडवरून 10 मिनिटात येणार होता . मी बटाटे पोह्यांची तयारी केली होती .मला कंपनीत फोटो आणि न्यूज पाठवायची होती . लेक पसार झाली काहीतरी काम काढून .
शेवटी मी डाईनिंग टेबलवर लॅपटॉप घेतला नि गॅसवर कढई ठेवली . माझी धांदल पाहून आजी म्हणाल्या , " मी करते ग पोहे , तू निश्चिनतीने फोटोचे काम हातावेगळे कर ." मी जरा संकोचले पण पर्याय नव्हता म्हणून तेथून बाजूला झाले . माझे काम होस्तोवर पोहे तय्यार .
भरपूर ओला खोबरं आणि कोथिंबीर घालून आजीनी मस्त पोहे केले होते . हक्कानी पापड मागून घेतले . मी भाजते म्हंटलं तर म्हणाल्या " थांब मी तळते कि ".
एव्हाना लेक आणि नवरा घरी आले आणि आम्ही एकत्र ब्रेकफास्ट करायला घेतला .आजींच्या हातचे चविष्ट पोहे खाऊन घरातले खुश . जाते जाते म्हणत आजी जेवण करूनच निघाल्या इतका आग्रह माझ्या माणूसवेल्हाळ लेकीने आणि नवऱ्याने त्यांना केला . आणि आजीने पण खान्देशी भरीत करून त्यांच्या आग्रहाला पोच दिली.
निघताना मी जरा संकोचून आजींना म्हंटले , " आजी खूप त्रास घेतलात हो ."
आजी जे उतरल्या त्यात समाधान होते आणि वेदनाही .
*त्या म्हणाल्या "नांदत्या घरात खूप दिवसांनी वावरले,अगदी स्वयंपाकघरातही हक्क दाखवला...खूप छान वाटलं ग "*
या एका वाक्यात मीच रडवेली झाले . " पुन्हा याल ना ? " त्या उत्तरादाखल किंचित हसल्या अन म्हणाल्या " परमेश्वराची इच्छा "
खरा सांगू ..सणासुदीला पाव्हण्यारावळ्यांचा मर्यादेपेक्षा जास्त राबता झाला कि मी जरा वैतागायचे .....आजींच्या " नांदत्या " या एका शब्दाने मला ती किंमत कळली .
-अनामिक लेखकाच्या सौजन्याने 🙏🏼🙏🏼
9 months ago | [YT] | 57
View 9 replies
Load more