ऑनलाइन अध्यापन व शाळेतील विविध उपक्रम आपणापर्यंत शेअर करावेत यासाठी हे शैक्षणिक चॅनेल निर्माण केलेले आहे. नवीन शैक्षणिक अध्यापन पद्धतीने मी ज्ञानरचनावादी, कृतीयुक्त व आनंददायी पद्धतीने अध्यापन करते..याच पद्धतीने विद्यार्थांना आवडतील असे नवनवीन व्हिडीओ मी या चॅनेलद्वारे पाठवत असते. आपण या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.
निर्मिती :- निर्मला लक्ष्मण केदारलिंगे (नवले) M.A.DED प्राथमिक शिक्षिका. अध्यापन अनुभव २१ वर्षे .
youtube.com/c/NirmalaKedarlinge
Nirmala Kedarlinge
जि प प्रा. शाळा जगताप वस्ती सोहाळे स्वातंत्रदिनानिमित विविध कार्यक्रम घेण्यात आले.
10 months ago | [YT] | 5
View 1 reply
Nirmala Kedarlinge
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगताप वस्ती सोहाळे येथील शिक्षणप्रेमी पालक श्री. सचिन नाईकनवरे यांनी मुलगी कुमारी शिवकन्या हिच्या वाढदिवसानिमित्त जगताप वस्ती शाळेतील इयत्ता पहिली दुसरी साठी मी वाचणारच हे पुस्तक तसेच इयत्ता तिसरी ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना ज्ञान आपल्या दारी या पुस्तकाचे वाटप करून आपली कन्या शिवकन्या हिचा वाढदिवस साजरा केला.. अशा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याबद्दल पालक श्री सचिन नाईकनवरे यांचे खूप खूप अभिनंदन.*कुमारी शिवकन्यास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा*.. ..🎂
11 months ago | [YT] | 10
View 2 replies
Nirmala Kedarlinge
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगताप वस्ती येथे प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
1 year ago | [YT] | 9
View 0 replies
Nirmala Kedarlinge
*अभिनंदन..अभिनंदन..*
अजंठा आर्ट अकॅडमी सांगोला आयोजित राज्यस्तरीय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेचा सन 2024-2025 चा पारितोषिक वितरण कार्यक्रम राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन, सांगोला येथे मोठ्या उत्साहात पार पडला.या स्पर्धेत आमच्या जि.प.प्रा.शाळा जगताप वस्ती (सोहाळे ) येथील कु. वेदिका संदीप जगताप हिने (तिसरी चौथी गटात राज्यात द्वितीय) तर कु.कु. संस्कृती उमेश जगताप हिने ( सातवी आठवी गटात) राज्यात तिसरा क्रमांक मिळाल्या बद्दल सांगोल्याचे आमदार मा. श्री. आबासाहेब देशमुख, शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर, कवी इंद्रजित घुले, महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, यांच्या हस्ते या विद्यार्थिनीचां प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. अंकोली केंद्राचे केंद्रप्रमुख राजकुमार राऊत साहेब, तसेच मुख्याध्यापक ज्ञानदेव डांगे, राज्य पुरस्कार प्राप्त परमेश्वर आश्रम शाळा कामती चे कला शिक्षक सुरेश मलाव सर आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश जगताप तसेच पालकांनी सदर विद्यार्थिनी चे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
🌹🎊🌷🎉🌹🌷
1 year ago | [YT] | 5
View 3 replies
Nirmala Kedarlinge
बालिका दिन उपक्रम
दि. 03.01.2025
जि.प.प्रा.शाळा, जगताप वस्ती (सोहाळे )येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचच उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजनाने प्रमुख पाहुण्या डाॅ.शोभा सरगुले मॅडम व कार्यक्रमाच्या अध्यक्षा इ. 7वीची विद्यार्थिनी कु.सृष्टी संतोष जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीम.ओहोळ मॅडम यांनी केले.प्रमुख पाहुण्या डाॅ.सरगुले मॅडम यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.इ.7वी ची राजगौरी जगताप हिने सावित्रीबाई यांच्या कार्याचा गौरव आपल्या भाषणातून केला.डाॅ .शोभा सरगुले मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य व मुलींचे आरोग्य याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थिनींनी पुढील विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे सादरीकरण केले. ⭐इ.7वी सावित्रीच्या ओव्या व गीते-अनुराधा ,शर्वरी,आदिती,राधा
⭐ इ7वी -एकपात्री नाटक -पलक
⭐ इ6वी समृद्धी पवार -भारुड
⭐समुहनृत्य-1) इ.4थी -आम्ही सावित्रीच्या मुली.......... 2)इ.5वी -फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? 3)7वी-कहता है पल,जीते चल....
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ.7वीतील स्नेहल घुले व गौरी लामतुरे यांनी केले.आभार संस्कृतीजगताप हिने मानले. तसेच यावेळी सर्व विद्यार्थ्यांना शिरा व मसालेभात यांचे जेवण देण्यात आले. मधल्या सुट्टीनंतर विद्यार्थिनींच्या रांगोळी, लिंबू चमचा या स्पर्धा घेण्यात आल्या.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री.डांगे सर,श्री.अत्तार सर,श्रीम.केदारलिंगे
मॅडम,श्रीम. रुही मॅडम व श्रीम. ओहोळ मॅडम यांनी सहकार्य केले.
1 year ago | [YT] | 14
View 1 reply
Nirmala Kedarlinge
जि.प.प्रा.शाळा, जगताप वस्ती (सोहाळे ) येथे जागतिक ध्यान दिवस साजरा करण्यात आला.
1 year ago | [YT] | 7
View 0 replies
Nirmala Kedarlinge
*जगताप वस्ती (सोहाळे) जिल्हा परिषद शाळेचे राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धेत यश..*
🏆🎊🎉🎊🎉🏆
*सन 2024-2025 मध्ये अजंठा आर्ट अकॅडमी, सांगोला मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धेत शाळेतील * कु.वेदिका संदीप जगताप- हिने इ.3 री व इ.4 थी गटातून राज्यात द्वितीय क्रमांक, कु. संस्कृती उमेश जगताप-हिने इ.6 वी व 7 वी गटातून राज्यात तृतीय क्रमांक, कु. समृध्दी ज्ञानेश्वर पवार हिने इ.6 वी व 7 वी गटातून राज्यात-उत्तेजनार्थ, कु.अनुश्री अतुल नाईकनवरे हिने इ.1 ली व 2 री गटातून राज्यात उत्तेजनार्थ ..असे यश मिळवले..*
🎨🎨🎨🎨🎨🎨
*या यशा बद्दल सर्व विद्यार्थ्यांचे तसेच या विद्यार्थ्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन..*
🌷🌹🌷🌹🌷🌷
*मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षक व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन..*🌹👍
1 year ago | [YT] | 2
View 0 replies