abhijeet dhongade



abhijeet dhongade

त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर संपूर्ण वंचित समाजाच्या आई. संघर्ष, त्याग आणि माणुसकीचे जिवंत प्रतीक असलेल्या रमाईंची देशातील वंचित, उपेक्षित समाजावर अपार माया होती. दुःखांचा डोंगर पेलत, स्वतःचे आयुष्य कष्टात घालवूनही त्या खंबीरपणे बाबासाहेबांच्या पाठीशी उभ्या राहिल्या.

स्वतःच्या कुटुंबापुरते न राहता संपूर्ण समाजालाच कुटुंब मानणाऱ्या, ममतेचा आणि सहनशीलतेचा आदर्श उभा करणाऱ्या या मायाळू मातेला माता रमाई जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

त्यांचे विचार, त्याग आणि प्रेरणा सदैव प्रेरित करत राहील.

4 months ago | [YT] | 5

abhijeet dhongade

न्यायपालिकेची 'कॉलेजियम' भिंत: जिथे न्याय मिळतो की वाटला जातो?

प्रस्तावना:
"न्याय मिळवण्यासाठी कोर्टात जावे लागते, पण न्यायाधीश होण्यासाठी कुणाच्या तरी मर्जीत असावे लागते का?" हा टोकदार प्रश्न आज भारतीय लोकशाहीच्या उंबरठ्यावर उभा आहे. भारताची 'कॉलेजियम प्रणाली' सध्या अशा एका वळणावर आहे, जिथे तिची 'गुप्तता' हीच तिची सर्वात मोठी शत्रू बनली आहे.

१. जगातील एकमेव 'स्वयंभू' व्यवस्था
कल्पना करा, एखाद्या कंपनीत मॅनेजरनेच ठरवायचं की पुढचा मॅनेजर कोण असेल आणि त्यासाठी त्याने आपल्याच वर्तुळातील नावं सुचवायची... हे वाचायला जितकं विचित्र वाटतं, तितकंच सत्य भारतीय न्यायपालिकेत घडतंय. जगात असा कोणताही प्रगत देश नाही जिथे न्यायाधीशच न्यायाधीशांची नियुक्ती करतात. ही 'Self-Appointing' सिस्टीम लोकशाहीच्या नावाखाली सुरू असलेली एक 'बंदिस्त संस्कृती' बनली आहे का? हा आजचा कळीचा प्रश्न आहे.

२. 'अंकल जज सिंड्रोम' आणि वशिलेबाजीचा धोका
न्यायपालिकेतील नियुक्त्या या कोर्टाच्या गांभीर्यापेक्षा 'बंद दाराआड' होणाऱ्या चर्चेवर अधिक अवलंबून असतात, असा आरोप वारंवार होतो. ज्याला 'अंकल जज सिंड्रोम' म्हणतात, तो म्हणजे "विशिष्ट घराण्यातील व्यक्तींना झुकते माप देणे." यामुळे न्यायालयात कायद्याचा अगाध अभ्यास असलेल्या विद्वानांपेक्षा 'नामवंत' घराण्यांचे वारसदार अधिक दिसू लागले आहेत. गुणवत्ता असूनही केवळ 'कनेक्शन' नसल्यामुळे अनेक सामान्य वकील मागे पडत आहेत.

३. 'मेरिट' की 'मॅनेजमेंट'? - सामाजिक प्रतिनिधित्वाचा प्रश्न
जेव्हा बहुजन समाजातील एखादा वकील न्यायाधीशाच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा 'गुणवत्ता' (Merit) नावाचे शस्त्र उपसले जाते. पण ही गुणवत्ता मोजण्याचे मोजमाप नेमके काय? ७५ वर्षांच्या इतिहासात हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच एससी, एसटी किंवा ओबीसी न्यायाधीश सर्वोच्च पदापर्यंत का पोहोचू शकले? हा प्रश्न केवळ आकडेवारीचा नाही, तर मानसिकतेचा आहे. नियुक्त्यांच्या आकडेवारीतून हे स्पष्ट दिसते की, इथे प्रवेश मिळवण्यासाठी केवळ 'पात्रता' पुरेशी नाही, तर एका 'विशिष्ट सामाजिक वर्तुळात' असणे गरजेचे ठरतेय.

४. सामाजिक वैविध्याची गरज
शिक्षण, नोकरी, राजकारण सगळीकडे प्रतिनिधित्व आहे, मग 'न्यायदेवतेच्या' दरबारात सामाजिक प्रतिनिधित्वाचा विषय निघताच 'न्यायपालिकेचे स्वातंत्र्य' धोक्यात कसे येते? खरं तर, न्यायपालिकेत विविधता आली तरच सामान्य माणसाला वाटेल की तिथे बसलेली व्यक्ती त्याचे दुःख समजू शकते. जोपर्यंत न्यायपालिकेत 'सोशल डायव्हर्सिटी' येत नाही, तोपर्यंत ती लोकशाहीची नव्हे तर एका विशिष्ट वर्गाची 'खाजगी जहागीर' वाटत राहील.

५. धोरणात्मक बदलाची वेळ!
आता न्यायपालिकेतील या 'क्लोज्ड सिस्टीम'वर संरचनात्मक प्रहार करण्याची वेळ आली आहे. २०१५ मध्ये रद्द करण्यात आलेला NJAC (राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग) पुन्हा एका पारदर्शक स्वरूपात सक्रिय करणे आवश्यक आहे. यात न्यायाधीश, सरकार आणि निष्पक्ष तज्ज्ञांचा समावेश असावा, जेणेकरून निवडीची प्रक्रिया पारदर्शक होईल.

निष्कर्ष:
न्यायपालिकेचा सन्मान हा तिच्या निर्णयांवरून व्हायला हवा, पण तिच्या निवडीच्या पद्धतीवर जेव्हा शंका घेतली जाते, तेव्हा लोकशाहीचा पाया डळमळीत होतो. आता वेळ आली आहे की, 'कॉलेजियम'च्या या बंद खोल्यांच्या भिंती पाडून तिथे पारदर्शकतेचा सूर्यप्रकाश आणला जावा. कारण, न्याय केवळ व्हायला नको, तो सर्वांना समान संधी देताना दिसायलाही हवा!
#CollegiumSystem #JudicialReform #SocialJustice #BahujanRepresentation #DemocraticIndia

4 months ago (edited) | [YT] | 0

abhijeet dhongade

महान व्यक्तिमत्त्व, त्याग, शिस्त आणि दूरदृष्टीचे प्रतीक असलेले रामजी बाबा यांचा स्मृतिदिन. ज्यांच्या संस्कारांनी, कष्टांनी आणि शिक्षणावरील आग्रही भूमिकेमुळे भारताला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारखा महामानव लाभला.

रामजी बाबांनी प्रतिकूल परिस्थितीतही मुलांच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. शिस्त, नीतिमत्ता, स्वाभिमान आणि जिद्द यांचे धडे देत त्यांनी बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व घडवले. त्यांच्या त्यागामुळेच जगाला “बाबासाहेब” मिळाले.

अशा महान पित्याच्या स्मृतीस कोटी कोटी विनम्र अभिवादन.

4 months ago | [YT] | 1

abhijeet dhongade

*संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!*

4 months ago | [YT] | 3

abhijeet dhongade

रोहित वेमुला हा केवळ एक विद्यार्थी नव्हता, तो आंबेडकरवादी विचारांचा, संविधानिक मूल्यांचा आणि मानवी सन्मानाचा निर्भय आवाज होता.

शिक्षण, समता, स्वाभिमान आणि हक्कांसाठी उभा ठाकलेला हा सुशिक्षित तरुण मनुवादी, जातीय आणि दडपशाही व्यवस्थेला अस्वस्थ करणारा होता.

म्हणूनच संस्थात्मक अन्यायाच्या माध्यमातून रोहित वेमुलांचा आवाज कायमचा गप्प करण्याचा अमानुष प्रयत्न करण्यात आला.

परंतु रोहितला मारता आलं नाही, कारण रोहित म्हणजे विचार आहे… संघर्ष आहे… प्रतिकार आहे.

आज रोहित वेमुला यांचा जन्मदिन आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त देशभरातील विद्यार्थी व युवकांनी शैक्षणिक संस्थांमध्ये जातीय भेदभावाविरुद्ध प्रश्न विचारणे, संघटित राहून प्रतिकाराचा लढा अधिक तीव्र करणे हेच रोहितला खरे अभिवादन ठरेल.

रोहित वेमुला यांच्या जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

#रोहित_वेमुला #Rohit_Vemula

4 months ago | [YT] | 7

abhijeet dhongade

महाराष्ट्रातील सर्व जिल्हयातील संविधानप्रेमी, समतावादी व निसर्गप्रेमी कार्यकर्त्याना बाळासाहेब आंबेडकर यांचे आवाहन.

#vbaforindia

5 months ago | [YT] | 6

abhijeet dhongade

ना 'युवराज', ना 'राजकुमार'...
कारण ते लोकशाहीचे नव्हे तर राजेशाहीचे बिरूद आहेत.
सुजातदादा आंबेडकर म्हणजे संघर्षातून तावून सुलाखून निघालेलं एक आश्वासक नेतृत्व! अन्याय आणि मनुवाद विरोधातील फुले शाहू आंबेडकरी विचाराची गाईडेड मिसाईल ✊🔥
उच्च विद्याभूषित, विचारांची प्रगल्भता आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांची जाण असलेला, नव्या पिढीचा बुलंद निडर आवाज.
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दमदार प्रतिभा आणि ध्येयवादी युवा नेता Sujat Ambedkar सुजातदादा आंबेडकर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! 🎂✨
तुमचा हा वंचितांच्या संघर्षाचा प्रवास असाच अविरत चालू राहो आणि नव्या पिढीला लढण्याची प्रेरणा, मार्ग आणि नेतृत्व मिळत राहो,
हि मंगल कामना ...

5 months ago | [YT] | 7