रवी भवन, नागपूर येथे चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी संघटनात्मक विषयांसह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक नागरिकांनी भेट घेऊन आपल्या समस्या, सूचना व अपेक्षा मांडल्या. याप्रसंगी युवासेना सचिव (पूर्व विदर्भ) शुभम नवले उपस्थित होते.
शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री. वर्धराज पिल्ले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित समारंभास उपस्थित राहून त्यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
ईश्वरचरणी प्रार्थना की, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धी लाभो. समाजहितासाठी व शिवसेनेच्या संघटनात्मक कार्यातील त्यांची वाटचाल अधिक यशस्वी व प्रेरणादायी ठरो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. (३ जुलै २०२६)
प्रख्यात कवी, वक्ते व साहित्यिक डॉ. कुमार विश्वास यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची 'वर्षा' निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपस्थित होतो.
याप्रसंगी साहित्य, संस्कृती यांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
९ व्या जीएसटी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्यासमवेत उपस्थित राहिलो. 'एक राष्ट्र, एक कर' या संकल्पनेतून देशाच्या करव्यवस्थेत ऐतिहासिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या जीएसटीने सहकारी संघराज्य व्यवस्थेला नवी दिशा दिली असून व्यवसाय सुलभतेलाही मोठी चालना मिळाली आहे. जीएसटी अंमलबजावणीत महाराष्ट्राने नेहमीच आघाडी कायम ठेवत देशातील सर्वाधिक जीएसटी योगदान देणारे राज्य म्हणून आपले स्थान अधिक बळकट केले आहे. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या करदाते व अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास मुंबईच्या महापौर रितूताई तावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (1 जुलै 2026)
कृषीदिनानिमित्त आयोजित सन २०२३ व २०२४ च्या राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सन्मान सोहळ्यास राज्याचा कृषी राज्यमंत्री म्हणून उपस्थित राहिलो.
कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, शेतकरी गट, संस्था, पत्रकार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. आपल्या कष्ट, जिद्द, नवकल्पना आणि कृषी विकासासाठी दिलेल्या योगदानामुळे सन्मानित झालेल्या सर्व पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधी यांसारख्या योजनांद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यात येत असून, शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. महिला शेतकरी सक्षमीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार आणि शाश्वत कृषी विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्राची शेती अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांना विनम्र अभिवादन करत, समृद्ध, आधुनिक आणि आत्मनिर्भर शेतीचा संकल्प अधिक दृढ करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्माजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारजी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेजी,फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावलेजी, राज्यमंत्री इंद्रनील नाईकजी, कृषी सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सुरज मांढरे, कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी, पुरस्कार विजेते तसेच त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
विधान परिषद उपसभापतीपदासाठी शिवसेना - महायुतीकडून उमेदवारी प्राप्त झाल्याबद्दल आमदार श्री सचिन अहिर यांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा!
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर मार्गक्रमण करणारे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आपण या नव्या जबाबदारीत यशस्वीपणे कार्य करून विधान परिषदेची गौरवशाली परंपरा अधिक समृद्ध कराल, असा दृढ विश्वास आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, नियोजन विभागाच्या वतीने आयोजित 'राष्ट्रीय सांख्यिकी दिन' कार्यक्रमास उपस्थित होतो.
यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय सांख्यिकी दिनाच्या शुभेच्छा देताना, सांख्यिकी विभाग हा शासनाच्या कार्याचा खरा पाठीचा कणा आहे, असे मत व्यक्त केले. नियोजन विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विभागाच्या कामकाजाविषयी सविस्तर चर्चा करण्याची इच्छा होती. १५ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत त्यास सुरुवात झाली असून, आज प्रत्यक्ष विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.
सांख्यिकी विभागाने आजवर अत्यंत चांगले काम केले असले, तरी डेटा संकलन आणि त्या डेटाचा शासनाच्या धोरणे, योजना व निधी नियोजनामध्ये प्रभावी वापर यामधील दरी कमी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. 'विकसित भारत' आणि 'विकसित महाराष्ट्र' या उद्दिष्टांच्या पूर्ततेमध्ये अचूक, अद्ययावत आणि सुसंगत सांख्यिकी माहितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, शासनाच्या योजनांची सांगड डेटाशी घातल्यास विकास अधिक परिणामकारक होईल, असेही नमूद केले.
यासोबतच, शासनाच्या निधीतून होणारी भांडवली गुंतवणूक, विकासकामांचे नियोजन आणि संसाधनांचे योग्य वाटप यासाठी डेटा-आधारित नियोजन आवश्यक असल्याचे सांगितले. राज्याचे प्रभावी मॅपिंग झाल्यास प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपल्या मतदारसंघाची वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध होईल आणि त्याआधारे अधिक अचूक नियोजन करता येईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान प्रकाशित करण्यात आलेल्या विविध सांख्यिकी प्रकाशनांचे कौतुक करत, या प्रकाशनांमधील माहितीचा प्रत्यक्ष धोरणनिर्मिती व विकासकामांमध्ये प्रभावी वापर झाला, तर त्याचे सकारात्मक परिणाम राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच दिसून येतील, असे मत मांडत सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या.
Adv. Ashish Jaiswal

#नागपूर
8 hours ago | [YT] | 3
View 0 replies

15 hours ago | [YT] | 19
View 0 replies
Adv. Ashish Jaiswal
प्रख्यात कवी, वक्ते व साहित्यिक डॉ. कुमार विश्वास यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची 'वर्षा' निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपस्थित होतो.
याप्रसंगी साहित्य, संस्कृती यांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
#वर्षा #मुंबई #देवेंद्रजी_फडणवीस #आशिष_जयस्वाल
2 days ago | [YT] | 24
View 0 replies
Adv. Ashish Jaiswal
📍 मुंबई
९ व्या जीएसटी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्यासमवेत उपस्थित राहिलो. 'एक राष्ट्र, एक कर' या संकल्पनेतून देशाच्या करव्यवस्थेत ऐतिहासिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या जीएसटीने सहकारी संघराज्य व्यवस्थेला नवी दिशा दिली असून व्यवसाय सुलभतेलाही मोठी चालना मिळाली आहे. जीएसटी अंमलबजावणीत महाराष्ट्राने नेहमीच आघाडी कायम ठेवत देशातील सर्वाधिक जीएसटी योगदान देणारे राज्य म्हणून आपले स्थान अधिक बळकट केले आहे. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या करदाते व अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास मुंबईच्या महापौर रितूताई तावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (1 जुलै 2026)
2 days ago | [YT] | 14
View 0 replies
Adv. Ashish Jaiswal
📍वरळी, मुंबई
कृषीदिनानिमित्त आयोजित सन २०२३ व २०२४ च्या राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सन्मान सोहळ्यास राज्याचा कृषी राज्यमंत्री म्हणून उपस्थित राहिलो.
कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, शेतकरी गट, संस्था, पत्रकार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. आपल्या कष्ट, जिद्द, नवकल्पना आणि कृषी विकासासाठी दिलेल्या योगदानामुळे सन्मानित झालेल्या सर्व पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधी यांसारख्या योजनांद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यात येत असून, शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. महिला शेतकरी सक्षमीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार आणि शाश्वत कृषी विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्राची शेती अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांना विनम्र अभिवादन करत, समृद्ध, आधुनिक आणि आत्मनिर्भर शेतीचा संकल्प अधिक दृढ करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्माजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारजी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेजी,फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावलेजी, राज्यमंत्री इंद्रनील नाईकजी, कृषी सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सुरज मांढरे, कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी, पुरस्कार विजेते तसेच त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
#कृषी_पुरस्कार #कृषी_राज्यमंत्री #आशिष_जयस्वाल
3 days ago | [YT] | 8
View 0 replies
Adv. Ashish Jaiswal
📍मुंबई
राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - दुसरा आठवडा, दिवस ३रा.
विधानभवन येथे आगमन!
#MonsoonSession2026 #Mumbai #Maharashtra
3 days ago | [YT] | 9
View 0 replies
Adv. Ashish Jaiswal
📍मुंबई
राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - दुसरा आठवडा, दिवस दुसरा.
विधानभवन येथे आगमन!
#MonsoonSession2026 #Mumbai #Maharashtra
4 days ago (edited) | [YT] | 14
View 0 replies
Adv. Ashish Jaiswal
विधान परिषद उपसभापतीपदासाठी शिवसेना - महायुतीकडून उमेदवारी प्राप्त झाल्याबद्दल आमदार श्री सचिन अहिर यांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा!
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर मार्गक्रमण करणारे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आपण या नव्या जबाबदारीत यशस्वीपणे कार्य करून विधान परिषदेची गौरवशाली परंपरा अधिक समृद्ध कराल, असा दृढ विश्वास आहे.
आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
4 days ago | [YT] | 11
View 0 replies
Adv. Ashish Jaiswal
📍 मुंबई
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, नियोजन विभागाच्या वतीने आयोजित 'राष्ट्रीय सांख्यिकी दिन' कार्यक्रमास उपस्थित होतो.
यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय सांख्यिकी दिनाच्या शुभेच्छा देताना, सांख्यिकी विभाग हा शासनाच्या कार्याचा खरा पाठीचा कणा आहे, असे मत व्यक्त केले. नियोजन विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विभागाच्या कामकाजाविषयी सविस्तर चर्चा करण्याची इच्छा होती. १५ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत त्यास सुरुवात झाली असून, आज प्रत्यक्ष विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.
सांख्यिकी विभागाने आजवर अत्यंत चांगले काम केले असले, तरी डेटा संकलन आणि त्या डेटाचा शासनाच्या धोरणे, योजना व निधी नियोजनामध्ये प्रभावी वापर यामधील दरी कमी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. 'विकसित भारत' आणि 'विकसित महाराष्ट्र' या उद्दिष्टांच्या पूर्ततेमध्ये अचूक, अद्ययावत आणि सुसंगत सांख्यिकी माहितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, शासनाच्या योजनांची सांगड डेटाशी घातल्यास विकास अधिक परिणामकारक होईल, असेही नमूद केले.
यासोबतच, शासनाच्या निधीतून होणारी भांडवली गुंतवणूक, विकासकामांचे नियोजन आणि संसाधनांचे योग्य वाटप यासाठी डेटा-आधारित नियोजन आवश्यक असल्याचे सांगितले. राज्याचे प्रभावी मॅपिंग झाल्यास प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपल्या मतदारसंघाची वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध होईल आणि त्याआधारे अधिक अचूक नियोजन करता येईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान प्रकाशित करण्यात आलेल्या विविध सांख्यिकी प्रकाशनांचे कौतुक करत, या प्रकाशनांमधील माहितीचा प्रत्यक्ष धोरणनिर्मिती व विकासकामांमध्ये प्रभावी वापर झाला, तर त्याचे सकारात्मक परिणाम राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच दिसून येतील, असे मत मांडत सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या.
#नियोजन_मंत्रालय #नियोजन_राज्यमंत्री #मुंबई #आशिष_जयस्वाल
4 days ago | [YT] | 12
View 0 replies
Adv. Ashish Jaiswal
📍मुंबई
राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - दुसरा आठवडा, पहिला दिवस.
विधानभवन येथे आगमन!
#MonsoonSession2026 #Mumbai #Maharashtra
5 days ago | [YT] | 19
View 1 reply
Load more