कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून राज्याच्या कृषी विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या शेतकरी व कृषी अधिकाऱ्यांचा गौरव करण्यासाठी आयोजित राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभ २०२६ उद्या मुंबई येथे संपन्न होत आहे.
शेतीतील नवकल्पना, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, उत्पादनवाढ आणि कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा सन्मान करण्यासाठी हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
📅 दिनांक: १ जुलै २०२६ (बुधवार) 🕐 वेळ: दुपारी १.०० वाजता 📍 स्थळ: डोम, एस.व्ही.पी. स्टेडियम, लाला लजपत राय मार्ग, वरळी, मुंबई
मा. राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते व मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
"गौरव महाराष्ट्राचा, सन्मान बळीराजाचा" या संकल्पनेतून कृषी क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान देण्याचा हा राज्य शासनाचा उपक्रम आहे.
जेजुरी ता. पुरंदर येथे जानाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यत, कुस्ती स्पर्धा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मंगलमय वातावरणात उपस्थित राहून सहभागी झालो. परंपरा, श्रद्धा आणि ग्रामीण संस्कृतीचे जतन करणाऱ्या या उत्सवामुळे परिसरात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!
२०२५-२६ हंगामातील खरेदी प्रक्रिया राबविण्यासाठी राज्यात ३ नोडल संस्थांची नियुक्ती!
📍 मंत्रालय, मुंबई | २७ ऑक्टोबर २०२५
राज्यातील शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा आणि किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी प्रक्रिया अधिक कार्यक्षम व पारदर्शक व्हावी, या उद्देशाने आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत २०२५-२६ हंगामासाठी सोयाबीन, मूग, उडीद आणि तूर या पिकांच्या MSP दरांचा आणि खरेदी योजनेच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी, राज्यात २०२५-२६ हंगामातील खरेदी प्रक्रीया राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ (मुंबई), विदर्भ सहकारी पणन महासंघ (नागपूर) आणि महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ (पुणे) या ३ नोडल संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, केंद्रशासनाच्या १८ ऑक्टोबर, २०२५ रोजीच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार ०९ ऑक्टोबर, २०२५ रोजीच्या शासन पत्रान्वये हमीभाव खरेदी २०२५-२६ च्या प्रस्तावांना मान्यता देण्याची केंद्र शासनास पुनश्च विनंती करण्यात आली.
या बैठकीत कृषी सचिव श्री. विकास चंद्र रस्तोगी, पणन व सहकार सचिव श्री. प्रवीण दराडे, दोन्ही विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच संबंधित मंडळांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगारांच्या विविध मागण्यासंदर्भात बैठक!
📍मंत्रालय!
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगारांच्या विविध मागण्याबाबत आज महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या उपस्थित बैठक आयोजित करण्यात आली होती. रामराजे निंबाळकर समितीच्या शिफारशी मान्य कराव्यात अशी त्यांची प्रमुख मागणी होती. कामगारांच्या मागणी संदर्भात विशेष बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे महसूल मंत्री महोदय यांनी सांगितले. या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात येईल आणि कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले.
याप्रसंगी श्री.प्रतापराव पाटील,श्री. वसंतराव मोहोळकर, श्री. दत्तात्रय फडतरे, श्री.सुहास डोंबाळे, श्री.विष्णू माने, श्री.हर्षवर्धन गायकवाड, महसूल विभागाचे अधिकारी, VC पुणे जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी, शेती महामंडळाच्या MD महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ लढा कृती समितीचे सरचिटणीस श्री. सुभाष कुलकर्णी, श्री.भालचंद्र शिंदे,श्री.ॲड. संजय चंदनशिवे, श्री. सागर मिसाळ, श्री. अतुल सावंत, श्री.सुभाष गुरव, श्री. शेखर काटे,श्री आकाश पवार श्री.भिकन शिंदे, श्री.राहुल अर्जुन, श्री.राज पाटील, श्री.योगेश खरात व श्री.विश्वनाथ गायकवाड व राज्य शेती महामंडळ लढा कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. Ajit Pawar Sunetra Ajit Pawar Chandrashekhar Bawankule NCPSpeaks_Official
जंक्शन MIDC संलग्न क्षेत्र प्रस्ताव उद्योग विभागाकडून महसूल विभागास सादर करण्याच्या महसूल मंत्री महोदय यांच्या सूचना!
आज माझ्या इंदापूर मतदारसंघातील प्रस्तावित जंक्शन ‘एमआयडीसी’साठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील 1000 एकरहुन अधिक क्षेत्र निशुल्क देण्यात यावे व शेती महामंडळ कामगारांच्या विविध मागण्यांबाबत बैठक घेण्यात आली.
पूर्वी झालेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने उद्योग विभागाकडून महसूल विभागाकडे संलग्नतेबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.
मंत्रालयातील परिषद सभागृह हॉलमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीत, इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि दोन्ही विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या 'एमआयडीसी’मुळे अनेक उद्योग इंदापूर तालुक्यात येणार आहेत. तसेच तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. इंदापूर तालुक्यांतील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ही एमआयडीसी उपयुक्त ठरणार आहे.
याप्रसंगी श्री.प्रतापराव पाटील,श्री. वसंतराव मोहोळकर, श्री. दत्तात्रय फडतरे, श्री.सुहास डोंबाळे, श्री.विष्णू माने, श्री.हर्षवर्धन गायकवाड, महसूल व उद्योग विभागाचे अधिकारी, VC द्वारे पुणे जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी, midc चे अधिकारी श्री. हनुमंत पाटील इतर सहकारी उपस्थित होते.
वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण केले. यावेळी शहीद जवानांचे वीर माता, पत्नी व स्वातंत्र्य सैनिकांचे जोडीदार यांचा सत्कार तसेच पुरस्कार वितरण करण्यात आले. आज स्वातंत्र्यदिनाच्या या पावन क्षणी तिरंगा ध्वज फडकावताना मन अभिमानाने भरून आलं, कृतज्ञतेची भावना दाटून आली आणि देशसेवेची नवी प्रेरणा मिळाली.
ही केवळ एक परंपरा नाही, तर त्या लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण आहे, ज्यांनी आपले प्राण अर्पण करून आपल्याला स्वातंत्र्य दिले. ज्यांच्या त्याग, बलिदान आणि संघर्षामुळे आपण आज मुक्त श्वास घेतो त्या सर्व वीरांना कोटी कोटी वंदन.
आज आपण सारे मिळून ठरवूयात की, राष्ट्रहित, विकास आणि एकतेच्या मार्गावर चालत राहू. तसेच आपल्या गावाला, राज्याला आणि देशाला महान बनवूया. प्रत्येकाने तिरंग्याचा मान राखणे हीच खरी देशभक्ती आहे.
माझ्या सर्व बांधवांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत आढावा बैठक व पाहणी दौरा.!
आज संत सेवालाल महाराज पोहरादेवी, उमरी व पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. प्रशासनाकडून पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील झालेल्या कामांचा व सध्या सुरु असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच सुरु असलेली कामे उत्कृष्ठ दर्जाची आणि वेळेत करावीत अशा सुचना अधिका-यांना दिल्या. मंदिर व परिसरातील विकासकामे, भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा आणि स्वच्छता याबाबत कोणतीही कसर बाकी ठेवू नका असेही सांगितले.
पाहणी दौऱ्यादरम्यान श्री पोहरादेवी माता मंदिरात साक्षात मातेचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं.तुझ्या कृपाछायेत जनतेचं जीवन सुख-समृद्धी व भरभराटीचे होवो अशी प्रार्थना केली. मंदिरातील आध्यात्मिक तेज,घंटानादाचा नाद आणि भक्तीने भारलेलं वातावरण हे मन, विचार आणि आत्मा सर्व काही प्रसन्न करून गेलं.
श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी जगद्गुरू संत सेवालाल महाराज तसेच माता जगदंबा देवीचे भव्य मंदिर आहे.येथे धर्मगुरू संत रामराव महाराजांची देखील समाधी आहे.तसेच बंजारा संस्कृती दाखवणारे आणि भावी पिढीला बंजारा संस्कृतीचे दर्शन व्हावे या करिता देशातील एकमेव असलेल्या नंगारा भवनाची पाहणी केली.
महायुती सरकारच्या माध्यमातून सुरु असलेली येथील सर्व विकासकामे संत सेवालाल महाराज व जगदंबा मातेच्या आशीर्वादाने लवकर पूर्ण होतील, असा विश्वास आहे. यावेळी मा.आमदार बाबुसिंग महाराज यांनी विशेष सत्कार केला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी आमदार बाबुसिंग महाराज, आमदार सई डहाके, प्रशासकीय अधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
Dattatray Bharane Official
राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभ २०२६ !
📅 दिनांक: १ जुलै २०२६ (बुधवार)
🕐 वेळ: दुपारी १.०० वाजता
📍 स्थळ: डोम, एस.व्ही.पी. स्टेडियम, लाला लजपत राय मार्ग, वरळी, मुंबई
2 weeks ago | [YT] | 10
View 0 replies
Dattatray Bharane Official
राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभ २०२६ !
कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून राज्याच्या कृषी विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या शेतकरी व कृषी अधिकाऱ्यांचा गौरव करण्यासाठी आयोजित राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभ २०२६ उद्या मुंबई येथे संपन्न होत आहे.
शेतीतील नवकल्पना, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, उत्पादनवाढ आणि कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा सन्मान करण्यासाठी हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
📅 दिनांक: १ जुलै २०२६ (बुधवार)
🕐 वेळ: दुपारी १.०० वाजता
📍 स्थळ: डोम, एस.व्ही.पी. स्टेडियम, लाला लजपत राय मार्ग, वरळी, मुंबई
मा. राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते व मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
"गौरव महाराष्ट्राचा, सन्मान बळीराजाचा" या संकल्पनेतून कृषी क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान देण्याचा हा राज्य शासनाचा उपक्रम आहे.
2 weeks ago | [YT] | 5
View 0 replies
Dattatray Bharane Official
जेजुरी ता. पुरंदर येथे जानाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यत, कुस्ती स्पर्धा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मंगलमय वातावरणात उपस्थित राहून सहभागी झालो.
परंपरा, श्रद्धा आणि ग्रामीण संस्कृतीचे जतन करणाऱ्या या उत्सवामुळे परिसरात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!
3 months ago | [YT] | 61
View 0 replies
Dattatray Bharane Official
चिंतन तुमचे सत्य चिरंतन
मिटवी सारी चिंता रे...
चिन्मय माझ्या चित्तातील
चैतन्य तूची दत्ता रे...
श्री दत्त जयंतीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा!
श्री गुरुदेव दत्तांच्या कृपेने सर्वांचे जीवन सुख, शांती व समृद्धीने उजळो, हीच प्रार्थना.
श्री गुरुदेव दत्त!
#दत्तजयंती #श्रीगुरुदेवदत्त
7 months ago | [YT] | 46
View 1 reply
Dattatray Bharane Official
२०२५-२६ हंगामातील खरेदी प्रक्रिया राबविण्यासाठी राज्यात ३ नोडल संस्थांची नियुक्ती!
📍 मंत्रालय, मुंबई | २७ ऑक्टोबर २०२५
राज्यातील शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा आणि किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी प्रक्रिया अधिक कार्यक्षम व पारदर्शक व्हावी, या उद्देशाने आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत २०२५-२६ हंगामासाठी सोयाबीन, मूग, उडीद आणि तूर या पिकांच्या MSP दरांचा आणि खरेदी योजनेच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी, राज्यात २०२५-२६ हंगामातील खरेदी प्रक्रीया राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ (मुंबई), विदर्भ सहकारी पणन महासंघ (नागपूर) आणि महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ (पुणे) या ३ नोडल संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, केंद्रशासनाच्या १८ ऑक्टोबर, २०२५ रोजीच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार ०९ ऑक्टोबर, २०२५ रोजीच्या शासन पत्रान्वये हमीभाव खरेदी २०२५-२६ च्या प्रस्तावांना मान्यता देण्याची केंद्र शासनास पुनश्च विनंती करण्यात आली.
या बैठकीत कृषी सचिव श्री. विकास चंद्र रस्तोगी, पणन व सहकार सचिव श्री. प्रवीण दराडे, दोन्ही विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच संबंधित मंडळांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
8 months ago | [YT] | 48
View 0 replies
Dattatray Bharane Official
धेनू आणि वासराच्या स्नेहबंधनातून उमटणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपल्या जीवनात नांदो!
आपणास वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!"
#वसुबारस #दिवाळी #दिपावली #Diwali #Vasubaras
8 months ago | [YT] | 41
View 0 replies
Dattatray Bharane Official
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगारांच्या विविध मागण्यासंदर्भात बैठक!
📍मंत्रालय!
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगारांच्या विविध मागण्याबाबत आज महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या उपस्थित बैठक आयोजित करण्यात आली होती. रामराजे निंबाळकर समितीच्या शिफारशी मान्य कराव्यात अशी त्यांची प्रमुख मागणी होती. कामगारांच्या मागणी संदर्भात विशेष बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे महसूल मंत्री महोदय यांनी सांगितले. या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात येईल आणि कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले.
याप्रसंगी श्री.प्रतापराव पाटील,श्री. वसंतराव मोहोळकर, श्री. दत्तात्रय फडतरे, श्री.सुहास डोंबाळे, श्री.विष्णू माने, श्री.हर्षवर्धन गायकवाड, महसूल विभागाचे अधिकारी, VC पुणे जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी, शेती महामंडळाच्या MD महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ लढा कृती समितीचे सरचिटणीस श्री. सुभाष कुलकर्णी, श्री.भालचंद्र शिंदे,श्री.ॲड. संजय चंदनशिवे, श्री. सागर मिसाळ, श्री. अतुल सावंत, श्री.सुभाष गुरव, श्री. शेखर काटे,श्री आकाश पवार श्री.भिकन शिंदे, श्री.राहुल अर्जुन, श्री.राज पाटील, श्री.योगेश खरात व श्री.विश्वनाथ गायकवाड व राज्य शेती महामंडळ लढा कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. Ajit Pawar Sunetra Ajit Pawar
Chandrashekhar Bawankule NCPSpeaks_Official
10 months ago | [YT] | 20
View 2 replies
Dattatray Bharane Official
जंक्शन MIDC संलग्न क्षेत्र प्रस्ताव उद्योग विभागाकडून महसूल विभागास सादर करण्याच्या महसूल मंत्री महोदय यांच्या सूचना!
आज माझ्या इंदापूर मतदारसंघातील प्रस्तावित जंक्शन ‘एमआयडीसी’साठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील 1000 एकरहुन अधिक क्षेत्र निशुल्क देण्यात यावे व शेती महामंडळ कामगारांच्या विविध मागण्यांबाबत बैठक घेण्यात आली.
पूर्वी झालेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने उद्योग विभागाकडून महसूल विभागाकडे संलग्नतेबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.
मंत्रालयातील परिषद सभागृह हॉलमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीत, इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि दोन्ही विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या 'एमआयडीसी’मुळे अनेक उद्योग इंदापूर तालुक्यात येणार आहेत. तसेच तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. इंदापूर तालुक्यांतील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ही एमआयडीसी उपयुक्त ठरणार आहे.
याप्रसंगी श्री.प्रतापराव पाटील,श्री. वसंतराव मोहोळकर, श्री. दत्तात्रय फडतरे, श्री.सुहास डोंबाळे, श्री.विष्णू माने, श्री.हर्षवर्धन गायकवाड, महसूल व उद्योग विभागाचे अधिकारी, VC द्वारे पुणे जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी, midc चे अधिकारी श्री. हनुमंत पाटील इतर सहकारी उपस्थित होते.
10 months ago | [YT] | 78
View 0 replies
Dattatray Bharane Official
वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण.!
वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण केले. यावेळी शहीद जवानांचे वीर माता, पत्नी व स्वातंत्र्य सैनिकांचे जोडीदार यांचा सत्कार तसेच पुरस्कार वितरण करण्यात आले. आज स्वातंत्र्यदिनाच्या या पावन क्षणी तिरंगा ध्वज फडकावताना मन अभिमानाने भरून आलं, कृतज्ञतेची भावना दाटून आली आणि देशसेवेची नवी प्रेरणा मिळाली.
ही केवळ एक परंपरा नाही, तर त्या लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण आहे, ज्यांनी आपले प्राण अर्पण करून आपल्याला स्वातंत्र्य दिले. ज्यांच्या त्याग, बलिदान आणि संघर्षामुळे आपण आज मुक्त श्वास घेतो त्या सर्व वीरांना कोटी कोटी वंदन.
आज आपण सारे मिळून ठरवूयात की, राष्ट्रहित, विकास आणि एकतेच्या मार्गावर चालत राहू. तसेच आपल्या गावाला, राज्याला आणि देशाला महान बनवूया. प्रत्येकाने तिरंग्याचा मान राखणे हीच खरी देशभक्ती आहे.
माझ्या सर्व बांधवांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#IndependenceDay #स्वातंत्र्यदिन #dattatraybharane #washim
10 months ago | [YT] | 51
View 1 reply
Dattatray Bharane Official
पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत आढावा बैठक व पाहणी दौरा.!
आज संत सेवालाल महाराज पोहरादेवी, उमरी व पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. प्रशासनाकडून पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील झालेल्या कामांचा व सध्या सुरु असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच सुरु असलेली कामे उत्कृष्ठ दर्जाची आणि वेळेत करावीत अशा सुचना अधिका-यांना दिल्या. मंदिर व परिसरातील विकासकामे, भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा आणि स्वच्छता याबाबत कोणतीही कसर बाकी ठेवू नका असेही सांगितले.
पाहणी दौऱ्यादरम्यान श्री पोहरादेवी माता मंदिरात साक्षात मातेचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं.तुझ्या कृपाछायेत जनतेचं जीवन सुख-समृद्धी व भरभराटीचे होवो अशी प्रार्थना केली. मंदिरातील आध्यात्मिक तेज,घंटानादाचा नाद आणि भक्तीने भारलेलं वातावरण हे मन, विचार आणि आत्मा सर्व काही प्रसन्न करून गेलं.
श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी जगद्गुरू संत सेवालाल महाराज तसेच माता जगदंबा देवीचे भव्य मंदिर आहे.येथे धर्मगुरू संत रामराव महाराजांची देखील समाधी आहे.तसेच बंजारा संस्कृती दाखवणारे आणि भावी पिढीला बंजारा संस्कृतीचे दर्शन व्हावे या करिता देशातील एकमेव असलेल्या नंगारा भवनाची पाहणी केली.
महायुती सरकारच्या माध्यमातून सुरु असलेली येथील सर्व विकासकामे संत सेवालाल महाराज व जगदंबा मातेच्या आशीर्वादाने लवकर पूर्ण होतील, असा विश्वास आहे. यावेळी मा.आमदार बाबुसिंग महाराज यांनी विशेष सत्कार केला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी आमदार बाबुसिंग महाराज, आमदार सई डहाके, प्रशासकीय अधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
#Washim
#TempleVisit #poharadevi
#SpiritualJourney
#FaithAndDevotion
#Blessings
#Bhakti
#Devotion
10 months ago | [YT] | 20
View 0 replies
Load more