News राजकीय सामाजिक व धार्मिक घडामोडी


SRB NEWS LIVE

*ओबीसी प्रवर्गाप्रमाणे मराठा समाजाला शैक्षणिक सवलती देण्याच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करा-ना.विखे पाटील*

*मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक*

अहील्यानगर २३ जून प्रतिनिधी

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक व इतर सवलती देण्याबाबत दिनांक ५ जून २०२६ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांनी तात्काळ अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.


विधान भवनात मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न झाली.या बैठकीत मराठा आरक्षणाशी संबंधित विविध प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यात आला आणि झालेल्या निर्णयाप्रमाणे अमंलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले.

या बैठकीस मंत्री मंडळातील
जलसंपदा मंत्री श्री. गिरीष महाजन,शालेय शिक्षण मंत्री श्री. दादा भुसे,सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रसिंह राजे भोसले, पर्यटन मंत्री श्री. शंभूराज देसाई,माहीती तंत्रज्ञान मंत्री श्री. आशिष शेलार,मदत व पुनर्वसन श्री. मकरंद जाधव,सहकार मंत्री श्री. बाबासाहेब पाटील,वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. हसन मुश्रीफ,रोजगार व उद्योजकता मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्हास्तरावर मराठा समाजाच्या अडचणी आणि शंकांचे निरसन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरावर तातडीने हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात यावी,तालुका आणि जिल्हा स्तरावर प्राप्त होणारी निवेदने व मागण्यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या थेट देखरेखी खाली वर्गीकरण करण्याची प्रक्रीया सुरू करावी. स्थानिक पातळीवरील मागण्यांचे तात्काळ निराकरण करण्यात यावे, तसेच ज्या मागण्या/निवेदने राज्य शासनाशी संबंधित आहेत, ती आवश्यकते नुसार तात्काळ शासनाकडे सादर करावीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात

1 week ago | [YT] | 3

SRB NEWS LIVE

मोदींच्या विकासदृष्टीला नवी गती; पुणे–शिर्डी रेल्वेसेवेचे सुजय विखे पाटलांकडून स्वागत..

पुणे शिर्डी थेट रेल्वे म्हणजे विकासाचा नवा ट्रॅक; सुजय विखे पाटील यांची प्रतिक्रिया

अहिल्यानगर (प्रतिनिधी)
पुणे ते शिर्डी दरम्यान पहिल्यांदाच थेट रेल्वेसेवा सुरू होत असून, यामुळे साईभक्तांसह हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत या नव्या रेल्वेसेवेचे उद्घाटन आज बुधवारी (१७ जून) करण्यात आले.

भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, शिर्डी हे देशातील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. पुण्याहून मिळालेल्या या पहिल्या थेट रेल्वे सुविधेमुळे लाखो भाविकांची मोठी सोय होणार असून धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुणे–शिर्डी थेट रेल्वेसेवा सुरू झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या पायाभूत सुविधा विकासाचे कौतुक केले. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत रेल्वे क्षेत्रात अभूतपूर्व बदल घडून आले असून नवीन रेल्वेमार्ग, आधुनिक स्थानके, वंदे भारतसारख्या अत्याधुनिक गाड्या आणि प्रवाशांसाठी वाढलेल्या सुविधा यामुळे भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलत आहे.पुणे–शिर्डीसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर थेट रेल्वेसेवा उपलब्ध करून देण्यामागे केंद्र सरकारची विकासाभिमुख भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील धार्मिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांना जोडण्यावर विशेष भर दिला जात आहे. पुणे–अहिल्यानगर–शिर्डी रेल्वेसेवा ही त्याच दृष्टीकोनाचा भाग असून यामुळे भाविक, विद्यार्थी, रुग्ण आणि व्यावसायिक यांना मोठा फायदा होणार आहे. रेल्वे नेटवर्कच्या विस्तारामुळे पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून विकसित भारताच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचेही डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

दररोज धावणारी ही रेल्वे पुणे, अहिल्यानगर, राहुरी, श्रीरामपूर मार्गे शिर्डीपर्यंत धावणार आहे. त्यामुळे केवळ भाविकांच्याच नव्हे तर विद्यार्थी, रुग्ण आणि व्यावसायिकांच्याही प्रवासाचा वेळ व खर्च कमी होणार आहे. पुण्यातील शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधांपर्यंत पोहोचणे ता अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरातील नागरिकांसाठी अधिक सुलभ होणार आहे.

यापूर्वी पुण्यातून शिर्डीसाठी थेट आणि नियमित रेल्वे उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रवाशांना बस किंवा खासगी वाहनांचा पर्याय निवडावा लागत होता. नव्या रेल्वेसेवेमुळे प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि किफायतशीर होणार आहे.

दरवर्षी देश-विदेशातून लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. अशा परिस्थितीत पुणे–शिर्डी थेट रेल्वेसेवा सुरू झाल्याने धार्मिक पर्यटन, व्यापार, दळणवळण आणि प्रादेशिक विकासाला मोठी गती मिळणार असल्याचे मानले जात आहे.

2 weeks ago | [YT] | 1

SRB NEWS LIVE

सर्वांनी आग्रहाचे निमंत्रण

2 weeks ago | [YT] | 13

SRB NEWS LIVE

शिर्डी मध्ये २३ ते २४ मे रोजी संरक्षण उत्पादनाच्या प्रदर्शानाचे आयोजन

विद्यार्थी नागरिकांना राॅकेट आणि क्षेपणास्त्र पाहाण्याची संधी!

शिर्डी, दि..२१ प्रतिनिधी

शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमिताने २३ आणि २४ मे २०२६ रोजी विद्यार्थी आणि नागरीकांसाठी संरक्षण साहीत्याच्या उत्पादनाचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये राॅकेट आणि क्षेपणास्त्र विशेष आकर्षण असणार आहेत.

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या सावळीविहीर येथील औद्यगिक वसाहती मध्ये निबे गृपच्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहाणार आहेत. अहील्यानगर जिल्हयात प्रथमच कार्यान्वित होत असलेल्या प्रकल्पामुळे अहील्यानगर जिल्हा देशातील महत्त्वाचे संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून भविष्यात ओळखला जाईल.या प्रकल्पामध्ये १५५ मिलीमीटर क्षमतेच्या तोफ गोळ्यांचे उत्पादन करण्यात येणार असून, प्रतिवर्षी पाच लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता या कारखान्याची आहे.संपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान व कच्चा माल स्वदेशी आहे. हा प्रकल्प अवघ्या एका वर्षात उभारण्यात आला आहे.

शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे दोनशे एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित करण्यात येत असून यामध्ये रॉकेट लाँचर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन व विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत.

उद्घाटनाच्या निमित्ताने २३ व २४ मे रोजी सकाळी साडेदहा ते पाच या वेळेत विशेष संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील प्रमुख संरक्षण उत्पादन कंपन्या व शंभरहून अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.यासाठी मोठे स्टाॅल प्रकल्पस्थळावर उभारण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी विज्ञानप्रेमी, नागरिक, महीला या प्रदर्शनाला भेट देतील व तरुणांसाठी संरक्षण क्षेत्रातील संधी जाणून घेण्याची ही मोठी संधी निर्माण करुन देण्यात आली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याला संरक्षण क्षेत्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली असून, रणगाडा प्रशिक्षण केंद्र, के.के. रेंजेस व मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमुळे जिल्ह्याला आधीपासूनच संरक्षण क्षेत्रातील महत्त्व आहे. संरक्षण उत्पादन प्रकल्पामुळे या ओळखीला अधिक बळ मिळणार आहे.

1 month ago | [YT] | 6

SRB NEWS LIVE

शिर्डीत खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या संरक्षण कारखान्याचे २३ मे रोजी संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन !

जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना !

१५५ मिली मीटर‌‌ क्षमतेचे प्रतिवर्षी पाच लाख तोफगोळे तयार होणार

शिर्डी, दि.. १८ :- अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत असून, शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन येत्या २३ मे रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार असून, या प्रकल्पामुळे जिल्हा देशातील महत्त्वाचे संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व ग्लोब फोर्ज लिमिटेडचे संचालक तथा चेअरमन रविकांत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

या प्रकल्पामध्ये १५५ मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचे उत्पादन करण्यात येणार असून, प्रतिवर्षी पाच लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता या कारखान्याची असेल. खासगी क्षेत्रातील तोफगोळा उत्पादनाची ही देशातील सर्वांत मोठी क्षमता मानली जात असून, संपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान व कच्चा माल स्वदेशी आहे. हा प्रकल्प अवघ्या एका वर्षात उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’, ‘मेक इन इंडिया’ व ‘मेक फॉर द वर्ल्ड’ या संकल्पनांना बळ देणारा हा महत्त्वाचा प्रकल्प असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे दोनशे एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित करण्यात येत आहेत. यामध्ये रॉकेट लाँचर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन व विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत. या प्रकल्पांसाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून, त्यापैकी सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक पूर्ण झाली आहे. या माध्यमातून सुमारे दोन हजार नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. याच दिवशी प्रतिदिन पंधरा टन क्षमतेच्या बायो-सीएनजी प्रकल्पाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुमारे सहाशे एकर जागेवर भव्य दारूगोळा निर्मिती संकुल उभारण्यात येत आहे. या संकुलात टीएनटी, आरडीएक्स, एचएमएक्ससारखी विविध स्फोटके व प्रणोदक तयार करणारे कारखाने उभारले जात असून, त्यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक प्रस्तावित आहे. दरवर्षी वीस हजार टन टीएनटी उत्पादनाची क्षमता येथे निर्माण होणार असून, सरकारी व खासगी क्षेत्रातील ही देशातील सर्वांत मोठी क्षमता ठरणार आहे. टीएनटी व आरडीएक्स निर्मितीचे कारखाने पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून, त्यांचे उद्घाटन व सादरीकरण लवकरच होणार आहे.

शिर्डी येथे तयार होणाऱ्या तोफगोळ्यांमध्ये स्फोटके भरण्याचे महत्त्वाचे काम अहिल्यानगर येथील प्रस्तावित कारखान्यात केले जाणार आहे. सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील सुमारे चार ते पाच हजार तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनाही या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्याला संरक्षण क्षेत्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली असून, रणगाडा प्रशिक्षण केंद्र, के.के. रेंजेस व मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमुळे जिल्ह्याला आधीपासूनच संरक्षण क्षेत्रातील महत्त्व आहे. नव्या प्रकल्पांमुळे या ओळखीला अधिक बळ मिळणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. शिर्डी हे धार्मिक स्थळ असल्याने प्रदूषणाचा धोका टाळण्यासाठी हा प्रकल्प विशेष रासायनिक क्षेत्रात उभारण्यात आला आहे.

स्थानिक युवकांना रोजगारासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात येत आहे. रतन टाटा ट्रस्टच्या सहकार्याने औद्योगिक वसाहतीमध्ये विशेष इनोव्हेशन सेंटर सुरू करण्यात येत असून, त्यासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. एमआयडीसीकडूनही पन्नास कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. राहाता येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे स्थलांतर एमआयडीसी परिसरात करण्यात आले असून, भविष्यातील विस्तारासाठी सुपे परिसरात संरक्षण विभागाच्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया प्राथमिक स्तरावर सुरू असल्याची माहितीही देण्यात आली.

या उद्घाटनाच्या निमित्ताने २३ व २४ मे रोजी विशेष संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील प्रमुख संरक्षण उत्पादन कंपन्या व शंभरहून अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. जिल्हाभरातून नागरिक या प्रदर्शनाला भेट देतील व तरुणांसाठी संरक्षण क्षेत्रातील संधी जाणून घेण्याची ही मोठी संधी ठरणार असल्याचे पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

*******

1 month ago | [YT] | 7

SRB NEWS LIVE

प्रिय बंधू अरुण बोरुडे,
तुझं असणं म्हणजे आयुष्यातील सगळ्यात मोठं बळ आहे. तुझ्या सोबत प्रत्येक क्षण खास वाटतो. देवाकडे एवढीच प्रार्थना की तुझं आयुष्य आनंद, यश आणि समाधानाने भरलेलं असो.

2 months ago | [YT] | 21

SRB NEWS LIVE

डॉ. सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द; ३ महिन्यात उभा राहणार बाबासाहेबांचा भव्य पुतळा!

श्रीरामपूर - भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात बोलताना डॉ. विखे पाटील यांनी श्रीरामपूरकरांना एक महत्त्वाची ग्वाही दिली – "येत्या ३ महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णआकृती पुतळा उभा करू," असा शब्द त्यांनी यावेळी दिला.

त्याच बरोबर डॉ बाबासाहेबांच्या स्मारकावरून सुरू असलेल्या श्रेयावादाचा देखील आपल्या अनोख्या शैलीतुन समाचार घेतल. यावेळी पुतळा उभारणीच्या कामावरून होत असलेल्या राजकारणावर डॉ. विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "यामध्ये कोणीही श्रेयावादाची लढाई करू नये. समाज बांधवांसह आजी-माजी लोकप्रतिनिधींचे नाव घेऊन त्यांचा देखील या पूर्णआकृती स्मारक उभारणीत मोठे योगदान आहे. जे काम शिल्लक राहिले आहे, त्यात आमचा खारीचा वाटा असेल. निदान महामानवांना तरी राजकारणाच्या कक्षेबाहेर ठेवा," अशी विनंती त्यांनी श्रीरामपूरमधील राजकारण्यांना केली.

श्रीरामपूरात उभारले जात असलेले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक हे केवळ एक पुतळा नसून ती बाबासाहेबांप्रती असलेली आस्था असेल, असे सांगताना ते म्हणाले, "हा पुतळा असा देखणा आणि भव्य असेल की, जो कोणी श्रीरामपूरमधून जाईल, त्याच्या मनात बाबासाहेबांबद्दलची निष्ठा अधिक बळकट होईल. आमचा उद्देश स्वच्छ आहे – बाबासाहेबांच्या कार्याला शोभेल असे भव्य स्मारक उभे करणे, हीच आमची प्राथमिकता आहे." पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, "पुरस्कार लहान किंवा मोठा नसतो, देणाऱ्याचे मन पाहून मी कार्यक्रमाला येतो.

आज मी इथे पुरस्कार घेण्यासाठी नाही, तर स्मारक समितीने जो पुढाकार घेतला आहे, त्यांचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचे सांगितले.श्रीरामपूर येथे संपन्न झालेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सोहळ्यास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांसह भाजपचे उपजिल्हाध्यक्ष दीपक पटारे, भाजपा तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, मा. नगराध्यक्ष संजय फंड, नाना शिंदे, पक्षप्रतोत वैशाली चव्हाण, नगरसेवक संजय गांगड,रवी पाटील, आशिष धनवटे, मनोज लबडे ,तिलक डुंगरवाल, केतन खोरे, शरद नवले, डॉ शंकर मुठे, भीमराज बागुल, नगरसेवक सिद्धार्थ फंड, रुपेश हरकल आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते....

2 months ago | [YT] | 11

SRB NEWS LIVE

https://youtu.be/ijGr_zmxj24
👆👆👆👆👆👆👆👆
*🛑डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 2026 | कोल्हारमधील भव्य सोहळा LIVE*

*🛑कोल्हारमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जल्लोष | हजारोंची प्रभात फेरी 🔥*

*🛑“जयभीम”च्या घोषणांनी दुमदुमला कोल्हार | आंबेडकर जयंती सोहळा Full Video*

*🛑कोल्हारमध्ये भव्य आंबेडकर जयंती उत्सव | संविधान वाचनाने सुरुवात*

*🛑संविधानाचा विजय असो! कोल्हारमध्ये जयंती उत्साहात साजरी 🎉*

2 months ago | [YT] | 8