इथे आहेत आपल्या माणसांच्या गोष्टी!

सर्वप्रथम, आपले The News Field या यूट्यूब चॅनल वर स्वागत आहे. आम्ही आपल्या चॅनल च्या माध्यमातून लहान मोठ्या उद्योग आणि व्यवसायांसोबत, आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान व शेतीपूरक व्यवसाय याची इत्यंभूत माहिती आपल्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत आहोत. लघु वा मध्यम स्वरूपाचा उद्योग, त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री, बाजारपेठ, गुंतवणुकीपासून व्यवसायात यशस्वी कसे व्हायचे इथपर्यंत माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो.

त्याशिवाय, कृषिप्रधान भारतातील शेतकऱ्याचे उत्पन्न कसे वाढेल, शेतकरी सुजलाम सुफलाम होण्यासाठी मदतीचे ठरणारी शेतीची अत्याधुनिक पद्धत, त्यासोबत केले जाऊ शकणारे शेतीपूरक व्यवसाय आणि जोडधंदा याविषयी देखील अनेक व्हिडियो आपल्याला पाहायला मिळतील.

आता इथवर आलाच आहात तर 'द न्युज फिल्ड' या चॅनल ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.
धन्यवाद!
......................................................................................................
आपल्या व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा..
The News Field : 9529945271
Email ID : tnfmedia2024@gmail.com


The News Field

“नोकरी नाही मिळाली तर स्वतःचा मार्ग तयार करा" हे या तरुणाने खेड्यात करून दाखवलं!

विलास नरवडे या 24 वर्षीय तरुणाच्या कुटुंबाचे पूर्ण आयुष्य मजुरी करण्यात गेले. शिक्षण पूर्ण होऊनही नोकरीच्या शोधात वेळ न घालवता आपल्याच गावात काहीतरी व्यवसाय उभा करायचा अशी जिद्द त्याने मनाशी बाळगली.

आई वडील शेतात राबून कष्ट करताना पाहून त्याने नोकरी न करता उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहिले आणि दररोज मागणी असलेल्या द्रोण पत्रावळी व्यवसायाची माहिती घेतली.

कमी खर्चात सुरू होणाऱ्या या घरगुती व्यवसायाच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंबाला काम मिळेल व एक उत्तम व्यवसाय सुरू होईल म्हणून 2 वर्षांपूर्वी उद्योगाची सुरुवात केली.

गावातील एका छोट्याशा शेड मधे सुरू झालेल्या या उद्योगातून दररोज द्रोण, पत्रावळ, नाष्टा प्लेट असे अनेक उत्पादने तयार केले जातात. तयार झालेला माल शहरातील होलसेल व्यापाऱ्यांकडे विक्री करून, पुन्हा कच्चा माल खरेदी करून गावात घेऊन येतो.

या छोट्याशा उद्योगाच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंबाच्या हाताला काम तर मिळालेच आहे, परंतु त्या माध्यमातून या तरुणाने शहरात स्थलांतर न करता दररोज उत्पन्न देणारा शाश्वत व्यवसाय गावात सुरू करून मोठा आदर्श निर्माण केला आहे. ज्यामुळे अनेक तरुणांना व्यवसायाची नवी ऊर्जा मिळत असून संपूर्ण जिल्ह्यात विलास नरवडे या तरुण उद्योजकांचे कौतुक केले जात आहे.

या तरुणाची यशोगाथा चॅनेल वर बघायला विसरू नका!

#businessideas #villagebusiness #marathiudyojak

2 weeks ago | [YT] | 29

The News Field

🌱 मातीशिवाय दररोज तयार होतोय हिरवागार चारा..
दिवसाला 800 किलो चाऱ्याची निर्मिती!

दुष्काळी भागातील शेतकरी आणि पशुपालकांसाठी ही पद्धत मोठा आधार ठरू शकते! 🙌
Hydroponic तंत्रज्ञानामुळे कमी पाणी, कमी जागा आणि मातीशिवाय दररोज पौष्टिक हिरवा चारा तयार होतो.
शेतीपूरक व्यवसायातील खाद्यासाठी लागणारा 40% खर्च बचत होत आहे.
घरच्या गच्चीवर, बाल्कनीत किंवा अगदी मोकळ्या जागेत कुठेही हा सेटअप बसवून रोजच्या रोज निर्मिती करता येऊ शकते.

✅ कमी पाण्यात, कमी जागेत जास्त उत्पादन
✅ वर्षभर हिरवा चारा उपलब्ध
✅ पशुपालकांचा खाद्य खर्च कमी होतो
✅ मजुरांची गरज भासत नाही

याविषयी सविस्तर व्हिडिओ चॅनेल वर पाहू शकता👇https://youtu.be/RWRC9rkxiMk?si=YXQDK...

3 weeks ago | [YT] | 20

The News Field

२२ वर्षाच्या तरुणांची कमाल! फुकट विकली जाणारी कच्ची केली जगभर पोचवली

1 month ago | [YT] | 0

The News Field

शेतातच सुरू केला व्यवसाय! खेडेगावात तयार झालेला माल शहरात विकतो. गावात - शहरात सगळीकडे ग्राहक

1 month ago | [YT] | 3

The News Field

शेतीमुळे उद्योजक बनलेल्या महिलेची गोष्ट! वयाच्या 65व्या वर्षी सुरू केला फोम बॅग तयार करण्याचा व्यवसाय.

1 month ago | [YT] | 1

The News Field

या दहा × दहा रूम मधून हा शेतकरी काढतोय 5 एकरापेक्षा अधिकचे उत्पन्न!! 👇

7 months ago | [YT] | 0

The News Field

तीन लाखांपेक्षा जास्त दुर्मिळ झाडांचे जतन करून संवर्धन करणारे 70 वर्षांचे कुटुंब 👏

8 months ago | [YT] | 0

The News Field

गायींच्या गोठ्यातच सुरु केला कारखाना... या शेतकऱ्याची नैसर्गिक प्रोडक्ट्स तयार करण्याची भन्नाट कल्पना !

8 months ago | [YT] | 0

The News Field

गव्हाच्या भुस्कटापासून हा शेतकरी पिकवतोय असं पीक ज्याची मागणी प्रत्येक हॉटेल, प्रत्येक घरात आहे!

8 months ago | [YT] | 1

The News Field

कुत्र्याच्या छत्र्या!! 🍄🍄

ज्ञानेश्वर जंगले पाटील, जालना जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावातील शेतीनिष्ठ शेतकरी. घनसावंगी तालुक्यातील गोदापट्ट्यात भरपूर प्रमाणात पाणी मुबलक असूनही केवळ शेतीवर अवलंबून न राहता, शेतीला जोडधंदा करून शहरी मार्केट कसे काबीज करता येईल याचा आवर्जून विचार करणे गरजेचे आहे. मशरूम शेती नवीन नसली तरीही ग्रामीण भागात आजही त्याचा फारसा प्रसार नाही. पण शहरातील उच्चभ्रू सोसायटी किंवा हॉटेल मधे भरपूर प्रमाणात मागणी असलेले उत्पादन. जंगले यांच्याकडून मशरूम शेतीविषयी इत्यंभूत माहिती घेऊन सुरुवातीपासून तर विक्री पर्यंत सर्व काही समजून घेता आले. त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस मदत करणारा नक्कीच आहे. आपल्या जिल्ह्यातील शेतकरी नवनवीन व्यावसायिक प्रयोग करतांना पहिले तर नक्कीच वेगळे समाधान मिळते.
याविषयीचा डिटेल व्हिडिओ चॅनेल वर लवकरच बघता येईल.
#mashroom #mashroomfarming #farming #agriculture

8 months ago | [YT] | 4