श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई.
श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात स्वच्छता राखण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही काही व्यक्तींकडून मंदिर परिसरात थुंकणे तसेच कचरा टाकण्याचे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर स्वच्छ व पवित्र राखण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने दोन विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
मंदिर संस्थानच्या सहायक स्वच्छता निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली थुंकणाऱ्या व कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी दोन स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके सकाळी ६ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री १० या दोन शिफ्टमध्ये मंदिर परिसरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करणार आहेत.
या पथकांमध्ये मंदिर संस्थानचे चार शिपाई तसेच सुरक्षा सेवा पुरवठादार कंपनी SISPL चे दोन सुरक्षा रक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंदिर परिसरात थुंकणे, घाण करणे अथवा कचरा टाकताना कोणी आढळल्यास संबंधित व्यक्तीवर ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर परिसराची स्वच्छता अबाधित राखण्यासाठी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पनवेल : राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन श्री. दिनेश दत्ता बंडगर यांना प्रतिष्ठेचा "राज्यस्तरीय डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसी रत्न पुरस्कार – २०२६" प्रदान करण्यात आला.
पनवेल येथील व्ही. के. हायस्कूल येथे हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा व राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. बाळाराम पाटील साहेब, माजी शिक्षक आमदार, कोकण विभाग हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. दत्तात्रय सावंत साहेब, माजी शिक्षक आमदार, पुणे विभाग तसेच मा. प्रवीण स्वामीजी, आमदार, उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघ उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. अनिल नाचपले, सरचिटणीस मा. संतोष भोजने, उपाध्यक्ष मा. सुखदेव भालेकर, महिला राज्याध्यक्ष मा. रेखाताई सुळे, महिला सरचिटणीस मा. विनया जाधव, राज्य संपर्कप्रमुख मा. मंगेश सुवर्णकार, राज्य प्राध्यापक प्रमुख मा. सुवर्ण पगार, राज्य खाजगी विभाग प्रमुख मा. राजन पाटील, राज्य मनपा प्रमुख मा. श्रीराम पळसकर, राज्य प्रवक्ते मा. अर्जुन जाधव, राज्य प्रसिद्धी प्रमुख मा. धनाजी घरत, जिल्हाध्यक्ष मा. अनंत फुलसुंदर, जिल्हा सरचिटणीस मा. दीपक हजारे, जिल्हा कोषाध्यक्ष मा. अशोक खडके, जिल्हा कार्याध्यक्ष मा. परमेश्वर साखरे, राज्य सदस्य मा. सतीश हुंडेकरी यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार प्रदान करताना मान्यवरांनी श्री. दिनेश दत्ता बंडगर यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत केलेल्या कार्याचे कौतुक केले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्री. बंडगर यांनी राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाचे आभार मानत हा सन्मान समाजसेवेच्या कार्यासाठी अधिक प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले. राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात प्रदान करण्यात आलेला हा राज्यस्तरीय सन्मान श्री. दिनेश दत्ता बंडगर यांच्या कार्याची पावती मानला जात असून त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
उस्मानाबाद जिल्हा खाजगी शिक्षण संस्था चालक संघटना जिल्हा धाराशिव ची बैठक संपन्न झाली -आज दि. 2/06/26 वार मंगळवार रोजी दुपारी 12.30 वा.के टी पाटील डी फार्मसी कॉलेज येथे उस्मानाबाद जिल्हा खाजगी शिक्षण संस्था चालक संघ यांची बैठक झाली सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री अशोकराव मोहेकर अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली प्रमुख पाहुणे म्हणून खाजगी शिक्षण संस्था चालक संघाचे अध्यक्ष श्री सुधीर पाटील श्री अशोक राव पवार श्री दत्ता बंडगर श्री धनंजय पाटील श्री टिकले गुरुजी हे होते सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री टिकले सर यांनी केले यामध्ये प्रामुख्याने शाळा चालवताना संस्थाचालकांसमोर अनेक अडचणी प्रश्न समस्या उभे आहेत त्या शासन दरबारी व न्यायालयीन मार्गाने कशा सोडवायचे याच्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले या. शिक्षण संस्थेच्या समोरील विविध प्रश्नांवर अनेक संस्थाचालकांनी आपली आपली मते मांडली त्यात श्री सरवदे सर श्री पांडुरंगलाटे सर श्री शिंदे सर श्रीमती मुळे मॅडम अशा अनेक मान्यवरांनी विचार मांडले यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी आपल्या मनोगत मध्ये असे म्हटले की संस्थेच्या पोर्टल मार्फत भरल्या जाणाऱ्या शिक्षकांच्या जागा व त्याच्या मध्ये असलेल्या त्रुटी याबाबत त्यात त्रुटी दूर करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील व कोर्टामध्ये या संदर्भात याचिका, शिपायाची पदे रद्द करणे व संस्थेतील शिपाई सेवानिवृत्त झाल्यानंतर ते पद नव्याने भरता येणार नाही अशी शासनाने बंदी घातली परंतु ते पद पायाभूत असल्यामुळे ते पद शासनाला कमी करता येणार नाही याबाबत देखील कोर्टामध्ये जाण्याचा मनोदय श्री सुधीर पाटील यांनी बोलून दाखवला पुढे असे म्हणाले या वर्षभराच्या काळामध्ये संस्थेतील रिटायर झालेले जे क्लार्क आहेत त्यांच्या जागी देखील नवीन भरती करण्यास शासनाने बंदी घातलेले ती बंदी उठवण्यासंदर्भात व क्लर्कची भरती पुन्हा नव्याने चालू करून पदभरतीस मान्यता घेण्यासाठी देखील शासन स्तरावर प्रयत्न केले जातील नसता याबाबत देखील माननीय कोर्टामध्ये याचिका करण्यात येईल भरणे संच मान्यता मधील विद्यार्थी संख्येच्या ज्या अन्यायकारक अटी व शर्ती घातलेले आहेत त्यासंदर्भातील 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करणे याबाबत देखील याचिका करण्यात येणार आहे जुनिअर कॉलेजच्या संच मान्यता 2025 26 च्या ऑनलाईन त्यामध्ये देखील शासनाने संस्थेवर अन्याय करण्याचे धोरण अवलंबियाचे दिसते त्या अनुषंगाने विद्यार्थी संख्येचे निकष चुकीच्या पद्धतीने दाखवणे, वर्कलोड व्यवस्थित न दाखवणे, वेतनेतर अनुदान न देणे, शासनाच्या अन्यायकारक धोरणाच्या विरोधात संस्था संघटना म्हणून कोर्टामध्ये जाण्याचे जाण्याचे ठरले व कायम शब्द काढलेल्या परंतु मूल्यांकन न केलेल्या जिल्ह्यातील बारा प्राथमिक शाळा त्या शासनाने स्वयं अर्थशाहीत करण्याचा डाव घातलेला आहे किंवा बंद करण्याचा यासंदर्भात देखील सुधीर अण्णा येणे चर्चा करून या शाळांना कसा न्याय देता येईल त्यासाठी वाटेल ते करण्याची व रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे असे संघटनेच्या माध्यमातून अध्यक्षांनी जाहीर केले वेगवेगळ्या पद्धतीने शासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला या संघटनेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी धाराशिव येथे संस्थेचे कार्यालय देखील उघडण्याचे मनोदय देखील भाषणामध्ये सुधीर पाटील यांनी दिले त्याचबरोबर जिल्हा पातळीवर सात जणांची न्यायालयीन लढाईसाठी तज्ञ लोकांची कमिटी तयार करून तिच्या माध्यमातून जिल्हास्तरीय प्रश्न सोडवण्याचा काम या तज्ञ समितीने करावे असा ठराव पास करण्यात आला त्याचबरोबर काही प्रश्नावर कोर्टात जाण्यासाठी तज्ञ कमिटी मार्गदर्शन करणार आहे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संस्था चालकांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव लहूराज लोमटे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मार्गदर्शक एडवोकेट वसंतरावजी मडके सर यांनी केले
तहसीलदार मृणाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई; दोन मंडळांत महसूल विभागाची मोहीम धाराशिव : तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी तहसीलदार मृणाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासनाने मंडळनिहाय विशेष तपासणी पथके सक्रिय केली असून विविध भागात धडक कारवाया सुरू आहेत. या मोहिमेअंतर्गत आंबेजवळगा व करजखेडा मंडळ परिसरात कारवाई करण्यात आली. आंबेजवळगा मंडळातील अवैध गौण खनिज तपासणी पथकाने संशयित वाहनावर कारवाई केली. मात्र कारवाईदरम्यान संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला. त्यामुळे या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त वाहन पुढील कार्यवाहीसाठी बेंबळी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. या कारवाईवेळी नायब तहसीलदार श्रीमती बलकवडे, मंडळ अधिकारी श्री गुळमिरे तसेच मंडळातील इतर ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, करजखेडा मंडळातही अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केली. यावेळी नायब तहसीलदार श्री शिंदे, मंडळ अधिकारी श्रीमती सुकेशनी कांबळे तसेच मंडळातील इतर ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते. तालुकाभर सुरू असलेल्या या मोहिमेमुळे अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न होत असून, महसूल प्रशासनाकडून पुढील काळातही अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
नवनियुक्त काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकर यांचा धाराशिव येथे जाहीर सत्कार; पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार धाराशिव : काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झालेल्या उमेशराजे निंबाळकर यांचा धाराशिव येथील काँग्रेस भवनात उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध स्तरावरील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या हस्ते उमेशराजे निंबाळकर यांचा पुष्पगुच्छ सत्कार करण्यात आला. नव्या जबाबदारीसाठी त्यांना शुभेच्छा देत जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले. या सत्कार समारंभाला विश्वास आप्पा शिंदे, राजाभाऊ शेरखाणे, नगरसेवक अमोल कुतवळ, शेख सर, प्रशांत पाटील, धनंजय रणदिवे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना शुभेच्छा देत आगामी काळात पक्षवाढीसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी बोलताना पक्ष संघटना ग्रामीण भागापर्यंत बळकट करणे, युवकांना पक्षाशी जोडणे तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविणे यावर भर देण्यात आल्याची माहिती समोर आली.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाला अधिक सक्षम करण्यासाठी सर्व पदाधिकारी एकत्रितपणे काम करतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमात पक्षाच्या भविष्यातील वाटचालीबाबत चर्चा झाली असून, काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहण्याचे आवाहन करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या सत्कार सोहळ्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
धाराशिव शहर काँग्रेस अध्यक्ष अग्निवेश शिंदे यांचा राजीनामा धाराशिव : धाराशिव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अग्निवेश विलासराव शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे. राजीनामा पत्रात अग्निवेश शिंदे यांनी नमूद केले आहे की, काँग्रेस पक्षाने शहराध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली होती. पक्षाच्या ध्येयधोरणानुसार प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. काम करताना काही उणिवा राहिल्या असतील किंवा नकळत कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. सध्याच्या वैयक्तिक अडचणींमुळे शहराध्यक्ष पदाला योग्य न्याय देता येत नसल्याचे सांगत त्यांनी पदाचा राजीनामा दिला असल्याचे पत्रात म्हटले आहे. इतर कार्यकर्त्यांनाही या पदावर काम करण्याची संधी मिळावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, अग्निवेश शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे धाराशिव शहर काँग्रेसमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले असून पुढील शहराध्यक्ष म्हणून कोणाची निवड होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
अवैध विदेशी दारूची वाहतूक उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, ६.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त धाराशिव | प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध विदेशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत ६ लाख ३४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 21 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील मालमत्तेसंदर्भातील गुन्हे उघडकीस आणणे, फरार आरोपींचा शोध घेणे तसेच अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी येडशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात असताना पथकाला गुप्त माहिती मिळाली की, एमएच 15 बीएक्स 6820 क्रमांकाच्या इनोव्हा कारमधून अवैध विदेशी दारूची वाहतूक सुरू आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित वाहन थांबवले. वाहन चालकाने आपले नाव सुभाष भिमराव उर्फ लाला काळे (वय 33, रा. कन्हेरवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव) असे सांगितले. वाहनात मागील सीटवर असलेल्या व्यक्तीने दादा रामा काळे (वय 46, रा. जुना बस डेपो परिसर, पारधी पिढी, धाराशिव) अशी ओळख सांगितली. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता कारमध्ये विदेशी दारूच्या बाटल्यांचे बॉक्स आढळून आले. त्यानंतर वाहनासह विदेशी दारू असा एकूण ६,३४,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी सुभाष भिमराव काळे व दादा रामा काळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि अमोल मोरे, बळीराम शिंदे, अमोल चव्हाण तसेच चालक पोकॉ दहीहांडे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. अवैध दारू वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून अशा कारवायांमुळे बेकायदेशीर धंद्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
शिवसेनेत सुरज साळुंके यांच्यावर धाराशिव लोकसभा सहसंपर्कप्रमुख पदाची मोठी जबाबदारी
नव्या जोमाने पक्ष संघटन आणखी मजबूत करणार - साळुंके
शिवसेनेचे सुरज राजाभाऊ साळुंके यांच्यावर पक्षाने नवी जबाबदारी सोपवली आहे. शिवसेनेच्या धाराशिव लोकसभा प्रभारी सहसंपर्कप्रमुखपदी त्यांची निवड करण्यात आली असून पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी नियुक्तीचे पत्र श्री. साळुंके यांना दिले आहे. निवडीनंतर शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव लोकसभा मतदारसंघात नव्या जोमाने पक्ष संघटन आणखी मजबूत करणार असल्याचे नूतन प्रभारी सहसंपर्कप्रमुख सूरज साळुंके यांनी सांगितले.
मुंबई येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते शिवसेना धाराशिव लोकसभा प्रभारी सहसंपर्कप्रमुखपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या धाराशिव लोकसभा प्रभारी सह संपर्कप्रमुखपदी आपली नियुक्ती करण्यात येत असून नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल, असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
तसेच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य असेही नियुक्ती पत्रात नमूद केले आहे. त्यांच्या या निवडीचे शिवसैनिकामधून स्वागत होत आहे.
सुरज साळुंके यांनी धाराशिव जिल्हाप्रमुख पदावर काम करत असताना धाराशिव - कळंब विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे संघटन मोठ्या प्रमाणात वाढविलेले आहे. जुन्या आणि नव्या शिवसैनिकांमध्ये समन्वय साधून त्यांनी युवा सैनिकांची मोठी फळी उभी केली आहे. त्यांच्यावर आता नवी जबाबदारी सोपवली असल्याने धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे संघटन आणखी बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा मा. मुख्यमंत्री महोदय यांनी ऊर्जा बचत, इंधन बचत व पर्यावरण संवर्धनाबाबत दिलेल्या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा परिषद धाराशिव यांच्या मा. अध्यक्षा यांनी जिल्हा परिषदेमधील सर्व सभापती यांना जनतेसमोर आदर्श निर्माण करण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनास सर्व सभापती यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या दौऱ्यांसाठी शासकीय वाहनांचा वापर टाळण्याचा निर्णय घेतला असून संबंधित शासकीय वाहने कार्यालयात जमा करण्यात येत आहेत. यामधून इंधन बचत, अनावश्यक खर्च नियंत्रण तसेच पर्यावरणपूरक प्रशासनाचा संदेश समाजामध्ये देण्यात येत आहे.
तसेच, जिल्हा परिषदेमधील विषय समिती बैठका, सर्वसाधारण सभा व आढावा बैठका शक्य त्या प्रमाणात ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) माध्यमातून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वेळेची बचत, इंधन बचत, प्रशासकीय कार्यक्षमता वाढ तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होणार आहे.
जिल्हा परिषद धाराशिव ही केवळ विकासकामांपुरती मर्यादित न राहता जबाबदार, पारदर्शक व पर्यावरणपूरक प्रशासनाचा आदर्श निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
“इंधन बचत हीच राष्ट्रसेवा” हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवून शासनाच्या पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना बळकटी देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद धाराशिव मार्फत करण्यात येत आहे.
अनुसूचित जाती उप वर्गीकरण संदर्भात ५ मे रोजी बैठकीचे आयोजन - शिंगाडे
सर्व मागासवर्गीय बांधवांनी उपस्थित रहावे
धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - राज्य सरकारच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील ५९ जातींच्या समुहामध्ये उभी फूट पाडण्याचा कुटील डाव सुरु आहे. त्यासाठी न्यायमूर्ती अनंत बदर समिती नेमून त्या समितीने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे अनुसूचित जातीचे अ, बं, क, ड असे उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया अवलंबवली जात आहे. ही कृती संविधानिक नसून घटना आणि नियमबाह्य आहे. ते होऊ नये म्हणून उपवर्गीकरणास संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड कडाडून विरोध होत आहे. त्यामुळे या संदर्भात धोरण ठरविण्यासाठी मंगळवार दि.५ मे रोजी बैठक आयोजित करण्यात आले असून या बैठकीस अनुसूचित जातीमधील सर्वच जाती समूहांनी
उपस्थित रहावे, असे आवाहन बहुजन योध्दा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांनी केले आहे.
भारतीय राज्यघटनेत अनुसूचित जाती प्रवर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष कायद्याद्वारे तरतूद केलेली आहे. त्यामुळे हजारो वर्षापासून वंचित असलेल्या व विकासापासून दूर फेकलेल्या जातीतील नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याची तरतूद घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी करून ठेवलेली आहे. त्यामुळे मागास जातींचा विकास होत आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येत नाही. जर बदल करायचाच असेल तर तो अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यासाठी देखील समिती गठीत करून त्या जाती समूहातील नागरिकांचे काय म्हणणे आहे ? हे विचारात घेणे आवश्यक असते. जर त्या नागरिकांनी सुधारणा करण्यास लेखी परवानगी दिली किंवा होकार दर्शविला तर ते करता येते. मात्र, केंद्र सरकारचे अधिकार सडलेल्या मनुवादी मानसिकतेचे राज्य सरकार व सरकारमधील आकांडतांडव करणारे जातीय द्वेष भावनेपोटी आणि केवळ मागास समाजाला पुन्हा विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर लोटण्यासाठीच उप वर्गीकरण करण्याचा घाट घालीत आहेत. हे संविधानिक आणि नैसर्गिक न्यायाला धरून नसून तो सरळ सरळ मागास समाजावर अन्याय करणारे कृत्य आहे. त्यामुळे जातीयवादी सरकारच्या अन्यायकारक षडयंत्र बाबत धोरण निश्चित करण्यासाठी धाराशिव शहरातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील शासकीय विश्रामगृह येथे ५९ जाती समूहांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस जिल्हाभरातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बहुजन योध्दा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांनी केले आहे.
Vishwa Vishal NEWS
श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई.
श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात स्वच्छता राखण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही काही व्यक्तींकडून मंदिर परिसरात थुंकणे तसेच कचरा टाकण्याचे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर स्वच्छ व पवित्र राखण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने दोन विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
मंदिर संस्थानच्या सहायक स्वच्छता निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली थुंकणाऱ्या व कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी दोन स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके सकाळी ६ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री १० या दोन शिफ्टमध्ये मंदिर परिसरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करणार आहेत.
या पथकांमध्ये मंदिर संस्थानचे चार शिपाई तसेच सुरक्षा सेवा पुरवठादार कंपनी SISPL चे दोन सुरक्षा रक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंदिर परिसरात थुंकणे, घाण करणे अथवा कचरा टाकताना कोणी आढळल्यास संबंधित व्यक्तीवर ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर परिसराची स्वच्छता अबाधित राखण्यासाठी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
6 hours ago | [YT] | 0
View 0 replies
Vishwa Vishal NEWS
दिनेश दत्ता बंडगर यांना राज्यस्तरीय 'डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसी रत्न पुरस्कार' प्रदान.
पनवेल : राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन श्री. दिनेश दत्ता बंडगर यांना प्रतिष्ठेचा "राज्यस्तरीय डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसी रत्न पुरस्कार – २०२६" प्रदान करण्यात आला.
पनवेल येथील व्ही. के. हायस्कूल येथे हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा व राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. बाळाराम पाटील साहेब, माजी शिक्षक आमदार, कोकण विभाग हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. दत्तात्रय सावंत साहेब, माजी शिक्षक आमदार, पुणे विभाग तसेच मा. प्रवीण स्वामीजी, आमदार, उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघ उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. अनिल नाचपले, सरचिटणीस मा. संतोष भोजने, उपाध्यक्ष मा. सुखदेव भालेकर, महिला राज्याध्यक्ष मा. रेखाताई सुळे, महिला सरचिटणीस मा. विनया जाधव, राज्य संपर्कप्रमुख मा. मंगेश सुवर्णकार, राज्य प्राध्यापक प्रमुख मा. सुवर्ण पगार, राज्य खाजगी विभाग प्रमुख मा. राजन पाटील, राज्य मनपा प्रमुख मा. श्रीराम पळसकर, राज्य प्रवक्ते मा. अर्जुन जाधव, राज्य प्रसिद्धी प्रमुख मा. धनाजी घरत, जिल्हाध्यक्ष मा. अनंत फुलसुंदर, जिल्हा सरचिटणीस मा. दीपक हजारे, जिल्हा कोषाध्यक्ष मा. अशोक खडके, जिल्हा कार्याध्यक्ष मा. परमेश्वर साखरे, राज्य सदस्य मा. सतीश हुंडेकरी यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार प्रदान करताना मान्यवरांनी श्री. दिनेश दत्ता बंडगर यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत केलेल्या कार्याचे कौतुक केले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्री. बंडगर यांनी राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाचे आभार मानत हा सन्मान समाजसेवेच्या कार्यासाठी अधिक प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले.
राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात प्रदान करण्यात आलेला हा राज्यस्तरीय सन्मान श्री. दिनेश दत्ता बंडगर यांच्या कार्याची पावती मानला जात असून त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
3 days ago | [YT] | 5
View 0 replies
Vishwa Vishal NEWS
उस्मानाबाद जिल्हा खाजगी शिक्षण संस्था चालक संघटना जिल्हा धाराशिव ची बैठक संपन्न झाली -आज दि. 2/06/26 वार मंगळवार रोजी दुपारी 12.30 वा.के टी पाटील डी फार्मसी कॉलेज येथे उस्मानाबाद जिल्हा खाजगी शिक्षण संस्था चालक संघ यांची बैठक झाली सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री अशोकराव मोहेकर अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली प्रमुख पाहुणे म्हणून खाजगी शिक्षण संस्था चालक संघाचे अध्यक्ष श्री सुधीर पाटील श्री अशोक राव पवार श्री दत्ता बंडगर श्री धनंजय पाटील श्री टिकले गुरुजी हे होते सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री टिकले सर यांनी केले यामध्ये प्रामुख्याने शाळा चालवताना संस्थाचालकांसमोर अनेक अडचणी प्रश्न समस्या उभे आहेत त्या शासन दरबारी व न्यायालयीन मार्गाने कशा सोडवायचे याच्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले या. शिक्षण संस्थेच्या समोरील विविध प्रश्नांवर अनेक संस्थाचालकांनी आपली आपली मते मांडली त्यात श्री सरवदे सर श्री पांडुरंगलाटे सर श्री शिंदे सर श्रीमती मुळे मॅडम अशा अनेक मान्यवरांनी विचार मांडले यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी आपल्या मनोगत मध्ये असे म्हटले की संस्थेच्या पोर्टल मार्फत भरल्या जाणाऱ्या शिक्षकांच्या जागा व त्याच्या मध्ये असलेल्या त्रुटी याबाबत त्यात त्रुटी दूर करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील व कोर्टामध्ये या संदर्भात याचिका, शिपायाची पदे रद्द करणे व संस्थेतील शिपाई सेवानिवृत्त झाल्यानंतर ते पद नव्याने भरता येणार नाही अशी शासनाने बंदी घातली परंतु ते पद पायाभूत असल्यामुळे ते पद शासनाला कमी करता येणार नाही याबाबत देखील कोर्टामध्ये जाण्याचा मनोदय श्री सुधीर पाटील यांनी बोलून दाखवला पुढे असे म्हणाले या वर्षभराच्या काळामध्ये संस्थेतील रिटायर झालेले जे क्लार्क आहेत त्यांच्या जागी देखील नवीन भरती करण्यास शासनाने बंदी घातलेले ती बंदी उठवण्यासंदर्भात व क्लर्कची भरती पुन्हा नव्याने चालू करून पदभरतीस मान्यता घेण्यासाठी देखील शासन स्तरावर प्रयत्न केले जातील नसता याबाबत देखील माननीय कोर्टामध्ये याचिका करण्यात येईल भरणे संच मान्यता मधील विद्यार्थी संख्येच्या ज्या अन्यायकारक अटी व शर्ती घातलेले आहेत त्यासंदर्भातील 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करणे याबाबत देखील याचिका करण्यात येणार आहे जुनिअर कॉलेजच्या संच मान्यता 2025 26 च्या ऑनलाईन त्यामध्ये देखील शासनाने संस्थेवर अन्याय करण्याचे धोरण अवलंबियाचे दिसते त्या अनुषंगाने विद्यार्थी संख्येचे निकष चुकीच्या पद्धतीने दाखवणे, वर्कलोड व्यवस्थित न दाखवणे, वेतनेतर अनुदान न देणे, शासनाच्या अन्यायकारक धोरणाच्या विरोधात संस्था संघटना म्हणून कोर्टामध्ये जाण्याचे जाण्याचे ठरले व कायम शब्द काढलेल्या परंतु मूल्यांकन न केलेल्या जिल्ह्यातील बारा प्राथमिक शाळा त्या शासनाने स्वयं अर्थशाहीत करण्याचा डाव घातलेला आहे किंवा बंद करण्याचा यासंदर्भात देखील सुधीर अण्णा येणे चर्चा करून या शाळांना कसा न्याय देता येईल त्यासाठी वाटेल ते करण्याची व रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे असे संघटनेच्या माध्यमातून अध्यक्षांनी जाहीर केले वेगवेगळ्या पद्धतीने शासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला या संघटनेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी धाराशिव येथे संस्थेचे कार्यालय देखील उघडण्याचे मनोदय देखील भाषणामध्ये सुधीर पाटील यांनी दिले त्याचबरोबर जिल्हा पातळीवर सात जणांची न्यायालयीन लढाईसाठी तज्ञ लोकांची कमिटी तयार करून तिच्या माध्यमातून जिल्हास्तरीय प्रश्न सोडवण्याचा काम या तज्ञ समितीने करावे असा ठराव पास करण्यात आला त्याचबरोबर काही प्रश्नावर कोर्टात जाण्यासाठी तज्ञ कमिटी मार्गदर्शन करणार आहे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संस्था चालकांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव लहूराज लोमटे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मार्गदर्शक एडवोकेट वसंतरावजी मडके सर यांनी केले
6 days ago | [YT] | 5
View 0 replies
Vishwa Vishal NEWS
तहसीलदार मृणाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई; दोन मंडळांत महसूल विभागाची मोहीम
धाराशिव : तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी तहसीलदार मृणाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासनाने मंडळनिहाय विशेष तपासणी पथके सक्रिय केली असून विविध भागात धडक कारवाया सुरू आहेत. या मोहिमेअंतर्गत आंबेजवळगा व करजखेडा मंडळ परिसरात कारवाई करण्यात आली.
आंबेजवळगा मंडळातील अवैध गौण खनिज तपासणी पथकाने संशयित वाहनावर कारवाई केली. मात्र कारवाईदरम्यान संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला. त्यामुळे या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त वाहन पुढील कार्यवाहीसाठी बेंबळी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.
या कारवाईवेळी नायब तहसीलदार श्रीमती बलकवडे, मंडळ अधिकारी श्री गुळमिरे तसेच मंडळातील इतर ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, करजखेडा मंडळातही अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केली. यावेळी नायब तहसीलदार श्री शिंदे, मंडळ अधिकारी श्रीमती सुकेशनी कांबळे तसेच मंडळातील इतर ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते.
तालुकाभर सुरू असलेल्या या मोहिमेमुळे अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न होत असून, महसूल प्रशासनाकडून पुढील काळातही अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
1 week ago | [YT] | 1
View 0 replies
Vishwa Vishal NEWS
नवनियुक्त काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकर यांचा धाराशिव येथे जाहीर सत्कार; पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार
धाराशिव : काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झालेल्या उमेशराजे निंबाळकर यांचा धाराशिव येथील काँग्रेस भवनात उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध स्तरावरील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या हस्ते उमेशराजे निंबाळकर यांचा पुष्पगुच्छ सत्कार करण्यात आला. नव्या जबाबदारीसाठी त्यांना शुभेच्छा देत जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले.
या सत्कार समारंभाला विश्वास आप्पा शिंदे, राजाभाऊ शेरखाणे, नगरसेवक अमोल कुतवळ, शेख सर, प्रशांत पाटील, धनंजय रणदिवे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना शुभेच्छा देत आगामी काळात पक्षवाढीसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी बोलताना पक्ष संघटना ग्रामीण भागापर्यंत बळकट करणे, युवकांना पक्षाशी जोडणे तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविणे यावर भर देण्यात आल्याची माहिती समोर आली.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाला अधिक सक्षम करण्यासाठी सर्व पदाधिकारी एकत्रितपणे काम करतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमात पक्षाच्या भविष्यातील वाटचालीबाबत चर्चा झाली असून, काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहण्याचे आवाहन करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या सत्कार सोहळ्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
2 weeks ago | [YT] | 8
View 6 replies
Vishwa Vishal NEWS
धाराशिव शहर काँग्रेस अध्यक्ष अग्निवेश शिंदे यांचा राजीनामा
धाराशिव : धाराशिव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अग्निवेश विलासराव शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे.
राजीनामा पत्रात अग्निवेश शिंदे यांनी नमूद केले आहे की, काँग्रेस पक्षाने शहराध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली होती. पक्षाच्या ध्येयधोरणानुसार प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.
काम करताना काही उणिवा राहिल्या असतील किंवा नकळत कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. सध्याच्या वैयक्तिक अडचणींमुळे शहराध्यक्ष पदाला योग्य न्याय देता येत नसल्याचे सांगत त्यांनी पदाचा राजीनामा दिला असल्याचे पत्रात म्हटले आहे. इतर कार्यकर्त्यांनाही या पदावर काम करण्याची संधी मिळावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, अग्निवेश शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे धाराशिव शहर काँग्रेसमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले असून पुढील शहराध्यक्ष म्हणून कोणाची निवड होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
2 weeks ago | [YT] | 5
View 0 replies
Vishwa Vishal NEWS
अवैध विदेशी दारूची वाहतूक उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, ६.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त
धाराशिव | प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध विदेशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत ६ लाख ३४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 21 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील मालमत्तेसंदर्भातील गुन्हे उघडकीस आणणे, फरार आरोपींचा शोध घेणे तसेच अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी येडशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात असताना पथकाला गुप्त माहिती मिळाली की, एमएच 15 बीएक्स 6820 क्रमांकाच्या इनोव्हा कारमधून अवैध विदेशी दारूची वाहतूक सुरू आहे.
माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित वाहन थांबवले. वाहन चालकाने आपले नाव सुभाष भिमराव उर्फ लाला काळे (वय 33, रा. कन्हेरवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव) असे सांगितले. वाहनात मागील सीटवर असलेल्या व्यक्तीने दादा रामा काळे (वय 46, रा. जुना बस डेपो परिसर, पारधी पिढी, धाराशिव) अशी ओळख सांगितली.
पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता कारमध्ये विदेशी दारूच्या बाटल्यांचे बॉक्स आढळून आले. त्यानंतर वाहनासह विदेशी दारू असा एकूण ६,३४,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपी सुभाष भिमराव काळे व दादा रामा काळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि अमोल मोरे, बळीराम शिंदे, अमोल चव्हाण तसेच चालक पोकॉ दहीहांडे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
अवैध दारू वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून अशा कारवायांमुळे बेकायदेशीर धंद्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
2 weeks ago | [YT] | 3
View 0 replies
Vishwa Vishal NEWS
शिवसेनेत सुरज साळुंके यांच्यावर धाराशिव लोकसभा सहसंपर्कप्रमुख पदाची मोठी जबाबदारी
नव्या जोमाने पक्ष संघटन आणखी मजबूत करणार - साळुंके
शिवसेनेचे सुरज राजाभाऊ साळुंके यांच्यावर पक्षाने नवी जबाबदारी सोपवली आहे. शिवसेनेच्या धाराशिव लोकसभा प्रभारी सहसंपर्कप्रमुखपदी त्यांची निवड करण्यात आली असून पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी नियुक्तीचे पत्र श्री. साळुंके यांना दिले आहे. निवडीनंतर शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव लोकसभा मतदारसंघात नव्या जोमाने पक्ष संघटन आणखी मजबूत करणार असल्याचे नूतन प्रभारी सहसंपर्कप्रमुख सूरज साळुंके यांनी सांगितले.
मुंबई येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते शिवसेना धाराशिव लोकसभा प्रभारी सहसंपर्कप्रमुखपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या धाराशिव लोकसभा प्रभारी सह संपर्कप्रमुखपदी आपली नियुक्ती करण्यात येत असून नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल, असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
तसेच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य असेही नियुक्ती पत्रात नमूद केले आहे. त्यांच्या या निवडीचे शिवसैनिकामधून स्वागत होत आहे.
सुरज साळुंके यांनी धाराशिव जिल्हाप्रमुख पदावर काम करत असताना धाराशिव - कळंब विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे संघटन मोठ्या प्रमाणात वाढविलेले आहे. जुन्या आणि नव्या शिवसैनिकांमध्ये समन्वय साधून त्यांनी युवा सैनिकांची मोठी फळी उभी केली आहे. त्यांच्यावर आता नवी जबाबदारी सोपवली असल्याने धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे संघटन आणखी बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे
3 weeks ago | [YT] | 6
View 0 replies
Vishwa Vishal NEWS
पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा मा. मुख्यमंत्री महोदय यांनी ऊर्जा बचत, इंधन बचत व पर्यावरण संवर्धनाबाबत दिलेल्या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा परिषद धाराशिव यांच्या मा. अध्यक्षा यांनी जिल्हा परिषदेमधील सर्व सभापती यांना जनतेसमोर आदर्श निर्माण करण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनास सर्व सभापती यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या दौऱ्यांसाठी शासकीय वाहनांचा वापर टाळण्याचा निर्णय घेतला असून संबंधित शासकीय वाहने कार्यालयात जमा करण्यात येत आहेत. यामधून इंधन बचत, अनावश्यक खर्च नियंत्रण तसेच पर्यावरणपूरक प्रशासनाचा संदेश समाजामध्ये देण्यात येत आहे.
तसेच, जिल्हा परिषदेमधील विषय समिती बैठका, सर्वसाधारण सभा व आढावा बैठका शक्य त्या प्रमाणात ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) माध्यमातून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वेळेची बचत, इंधन बचत, प्रशासकीय कार्यक्षमता वाढ तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होणार आहे.
जिल्हा परिषद धाराशिव ही केवळ विकासकामांपुरती मर्यादित न राहता जबाबदार, पारदर्शक व पर्यावरणपूरक प्रशासनाचा आदर्श निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
“इंधन बचत हीच राष्ट्रसेवा” हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवून शासनाच्या पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना बळकटी देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद धाराशिव मार्फत करण्यात येत आहे.
3 weeks ago | [YT] | 3
View 0 replies
Vishwa Vishal NEWS
अनुसूचित जाती उप वर्गीकरण संदर्भात ५ मे रोजी बैठकीचे आयोजन - शिंगाडे
सर्व मागासवर्गीय बांधवांनी उपस्थित रहावे
धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - राज्य सरकारच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील ५९ जातींच्या समुहामध्ये उभी फूट पाडण्याचा कुटील डाव सुरु आहे. त्यासाठी न्यायमूर्ती अनंत बदर समिती नेमून त्या समितीने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे अनुसूचित जातीचे अ, बं, क, ड असे उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया अवलंबवली जात आहे. ही कृती संविधानिक नसून घटना आणि नियमबाह्य आहे. ते होऊ नये म्हणून उपवर्गीकरणास संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड कडाडून विरोध होत आहे. त्यामुळे या संदर्भात धोरण ठरविण्यासाठी मंगळवार दि.५ मे रोजी बैठक आयोजित करण्यात आले असून या बैठकीस अनुसूचित जातीमधील सर्वच जाती समूहांनी
उपस्थित रहावे, असे आवाहन बहुजन योध्दा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांनी केले आहे.
भारतीय राज्यघटनेत अनुसूचित जाती प्रवर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष कायद्याद्वारे तरतूद केलेली आहे. त्यामुळे हजारो वर्षापासून वंचित असलेल्या व विकासापासून दूर फेकलेल्या जातीतील नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याची तरतूद घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी करून ठेवलेली आहे. त्यामुळे मागास जातींचा विकास होत आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येत नाही. जर बदल करायचाच असेल तर तो अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यासाठी देखील समिती गठीत करून त्या जाती समूहातील नागरिकांचे काय म्हणणे आहे ? हे विचारात घेणे आवश्यक असते. जर त्या नागरिकांनी सुधारणा करण्यास लेखी परवानगी दिली किंवा होकार दर्शविला तर ते करता येते. मात्र, केंद्र सरकारचे अधिकार सडलेल्या मनुवादी मानसिकतेचे राज्य सरकार व सरकारमधील आकांडतांडव करणारे जातीय द्वेष भावनेपोटी आणि केवळ मागास समाजाला पुन्हा विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर लोटण्यासाठीच उप वर्गीकरण करण्याचा घाट घालीत आहेत. हे संविधानिक आणि नैसर्गिक न्यायाला धरून नसून तो सरळ सरळ मागास समाजावर अन्याय करणारे कृत्य आहे. त्यामुळे जातीयवादी सरकारच्या अन्यायकारक षडयंत्र बाबत धोरण निश्चित करण्यासाठी धाराशिव शहरातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील शासकीय विश्रामगृह येथे ५९ जाती समूहांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस जिल्हाभरातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बहुजन योध्दा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांनी केले आहे.
1 month ago | [YT] | 2
View 0 replies
Load more