पायवाटेचं एक बरं असतं , ह्या वाटेवर मैलाचे दगड नसतात. त्यामुळे किती वाट चाललो किती बाकी आहे याचे गणित करत न बसता आपल्याला आजूबाजूच्या अलौकिक निसर्गाला न्याहाळत मार्गक्रमण करायला मिळते.
काही पायवाटा कायमच्या पुसल्या गेल्या आहेत काही आज शेवटच्या घटका मोजत आहेत. काही मात्र आजही ताज्या आहेत..
याच पायवाटांना पुन्हा पावलांचा स्पर्श करण्यासाठी ....फिरणार आहे.
Instagram ID :
instagram.com/paayvata
Facebook ID :
www.facebook.com/profile.php?id=100092664091333
E Mail Id :
paayvata@gmail.com
Paayvata
माणुसकीचे नवे छप्पर आणि घर पुन्हा उभे राहिले..
गणदादा आणि त्याची पत्नी पारू काकू यांचा छोटासा पण सुखी संसार होता.
गणदादा ही अशी व्यक्ती जि गावात कोणाच्याही उपयोगाला ( कामाला ) सहज उपलब्ध होणारी व्यक्ती.
काही कामा निमित्त गणदादा गावाबाहेर पडले आणि त्याच वेळी कोरोनाचा lockdown सुरू झाला.
शिक्षण नसलेला साधा, सरळ गणदादा लॉकडाऊन त्या परिस्थितीत पुन्हा आपल्या गावापर्यंत पोहचू शकला नाही.
पुढे सर्व नातेवाईक लोकांकडे गण दादांची चौकशी झाली पण ते कुठेच नव्हते.
“आज येतील… उद्या येतील…” या एका आशेवर पारू काकू दिवस काढत राहिल्या. पण दिवस महिन्यांत बदलले, महिने वर्षांत बदलले… आणि आज तब्बल सात वर्षे उलटून गेली, तरी गणदादा परत आले नाहीत.
त्यांचे काय झाले..? ते कुठे आहेत..? आहेत की नाही..? हे आज पर्यंत काही समजले नाही.
मागील सात वर्ष
आयुष्याच्या ओझ्यासोबत त्यांच्या घराचंही ओझं वाढत गेलं. कष्टाच्या वर्षांबरोबर घराच्या भिंती कोसळू लागल्या, वासे पडू लागले.
परवा गावी गेलो असता गण दादाच्या घराची अवस्था पाहून मन अस्वस्थ झाले.
पाऊस वेशीवर येऊन थांबला होता. जर पावसाच्या आधी घराची डागडुजी केली नाही तर घर पारू काकूच्या अंगावर पडून काहीही बरे वाईट घडू शकते.
आपण लवकरात लवकर काही तरी करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन कामाला लागलो.
पुढे दोन दिवसात गावातील काही लोकांनी घरावरील पुढील संकट लक्षात घेऊन स्वयं रोजगारातून घर तात्पुरते नीट करण्यासाठी सुरुवात देखील केली.
आणि ही बातमी समजताच मी तातडीने गावी पोहचलो.
प्रत्यक्ष जागी त्या कामात आपली काहीतरी मदत होऊ शकते.
गावातील काही लोकांनी मिळेल ते साहित्य लावून घर पावसापुरते तिच्या राहण्याजोगे बनवून द्यायचा निर्धार केला होता.
गावी जाग्यावर जाऊन मी आपल्या चॅनेल च्या माध्यमातून आजच्या आज त्या घरासाठी नवीन पत्रे आणून देतो असा शब्द दिला..
नवीन पत्रे येणार या आशेने ग्रामस्थांना देखील कामात हुरूप आला आणि दिलेल्या शब्दा प्रमाणे तीन तासाच्या आत गावात गाडी मागवून नवीन *२२,००० हजाराचे १० स्टीलचे पत्रे* उपलब्ध करून दिले.
सर्वांच्या प्रामाणिक कष्टाने एका दिवसात ते घर पुन्हा एकदा उभे राहिले. ज्या भिंती पडल्या होत्या त्या पुन्हा रचल्या गेल्या, कुजलेल्या वाश्यांची जागी आता नवीन वाश्यांनी घेतली होती.
घरावर आता नवीन छप्पर पडले होते.
जुन्याच दगडींचा वापर करून पडलेल्या भिंती पुन्हा दुरुस्त करून घेतल्या.
वरती नवीन पत्रे टाकले.
पूर्ण नवीन नाही पण त्या पुढील काही वर्ष त्या निश्चिंत राहू शकतील अशा पद्धतीने आपण घर बनवून देऊ शकलो.
या कार्यात आपल्यावर विश्वास ठेऊन उभे राहिलेल्या त्या प्रत्येक हाताचे
ज्यामध्ये आपले मान्यवर सबस्क्राईबर
अतुलजी गाडे
सचिनजी गावडे
अभिजीत देसाई
एकनाथ गावडे
मुकुंद गावडे
शंतनु परांजपे
सागर संकपाळ
मंगल बनसोडे
आशा कोले
प्रशांत सरापुरे
राजेश दानवे
रोहित शेडगे
नीलेश जावळे
तसेच
( ग्रामस्थ घिसर , सुनील शिवाजी धिंडले, सुभाष पंढरीनाथ धिंडले, कांताराम अनंत धिंडले ) यांचे मनापासून आभार मानतो.
धन्यवाद !
महेश धिंडले
पायवाटा यूट्यूब चॅनल
1 week ago (edited) | [YT] | 557
View 22 replies
Paayvata
🟡 नवीन व्हिडिओ लिंक 👇🏻 🟡
https://youtu.be/EPyDODz4obI
माझ्या गावाकडे पिण्याच्या पाण्याची विहीर गेल्या काही काळापासून गाळ, कचरा आणि अस्वच्छतेने भरत चालली होती. हळूहळू त्या विहिरीचं पाणी दूषित झालं आणि त्याच पाण्यावर अनेक ग्रामस्थांना नाईलाजाने अवलंबून राहावं लागत होतं. आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या होत्या, पण परिस्थिती बदलण्यासाठी ठोस पाऊल उचलणं आवश्यक होतं.
आज मात्र गावाने एकजुटीचं खरं उदाहरण दाखवलं. ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेतला. श्रमदानातून सर्वांनी मिळून ती विहीर साफ करण्याचा निर्णय घेतला.
विहीर जवळजवळ ३० ते ४० फूट खोल शिवाय खाली उतरण्यासाठी पायऱ्या देखील नव्हत्या अशा परिस्थितीत लोखंडी शिड्या एकमेकांना बांधून त्या खाली सोडल्या.
त्या शिड्यांच्या सहाय्याने आम्ही चार पाच जण खाली विहिरीत उतरलो.
कोणी दोर घेऊन आले होते तर कोणी गाळ बाहेर ओढत होतं..कोणी कचरा वेगळा केला, तर कोणी वरून मदत करत राहिलं. प्रत्येकाची एकच भावना होती—“आपलं पाणी, आपली जबाबदारी.”
या सर्व कामात मला देखील सहभागी होता आलं, याला मी माझं मोठं भाग्य समजतो. कारण अशा क्षणांमध्ये फक्त काम होत नाही, तर माणसांमधली एकता, जबाबदारी आणि एकमेकांप्रती आपुलकी अधिक घट्ट होते.
काही तासांच्या मेहनतीनंतर विहीर पुन्हा स्वच्छ झाली. गावाने स्वतःच आपलं आरोग्य परत मिळवलं होतं. सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान होतं.
पूर्वीची एकोप्याची गावगाडा संस्कृती, एकमेकांवर अवलंबून असलेली माणसांची नाती आणि निसर्गाशी जोडलेली गावाची नाळ अधोरेखित करणारी अशी गाव आजही आहेत याचा आनंद आहे.
आजचा दिवस सार्थकी लागल्याचे समाधान होते.
धन्यवाद!
महेश धिंडले
#payvata
2 weeks ago | [YT] | 358
View 7 replies
Paayvata
सर्वांना नमस्कार 🙏🏻
सह्याद्रीच्या पायवाटा चालताना अनुभवलेला निसर्ग,
पश्चिम घाटातील जैव विविधता आणि त्यांच्या संवर्धनाची गरज…निसर्ग संवर्धनात स्थानिक लोकांचा सहभाग किती महत्त्वाचा असतो..तालुक्यातील ऐतिहासिक वारसा स्थळ.
या विषयावर International Tourism Short Film Festival 2025 मध्ये बोलण्याची मला संधी मिळाली होती..
एखाद्या मंचावर बोलण्याची तशी ही माझी पहिलीच वेळ.
वेल्हे, भोर आणि मुळशीच्या समृद्ध निसर्गाचा परिचय करून देण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक आभार.
या मुलाखतीचा व्हिडिओ नुकताच ITSFF च्या यूट्यूब चॅनेलवर प्रकाशित झाला आहे.
नक्की बघा 🙏🏻
व्हिडिओ लिंक 👇🏻
https://youtu.be/up3gFk92rhs?si=XEhry...
3 weeks ago | [YT] | 138
View 25 replies
Paayvata
नवीन व्हिडिओ लिंक 👇🏻
https://youtu.be/3mHFi2ThHkQ
साधारण दोन महिन्यांपूर्वी सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अवघ्या सहा घरांच्या एका छोट्याशा वस्तीला भेट देण्याचा योग आला होता. त्या वेळी त्या वस्तीतील निरागस चिमुकल्यांसोबत काही क्षण घालवले, त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांमध्ये आनंद पाहिला आणि त्यांच्या आयुष्याचा साधेपणा जवळून अनुभवला.
माघारी येताना त्या लहानग्यांना नकळत एक वचन देऊन आलो होतो — पुन्हा भेटायला येण्याचं आणि त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात थोडासा हातभार लावण्याचं.
आज ते वचन पूर्ण करण्याची संधी मिळाली. पुन्हा एकदा डोंगर-दऱ्या ओलांडून त्या वस्तीपर्यंत पोहोचलो. यावेळी माझ्या हातात त्या चिमुकल्यांसाठी शालेय साहित्य, नवीन बूट आणि तिथल्या कुटुंबांच्या आयुष्यात थोडासा उजेड निर्माण करणारे सोलार दिवे होते.
हे साहित्य देताना त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसणारा आनंद आणि चेहऱ्यावर उमटलेले ते निरागस हास्य हेच माझ्यासाठी सर्वात मोठं समाधान होतं. आपण दिलेली वस्तू किती मोठी आहे यापेक्षा त्यामागील आपुलकी आणि माणुसकी त्यांच्यापर्यंत पोहोचणे अधिक महत्त्वाचं असतं.
सह्याद्रीच्या या दुर्गम वाटांवर राहणाऱ्या या कुटुंबांचा संघर्ष मोठा आहे, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि जगण्याची जिद्द तर त्याहीपेक्षा मोठी आहे.
या छोट्याशा प्रयत्नातून त्यांच्या आयुष्यात थोडासा आनंद आणि उजेड निर्माण झाला असेल, तर हाच माझ्यासाठी खरा आशीर्वाद आणि पुढच्या कार्यासाठी मिळालेली प्रेरणा आहे.
प्रवास लांबचा आहे बळ मिळो..!
धन्यवाद! 🙏🏻
महेश धिंडले
#ᴠɪʀᴀʟᴘᴏsᴛ #trendingpost❤️ #payvata #humanity #socialwork
3 weeks ago | [YT] | 718
View 16 replies
Paayvata
नवीन व्हिडिओ लिंक 👇🏻
https://youtu.be/9RjdkuMxaVM
निसर्गाचे अथांग रूप जितके सुंदर, तितकेच तिथले जीवन आव्हानात्मक. पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील घनदाट जंगलात राहणाऱ्या काही गरजू कुटुंबांना भेट देण्याचा योग आला.
आज त्यांच्या अंगणात जाऊन त्यांच्या सोबत काही क्षण घालवता आले.
अंधाराला काहीसे छेद देणारे ‘सोलार दिवे’ 💡आणि उद्याचे भविष्य घडवणाऱ्या लहान मुलांसाठी आणलेले ‘शाळेचे साहित्य’ 📚🖋️त्यांच्यापर्यंत सुपूर्द केले. शहराच्या झगमगाटापेक्षा जंगलातील त्या छोट्याशा झोपडीत पेटलेला तो सोलारचा दिवा जास्त प्रखर वाटला, कारण त्यात त्या कुटुंबाची आस आणि मुलांच्या शिक्षणाची स्वप्ने सामावली होती.
हा केवळ मदतीचा हात नव्हता, तर ती एक कृतज्ञतेची भावना होती.
आज खऱ्या अर्थाने दिवस सार्थकी लागल्याचे समाधान मिळाले.
धन्यवाद!🙏🏻
महेश धिंडले
या ठिकाणाचा व्हिडिओ आपल्या पायवाटा यूट्यूब चॅनेल वर पब्लिश केला आहे. नक्की बघा 🙏🏻
#humanity #helpinghand #love #viralpost #instapost
1 month ago | [YT] | 528
View 24 replies
Paayvata
गणदादा आणि त्याची पत्नी पारू काकू यांचा छोटासा पण सुखी संसार होता. गरिबी असली तरी कष्ट करून दोघे आपल्या संसाराचा गाडा हाकत होते.
गणदादा ही अशी व्यक्ती जि गावात कोणाच्याही उपयोगाला ( कामाला ) सहज उपलब्ध होणारी व्यक्ती.
काही कामा निमित्त गणदादा गावाबाहेर पडला आणि त्याच वेळी कोरोनाचा lockdown सुरू झाला.
शिक्षण नसलेला साधा, सरळ गणदादा लॉकडाऊन त्या परिस्थितीत पुन्हा आपल्या गावापर्यंत पोहचू शकला नाही.
पुढे सर्व नातेवाईक लोकांकडे गण दादांची चौकशी झाली पण ते कुठेच नव्हते.
“आज येतील… उद्या येतील…” या एका आशेवर पारू काकू दिवस काढत राहिल्या. पण दिवस महिन्यांत बदलले, महिने वर्षांत बदलले… आणि आज तब्बल सात वर्षे उलटून गेली, तरी गणदादा परत आले नाहीत.
त्यांचे काय झाले..? ते कुठे आहेत..? आहेत की नाही..? हे आज पर्यंत काही समजले नाही.
मागील सात वर्ष नवऱ्याचा आधार गेलेली त्यांची पत्नी आपला जीव जगवण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात राबून आपले पोट भरत आहे.
आयुष्याच्या ओझ्यासोबत त्यांच्या घराचंही ओझं वाढत गेलं. कष्टाच्या वर्षांबरोबर घराच्या भिंती कोसळू लागल्या, वासे पडू लागले.
घर कोसळलं आहे, पण त्यांची जिद्द अजूनही उभी आहे… आता त्या जिद्दीला आपल्या आधाराची गरज आहे. ❤️🙏
व्हिडिओ लिंक 👇🏻
https://youtu.be/BD-aopwDi98
महेश धिंडले
पायवाटा
#payvata
1 month ago | [YT] | 397
View 9 replies
Paayvata
नवीन व्हिडिओ लिंक 👇🏻
https://youtu.be/D32sPpl_BjM
काल पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर अतिशय दुर्गम भागात जाण्याचा योग आला.
तिथलं निसर्गसौंदर्य जितकं विलोभनीय आहे, तितकंच तिथलं जगणं आजही संघर्षाचं आहे. मूलभूत गरजांसाठीही तिथल्या माणसांना रोज झुंजावं लागतं.
तिथल्या काही गरजू कुटुंबांना रोजच्या अंधारातून मुक्ती मिळावी आणि त्यांच्या रात्री प्रकाशमान व्हाव्यात, म्हणून त्यांना उपयोगी पडतील अशा ‘सोलर दिव्यांची’ (Solar Lights) छोटीशी भेट दिली.
ते दिवे हातात घेताना त्यांच्या डोळ्यात चमकलेला तो कृतज्ञतेचा आणि आनंदाचा प्रकाश... कोणत्याही मोठ्या पुरस्कारापेक्षा खूप मोलाचा वाटला. माणसाने माणसाच्या सुखासाठी लावलेला हा एक छोटासा दिवा, त्यांच्या आयुष्यातील अंधार नक्कीच दूर करेल हा विश्वास आहे. 🤝❤️
दुर्गम भागात राहणाऱ्या आपल्याच माणसांच्या आयुष्यात प्रकाशाची एक लहानशी किरण होता आलं, याचं मनापासून समाधान आहे.
महेश धिंडले
पायवाटा
#light #माणुसकी #humanity #मानवता #payvata
1 month ago (edited) | [YT] | 868
View 45 replies
Paayvata
जुन्या रस्त्यांच्या कथा आणि
नव्या प्रवासाची वाट..
मी दोन्ही शोधतोय…
#payvata #paayvata #maheshdhindle #solo #travel
1 month ago | [YT] | 275
View 9 replies
Paayvata
नवीन व्हिडिओ 📽️ लिंक 👇🏻
https://youtu.be/oy7WmYjHUXQ
याच राजवाड्यामध्ये महाराणी ताराराणी यांचे जळवळजवळ तीस वर्षे वास्तव्य होते..
याच ऐतिहासिक दुर्गावरून महाराणी ताराराणींनी औरंगजेबाला सात वर्षे झुंजवले होते..
याच दुर्गाने छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आजारपणात मायेने सावरले होते..
याच दुर्गाने कित्येक रथी महारथींना आपल्या पोलादी कैदेत बंदिस्त ठेवले होते..
याच दुर्गाने औरंगजेबाच्या अथांग सेनेला तब्बल साडेचार महिने रडवले होते..
छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर जेव्हा स्वराज्यावर औरंगजेब नावाचे संकट आले होते तेव्हा महाराणी ताराराणींनी औरंगजेबाच्या त्या विशाल फौजेला ज्या जिद्दीने झुंज दिली होती त्या संघर्षात या किल्ल्याचा वाटा खूप मोठा होता.
पण आज मात्र या गडावर काही मन सुन्न करणाऱ्या गोष्टी पहायला मिळाल्या.
अशा या सातारा नगरीत वसलेल्या ऐतिहासिक दुर्गाचा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चैनल वर प्रदर्शित केला आहे.
नक्की बघा.
आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.
धन्यवाद ! 🙏🏻
महेश धिंडले
2 months ago | [YT] | 193
View 2 replies
Paayvata
निष्पाप जीवावर जेव्हा क्रौर्य कोसळतं
तेव्हा माणुसकीच अस्तित्वचं प्रश्नांत येतं..
प्रश्न फक्त त्या निष्पाप चिमुकलीच्या मृत्युचा नाही
तर प्रश्न आहे आपल्या शांततेचा आणि इथल्या मुर्दाड व्यवस्थेचा..
#nasarapur #pune #navalebridge
2 months ago | [YT] | 243
View 8 replies
Load more