👑 𝐃𝐍𝐘𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 👑

🔵 𝐀𝐌𝐁𝐄𝐃𝐊𝐀𝐑 𝐄𝐑𝐀 | 𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐈𝐀𝐋
📡 𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥 𝐀𝐦𝐛𝐞𝐝𝐤𝐚𝐫𝐢𝐭𝐞 𝐍𝐞𝐰𝐬 & 𝐌𝐞𝐝𝐢𝐚 𝐍𝐞𝐭𝐰𝐨𝐫𝐤 #𝐀𝐦𝐛𝐞𝐝𝐤𝐚𝐫𝐢𝐭𝐞 💙🦅⚖️
𝐏𝐚𝐢𝐝 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧𝐬 𝐚𝐯𝐚𝐢𝐥𝐚𝐛𝐥𝐞 💼
#𝐀𝐦𝐛𝐞𝐝𝐤𝐚𝐫𝐢𝐭𝐞 💙
Ambedkar Era News is a dedicated digital platform bringing you authentic, fearless, and unbiased coverage of the Ambedkarite movement and the Bahujan community. Our mission is to amplify the voices ignored by mainstream media and uphold the constitutional values of Liberty, Equality, and Fraternity. Inspired by the life and ideology of Dr. B.R. Ambedkar, we focus on spreading awareness, protecting constitutional rights, and documenting our community’s journey toward progress.

Jay Bhim 💙 Jay Savidhan ✒️


👑 𝐃𝐍𝐘𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 👑

🛑 जाहीर आवाहन: विरोधकांचा कुटील डाव आपल्याला चिथावून रस्त्यावर आणण्याचा आणि हुल्लडबाज ठरवून आपली सामाजिक प्रतिमा मलीन करण्याचा आहे. आपण कोणत्याही दबावाला किंवा चिथावणीला बळी न पडता, शांततेने आणि बुद्धीने कायदेशीर लढा दिला पाहिजे. भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून शत्रूचा असा चोख बंदोबस्त करा की, त्याची पुढची पिढीही धडा शिकेल!

1 day ago | [YT] | 522

👑 𝐃𝐍𝐘𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 👑

🛑 आदरणीय बौद्ध बांधवांनो, शत्रूचा छुपा कट शांत डोक्याने ओळखा...
भावनेच्या भरात शिकार होऊ नका... विवेक जागा ठेवा!

2 days ago | [YT] | 227

👑 𝐃𝐍𝐘𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 👑

हृदय हेलावून टाकणारी ती काळी पहाट आणि मनावर उमटलेली ती चिरंतन जखम...
११ जुलै १९९७... आजच्याच दिवशी रमाबाई आंबेडकर नगर निष्पाप रक्ताने लांछित झाले होते. आपल्या अस्मितेसाठी, स्वाभिमानाच्या रक्षणासाठी आणि परमपूज्य बाबासाहेबांच्या महनीय आदरासाठी सनदशीर मार्गाने रस्त्यावर उतरलेल्या आमच्या निष्पाप माता-भगिनींवर अन् बांधवांवर क्रूरतेची परिसीमा गाठत अमानुष गोळीबार करण्यात आला.
त्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या नृशंस हत्याकांडात ज्या १० निष्पाप आत्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्या स्मृती प्रज्वलित होऊन आज पुन्हा एकदा अंर्तमन व्याकुळ झाले आहे. तो आर्त आक्रोश, ती मूक पावले आणि तो न्याय्य लढा आजही आपल्या धमन्यांत जिवंत आहे.
आपल्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आत्मबलिदान देणाऱ्या रमाबाई नगरच्या त्या सर्व क्रांतिवीरांना, हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम आणि मानाचा मुजरा!
तुमचा हा सर्वोच्च त्याग आणि संघर्ष इतिहास कधीही विसरणार नाही...
अजरामर हुतात्म्यांना विनम्र अभिवादन! 💐
जय भीम! 💙🙏

3 days ago | [YT] | 746

👑 𝐃𝐍𝐘𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 👑

🛑 अनेकदा आपण भावनेच्या भरात किंवा मोठेपणा दाखवून समोरच्याला 'माफ' करतो. परंतु, आपली ही मवाळ भूमिका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला सुधारत नाही, उलट तो आपल्या सहनशीलतेला आपली 'कमकुवतपणा' समजतो. आपली हीच क्षमाशील वृत्ती अशा प्रवृत्तींची हिंमत अधिक वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे.

4 days ago | [YT] | 151

👑 𝐃𝐍𝐘𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 👑

🛑 आपल्या पाठीवर पडणारी प्रत्येक लाठी एकाच गोष्टीचा पुरावा आहे -तुम्ही सत्तेच्या बाहेर आहात! सत्ता मिळवा, नाहीतर आयुष्यभर.........

5 days ago | [YT] | 3,796

👑 𝐃𝐍𝐘𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 👑

🛑टीईटी घोटाळा: नैतिक जबाबदारी स्वीकारून दादा भुसेंनी पद सोडावे; 'सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा' आक्रमक पवित्रा!
🛑संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇
https://youtu.be/U0l2Q44OZpg?si=0TKq5...

1 week ago | [YT] | 105

👑 𝐃𝐍𝐘𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 👑

ज्यांनी सकल जगाला कारुण्य आणि शांततेचा मंगल संदेश दिला, त्यांच्याच जीवनप्रवासाचा असा आकस्मिक आणि हृदयद्रावक अंत व्हावा, हा काळाचा क्रूर दैवदुर्विलास आहे. हे जग खरोखरच अत्यंत अनपेक्षित आणि नश्वर आहे. निर्वाण पावलेल्या सर्व पूजनीय भिक्खूंच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो. 🙏🏼🕊️💔

1 week ago | [YT] | 3,099

👑 𝐃𝐍𝐘𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 👑

उपवर्गीकरणविरोधी विराट महामोर्चाच्या दिशेने रवाना होण्यापूर्वी इंदू मिल स्मारक प्रणेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब व युवा नेते ॲड. अमन आनंदराज आंबेडकर साहेब यांनी चैत्यभूमी येथे बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. 💙

2 weeks ago | [YT] | 3,718

👑 𝐃𝐍𝐘𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 👑

🛑 E20 इथेनॉल ब्लेंडिंग कथित घोटाळा: प्रकाश आंबेडकरांनी शेअर केलेला 'हा' खळबळजनक व्हिडिओ नक्की पहा!
🛑संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇https://youtu.be/AmPECZtV-cM?si=szSYn...

2 weeks ago | [YT] | 106

👑 𝐃𝐍𝐘𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 👑

🛑NCERT कडून संविधानाच्या मूळ संरचनेवर आघात आणि मनूस्मृतीचे उदात्तीकरण; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोठा आरोप!
🛑संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇
https://youtu.be/SRe15GHABL0?si=8Elgu...

2 weeks ago | [YT] | 336