श्री स्वामी समर्थ नमस्कार
ह्या चॅनल मार्फत आम्ही अप्रसिद्ध मंदिराच्या कथा आणि त्यांचा इतिहास आणि मंदिरात/मठात होणारे कार्यक्रम जसे कीर्तन, भारुड, प्रवचन, अनुभवकथन त्याचबरोबर दैविय उपासना, लक्ष्मी प्राप्तीचे तोडगे उपाय असे बरेच गोष्टींवरती व्हिडिओ बनवतो त्यामुळे आपण नक्कीच आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद
टीम देऊळगाथा
#TheeUntoldStoriesoftemples #swamisamarth #aaplapune #devasthanam #firstvlog #rayaru #mantralaya #akkalkot #TheeUntoldStorieswithsameer #TUSOT #Deoolgatha #देऊळ गाथा
Deool Gatha
नमस्कार, स्वामी भक्तांनो आणि आमच्या देऊळगाथा यू-ट्यूब परिवारातील सदस्य!
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य अण्णा महाराजांच्या कृपेने, आपल्या "खडकी केंद्राचा" भव्य शुभारंभ शनिवार, दिनांक ०६ जून २०२६ रोजी होत आहे.
कार्यक्रमाची माहिती:
📅 दिनांक: शनिवार, ०६ जून २०२६
🌟 शुभहस्ते: परमपूज्य गुरुवर्य “श्री दादा दामले”
📍 स्थळ: एम. एम. रेस्टॉरंट हॉल, औंध रोड, खडकी, पुणे - ४११०२०
📞 संपर्क: ९५१८७ ०९६९५ (कांचन हरिहर) / ८००७३ ६४०३८ (विद्या निमकर)
वेळापत्रक:
👉 सायं. ५:३० PM: महाआरती (दत्त पादुका मंदिर, खडकी)
👉 सायं. ६:०० PM: पालखी प्रस्थान
👉 सायं. ७:०० PM: दीप प्रज्वलन व पाद्यपूजन
👉 सायं. ७:४० PM: गुरुवर्य दादा दामले यांचे प्रबोधन
👉 सायं. ८:३० PM: महाप्रसाद
हा एक अत्यंत पवित्र आणि आनंदाचा क्षण आहे. आपल्या उपस्थितीने या सोहळ्याची शोभा वाढेल. कृपया वेळ काढून या मंगलमय कार्यक्रमात सहभागी व्हा.
केंद्राच्या स्थानासाठी QR कोड स्कॅन करा.
तरी या दिव्य सोहळ्याला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
आपले विनीत,समस्त सेवेकरी वर्ग,
खडकी केंद्र
#SwamiSamarth #Pune #DarshanSohala #ShreeSwamiSamarth #Spiritual #Marathi #PuneEvents #deoolgatha #samarthnaad #kirtansatva #viral #akkalkot #swami
6 days ago (edited) | [YT] | 57
View 7 replies
Deool Gatha
🚩 स्वामी महाराजांच्या दिव्य वस्तूंचा दर्शन सोहळा!🚩
अक्कलकोट निवासी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्य वापरातील व अंगावरील पवित्र दिव्य वस्तूंचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी पुणेकर भाविकांसाठी उपलब्ध झाली आहे!
स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी वंशज घराणे (इंदापूर - वडापुरी) येथील पिढ्यानपिढ्या जतन करून ठेवलेला हा ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा पुण्यात आणण्यात येणार आहे.
🔹 दर्शनासाठी ठेवण्यात येणाऱ्या दिव्य वस्तू:
स्वामी महाराजांच्या वापरातील दिव्य मणी, पादुका आणि कमलोतीतील रुद्राक्ष, नित्य पूजेतील दिव्य शिवलिंग आणि अन्नपूर्णा माता शंख, श्री गुरुचरित्र पोथी (स्वामी महाराजांच्या नित्य वाचनातील)...आणि इतर अनेक पवित्र वस्तू!
📅 सोहळ्याची वेळ आणि ठिकाण:
दिनांक: २८ मे २०२६ (वार: गुरुवार)
वेळ: संध्याकाळी ६ ते ९
स्थळ: श्री स्वामी समर्थ मंदिर, पुणे
प्रवेश: सर्व भक्तांसाठी विनामूल्य (Free)
संयोजक: श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ, ११२, नारायण पेठ, पुणे
अध्यक्ष: श्री दादा दामले
"स्वामी महाराजांच्या दिव्य वस्तूंचे दर्शन घ्या व स्वामी महाराजांचे कृपा-आशीर्वाद प्राप्त करून स्वामी कृपांकित व्हावे, ही नम्र विनंती.
" भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!"
#SwamiSamarth #Pune #DarshanSohala #ShreeSwamiSamarth #Spiritual #Marathi #PuneEvents #deoolgatha #samarthnaad #kirtansatva
1 week ago (edited) | [YT] | 145
View 2 replies
Deool Gatha
सर्व स्वामी भक्तांना आग्रहाचे निमंत्रण, पंढरपूर मधल्या स्वामी भक्तांनी चुकवूनये असा सोहळा
2 months ago | [YT] | 477
View 12 replies
Deool Gatha
|| श्री राम जय राम जय जय राम ||
4 months ago | [YT] | 140
View 4 replies
Deool Gatha
चैतन्यमयी वातावरणात गणपती बाप्पांची स्थापना झाली. बघता बघता दिड दिवस, थोड्या कालावधीच्या सेवेनंतर पाच दिवस, गौरी आवाहन पुजन गौरी गणपती सोबत, सात दिवस इ.अशा घरगुती गणपती गौरींचे विसर्जन पुर्ण झाले.
पुढे अनंत चतुर्दशी पर्यंत सर्व भक्तजन, नागरिक, बंधु भगिनी, मित्र मैत्रिणी आप्तेष्ट पाहुणे मंडळी, नातेवाईक यांनी असंख्य प्रमाणात मानाच्या गणपतींचे, जुन्या नामवंत मंडळांच्या पौराणिक, सामाजिक, सांस्कृतिक देखावे पाहण्याकरिता, उत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्याकरिता गर्दी केली.
टु व्हिलर, फोर व्हिलर घेऊन शहरांमधुन गजाननाच्या दर्शनास लाखोंच्या संख्येने लोक येत जात असताना, प्रत्यक्ष रस्त्यावर उभे राहुन उत्सव कालावधीत ठरवुन दिलेल्या नियमांचे पालन करित वातावरण कसं उत्तम राहिलं? शहर कसे स्वच्छ ठेवता येईल? आणि कुठलेही गालबोट लागणार नाही यासाठीची सर्व यंत्रणा सुव्यवस्थित चालविण्याचे अतिशय अवघड काम समस्त पोलिस, वाहतुक विभाग,पोलिस मित्र संघटना, मुल्य शिक्षणाचा वसा जोपासणारे शाळेतील एन.सी.सी. एम.सी.सी. चे विद्यार्थी विद्यार्थिनी काही सेवाभावी संस्था महापालिका कर्मचारी प्रशासन स्वच्छता विभाग,आप्तकालीन विभाग, अग्निशामक दल इ. लोकांनी पार पाडली. उत्सवातील शेवटचे चार दिवस तर अहोरात्र ते आपले काम अतिशय चोख बजावत होते. अहो यातील काही लोक तर आपले नोकरी व्यवसाय सांभाळून ही सेवा करतात.
या उत्सव कालावधीत अतिशय प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या समस्त सरकारी, निम-सरकारी, स्वयंसेवी संस्था, पोलिस दल, आरोग्य संस्था, सुरक्षा यंत्रणा आणि आपात्कालीन विभाग या संर्वांच मनःपुर्वक अभिनंदन आणि आभार!
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती इ. उत्सव यांची मुहुर्तमेढ रोवली घरातील देव रस्त्यावर आणले यांचा एकमेव हेतु म्हणजे समाज एकत्र येऊन चांगल्या विचारांचे आदानप्रदान होऊन काही तरी उत्तम कार्य त्यांच्या हातुन घडावं. दुष्ट विघातक प्रवृत्तींचा समुळ नाश होऊन सामाजिक ऐक्य सलोखा बंधुता ऐकता सदोदित रहावी असा होता हे विसरून चालणार नाही.
चौदा विद्या चौसष्ठ कलांचा अधिपती रिद्धी सिद्धी आणि बुद्धी या तिन्ही शक्ती ज्यांच्या बाजुस उभ्या राहुन ज्यांच्या सेवेत लीन आहेत अशा या प्रथम पूजक गजाननाला काल अनंत चतुर्दशीच्या परम पावन दिनी “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर” या भावपूर्ण स्वरात निरोप देताना एवढंच मागण मागूया,
“हे गणाधीशा या कलियुगात सत्याच्या न्यायाच्या बाजुने लढणाऱ्या सर्वांना प्रचंड बळ दे. दुष्ट शक्तींचा नाश करं. चांगलं तेचं आपलं या तत्वाशी नेहमी प्रामाणिक राहुन समाधानी राहण्याची बुद्धी तू समस्त मानवजातीला दे.”
मंगलमूर्ती मोरया 🙏🏻
8 months ago | [YT] | 874
View 23 replies
Deool Gatha
II श्री स्वामी समर्थ II
गेल्या १ महिन्यापासून आम्ही स्वामी समर्थांच्या कृपेने आणि सद्गुरू दादामहाराज दामले यांच्या आशीर्वादाने " प्रश्न तुमचे उत्तर सदगुरूंचे " हा प्रश्न उत्तरांचा सिरीज चालू केली आहे त्याचे ८ भाग सुद्धा झाले आणि बऱ्याच लोकांच्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा मिळाली तर आपल्याला हा आमचा प्रकल्प कसा वाटतो आणि हयात अजून काय बदल हवे आहेत का किंवा आपले काही प्रश्न असतील तर आम्हास नक्की कळवा
1 year ago | [YT] | 28
View 8 replies
Deool Gatha
श्री स्वामी समर्थ
काही दिवसांपूर्वी आम्ही एक live विडियो करून प्रश्नोत्तरे विचारण्याचा एक नवीन प्रयत्न केला होता त्याला फार उत्तम प्रतिसाद दिला आपण त्यासाठी मनापासून धन्यवाद त्यामुळे पुनः एकदा उद्या म्हणजेच दिनांक २२ /०४/२०२५ रोजी दुपारी ११.१५ वाजता आम्ही लाईव्ह येणार आहोत त्यामुळे परमपूज्य सद्गुरु श्री दादा महाराजांना काही प्रश्न विचारायचे होते तर आज ती संधी आहे आपल्याला साधनेबद्दल किंवा श्री स्वामी समर्थांच्या सेवे बद्दल किंवा नामस्मरणाबद्दल काही प्रश्न विचारायचे असल्यास आपण इथे आपले प्रश्न पोस्ट करू शकता (जर करण्याजोगे असतील तर) किंवा आम्हाला आमच्या व्हाट्सअप नंबर वरती आपण आपले प्रश्न खालील फॉरमॅट मध्ये पाठवा त्यातील काही प्रश्न घेण्याचे आम्ही प्रयत्न करू .
नाव-
आपण कुठून बोलताय -
प्रश्न-
नंबर खालील प्रमाणे (कृपया फक्त व्हाट्सअप वर मेसेज करावा)
+९१९८२३६५२४९८
1 year ago | [YT] | 517
View 18 replies
Deool Gatha
श्री स्वामी समर्थ नमस्कार
येत्या 18 तारखेला रामपर्व हा सोहळा आपल्या साताऱ्यामध्ये होणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाला भेट द्या
ह्या कार्यक्रमांमध्ये विविध संत महंतांच्या पादुका तर येणार आहेच त्याचबरोबर नागा साधू सुद्धा या कार्यक्रमाला आपली हजेरी लावणार आहे आणि या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे रामसेतू मधली शिळा ...एक वेगळीच देवी ऊर्जा नक्कीच या कार्यक्रमांमध्ये उत्पन्न होणार आहे आपण सर्वांनी या सनातन वैदिक धार्मिक कार्यक्रमाचा भाग होऊया.. ज्यांना ह्या कार्यक्रमांमध्ये किंवा कार्यक्रमासाठी काही दान करायचे आहे त्यांनी खाली दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून आपली जी काही मदत आहे ती आपण पाठवावी आपली अगदी छोट्यातली छोटी मदत सुद्धा या कार्यक्रमाचा खूप मोठा आधार बनू शकते त्यामुळे सढळ हस्ताने दान करा ...आणि सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे तरी सर्वांनी ह्या कार्यक्रमाला यावे
1 year ago | [YT] | 89
View 2 replies
Deool Gatha
श्री स्वामी समर्थ
नमस्कार, आम्हाला व्हाट्सअप वरती भरभरून प्रश्न आले आणि दादा महाराजांबरोबर बऱ्याच लोकांनी भेटण्याची इच्छा देखील दर्शवली आहे. वेळेच्या अभावामुळे सर्व प्रश्न घेता आले नाही परंतु आम्ही अजून काही भाग घेऊन येणार आहोत ज्यामध्ये उर्वरित प्रश्न त्याचबरोबर जे काही नवीन प्रश्न येतील त्या प्रश्नांचा समावेश सुद्धा येत्या भागांमध्ये करण्याचा प्रयत्न करू आपण दिलेल्या उदंड प्रतिसादासाठी धन्यवाद असेच आपण आम्हास भरभरून प्रेम देत राहा आणि अजूनही ज्यांच्या कडून चॅनल सबस्क्राईब करायचे राहून गेले असेल त्या सर्वानी नक्की सबस्क्राईब करा.
ज्यांना वेळेच्या अभावामुळे आम्ही केलेला " प्रश्न तुमचे उत्तर सद्गुरूंचे " हा भाग बघता आला नाही त्या सर्वांसाठी त्या भागाची लिंक खाली पोस्ट करत आहोत नक्की बघा आणि आपले जर काही प्रश्न असतील किंवा आपल्याला आमचा हा उपक्रम कसा वाटतो हे आपण खाली कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा.
1 year ago | [YT] | 9
View 0 replies
Deool Gatha
श्री स्वामी समर्थ
आम्हाला सांगायला फार आनंद होत आहे की दिनांक १३/०४/२०२५ रोजी दुपारी ११.१५ वाजता आम्ही लाईव्ह येणार आहोत. बरेच दिवस झाले व्हाट्सअप वरती आम्हाला मेसेज येत होते की परमपूज्य सद्गुरु श्री दादा महाराजांना काही प्रश्न विचारायचे होते तर आज ती संधी आहे आपल्याला साधनेबद्दल किंवा श्री स्वामी समर्थांच्या सेवे बद्दल किंवा नामस्मरणाबद्दल काही प्रश्न विचारायचे असल्यास आपण इथे आपले प्रश्न पोस्ट करू शकता (जर करण्याजोगे असतील तर) किंवा आम्हाला आमच्या व्हाट्सअप नंबर वरती आपण आपले प्रश्न खालील फॉरमॅट मध्ये पाठवा त्यातील काही प्रश्न घेण्याचे आम्ही प्रयत्न करू .
नाव-
आपण कुठून बोलताय -
प्रश्न-
नंबर खालील प्रमाणे (कृपया फक्त व्हाट्सअप वर मेसेज करावा)
+९१९८२३६५२४९८
1 year ago | [YT] | 758
View 22 replies
Load more