Vishals Podcast Clips

Welcome to Podcast with Vishal — your one-stop destination for deep, meaningful conversations on everything that matters in Maharashtra and beyond.

🎙️ From Maharashtra politics and Indian current affairs to inspiring stories of entrepreneurs, insights into business, the world of entertainment, and discussions on international geopolitics — we bring you thought-provoking podcasts with experts, leaders, and changemakers.

New episodes every week featuring politicians, journalists, business leaders, actors, and analysts.

🔔 Subscribe for real, unscripted conversations that help you understand the world better — from a Maharashtra-first lens, but with a global perspective.

📍 Hosted by Vishal — a voice for the curious, the critical, and the informed.


Vishals Podcast Clips

एखादा जिल्हा किती उपेक्षित असावा. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर ७८ वर्षांनी माझ्या बीड जिल्ह्याच्या मुख्यालयात रेल्वे पोहोचली. मुंडे साहेब, आज तुम्ही हवे होतात. तुमची सत्ता नव्हती, एक आमदार असताना तुम्ही जिल्ह्यात रेल्वे आणायचं स्वप्न पाहिलं. खासदार झाल्यानंतर तर रेल्वे मंत्रालयाचे उंबरे झिजवले. गोपीनाथ मुंडेंसारखा महाराष्ट्रातला एवढा मोठा नेता रेल्वे सचिवांची वाट पाहत बसायचा हे पाहून दिल्लीतले पत्रकारही कौतुक करायचे. ही तळमळ तुम्ही स्वतः भोगलेल्या यातनांमधून होती. ऊसतोड कामगार असलेल्या या जिल्ह्यातल्या गरिबांचे मुलं मुंबई पुण्याला ट्रेनने जाऊ शकले पाहिजेत हे तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत सांगत राहिलात. रेल्वे मंत्री राहिलेले लालू, नितीश कुमार यांच्यापासून ते ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक मुख्यमंत्र्याला दिलेले हजारो पाठपुराव्याचे पत्रही आज तुमच्या आठवणीत बंद लिफाफ्यात अश्रू ढाळत असतील. बीडच्या चारही बाजूने रेल्वे पोहोचलेली होती आणि तुमच्या जिल्ह्यात रेल्वे नाही हे सांगताना तुम्हाला किती वेदना व्हायच्या याच्या आठवणी तुमचे जुने सहकारी आजही भावनिक होऊन सांगतात. या एका रेल्वेसाठी तुम्ही जेवढे पत्र दिले, जेवढे उंबरे झिजवले ते कधी भविष्यात परत करायचं असेल तर आणखी एका गोपीनाथ मुंडे नावाच्या लोकनेत्यालाच जन्म घ्यावा लागेल. पुढच्या काही महिन्यात वीजेवर चालणारी रेल्वे सुरु झाली की बीडचा माणूस फक्त २०० रुपयांत मुंबईपर्यंत जाईल. बीडच्या स्टेशनला नाव काय द्यायचं याची चर्चा सुरुय. पण पुढच्या कित्येक पिढ्या बीडची रेल्वे म्हणजेच गोपीनाथ मुंडे हे अभिमानाने सांगत राहतील. जिल्हावासियांचं अभिनंदन

विशाल बडे

9 months ago | [YT] | 2