KyRao - कायराव

@Ky-rao में आपका स्वागत है – जहां मनोरंजन, शिक्षा और व्यक्तिगत कहानियां एक साथ मिलती हैं!

🎥 छत्रपती शिवाजी महाराज, इतिहास और व्लॉग्स की दुनिया में उतरिए!
एक अनोखे मिश्रण का आनंद लें, जहां मनोरंजन, शिक्षा और व्यक्तिगत व्लॉग्स या मेरी जिंदगी के व्यक्तिगत व्लॉग्स हों, इस चैनल पर हर किसी के लिए कुछ न कुछ है।

🌟 हम क्या प्रदान करते है

फिल्मों की जानकारी:

अपनी पसंदीदा फिल्मों के पर्दे के पीछे की कहानियां, छुपे हुए रहस्य और विश्लेषण जानें।

इतिहास की बातें: इतिहास के रोचक और अनसुने तथ्यों से रूबरू हों।

व्यक्तिगत व्लॉग्स: मेरे साथ जुड़ें और मेरी दैनिक जिंदगी, अनुभवों और रोमांचक यात्राओं को देखें।

🎬 क्यों सब्सक्राइब करें?

विविध सामग्री: मनोरंजन से लेकर शिक्षा तक

नियमित अपडेट: हर हफ्ते नए वीडियो के साथ बनाए रखें

👉 Subscribe : youtube.com/@Ky-rao
📸 इंस्टाग्राम: जल्द ही!
🌐 हमारी वेबसाइट: जल्द ही!

हमारे बढ़ते समुदाय में शामिल हों और मनोरंजन, शिक्षा और व्यक्तिगत कहानियों का अनोखा मिश्रण देखें।

🔔 बेल आइकन दबाना न भूलें!

#KyRao #southcontent #education #minivlog


KyRao - कायराव

​१४ मे १६५७ रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती! हा दिवस फक्त एका राजपुत्राच्या जन्माचा नाही, तर अवघ्या वयाच्या ९ व्या वर्षी आग्र्याच्या भर दरबारात औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून उभा राहिला? हे बाळकडू त्यांना पुरंदरच्या याच मातीत होतं.

​🔸शिवरायांचं धाडस आणि जिजाऊंची दूरदृष्टी यांचा असा काही संगम झाला, की वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांनी 'बुधभूषण' सारखा ग्रंथ लिहून आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली.

🔸​शत्रूला न उलगडलेलं कोडं म्हणजे औरंगजेबाला वाटलं होतं शिवरायांच्या जाण्यानंतर स्वराज्य संपेल, पण शंभूराजांनी सलग ९ वर्ष मुघलांच्या बलाढ्य सेनेला महाराष्ट्राच्या मातीत गाडून दाखवलं.

​हा दिवस केवळ एका राजाचा जन्मदिवस नाही, तर तो स्वाभिमान, निष्ठा आणि अदम्य साहसाचा उत्सव आहे.
​"शत्रूही नतमस्तक होई जिथे, असा तो शिवपुत्र होता!"

​अशा या महान पराक्रमी राजास त्रिवार मानाचा मुजरा!🚩

#SambhajiMaharaj #Swarajyarakshak #Dharmaveer #ChatrapatiSambhajiMaharaj #MaharashtraHistory #PurandarFort #Jayanti #MarathaEmpire #SambhajiMaharajJayanti

2 weeks ago | [YT] | 21

KyRao - कायराव

Q. सूर्यापासून सर्वात दूर असलेला ग्रह कोणता आहे?

Which planet is farthest from the Sun?

#sun #quiz #planets

2 weeks ago | [YT] | 3

KyRao - कायराव

१२ मे, १६६६: आग्रा दरबारात मराठ्यांच्या स्वाभिमानाची डरकाळी! 🚩

आजच्याच दिवशी, ३६० वर्षांपूर्वी आग्र्याच्या दिवाण-ए-आममध्ये इतिहासाने एक असा प्रसंग पाहिला ज्याने मुघल सत्तेचा पाया हादरवून सोडला. छत्रपती शिवाजी महाराज केवळ एका भेटीसाठी गेले नव्हते, तर त्यांनी जगाला दाखवून दिले की 'स्वराज्य' कधीही कोणासमोर झुकणार नाही!

१२ मे ही तारीख केवळ एक ऐतिहासिक घटना नाही, तर ती आपल्याला 'स्वाभिमान' शिकवते. शत्रू कितीही शक्तिशाली असला, तरी स्वतःच्या तत्त्वांशी आणि सन्मानाशी कधीही तडजोड करायची नाही, हाच वारसा महाराजांनी आपल्याला दिला आहे.


🔸स्वराज्याच्या राजाला मुद्दाम मागे, म्हणजे ५००० व्या श्रेणीच्या (पाच हजारी) मनसबदारांच्या रांगेत उभे करण्यात आले. हे शिवरायांच्या अपमानाचे षडयंत्र होते.

🔸महाराजांनी हा अन्याय निमूटपणे सहन केला नाही. भर दरबारात औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून आपला संताप व्यक्त केला आणि "ज्यांचे आम्ही पाठ राखून आहोत, त्यांना आमच्या पुढे उभे केले?" असा सवाल करत ते तडक बाहेर पडले.

🔸याच घटनेनंतर महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आले, जिथून त्यांनी जगातील सर्वात धाडसी 'पेटारा सुटका' करून स्वराज्याकडे कूच केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंग्याचा अहंकार मोडीत काढत, त्याला त्याच्याच दरबारात लायकी दाखवली आणि तिथून तडक बाहेर पडले.

जर तुम्ही महाराजांच्या या स्वाभिमानी इतिहासाचा अभिमान बाळगता, तर comment मध्ये 'जय शिवराय' लिहायला विसरू नका! 🚩

​जय भवानी, जय शिवाजी! 🚩💯

#ShivajiMaharaj #AgraHistory #MarathaPride #Swarajya #HistoryOfMaharashtra #MarathiAsmita #Shivray #OnThisDay #kayrao #kyrao

2 weeks ago | [YT] | 17

KyRao - कायराव

१० मे — "मातृदिन"❤️ हे वाचताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल… कारण ही पोस्ट तुमच्या आईबद्दल आहे…

━━━━━━━━━━━━━━━

लोक म्हणतात —

"देव मागितल्यावर देतो…"

पण आई...?
ती तर आपण न मागताही
स्वतःचं आयुष्य आपल्यावर खर्च करून टाकते… ❤️

आणि विशेष म्हणजे —
ती कधीच त्या प्रेमाची "पावती" मागत नाही! 🙏🏽

━━━━━━━━━━━━━━━

🚩 साडेतीनशे वर्षांपूर्वी…

राजमाता जिजाऊ साहेबांनी
शिवबांना फक्त वाढवलं नाही;

तर स्वतःच्या सुखाचा त्याग करून,
एका मुलाला "रयतेचा राजा" बनवलं.

त्या काळात त्यांनी तलवार पाहिली…
आजची आई EMI पाहते.

त्या काळात त्यांनी स्वराज्यासाठी संघर्ष केला…
आजची आई आपल्या मुलांच्या भविष्याकरिता
स्वतःची स्वप्नं गाडते.

━━━━━━━━━━━━━━━

फरक फक्त इतकाच आहे —

जिजाऊंचा इतिहास पुस्तकांत लिहिला गेला…

पण आपल्या आईचा इतिहास फक्त —

• स्वयंपाकघराच्या धुरात,
• रात्रीच्या जागरणात,
• आणि आपल्या यशाच्या मागे लपलेला असतो…! ❤️

━━━━━━━━━━━━━━━

जेव्हा आपण हरतो,
तेव्हा जग हसतं…

पण आई मात्र
जिजाऊंसारख्या नजरेने म्हणते —

"उठ… अजून लढायचं बाकी आहे!"

━━━━━━━━━━━━━━━

आज १० मे आहे…
पण खरा मातृदिन त्या दिवशी असतो —

ज्या दिवशी तुमच्या यशामुळे
आईच्या डोळ्यांत
पाणी आणि अभिमान
एकत्र दिसतो…! ✨

━━━━━━━━━━━━━━━

आज फक्त फोटो पोस्ट करू नका…

तिच्यासाठी असं एखादं काम करा,
जे ती आयुष्यभर तुमच्याकडून अपेक्षित करत होती…

कदाचित तीच तिच्यासाठी सर्वात मोठी भेट असेल. ❤️

━━━━━━━━━━━━━━━

ही पोस्ट इथेपर्यंत वाचली असेल तर…

Comment मध्ये तुमच्या आईने तुम्हाला लहानपणी कोणत्या नावाने हाक मारायची ते लिहा… ❤️


#मातृदिन #आई #जिजाऊ #शिवाजीमहाराज #kyrao
#MarathiPride #Aai #Motherhood
#RealHero #Jijau #MothersDay #मराठी

3 weeks ago (edited) | [YT] | 14

KyRao - कायराव

Q. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कुठे केला?

Where did Shivaji Maharaj defeat Afzal Khan?

#shivajimaharaj #afzalkhan #history

3 weeks ago | [YT] | 5

KyRao - कायराव

Q. भारतातील पहिले राज्य-नेतृत्वाखालील अंतराळ तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्र कोणत्या राज्याने सुरू केले?

India’s first state-led Space Technology CoE was launched by which state?

#quiz #currentaffairs #spacetechnology

3 weeks ago | [YT] | 5

KyRao - कायराव

हे पाहून जाणवतं की महाराजांचे विचार किती उच्च होते!

🔸महाराज साहेब, आपल्याला जिवे मारण्याचा विडा घेऊन आलेल्या खानाला मारून त्याची कबर बांधलीत. तो आपला शत्रू होता.

🔸शंभूबाळ, आमचं वैर होतं ते त्याच्या कर्मांवर. कर्म करणाऱ्यांशी नाही. आणि त्याच्या मृत्यूनंतर ते शत्रुत्वही संपलं शंभूराजे.

🔸पण आबासाहेब, तसे शत्रू तर मानत नाहीत ना. आपल्या गुजर काकांचा देहही त्यांनी आपल्या ताब्यात दिला नाही. मग ते लोक आपल्या लोकांच्या देहाचे लचके तोडायला कुत्र्यासमोर काढी आलेल्या माणसांना टाकतात, त्यांचं काय?

“शंभूबाळ, मोंगलांत आणि आपल्यात तोच तर फरक आहे ना.”

हा विचार आवडला असेल तर Like करा ❤💯🚩

#छत्रपतीशिवाजीराजे #शंभूराजे #मराठीइतिहास #मराठा #HistoryMarathi #ShivajiMaharaj #Motivation #MarathiQuotes #ProudMarathi #kyrao

3 weeks ago | [YT] | 12

KyRao - कायराव

खरं सांगू तर, आज मी जो काही आहे तो फक्त तुमच्यामुळेच! जेव्हा मी चॅनेल सुरू केलं होतं, तेव्हा वाटलं नव्हतं की इतकं प्रेम मिळेल. आज आपण १४.३K झालोय, हे बघून खूप आनंद होतोय.

​खूप वेळा असं वाटतं की आता बस करावं, पण तुमच्या कमेंट्स आणि सपोर्ट बघून पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळते. तुम्ही मला नेहमी साथ दिली, माझं चॅनेल मोठं केलं, त्याबद्दल मनापासून आभार! ❤️

​छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विचार मला नेहमी लढण्याची शक्ती देतो:

​"धैर्य असेल तरच विजय मिळवता येतो आणि ध्येय समोर असेल तर मार्ग नक्की सापडतो." 🚩

​तुम्ही आहात म्हणून मी आहे. अशीच साथ कायम ठेवा!

सातासमुद्रापार झेंडा फडकवायचा असेल तर तुमच्यासारख्या मावळ्यांची साथ हवीच! 🚩🔥

​जय शिवराय! 🚩

#newpost #thankyou #subscribers #kyrao #kayrao

4 weeks ago (edited) | [YT] | 7

KyRao - कायराव

आज १ मे. आजच्या दिवशी आपण दोन गोष्टींचा सन्मान करतो.​आपला सांस्कृतिक वारसा (महाराष्ट्र दिन) आणि आपली निष्ठा (कामगार दिन).

🔸१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची अधिकृतपणे निर्मिती झाली, म्हणून हा दिवस 'महाराष्ट्र दिन' म्हणून साजरा केला जातो.

​आजचा दिवस केवळ उत्सवाचा नाही, तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास आणि इथल्या मातीचा स्वाभिमान पुन्हा एकदा स्मरण्याचा आहे.

सह्याद्रीच्या कडांमधून घुमणारा 'जय महाराष्ट्र'चा नारा केवळ शब्द नसून ती आमची ओळख आहे.

​महाराष्ट्राच्या ऐतिहासिक प्रवासातील महत्त्वाचे टप्पे:

🔸​१९५६: संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना.
🔸​१९६०: मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत इथल्या कष्टकरी हातांचा आणि बुद्धिमत्तेचा मोठा वाटा आहे.

​चला, आजच्या दिवशी संकल्प करूया - आपल्या कामातून महाराष्ट्राचे नाव अधिक उंचावण्याचा!

​तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमचं महाराष्ट्रातील आवडतं ऐतिहासिक ठिकाण कोणतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. 💯❤

#MaharashtraDay #महाराष्ट्रदिन #JaiMaharashtra #History #MaharashtraDiwas #kamgardivas #jaishivray

4 weeks ago | [YT] | 22