यवतमाळ विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपस्थित राहून त्यांना विजयाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
आज पोहरादेवी येथील बणजारा विरासत संग्रहालयाला लोकमत समूहाचे अध्यक्ष डॉ. विजयजी दर्डा यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी १३५ फूट उंच सेवा ध्वज व संत श्री सेवालाल महाराज यांच्या भव्य पुतळ्यास अभिवादन करून संग्रहालयातील विविध दालनांची पाहणी केली. बंजारा समाजाचा इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि गौरवशाली परंपरेची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली.
आज शासकीय निवासस्थान ‘शिवनेरी’ येथे पोहरादेवी गडाचे महंत पूज्य जितेंद्र महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत नांदेड जिल्ह्यातील किनवट जिल्हा परिषदचे माजी सदस्य विशाल जाधव तसेच त्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
आज पुर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित “जलक्रांती परिषद २०२६” या कार्यक्रमास उपस्थित राहून राज्य शासनाच्या “शाश्वत जलव्यवस्थापन” संकल्पनेअंतर्गत मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी जलयुक्त शिवार, शेततळे, नाला खोलीकरण, बंधारे, वृक्षलागवड आणि जल पुनर्भरण यांसारख्या उपक्रमांद्वारे राज्यात प्रभावी जलसंवर्धनाची कामे सुरू असल्याचे सांगितले. तसेच “प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – पाणलोट विकास घटक २.०” अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांसाठी पाण्याची उपलब्धता वाढत असल्याचेही नमूद केले.
पाणी फाऊंडेशन, नाम फाऊंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, जैन फाऊंडेशन तसेच विविध सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे राज्यातील जलक्रांती अधिक बळकट होत असल्याचे यावेळी अधोरेखित केले.
या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी, अभिनेते तथा नाम फाऊंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, सचिव मकरंद अनासपुरे, राज्यमंत्री आशीष जयस्वाल, राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार सौ. मायाताई इवनाते, महापौर सौ. नीता ठाकरे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख तसेच गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, आमदार, जलतज्ञ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबईतील एसएसपी स्टेडियम, वरळी येथे आयोजित युवासेना महायुवोत्सव २०२६ या प्रेरणादायी सोहळ्यास उपस्थित राहिलो.
या भव्य कार्यक्रमातून युवकांमध्ये नवचैतन्य, नेतृत्वगुण आणि संघटनात्मक बळ निर्माण करण्याचा अत्यंत सकारात्मक संदेश देण्यात आला.
राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा “शिवगौरव पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमासाठी आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि सहभागी सर्व युवकांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मुंबई येथे आज राज्याचे उद्योगमंत्री मा. उदय सामंत यांच्या उपस्थितीत यवतमाळ जिल्ह्यातील औद्योगिक विकासासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत पांढरकवढा व नेर तालुक्यातील मौजे वटफळी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मार्फत उभारण्यात येणाऱ्या नवीन औद्योगिक वसाहतीसाठी जमीन संपादनाच्या प्रक्रियेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रस्तावित औद्योगिक वसाहतीचे काम लवकरच सुरू होणार असून, यामुळे यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे. तसेच, जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला यामुळे गती मिळणार आहे.
या बैठकीला उद्योग विभागाचे प्रधान सचिव, MIDC चे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच यवतमाळचे जिल्हाधिकारी (व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे) आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
आज मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील किल्लोद (पाटाखाली) येथील श्री हरिहर चैतन्य सेवाधाम, चैतन्य नगर येथे आयोजित “श्रीराम कथा”, “श्री हरिहर महायज्ञ” व आश्रम लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहून रामकथेचा पवित्र अनुभव घेतला.
या प्रसंगी आश्रमाचे विधिवत लोकार्पण करण्यात आले. तसेच महादेवांचे दर्शन घेऊन भाविकांशी संवाद साधला.
संत श्री आनंद चैतन्य जी महाराज यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्रीराम कथेमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. यावेळी महंत महाराज, मांधाता विधानसभेचे आमदार तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देत, सुख-दुःखात खंबीरपणे उभी राहणारी माझी जीवनसाथी सौ. शितल राठोड यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुमचं आयुष्य आनंद, आरोग्य आणि यशाने सदैव उजळून निघो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आज जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथील महसूल भवन येथे जिल्ह्यातील पांदन रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.
ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुलभ व्हावे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सहज पोहोचता यावे, यासाठी पांदन रस्त्यांची कामे जलद गतीने व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आ. बाळासाहेब मांगुळकर, आ. राजू तोडसाम, आमदार संजय देरकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Sanjay Rathod
यवतमाळ विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी उपस्थित राहून त्यांना विजयाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
#vidhanparishadelection #yavatmal #mahayuti
11 hours ago | [YT] | 53
View 0 replies
Sanjay Rathod
आज पोहरादेवी येथील बणजारा विरासत संग्रहालयाला लोकमत समूहाचे अध्यक्ष डॉ. विजयजी दर्डा यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी १३५ फूट उंच सेवा ध्वज व संत श्री सेवालाल महाराज यांच्या भव्य पुतळ्यास अभिवादन करून संग्रहालयातील विविध दालनांची पाहणी केली. बंजारा समाजाचा इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि गौरवशाली परंपरेची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली.
#banjarasamaj #poharadevi #sevalalmaharaj #nangaramuseum #gorbanjara
2 days ago | [YT] | 179
View 0 replies
Sanjay Rathod
आज शासकीय निवासस्थान ‘शिवनेरी’ येथे पोहरादेवी गडाचे महंत पूज्य जितेंद्र महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत नांदेड जिल्ह्यातील किनवट जिल्हा परिषदचे माजी सदस्य विशाल जाधव तसेच त्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
1 week ago | [YT] | 137
View 0 replies
Sanjay Rathod
आज पुर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित “जलक्रांती परिषद २०२६” या कार्यक्रमास उपस्थित राहून राज्य शासनाच्या “शाश्वत जलव्यवस्थापन” संकल्पनेअंतर्गत मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी जलयुक्त शिवार, शेततळे, नाला खोलीकरण, बंधारे, वृक्षलागवड आणि जल पुनर्भरण यांसारख्या उपक्रमांद्वारे राज्यात प्रभावी जलसंवर्धनाची कामे सुरू असल्याचे सांगितले. तसेच “प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – पाणलोट विकास घटक २.०” अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांसाठी पाण्याची उपलब्धता वाढत असल्याचेही नमूद केले.
पाणी फाऊंडेशन, नाम फाऊंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, जैन फाऊंडेशन तसेच विविध सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे राज्यातील जलक्रांती अधिक बळकट होत असल्याचे यावेळी अधोरेखित केले.
या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी, अभिनेते तथा नाम फाऊंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, सचिव मकरंद अनासपुरे, राज्यमंत्री आशीष जयस्वाल, राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार सौ. मायाताई इवनाते, महापौर सौ. नीता ठाकरे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख तसेच गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, आमदार, जलतज्ञ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📍 नागपूर | स्व. वसंतराव देशपांडे सभागृह
#jalkranti #जलक्रांती_परिषद #waterconservation #nagpur
2 weeks ago | [YT] | 130
View 1 reply
Sanjay Rathod
मुंबईतील एसएसपी स्टेडियम, वरळी येथे आयोजित युवासेना महायुवोत्सव २०२६ या प्रेरणादायी सोहळ्यास उपस्थित राहिलो.
या भव्य कार्यक्रमातून युवकांमध्ये नवचैतन्य, नेतृत्वगुण आणि संघटनात्मक बळ निर्माण करण्याचा अत्यंत सकारात्मक संदेश देण्यात आला.
राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा “शिवगौरव पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमासाठी आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि सहभागी सर्व युवकांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
#shivsena #yuvasena #शिवसेना #युवासेना
1 month ago | [YT] | 128
View 2 replies
Sanjay Rathod
श्री. प्रभाकरराव भबुतकर (रा. माळीपुरा, नेर ता. नेर) यांची कन्या चि. सौ. कां. धनश्री/ पल्लवी हिच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहिलो.
नवदांपत्यास सुख, समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण अशा भावी वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
1 month ago | [YT] | 178
View 0 replies
Sanjay Rathod
मुंबई येथे आज राज्याचे उद्योगमंत्री मा. उदय सामंत यांच्या उपस्थितीत यवतमाळ जिल्ह्यातील औद्योगिक विकासासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत पांढरकवढा व नेर तालुक्यातील मौजे वटफळी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मार्फत उभारण्यात येणाऱ्या नवीन औद्योगिक वसाहतीसाठी जमीन संपादनाच्या प्रक्रियेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रस्तावित औद्योगिक वसाहतीचे काम लवकरच सुरू होणार असून, यामुळे यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे. तसेच, जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला यामुळे गती मिळणार आहे.
या बैठकीला उद्योग विभागाचे प्रधान सचिव, MIDC चे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच यवतमाळचे जिल्हाधिकारी (व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे) आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
#yavatmal #midc #maharashtradevelopment #employment #guardianminister
1 month ago | [YT] | 123
View 2 replies
Sanjay Rathod
आज मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील किल्लोद (पाटाखाली) येथील श्री हरिहर चैतन्य सेवाधाम, चैतन्य नगर येथे आयोजित “श्रीराम कथा”, “श्री हरिहर महायज्ञ” व आश्रम लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहून रामकथेचा पवित्र अनुभव घेतला.
या प्रसंगी आश्रमाचे विधिवत लोकार्पण करण्यात आले. तसेच महादेवांचे दर्शन घेऊन भाविकांशी संवाद साधला.
संत श्री आनंद चैतन्य जी महाराज यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्रीराम कथेमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
यावेळी महंत महाराज, मांधाता विधानसभेचे आमदार तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
#श्रीरामकथा #shriramkatha #jayshriram #harharmahadev
1 month ago | [YT] | 141
View 0 replies
Sanjay Rathod
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देत, सुख-दुःखात खंबीरपणे उभी राहणारी माझी जीवनसाथी सौ. शितल राठोड
यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तुमचं आयुष्य आनंद, आरोग्य आणि यशाने सदैव उजळून निघो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
1 month ago | [YT] | 261
View 6 replies
Sanjay Rathod
आज जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथील महसूल भवन येथे जिल्ह्यातील पांदन रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.
ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुलभ व्हावे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सहज पोहोचता यावे, यासाठी पांदन रस्त्यांची कामे जलद गतीने व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आ. बाळासाहेब मांगुळकर, आ. राजू तोडसाम, आमदार संजय देरकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
#yavatmaldevelopment #maharashtradevelopment #maharashtra #guardianminister #yavatmal
2 months ago | [YT] | 154
View 0 replies
Load more