Welcome to Lokrajya TV News, your trusted source for the latest updates from Chandrapur, Maharashtra. We bring you comprehensive coverage of social, political, crime, government, and current news that matters most to our community. Stay informed with accurate, timely, and unbiased reporting on events shaping Chandrapur and beyond. Subscribe to Lokrajya TV News for daily updates and in-depth analysis.

Chandrapur news, Maharashtra news, Lokrajya TV News, social news Chandrapur, political news Maharashtra, crime news Chandrapur, government updates, current news Chandrapur, local news Maharashtra, Chandrapur latest updates.

#LokrajyaTVNews #ChandrapurNews #MaharashtraNews #SocialNews #PoliticalNews #CrimeNews #GovernmentUpdates #CurrentNews #LocalNews #ChandrapurUpdates #MaharashtraCurrentAffairs #NewsChannel #LokrajyaTV


Lokrajya TV News

5 months ago | [YT] | 13

Lokrajya TV News

नगरपरिषद, नगरपंचायतीचं बिगुल वाजलं - 2025

8 months ago | [YT] | 3

Lokrajya TV News

आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व्यक्ती / संस्थेकडून अर्ज आमंत्रित

Ø अंतिम दिनांक 4 जुलै 2025 पर्यंत

चंद्रपूर, दि. 26 : आदिवासी कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देणे व त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभागामार्फत ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार’ व ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण संस्था पुरस्कार’ देण्यात येणार आहे. चंद्रपूर प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील चंद्रपुर, बल्लारपुर, राजुरा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, मुल, सावली, सिंदेवाही, पोंभुर्णा या तालुक्यातील आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती तसेच सामाजिक संस्था यांच्याकडून 2023-24 व 2024-25 या वर्षाकरिता प्रस्ताव आमंत्रित आहेत.

सदर प्रस्ताव 4 जुलै 2025 पर्यंत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपुर येथे स्विकारण्यात येतील. विनामुल्य प्रस्तावाचा नमुना व आवश्यक सर्व माहितीसाठी कृपया प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.

1 year ago | [YT] | 1

Lokrajya TV News

तृतीयपंथीयांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास शासन कटिबद्ध : अतिरिक्त जिल्हाधिकारी व्यवहारे

सामाजिक न्याय दिन व तृतीयपंथीय कार्यशाळा

चंद्रपूर, दि. 27 : तृतीयपंथीय हे समाजाचा अविभाज्य घटक असून काही गैरसमजुती पोटी आपण त्यांना आपल्यापासून दूर केले आहे. याचा परिणाम म्हणून त्यांना संघर्षांला सामोरे जावे लागत आहे. मात्र यापूढे ते आपला समाज घटक आहेत, आपले बांधव आहेत, असे समजुन आपण सर्वांनी त्यांच्यासोबत चांगला व्यवहार करावा व शासनाच्या विविध योजना त्यांच्या पर्यंत पोहोचवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी नितिन व्यवहारे यांनी केले.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा जात पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेव आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, समतादुत प्रकल्प व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामाजिक न्याय व तृतीयपंथीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, जिल्हा क्रीडा अधिकारी नंदु आवारे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादुरकर, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, सहायक आयुक्त विनोद मोहतुरे आदी उपस्थित होते.

यावेळी शासकीय निवासी शाळा व वसतीगृहात राहून 85 ते 100 टक्के गुण प्राप्त 12 विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच संबोधन ट्रस्टचे राज काचोळे व प्रशिक मेश्राम यांना व कार्यक्रमाला उपस्थित सर्व तृतीयपंथीय लाभार्थ्यांना साडीचोळी देवून सन्मानित करण्यात आले.

1 year ago | [YT] | 1

Lokrajya TV News

अल्पवयीन मुलीच्या हत्येसंदर्भात प्रशासनाने गांभीर्याने तपास करावा
 अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचे आदेश
 चोरा (ता. भद्रावती) येथील मृतक मुलीच्या घरी भेट
चंद्रपूर, दि. 27 : भद्रावती तालुक्यातील चोरा येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू हा अतिशय दुर्दैवी असून संशयास्पद सुद्धा आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मृतक मुलीच्या आई-वडीलांकडून तसेच संबंधित यंत्रणांकडून घेतली आहे. मृतक मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अतिशय गांभीर्याने या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करावा, असे निर्देश अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲङ धर्मपाल मेश्राम यांनी दिले.
विश्रामगृह येथे आयोजित अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पुढे ॲङ मेश्राम म्हणाले, 20 मार्च 2025 रोजी चोरा येथील अश्विनी आसुटकर या अल्पवयीन मुलीची हत्या की आत्महत्या, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आरोपी हा 22 वर्षाचा असून त्या मुलाने तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दुर्दैव म्हणजे याच गावात पोक्सोची दुसरी घटना घडल्याचेसुध्दा निदर्शनास आले आहे. जिल्हा प्रशासनाने अशा घटनांना तात्काळ आळा घालावा. जिल्हा प्रशासन, पोलिस विभागासह सामाजिक न्याय विभाग, महिला व बालकल्याण विभाग या विभागाने सुद्धा अशा घटकांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
आयोग म्हणून या घटनेत दिरंगाई झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते. ज्या डॉक्टरांच्या टीमने मृतक मुलीचे पोस्टमार्टम केले आहे, त्या डॉक्टरांना सुद्धा तात्काळ प्रभावाने सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच वरोराच्या उपविभागीय पोलिस अधिकारी नियोमी साटम यांनी या प्रकरणात विशेष लक्ष देऊन चांगल्या पद्धतीने तपास करावा. मृतक मुलीच्या आई-वडिलांची शंका नऊ जणांवर असून या सर्व नऊ जणांचे फोनचे चाट, सीडीआर, सोशल मीडिया आदींची तपासणी करावी.
अशा प्रकरणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कडून 3 लक्ष ते 10 लक्ष रुपये मदतीची तरतूद आहे. ही तरतूद संबंधित कुटुंबाला मिळवून देण्यासाठी विभागाने प्रयत्न करावे. जिल्ह्यात एकूण पोक्सोच्या घटना किती, ॲट्रॉसिटीच्या घटना किती, याचा सविस्तर अहवाल तात्काळ सादर करावा. तसेच या संपूर्ण प्रकरणाबद्दल प्रशासनाने 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देशही ॲङ धर्मपाल मेश्राम यांनी दिले
चोरा येथे मृतक मुलीच्या घरी भेट : अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲङ धर्मपाल मेश्राम यांनी भद्रावती तालुक्यातील चोरा येथे मृतक मुलीच्या घरी भेट दिली. तसेच आई-वडिलांसोबत व आजी सोबत चर्चा करून संपूर्ण प्रकरण जाणून घेतले.
यावेळी वरोराचे उपविभागीय पोलिस अधिकारी नियोमी साटम, वरोराचे उपविभागीय अधिकारी अतुल जटाळे, सहायक आयुक्त समाजकल्याण विनोद मोहतुरे, तहसीलदार श्री. भांडारकर, पोलिस निरीक्षक श्री. पारधी, आयोगाचे कायदेशीर सल्लागार ॲङ राहुल झामरे आदी उपस्थित होते

1 year ago | [YT] | 1

Lokrajya TV News

सर्वांचे मनापासून आभार

1 year ago | [YT] | 4