Audio-Visual content from indiejournal.in
We report about things that matter. The subcontinent explored, for the world to see.



Indie Journal

#Shivsena​ #UddhavThackeray​ #LIVE​
विरोधी पक्ष एकामागून एक फोडले जात असताना या प्रकारची जवाबदारी फक्त या नेत्यांची, की सत्तेच्या उन्मादाची?

6 days ago | [YT] | 3

Indie Journal

वाचा इथं: indiejournal.in/article/media-line-hemant-desai-mo…
सर्वाधिक काळ सलग निवडून आलेले पंतप्रधान म्हणून विक्रम केल्यानंतर, नरेंद्र मोदी यांनी तत्परतेने काँग्रेसवर हल्लाबोल केला. नेहरू आणि त्यांच्या मंत्रिमंडळात जगातील सर्वोत्तम नेत्यांचा समावेश होता, ज्याची तुलना मोदी सरकारशी होऊ शकत नाही, अशी राष्ट्र टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतंत्र भारताची जडणघडण आणि उभारणी करण्याचे ऐतिहासिक कार्य नेहरूंनी केले.
लिहीत आहेत हेमंत देसाई
#JawaharlalNehru #NarendraModi

1 week ago | [YT] | 61

Indie Journal

Happy Birthday To Us!
The People's News Place Turns 8!
जनवादी पत्रकारिता झाली ८ वर्षांची!

2 weeks ago | [YT] | 54

Indie Journal

वाचा इथं: indiejournal.in/article/hemant-desai-media-line-en…
आम्ही दुसरीकडे झाडांचे पुनरोपण करत आहोत, असा युक्तिवाद नेहमी केला जातो. परंतु त्या त्या ठिकाणचे हिरवे आच्छादन नाहीसे झाल्यामुळे तेथील स्थानिक लोकांना झळ पोहोचत असतेच. शिवाय या झाडांची निगा राखली जात नाही. असो. मुंबई शहर आणि उपनगरांत गेल्या काही दिवसांपासून ३५ ते ३८ अंश इतके तापमान राहिले आहे.

लिहीत आहेत हेमंत देसाई
#EnvironmentDay #Mumbai #Temperature

2 weeks ago | [YT] | 36

Indie Journal

वाचा इथं: www.indiejournal.in/article/pankaj-sekhsaria-great…
एप्रिल २०२३ मध्ये एनजीटीचा अंतिम आदेश त्यांनी स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीच्या शिफारशींवर आधारित होता. प्रकल्पात गुंतवणूक करणारे किंवा प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी देण्यात सहभागी असलेले प्रतिनिधी या समितीत होते. ज्या संस्थांनी दिलेल्या निर्णयांना आव्हान देण्यात आले आहे, त्याच संस्थांच्या प्रतिनिधींना त्या आव्हानांबाबत निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या समितीत घेणे, यामध्ये सर्वांचे गुंतलेले हितसंबंध दिसून येतात.

लेखक: पंकज सेखसरीया, अनुवाद: रेश्मा जठार
#GreatNicobarCrisis #GalatheaBay #NGT

3 weeks ago | [YT] | 29

Indie Journal

वाचा इथं: indiejournal.in/article/hemant-desai-media-line-pm…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसरीचे आवाहन करून अनेक देशांचा विदेश दौरा केला. त्यानंतर या दौऱ्याचे भारताला कसे कसे फायदे होणार आहेत याचा प्रचार भाजपवाल्यांनी तात्काळ सुरू केला. वास्तविक केंद्र, सरकारच्या स्तरावर तसेच सार्वजनिक उपक्रमांच्या माध्यमातून वेगवेगळ्या परिषदा मेळावे, बैठका घेतल्या जातात त्यासाठी जो प्रचंड खर्च केला जातो, तो तसाच चालू आहे.


लिहीत आहेत हेमंत देसाई

#NarendraModi #IranWar

3 weeks ago | [YT] | 56

Indie Journal

वाचा इथं: indiejournal.in/article/t-mohan-great-nicobar-shom…
शोम्पेन आणि निकोबारी या आदिम जमाती आहेत. संविधान ग्रेट निकोबार बेटासाठी केवळ या दोनच जमातींना अनुसूचित जमाती (एसटी) हा दर्जा देते. त्यामुळे, बाहेरून येऊन इथे वसलेली व्यक्ती झारखंड किंवा बिहारमध्ये एसटी दर्जा असलेल्या समुदायातील असली तरी, निकोबारमध्ये अशा व्यक्तीला एसटी दर्जा नाही. म्हणूनच, प्रस्तावित वन जमिनी वनेतर वापरासाठी वळवण्याची संमती देण्याचा अधिकार केवळ निकोबारी आणि शोम्पेन यांनाच आहे.


लेखक: टी. मोहन, अनुवाद: रेश्मा जठार

#GreatNicobar #Shompen #Nicobarese

1 month ago | [YT] | 63

Indie Journal

वाचा इथं: indiejournal.in/article/hemant-desai-media-line-su…
भाजपला सातत्याने राजकीय यश मिळत असल्यामुळे आपली आर्थिक धोरणेदेखील बरोबर आहेत, असा मोदी सरकारचा गैरसमज झाला आहे. मात्र सलग सातव्या वर्षी भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत घरंगळत आहे. २०२५ मध्ये आशियातील सर्वात वाईट कामगिरी नोंदवणारे चलन म्हणजे भारतीय रुपया होते.

लिहीत आहेत हेमंत देसाई

#Rupee #SurjitBhalla #NarendraModi

1 month ago | [YT] | 59

Indie Journal

वाचा इथं: indiejournal.in/article/pankaj-sekhsaria-great-nic…
गलाथिया बे परिसराची १९९७ मध्ये वन्यजीव अभयारण्य म्हणून सरकारने घोषणा केली होती. परंतु इथे बंदर बांधकामाचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी २०२१ मध्ये ती अधिसूचना रद्द करण्यात आली. २०२१ च्या राष्ट्रीय सागरी कासवे कृती आराखड्यात समुद्री कासवे अंडी घालण्यासाठी येतात अशा सर्वात महत्त्वाच्या स्थळांपैकी देशातील एक म्हणून गलाथिया बेची नोंद केली आहे.

मूळ लेख: पंकज सेखसरिया
अनुवाद: रेश्मा जठार
#GreatNicobar #GalatheaBay #Turtles

1 month ago | [YT] | 65

Indie Journal

वाचा इथं: indiejournal.in/article/hemant-desai-media-line-pe…
शुक्रवारी पेट्रोलचे दर लिटरला तीन रुपये आणि डिझेलचे लिटरला ३ रुपये ११ पैशांनी वाढवण्यात आले आहेत. सीएनजी त्याचप्रमाणे व्यावसायिक गॅसच्या दरांत यापूर्वीच वाढ करण्यात आली आहे. आता महागाईचा अक्षरशः कहर होणार असून, त्यामुळे टीकेबाबत कोणतीही काटकसर न करता, सामान्य जनता सरकारला फैलावर घेऊ लागली आहे.


लिहीत आहेत हेमंत देसाई

#IranWar #Petrol #Diesel #Inflation #NarendraModi

1 month ago | [YT] | 37