सद्गुरूंचे अधिकृत मराठी यु-ट्युब चॅनल
ह्या चॅनलवर आपण पाहू शकता ज्ञान, विवेक, हास्य, आणि आंतरिक दृष्टीनी भरलेले व्हिडिओ, जे मराठी भाषेत डब केले आहेत. एक योगी, युगप्रवर्तक, मानवतावादी; सद्गुरू एक आधुनिक गुरु आहेत, ज्यांना योगाच्या प्राचीन विज्ञानाची सखोल जाण आहे. विश्वशांती आणि मानवी कल्याणाच्या दिशेने निरंतर कार्यरत असणाऱ्या सद्गुरूंनी आंतरिक परिवर्तनाच्या कार्यक्रमांनी जगातील लाखो लोकांना आनंदाच्या मार्गात दीक्षित करून त्यांच्या जीवनाला एक नवी दिशा दिली आहे.
Sadhguru Marathi
मुले केवळ उपदेश आणि तत्त्वज्ञानाने नव्हे, तर निरीक्षणाने आणि प्रत्यक्ष सहभागाने घडतात. तुम्हाला तुमचे मूल जसे बनावे असे वाटते, त्या प्रकारची व्यक्ती तुम्ही स्वतः बना.
~ सद्गुरू
.
#child #observation #involvement
#SadhguruMarathi #SadhguruQuotes
10 hours ago | [YT] | 170
View 3 replies
Sadhguru Marathi
भविष्याचे नियोजन करणे ही एक गोष्ट आहे – आणि जे भविष्य अजून आलेच नाही, त्याबद्दल दुःखी होणे ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे.
~ सद्गुरू
.
.
#future #planning #consciousliving
#SadhguruQuotes #SadhguruMarathi
1 day ago | [YT] | 367
View 5 replies
Sadhguru Marathi
अध्यात्मिक साधकाला ध्येयनिष्ठ कसे राहता येईल? | Staying Focused On the Path #distraction
.
.
गुरु पौर्णिमेच्या गूगल हँगआउट दरम्यान, सद्गुरू भटकाव्याबद्दलच्या एका प्रश्नाचे उत्तर देतात. लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि दिलेले ज्ञान ग्रहण करण्यासाठी, सद्गुरू समजावतात की आपण मर्त्य आहोत याची स्वतःला आठवण करून देणं एव्हढंच पुरेसं आहे. ही जाणीव आपल्यामध्ये दृढ ठेवण्यासाठी ते एक सोपी पद्धत सांगतात.
.
#focused #spirituality #consistent
2 days ago | [YT] | 24
View 0 replies
Sadhguru Marathi
२४ मे रोजी टेनेसी येथील ईशा इन्स्टिट्यूट ऑफ इनर-सायन्सेसमध्ये 'इन द लॅप ऑफ द मास्टर' या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमेरिकेच्या कानाकोपऱ्यातून साधक आले होते.
सखोल स्पष्टता, गहन स्थिरता आणि सद्गुरूंच्या सान्निध्यात असण्याचा परमानंद यांनी भरलेल्या या एका दिवसाची ही काही क्षणचित्रे.
.
#InTheLapOfTheMaster #Seekers #Program #Ecstacy #Balance
2 days ago | [YT] | 171
View 1 reply
Sadhguru Marathi
कधीकधी जग तुमच्या विरोधात असतं; पण जर तुम्हीच स्वतःच्या विरोधात असाल, तर त्यावर कोणताही उपाय नसतो.
~ सद्गुरू
.
.
#worldagainstyou #againstyourself #solution
#SelfAwareness #SadhguruQuotes
2 days ago | [YT] | 304
View 2 replies
Sadhguru Marathi
चांद्र दिनदर्शिकेप्रमाणे, एकादशी ही अमावस्येनंतर किंवा पौर्णिमेनंतर ११ दिवसांनी साजरी केली जाते. हा दिवस उपवासासाठी अतिशय योग्य आहे. आज रात्री जेवणानंतर, तुम्ही उद्या रात्रीच्या जेवणापर्यंत उपवास करू शकता. एकादशी ही शरीर शुद्ध करण्याची आणि अन्नासोबत अधिक जाणीवपूर्वक जोडलं जाण्याची संधी आहे
.
#ekadashi #fasting #health #energy #spirituality #bodydetox #awareness
3 days ago | [YT] | 219
View 2 replies
Sadhguru Marathi
चांगलं जगणं म्हणजे ऐश आराम नव्हे. चांगलं जगणं म्हणजे, तुम्ही अगदी एखाद्या खडकावर बसलात तरी तिथं आनंदानं कसं बसावं हे तुम्हाला ठाऊक असणं.
~ सद्गुरू
.
.
#goodlife #comfort #lifeatease #joyful
#SadhguruMarathiQuotes
3 days ago | [YT] | 375
View 2 replies
Sadhguru Marathi
लोक नेहमीच जगातल्या सर्वात अद्भुत व्यक्तीला भेटण्याचा प्रयत्न करतात. ती अद्भुत व्यक्ती तुम्ही स्वतःच का असू नये.
~ सद्गुरू
.
.
#wonderfulperson #beinghuman #joyfullife
#SadhguruMarathi #SadhguruQuotes
4 days ago | [YT] | 430
View 4 replies
Sadhguru Marathi
ऐका पॉडकास्ट - #157 - आपल्याला जे हवे आहे ते कुटुंबाला मान्य नसेल तर काय करावे?
संपूर्ण भागाची लिंक - tinyurl.com/822878hh
.
#sadhguru #podcast
5 days ago (edited) | [YT] | 183
View 1 reply
Sadhguru Marathi
आनंदी व्यक्तीला हे जीवन संक्षिप्त वाटतं. पण जी व्यक्ती दुःखी-कष्टी असते, तिच्यासाठी ते भयंकर लांबलचक ठरतं.
~ सद्गुरू
.
.
#joyful #brieflife #miserable #longlife
#SadhguruQuotes
5 days ago | [YT] | 390
View 3 replies
Load more