||श्री स्वामी समर्थ||
🙏🏻🌼🙏🏻







Dipali Naik

लीन माणसाला भगवंत लवकर साधेल.

नामस्मरण करायचे ते अभिमान टाकून करीत जावे. परमेश्वराला अनन्यशरण जाऊनच त्याचे नाम घेत जावे. पुष्कळ वेळा, आपण साधन करू लागलो म्हणजे आपल्याला अभिमान चढू लागतो, आणि त्यामुळे साधन व्यर्थ होते. संताकडे जाताना आपण मनामध्ये काही एक बरोबर घेऊन जाऊ नये; किंवा काही नेलेच तर भगवंताचे प्रेम न्यावे. आपण प्रपंचाचे प्रेम आणि अभिमान बरोबर घेऊन जातो आणि मग, एकावर एक लिहिलेले जसे वाचता येत नाही तशी अवस्था होते. एखादी वस्तू आपल्याला हवी असे वाटल्यावर आपण तिच्या प्राप्तीविषयी विचार करू लागतो. म्हणूनच पहिल्याने, भगवंत हवा असे आपल्याला वाटले पाहिजे. त्यानंतर त्याच्या प्राप्तीच्या साधनांचा अभ्यास करायला पाहिजे. हा अभ्यास मनाच्या कष्टाचा आहे. क्रोधाला बाहेर येऊ देण्यापेक्षा, क्रोध गिळणे यात जास्त श्रम आहेत. असे करण्यामध्ये आज कष्ट आहेत हे खरे, पण पुढे मात्र सुख आहे हे निश्चित. वागण्यात, बोलण्यात आणि चालण्यात आपण सावधगिरी बाळगावी; नको ते टाळावे.

अनन्यतेला पैसा लागत नाही. विद्या लागत नाही; त्याला फक्त आपली अभिमानवृत्ती बाजूला ठेवावी लागते. भगवंताचे होण्यासाठी अंगी लीनता आलीच पाहिजे. लीन माणसाला भगवंत लवकर साधेल. लीनतेमध्ये बाकीचा विसर पडून भगवंत तेवढा शिल्लक राहतो. जो वृत्तीने लहान आहे त्याला भगवंत लवकर वश होतो. मनुष्य मोठा असून लहानासारखा वागला तर ते फार चांगले असते. मनाने मात्र आपण बळकट बनले पाहिजे. आपण स्वत:शी चोवीस तास उघडा व्यवहार करावा. भगवंताने आपल्याला केव्हाही जरी पाहिले तरी आपल्याला लाज वाटता कामा नये. आपले वागणे असे असावे की भगवंताची आस मनामध्ये वाढत जाऊन, तिचे पर्यवसान ध्यासामध्ये व्हावे. रात्री जे स्वप्न पडावेसे वाटते ते दिवसभर करावे. यासाठी आपली वृत्ती नामामध्ये गुंतवून ठेवावी. ‘असावे सर्वांत पण नसावे कोणाचे’ अशा वृत्तीने जो राहील त्याला लवकर परमार्थ साधेल.

देहाच्या उपचारांना जो भुलतो तो भगवंताला अगदी विसरलेला असतो. पण ज्याचे अनुसंधान मजबूत असते त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते. पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात. त्यांच्या तावडीत सापडता कामा नये. लोकेषणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच. तो टाळता येणे कठीण आहे. पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे आहे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत.

अभिमानरहित जावे रामाला शरण । त्यानेच राम आपला होईल जाण ॥

#shreeswamisamarth

6 months ago | [YT] | 4

Dipali Naik

परनिंदा व विद्येचा अभिमान माणसाला भगवंतापासून दूर नेतात.

परनिंदा करण्यासारखे पाप नाही. निंदेची सवय फार वाईट असते; तिच्यामुळे आपले स्वत:चेच नुकसान होते. दुसऱ्याला दु:ख व्हावे म्हणून माणूस परनिंदा करतो, पण ती ऐकायला तो हजरच कुठे असतो ? म्हणजे मग आपण यात काय साधले ? निंदेमुळे आपलेच मन दूषित होते. दूषित मन किंवा दुष्कर्म हे माणसाला परनिंदेला प्रवृत्त करते. ज्याला परनिंदा गोड वाटते, त्याने समजावे की आपल्याला भगवंत अजून फार दूर राहिला आहे. तिखट तिखटाप्रमाणे लागू लागणे ही जशी सापाचे विष उतरल्याची खूण आहे, त्याचप्रमाणे परनिंदा गोड वाटेनाशी झाली की देव जवळ येत चालला असे समजावे. म्हणून, ज्याला स्वत:चे हित करून घ्यायचे असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जिव्हा नामाला वाहावी. भगवंताच्या मार्गाने जाणाऱ्याने, दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे, आणि अवगुणाचे तण आपल्या अंत:करणातून काढून टाकून तिथे भगवंताच्या नामाचे बीज पेरावे.

पुष्कळ वेळा आपले दोष आपल्याला कळतात, ते भगवंताच्या आड येतात हे देखील कळते, पण त्याला आपला इलाज नसतो. उदाहरणार्थ, काही लोकांची दृष्टी फारच बाधक असते. एखादी चांगली वस्तू किंवा गोष्ट त्यांनी बघितली की ती बिघडते. असे दोष पुष्कळ वेळा ज्याचे त्याला सुधारता येत नाहीत. पण सत्संगती जर लाभली तर मात्र असले दोषदेखील सुधारतात. हाच संतांच्या संगतीचा महिमा आहे. मनुष्य स्वभावत: आपले दोष वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्याचे जीवन सुखमय होत नाही. तो दुसऱ्याला त्याचा दोष दाखवून देईल, पण त्याला स्वत:ला आपला दोष कळणार नाही.

विद्या ही बरेच वेळा मनुष्याला भगवंतापासून दूर नेते. वारकरी पंथातले अडाणी लोक ‘ विठ्ठल विठ्ठल’ म्हणता म्हणता भगवंताला ओळखतात, पण शहाणे लोक परमार्थाची पुस्तके वाचूनही त्याला ओळखीत नाहीत. घरात बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली, तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामांसात जाऊन रक्तामध्ये मिसळत नाहीत तोपर्यंत त्यांचा उपयोग नाही. त्याचप्रमाणे, पुस्तकी ज्ञानाचे पर्यवसान आचरणात झाले नाही तर ते व्यर्थ जाते. भगवंताकरिता कुणीही कष्ट करू नका; कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे. ती वस्तू सात्त्विक प्रेमाने साध्य होणारी आहे; आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो. तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा, आपापसांत प्रेम वाढवा, म्हणजे मग सर्व जग आनंदमय, प्रेममय दिसू लागेल, आणि शेवटी तुम्हाला स्वत:चा विसर पडेल.

निंदा ही आपल्या साधनाची होळी करते.

#shreeswamisamarth

6 months ago | [YT] | 2

Dipali Naik

अनन्यतेतच भक्ति जन्म पावते.


भगवंतावाचून भक्ती होत नाही. ज्याप्रमाणे सौभाग्यवती म्हटली की तिला नवरा असायचाच, त्याचप्रमाणे भक्ती म्हटली की तिथे भगवंत असलाच पाहिजे. भगवंत हा भक्तीचा प्राण आहे. भक्ती आणि माया दोघी भगवंताच्याच स्त्रिया आहेत. पण, म्हणून त्या सवती आहेत. दोन सवती एके ठिकाणी सुखाने नांदत नाहीत हा जगाचा अनुभव आहे. मायेला बाजूला करायची झाल्यास आपण भक्तीची कास धरावी. म्हणजे ती मायेस आपोआप हुसकावून लावते. मायेचे वर्चस्व नाहीसे झाले की आपले काम होऊन जाते.

तालमीत जाणारा आणि तालमीत न जाणारा यांच्यामध्ये थोडातरी फरक दिसायला पाहिजे; तालमीत जाणाऱ्याच्या शरीरावर थोडातरी पीळ दिसायला हवा ना ! तसेच, जो भक्ती करतो त्याच्या वृत्तीमध्ये थोडा तरी फरक पडला पाहिजे. आपल्याला जर विद्या पाहिजे असेल तर आपण विद्वानांची संगत धरली पाहिजे, त्याचप्रमाणे आपल्याला भक्ती आणि आनंद पाहिजे असेल तर भगवंताची संगत धरली पाहिजे. सर्व सृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे. याकरिता अनन्यतेची अत्यंत जरुरी आहे. अनन्यतेतच भक्ती जन्म पावते. द्रौपदीची अनन्यता खरी. भगवंताशिवाय मला दुसरा कोणताच आधार नाही याची खात्री पटणे, हेच अनन्यतेचे स्वरूप. माझी प्राप्ती करून घ्यायची असेल तर भक्ती हेच साधन आहे असे स्वत: परमात्म्यानेच सांगितले आहे. जसे नामस्मरण विस्मरणाने करता येत नाही, त्याचप्रमाणे भक्ती अभिमानाने करता येत नाही.

समजा, एखाद्या माणसाचे लग्न झाले. तो काल ब्रह्मचारी होता आणि आज गृहस्थाश्रमी झाला; तरी त्याच्या जीवनातले इतर व्यवसाय चालूच राहतात. त्याचप्रमाणे, आपण भगवंताचे झालो तरी आपले प्रपंचाचे सर्व व्यवहार पूर्ववत् सुरळीत चालतात. जी जी गोष्ट घडेल ती ती आपण भगवंताला सांगावी. भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ठेवण्यासाठी, भगवंताला सांगून प्रत्येक काम करावे. भक्तीने भगवंत साधतो आणि फलाशा आपोआप कमी होतात. म्हणून आपण उपासना किंवा भक्ती वाढवावी. ‘ मी देही आहे, ’ असे म्हणता म्हणता आपण या देहाचे झालो; त्याचप्रमाणे मी देवाचा आहे असे म्हणत गेल्याने आपण देवरूप होऊन जाऊ. पण हे होण्यासाठी सगुणोपासनेची जरुरी आहे. रस्ता चालून गेल्याशिवाय जसे आपले घर गाठता येत नाही, त्याप्रमाणे सगुणोपासनेशिवाय आपल्याला उपाधिरहित होता येत नाही. राम कर्ता आहे ही भावना म्हणजेच सगुणोपासना, आणि हेच खऱ्या भक्तीचे स्वरूप आहे. ‘ तू जे देशील ते मला आवडेल ’ असे आपण भगवंताला सांगावे, आणि ‘ माझ्या देवाला हे आवडेल का ? ’ अशा भावनेने जगात वागावे.

घडणारी प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने घडते अशी भावना कायम ठेवणे म्हणजेच भक्ति करणे होय.

#shreeswamisamarth

6 months ago | [YT] | 3

Dipali Naik

भगवंताच्या प्राप्तीची साधने.

भगवंत आणि आपण ह्यांच्यामध्ये अभिमानाचा पडदा आहे; हा दूर झाला म्हणजे आपल्याला भगवत्प्राप्ती झाली. हा दूर व्हायला अनेक मार्ग आहेत. कर्ममार्ग, हठयोग, राजयोग वगैरे मार्गांनी हा तितका लवकर दूर होत नाही; उलट क्वचित् प्रसंगी वाढतोही. भक्तिमार्ग सोपा आहे. भक्ती म्हणजे भगवंताला अभिमानरहित अनन्य शरण जाणे, भगवंताचे होऊन राहणे, भगवंताशिवाय दुसरे काहीच न दिसणे, सर्वत्र भगवत्प्रचीती येणे. अशी भक्ती प्राप्त होण्याचा मार्ग म्हटला म्हणजे सर्व कर्तृत्व भगवंताकडे देणे, सर्व त्याच्या इच्छेने चालले आहे असे मानणे, आणि आपली प्रत्येक क्रिया त्याला समर्पण करणे. असे केल्याने आपला अभिमान लवकर नाहीसा होतो. हे साधत नसेल तर गुरुआज्ञेत राहणे, म्हणजेच आपला मान, अभिमान, शहाणपण हे सर्व गुंडाळून ठेवून, गुरु सांगतील तसे, सबब न सांगता वागणे. हेही साधत नसेल तर संतांजवळ नुसते पडून राहणे. त्यांच्या सांगण्याने, सहवासाने, अभिमान हळूहळू कमी होतो.

भक्ती दोन प्रकारांनी उत्पन्न करता येते. पहिला प्रकार म्हणजे सर्व सोडून, लंगोटी लावून, ‘ भगवंता, तू मला भेटशील तेव्हाच मी उठेन, ’ अशा निग्रहाने बसणे. हा मार्ग कठीण आहे. प्रापंचिकाला हा साधणार नाही. दुसरा प्रकार म्हणजे सहवासाने भक्ती उत्पन्न करणे. भगवंताचे गुणवर्णन वाचणे, त्याचेच गुण श्रवण करणे, त्याच्या दर्शनास जाणे, प्रत्येक कृत्य भगवंताकरिता करणे, प्रत्येक कृत्यात त्याचे स्मरण ठेवणे; असा त्याचा अखंड सहवास ठेवावा, म्हणजे भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होते. विषयाकरिता केलेली भगवद्भक्ती ही खरी भक्ती होऊ शकत नाही. भगवत्सेवा निष्काम पाहिजे; कारण भक्ती म्हणजे संलग्न होणे. मी विषयाशी संलग्न असतो तेव्हा ती विषयाची भक्ती होते, भगवंताची नाही. तेव्हा, आपण करतो ही भगवंताची सेवा नसून विषयाची सेवा होते हे ठरल्यासारखे झाले; म्हणजे मी विषयाचाच गुलाम झालो. विषयांचा गुलाम होऊन मी विषय कसचे भोगणार ? मालक होऊन विषय भोगावेत. संत, भगवंत हे निरतिशय सुख देणारे आहेत. त्यांच्याजवळ विषय मागणे म्हणजे रामाजवळ भिक्षेचे फडके मागण्याइतकेच वेडेपणाचे नव्हे का ? आपण सेवेचे फळ मागून भगवंताला मात्र दूर करतो. भगवंताची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्याभोवती फिरत असावे. भगवंतामध्ये जे मिसळतात ते परत येत नाहीत, हे लक्षात ठेवावे.

भगवंताच्या प्राप्तीच्या आड येणारे नाहीसे व्हावे म्हणून तळमळणारा जो असतो, त्याचे साधन बरोबर चाललेले असते.

#shreeswamisamarth

6 months ago | [YT] | 2

Dipali Naik

संस्कारकर्मांचा मूळ हेतू.

धार्मिक संस्कार फार चांगले असतात, कारण त्यांनी आपल्या मनाला वळण लागते. प्रत्येक धर्मामध्ये संस्कार असतातच. ज्या मनुष्याला संस्कार नाही तो कोणत्याच धर्माचा नाही; मग तो आस्तिक असो वा नास्तिक असो. खरे म्हणजे कोणतेच कर्म यथासांग घडत नसते; पण त्यातल्या त्यात, संस्कारकर्म मनुष्याने शास्त्राप्रमाणे करावे. त्यामध्ये जिथे कमी पडेल तिथे भगवंताचे स्मरण करावे, कारण भगवंताची श्रद्धा वाढावी हाच संस्काराचा मूळ हेतू आहे. संस्कार करीत असताना जरूर असलेला धार्मिक विधी तर करावाच, पण ज्यांना आपल्याविषयी प्रेम आहे असे, आणि आपल्याला ज्यांच्याविषयी प्रेम आहे असे जे लोक आहेत, त्यांना जेवायला बोलवावे. लौकिक मात्र वाढवू नये. वाईट ते सोडणे आणि चांगले ते धरणे हाच संस्काराचा मुख्य हेतू. संस्कार हे भगवंताचे स्मरण करून देतात. समाज हा बंधनाशिवाय राहूच शकत नाही. ‘ आम्हांला बंधने नकोत ’ असे म्हणणारे लोक वेडे आहेत. बंधनांमुळेच आपल्या धर्माला सनातनत्व आले आहे. म्हणून बंधनांना अतिशय महत्त्व आहे. धर्म हा कधीच बुडत नसून बंधने बुडत जातात. सध्या बंधने बुडत चालली आहेत. पूर्वी धर्मावर श्रद्धा होती, म्हणून इतक्या सुधारणा नसूनसुद्धा स्वास्थ्य होते. पण आज बाहेरच्या जगात पुष्कळ सुधारणा झाल्या तरी त्या सुधारणांना धर्माचा पाया नसल्यामुळे मानवाला स्वास्थ्य नाही. अलीकडे काही लोक असे म्हणतात की, समाज जसा बदलेल तसे नीतीचे नियम बदलायला पाहिजेत. पण अध्यात्मविद्या असे सांगते की, नीतीचे नियम कायमच आहेत. ते न बदलता माणसाने स्वत:लाच बदलले पाहिजे. एखाद्या समाजाचा पाया बौद्धिक असू शकेल किंवा पैसा असेल; पण ज्या समाजाचा पाया धर्म आहे त्या समाजालाच खरे समाधान लाभेल. धर्म म्हणजे एका अर्थाने व्यवस्थितपणाच होय. धर्म वस्तुजाताला संस्काराच्या रूपाने नीट धरून ठेवतो.

व्यवहारामध्ये ज्याचा उपयोग करता येतो तोच खरा वेदांत होय; आणि जो परमार्थाला उपयोगी पडतो तोच खरा आणि योग्य व्यवहार होय. भगवंत आम्हाला हवा आहे असे म्हटले, तरी जग आमच्या आड येत आहे असे आम्हाला वाटते. जग आडवे का येते, तर जगाशी आमचे स्वार्थाचे संबंध आहेत म्हणून. जगाशी वागताना आम्हाला नि:स्वार्थीपणाने व्यवहार करण्याची सवय नसल्याने जगाचा मोह आम्हाला सुटत नाही. हे सर्व नाहीसे होण्यासाठी आम्ही नि:स्वार्थी बनणे खरोखर आवश्यक आहे. त्यासाठी आम्हाला आमचे मन ताब्यात ठेवता आले पाहिजे, आणि त्याकरिता नाम हेच साधन आहे. जन्माला येऊन काही करणे असेल तर भगवंताला न विसरता कर्मे करावी, म्हणजे झाले.

नामात जो प्रपंच करील त्याचाच प्रपंच पूर्णत्वाला जातो.
#shreeswamisamarth

6 months ago | [YT] | 3

Dipali Naik

प्रारब्ध म्हणजे न समजणाऱ्या गोष्टींचे कारण.

आपले ध्येय काय असावे हे ठरविण्याची बुद्धी माणसाला आहे, ती खालच्या प्राण्यांना नाही. हाच माणसांत आणि त्या प्राण्यांत फरक आहे. प्राण्यांना प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात, त्याचप्रमाणे माणसालादेखील आलेले भोग भोगावे लागतात. पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागेपुढे सोयीने भोग भोगू शकतो. जगातल्या घडामोडी जशा चालतात, तशाच आपल्याही सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात. आपण जे मिळविले आहे ते स्वत:च्या प्रयत्नाने मिळाले, ही कल्पना गेल्याशिवाय देह प्रारब्धावर टाकता येणार नाही. ‘ माझे सर्व हे त्याच्या कृतीचे फळ आहे, ’ असे म्हटले की क्रिया तर चालते, पण कर्तेपण राहात नाही. पुष्कळ गोष्टी अशा आहेत की, त्यांच्याकडे बोट दाखवून त्यांचे कारण अमुक, असे आपण सांगू शकतो. पण काही गोष्टी अशा आहेत की, त्यांचे कारण आपल्याला दाखविता येत नाही. अशा वेळी, त्या प्रारब्धाने घडल्या असे आपण म्हणतो. प्रारब्ध म्हणजे न समजणाऱ्या गोष्टींचे कारण होय, असे म्हणायला हरकत नाही. संतांनादेखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते, पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदु:ख त्यांना नाही. व्यवहारदृष्ट्या औषध घेऊन मग भोग भोगणे हाच खरा मार्ग आहे. बुवाने आपल्या सिद्धीने रोग बरा करणे किंवा टाळणे हे बरे नाही. त्यामध्ये बुवाची प्रसिद्धी होईल खरी, पण त्यात त्याचे स्वत:चे कल्याण नाही, तसेच लोकांचेही पण हित नाही. समजा, एक मनुष्य रस्त्याने चालला असताना वाटेत एक दहा रुपयांची नोट पडलेली आढळली. पूर्वसंस्काराप्रमाणे ती उचलून घेण्याची वासना त्याला होईल, पण ती प्रत्यक्ष उचलून घ्यावी किंवा न घ्यावी हे ठरविण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे. म्हणून प्रारब्धाने देहभोग आला असता त्यामध्ये मनाची वृत्ती कशी ठेवावी हे स्वातंत्र्य आपल्याला आहे. ते प्रारब्धावर अवलंबून नाही. भगवंत सगुणात आला की त्यालादेखील प्रारब्धाचा नियम लागू झाला.

आपला जन्मजात स्वभाव जरी वाईट असला तरी अभ्यासाने तो खात्रीने सुधारता येईल. जोपर्यंत आपल्या अंत:करणात अवगुण आहेत तोपर्यंत आपली प्रगती होणे फार कठीण आहे. शेत पेरण्यासाठी ज्याप्रमाणे जमिनीची मशागत करायला पाहिजे, त्याप्रमाणे भगवंताचे प्रेम येण्यासाठी आपले अंत:करण दुर्गुणांपासून स्वच्छ केले पाहिजे. एकदा असे अंत:करण शुद्ध झाले म्हणजे भगवंतावाचून दुसरा कोणी नाही ही भावना टिकविणे, म्हणजेच अनुसंधान ठेवणे, फारसे जड जात नाही. अनुसंधान हे आपले ध्येय ठरवून, त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी कराव्या. त्याकरिता सर्वांनी मनापासून नाम घ्यावे, आणि आनंदात राहावे.

मिळणे आणि जाणे दोन्ही प्रारब्धाधीनच आहे. मग हर्ष, शोक वृथा का करावा ?

6 months ago | [YT] | 2

Dipali Naik

कोणीतरी विचारले मला परवा
तुला राम हवा की कृष्ण हवा

मी म्हणालो किती छान विचारला प्रश्न

सांगतो ऐका कधी मला राम पाहिजे कधी कृष्ण हवा

रामराया पोटात घालेल माझी चूक
आणि कृष्ण भागवेल माझी भूक

रात्रीची शांत झोप रामरायाच देतो
भूक लागली की कृष्ण च आठवतो,

कशाचीही भिती वाटली की मला आठवतो राम
कष्ट झाले, दुखः झाले की कृष्णाकडे च मिळतो आराम,

रक्षण कर सांगतो रामरायाला
सुखी ठेव सांगतो मी श्रीकृष्णाला

बुध्दीचा विवेक रामाशिवाय कोणाकडे मागवा,
व्यवहारातील चतुरपणा कृष्णानीच शिकवावा,

सहनशक्ती दे रे माझ्या रामराया
कृष्ण बसलाय ना कर्माचे फळ द्याया,

रामाला फक्त शरण जावे वाटते
कृष्णाशी मात्र बोलावेसे भांडवेसे वाटते,

रामाला क्षमा मागावी
कृष्णाला भीक मागावी

रामाला स्मरावे
कृष्णाला जगावे

अभ्यास करताना प्रार्थना राज मणी रामाला
पायावर उभे राहताना विनवणी कृष्णाला,


आरोग्य देणारा राम
सौंदर्य देणारा कृष्ण

राज्य देणारा राम
सेना देणारा कृष्ण

बरोबर चूक सांगतो राम
चांगले वाईट सांगणे कृष्णाचे काम

रामाकडे मागावे आई वडिलांचे प्रेम
कृष्णाकडे मागतो मी मित्रांचे प्रेम

पाळण्यात नाव ठेवताना गोविंद घ्या गोपाळ घ्या
अंतीम वेळी मात्र रामनाम घ्या,

दोघांकडे मागावे तरी काय काय
ते दोघे हसत बघत आहेत माझ्याकडे,
म्हणत आहेत, अरे आम्ही एकच
तु फसलास की काय.....,

म्हणाले, कोण हवा हा प्रश्न च नाही
मिळू दोघेही नाहीतर कोणीच नाही,

मी रडलो आणि म्हणालो

दोघेही रहा माझ्याबरोबर
परत नाही विचारणार हा प्रश्न

राम का कृष्ण परत विचारले जरी
फक्त म्हणेन
जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी.
🙏😊🌹




#shreeswamisamarth
#jayshreekrishna
#jayshreeram
#post

7 months ago (edited) | [YT] | 10

Dipali Naik

🙏 सुप्रभात 🙏
आयुष्यात कोणतीही गोष्ट कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी, अपमानित करण्यासाठी व स्व:च्या स्वार्थासाठी करु नये. कोणतीही गोष्ट करताना ती दुसऱ्याला मदतीसाठी व स्वत:ला समाधान मिळण्यासाठी करा. तरच आयुष्य जगताना आनंद व समाधान नक्कीच मिळेल.
आयुष्यात आपल्याला चटका व झटका देणारे काही जण तेच असतात ज्यांना आपण त्यांचे चांगलेच व्हावे, वाईट होऊ नये म्हणून कधी काळी समजून, संभाळून घेतलेले असते व मदतही केलेली असते. अनुभवातून अशा व्यक्ती ओळखून वेळीच सावध झाले पाहिजे.
पराभवाने माणूस संपत नाही प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलो नाही...

#shreeswamisamarth
#swamiaai

7 months ago | [YT] | 7

Dipali Naik

*🙏🏵️‼️श्री स्वामी समर्थ‼️🏵️🙏*

*💯🌹भगवंताचे नामस्मरण 🌹💯*

*1) भगवंत म्हणजे "श्रीपाद श्रीवल्लभ*

*२)नाव अखंड जपावे. नामस्मरण करुन समाधानी व्हावे.*

*३) नित्य नेमाने प्रातःकाळी, दुपारी व सायंकाळी नामस्मरण करावे.*

*४) सुख असो, दुःखी प्रसंग असो, मन उद्विग्न झालेले असो वा चिंतेंत असो, नामस्मरण सर्वकाळ, सर्व प्रसंगी करीत जावे*

*५) आनंदकाळी, कठीण काळी, पर्व काळ असो किंवा योग्य काळ असो, विश्रांती अथवा झोपेची वेळ असो नामस्मरण करीत जावे.*

*६) एखादा कठीण प्रसंग असो, कांहीं अडचण आलेली असो, एखद्या संकटांत सापडलेले असो, संसारांतील अनेक खटपटी असोत किंवा मनाला कसली तरी चुटपुट लागलेली असो, आपण नामस्मरण करीत जावे.*

*७) चालतांना, बोलतांना, धंदा करतांना, खातांना, जेवतांना, सुखी असतां किंवा नाना उपभोग भोगतांनानाम घ्यावयास विसरु नये.*

*८) कधी श्रीमंती असेल तर कधी विपत्तीचा काळ असेल नामस्मरण मात्र चालूच ठेवावे. विसरु नये* .

*९) मोठे वैभव मिळाले, वा सामर्थ्याने सत्ता लाभली अनेक वस्तु वाट्यास आल्या आणि भाग्याने निरनिराळेभोग प्राप्त झाले तरी नामस्मरण विसरु नये.*

*१०) जीवनांत आधी वाईट परिस्थिती व नंतर सुस्थिती आली किंवा आधी सुस्थिती व नंतर वाईट स्थिती आली, प्रसंग चांगले वाईट कसेही आले तरी नाम विसरु नये.*

*११) नाम घेत राहील्याने संकटे नाहीशी होतात. सर्व विघ्नांचे निवारण होते. नामस्मरणाने उत्तम गति किंवा पदे लाभतात.*

*१२) नाम निष्ठेने, श्रद्धेने घेतले तर भूतपिशाच्चांची पीडा नष्ट होते. कपटांपासून रक्षण होते. ब्रह्म राक्षस साचा त्रास असेल तर नाहीसा होतो. मुंजाची बाधा होत नाही. मंत्र जपण्यांत चूक झाल्याने लागलेले वेड नाहीसे होते.*

*१३) नामामुळे विषबाधा नाहीशी होते. नामामुळे चेटुक, जादुटोणा यांचा त्रास नाहीसा होतो. नामस्मरण करत राहील्याने अंतःकाळी उत्तम गति मिळते.*

*१४) लहानपणी, तरुणपणी, कठीण प्रसंगी, वृधपणी, सर्वकाळी व अंतःकाळी नामस्मरण करीत असावे.*

*१५) नामाचे महत्व व मोठेपण स्वतः भगवान श्रीशंकर जाणतात. तो विश्र्वेश्र्वर लोकांना नामस्मरण करा असा*

*उपदेश करतो. काशींत देह ठेवणारास श्रीशंकर नामस्मरण सांगतात व त्याला भगवंतनामाने मुक्ति मिळते.*

*१६) भगवंताचे नाम उलटे घेऊनही वाल्याचा वाल्मीकी ऋषी झाला व त्याने भविष्यांत होणारे श्रीरामाचे शतकोटी श्लोकांचे चरित्र श्रीरामाच्या जन्मा आधीच लिहून ठेवले.*

*१७) भगवंत नाम घेऊन नाना संकटांतुन प्रल्हाद वाचला व त्याचा उद्धार झाला.भगवंताच्या नावाचा जप करुन अजामेळ पवित्र झाला.*

*१८) नामा मुळे दगड तरंगले व प्रसिद्ध सेतु निर्माण झाला. अनेक भक्तांचा उद्धार झाला. अतिशय पापी लोकांनीसुद्धा नामाचा जप करुन स्वतःल पावन,पवित्र करुन घेतले.*

*१९) परमेश्र्वराची पुष्कळ नामे आहेत. नित्य नियमाने त्यांचे स्मरण केले तर मनुष्य तरुन जातो.नामस्मरण करणाराला यम यातना होत नाहीत. परमेश्र्वराच्या अनंत नामांपैकी कोठचेही नाम घेतलेतरी भगवंत त्याचा उद्धार करतो.*

*२०) भगवंताच्या असंख्य नामांपैकी कोणतेही एक नाम मनापासून जपत जावे. त्यामुळे मनुष्य जन्माचेसार्थक होणारच. नामाचे स्मरण करीत राहील्याने मनुष्य मोठा पुण्यात्मा होतो.*

*२१) माणसाने कांहींच केले नाही व वाणीने फक्त भगवंताचे नाम जपले, तरी त्याने भगवंत संतुष्ट होतो वभक्ताचा सांभाळ करतो.*

*२२) जो भगवंताच्या नामाचा जप करतो त्याचे शरीर पुण्यवान माणसाचे म्हणुन जाणावे. मोठमोठ्या पापांचे डोंगर त्यांनेच नष्ट होतात.*

*२३) नामाचा महिमा एवढा अपरंपार आहे, कीं तो सगळा सांगणे शक्य नाही. नामस्मरणाने पुष्कळ लोकांचा उद्धार झाला आहे. प्रत्यक्ष शंकर हळाहळ विषापासून वाचला.*

*२४) कोठच्याही वर्णाचा माणुस नाम घेऊ शकतो. लहान मोठा कोणीही नाम घेऊ शकतो. अडाणी व मूर्ख माणसेसुद्धा नामस्मरणाने संसारांतुन उद्धरुन जातात.*

*२५) म्हणुन नाम नेहमी घ्यावे व ते घेतांना मनांत भगवंताचे रुप स्मरत असावे.*

*👉श्रीपाद श्रीवल्लभ हे भगवंताचे नामस्मरण करून नामाचा अनुभव घ्यावा.*


#shreeswamisamarth

8 months ago | [YT] | 1