News1 network

जेसीआय दापोली व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात सामंजस्य करार; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवे पर्व

दापोली : युवकांचे व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व प्रशिक्षण, सामाजिक बांधिलकी व समाजोपयोगी उपक्रमांना चालना देण्यासाठी जेसीआय दापोली आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (डीबीएसकेकेव्ही), दापोली यांच्यामध्ये सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला.

या कराराअंतर्गत व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम, नेतृत्व प्रशिक्षण, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) उपक्रम, युवक सक्षमीकरण, समाजसेवा प्रकल्प, विविध सामाजिक विकास उपक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी परिसंवाद व कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना विकसित होण्यास मदत होणार आहे.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजयजी भावे सर, डॉ. विनायक जालगावकर, डॉ. नारखेडे, डॉ. राणे, डॉ. ठोकळ, डॉ. धांडे तसेच डॉ. त्रिपाठी उपस्थित होते. या उपक्रमासाठी विद्यापीठ प्रशासन व प्राध्यापकवर्गाने दिलेल्या सहकार्याबद्दल जेसीआय दापोलीतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेसी डॉ. कुणाल मेहता, सचिव जेसी रोशन वेदक, खजिनदार जेसी सीए ऋषिकेश शेठ, जेसी भूषण इसवलकर, जेसी अभिषेक खटावकर, जेसी तेजस मेहता, जेसी मयुरेश शेठ, जेसी स्वप्नील मेहता, जेसी ओंकार कर्वे, जेसी ऋषी तलाठी तसेच जेसी अनिकेत खानविलकर उपस्थित होते.

ज्ञान, नेतृत्व आणि सेवाभावाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ही भागीदारी महत्त्वपूर्ण ठरणार असून विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देत त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

"समुदाय विकासासाठी नेतृत्व" या ध्येयवाक्याने प्रेरित होऊन जेसीआय दापोली व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ समाजहितासाठी विविध उपक्रम संयुक्तपणे राबविणार आहेत.

1 week ago | [YT] | 1