मी सुनिल माळी , आपल्या चॅनेलच नाव - सुनिल माळी वलॉंग ( sunil mali vlog ) आहे. मी एक middle क्लास परिवार मधून आहे . मी IT क्षेत्रामध्ये काम करतो . स्वतःच्या जीवनातील व्हिडिओस बनवतो आणि ते तुमच्या पर्यंत घेऊन येतो जेने करून आपली संस्कृती सर्वांना दिसेल आणि सर्वांना आवडेल 🙏.
सर्वांना विनंती आहे कि कोणी गाव सोडलं असेल तर कृपया परत गावाकडे वळा हि मनापासून विनंती 🙏.

🌳🌳 झाडे लावा | झाडे जगवा 🌳🌳


sunil mali vlog

कोकणातील राजापूर तालुक्यातील नामांकित कलाकार | आपल्या भू पंचक्रोशी कोतापूर गावातील नामांकित कलाकार संदेश जाधव | आज राजापूर मार्केट ला अचानक भेट झाली ❤️

1 month ago | [YT] | 142

sunil mali vlog

​🚩 *"महिला शक्तीचा निर्धार, राजापूर पेंडखळे पंचायत समिती गणाच्या विकासाचा आधार!"* 🚩
*राजापूर ​पेंडखळे पंचायत समिती गणातील सुज्ञ मतदार बंधू-भगिनींनो,*

पेंडखळे गावे- ( भालावली, भू, तेरवण, खिणगीणी, कोतापूर, देविहसोळ, दसूर, पेंडखळे )

​आपल्या राजापूर पेंडखळे पंचायत समिती गणाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना जिल्हा पातळीवर प्रभावीपणे मांडण्यासाठी, एक अभ्यासू, अनुभवी आणि कर्तृत्ववान महिला नेतृत्व आपल्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.
*​सौ. प्रणाली सुनिल माळी*
अपक्ष उमेदवार: राजापूर पेंडखळे पंचायत समिती गण
आता आपल्या राजापूर पेंडखळे पंचायत समिती गणाच्या विकासासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. *पक्षाच्या राजकारणापेक्षा 'गावचा विकास आणि महिलांचे सक्षमीकरण' हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे.*
​आमचा संकल्प - राजापूर पेंडखळे पंचायत समितीच्या गणातील गावांचा विकास!
​🚺 *महिला शक्ती:* बचत गटांना बळकट करून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे.
​🛣️ *पायाभूत सुविधा:* गणातील प्रत्येक वाडी-वस्तीला जोडणारे दर्जेदार रस्ते आणि दिवाबत्तीची सोय.
​💧 *शुद्ध पाणी:* प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ आणि मुबलक पिण्याचे पाणी पोहोचवणे.
​🏥 *आरोग्य व शिक्षण:* ग्रामीण आरोग्य सेवा आणि शाळांच्या दर्जा सुधारण्यावर विशेष भर.
​🤝 *पारदर्शक कारभार:* सर्व सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे.

*सौ. प्रणाली सुनिल माळी यांनाच ​का निवडून द्यावे?*
कारण त्यांच्याकडे *अनुभव आहे, दृष्टी आहे आणि कामाची जिद्द आहे. महिला शक्ती जेव्हा खंबीरपणे उभी राहते, तेव्हाच समाजाचा खरा विकास होतो!*

मतदानाची तारीख: ५ फेब्रुवारी २०२६
🗳️ *उमेदवार: सौ. प्रणाली सुनिल माळी (अपक्ष)*
📍 *मतदारसंघ: राजापूर पेंडखळे पंचायत समिती गण*

*​एकच ध्यास, राजापूर पेंडखळे पंचायत समिती गणाचा विकास!*
*आपले एक मत, महिला शक्तीच्या पाठीशी आणि विकासाच्या दिशेने!*

*समस्त राजापूर पेंडखळे पंचायत समिती गण विकास समर्थक आणि ग्रामस्थ.*

सर्व गावातील मंडळींनी सौ प्रणाली सुनिल माळी ह्यांना प्रचंड मतांनी विजयी करा 🚩

सौ प्रणाली सुनिल माळी
चिपटे वाडी | पेंडखळे गावची रहिवाशी
राजापूर कोकण

5 months ago | [YT] | 170

sunil mali vlog

गावातील बंद घरांचे दरवाजे उघडूया | तरुण पिढीला उज्वल बनवूया 🚩

सौ प्रणाली सुनिल माळी
चिपटे वाडी | पेंडखळे गावची रहिवाशी
राजापूर कोकण

मी सुनिल राजाराम माळी ( कोकणातील यूट्यूबर| राजापूर तालुक्यातील यूट्यूबर - sunil mali vlog ) माझी बायको सौ प्रणाली सुनिल माळी ही अपक्ष म्हणून राजापूर पेंडखळे पंचायत समिती साठी उमेदवार म्हणून उभी आहे.

पेंडखळे गावे - ( भालावली,भू, तेरवण, कोतापूर, खिणगीणी, दसूर, देविहसोळ, पेंडखळे )

Lockdown होण्याच्या 1 आठवडा अगोदर शिमगा साठी पालखी ला गावी आलो होतो .काही दिवसांनी lockdown झाला म्हणजे कोरोना ची साथ आली आणि जगजीवन विस्कळीत झालं . होत्याच नव्हतं अस झालं.
काही दिवस उलटून गेले आणि गाव आवडू लागले आणि गावातील जिवन शैल्ली जगता आली आणि जवळून बघता आली. म्हणजे गावातील सुख दुःख बघितले. मनाची इच्छाच होत नव्हती गाव सोडून शहरात जायची कारण निसर्ग स्वर्ग कोकण ज्याने जवळून बघितले त्याला नक्कीच गावची ओढ लागेल.
आमच्या दोघांचं जन्म शिक्षण मुंबईचं पण पुर्वजांच्या रक्तात होत गाव सांभाळायचं तेच आमच्या मध्ये आलं आणि गावी राहिलो. गावी राहून आंबा काजू झाडे पूर्वजांनी लावलेली ती हाती घेऊन छोट मोठ उत्पन्न निर्माण करू लागलो आणि त्याचबरोबर social media वर कोकणातील, शहरातील आपल्या मराठी मंडळींचे उद्योग जगासमोर घेऊन आलो. त्यांना सुद्धा एक चालना मिळाली. आणि आम्हाला सुद्धा मंडळी ओळखू लागली कि हे तरुण जोडप कोकणासाठी,गावासाठी, तरुण मुलांसाठी उद्योगात यावे त्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत.
कशे 6 वर्ष पूर्ण होतील ते कळलेच नाही. कोकण आणि कोकणातील मंडळींना मोठं करायचं आणि पुन्हा गावाकडे कसे व्यवसाय अजून निर्माण करता येतील त्याचे सतत प्रयत्न करत असतो.
कोकण अजून मोठं व्हावं आणि कोकणातील मंडळी गावीच राहून काही तरी व्यवसाय, शेती, वेगवेगळ्यात शेतीतून उत्पन्न कसे वाढेल म्हणून माझी बायको सौ प्रणाली सुनिल माळी ही अपक्ष म्हणून राजापूर पेंडखळे पंचायत समिती साठी उमेदवार म्हणून उभी आहे अजून ज्ञान मिळेल आणि गावातील, कोकणातील मंडळी समृद्ध करता येईल.
कोकणातील आणि महाराष्ट्रातील तरुण मुलांनी - मुलींनी शिकून गावीच राहून कुटुंबाच, गावचं, तालुक्याच, जिल्ह्याच, नाव मोठं कराव 🚩शेती समृद्ध करावी 🚩

राजापूर पेंडखळे पंचायत समिती साठी ज्या गावांची नावे आहेत त्या गावातील मंडळींनी सौ प्रणाली सुनिल माळी ह्यांना प्रचंड मतांनी विजयी करा 🚩

जय शिवराय 🚩

5 months ago | [YT] | 242

sunil mali vlog

आज पहिल्यांदा कुक्कुटपालन प्रशिक्षण दिले आणि उत्तम प्रकारे पार पडली.
गणपती पुळे, रत्नागिरी, लांजा, जैतापूर, पडवे हिथुन मंडळी आले.
ह्या सर्व मंडळीन मुळे आपल्याला प्रशिक्षण द्यायची भीती नष्ट झाली ह्या सर्व मंडळींनी माझा आत्मविश्वास वाढवला आणि आज आपल्या कुक्कुटपालन प्रशिक्षण सुरु झाले त्याचे साक्षीदार आहेत.

ह्या सर्व मंडळींना एक मानाचा मुजरा.

आजचा दिवस अविस्मरणीय.

14 डिसेंबर 2025 ह्या दिवशी पहिली कुक्कुटपालन प्रशिक्षण झाले.

मुंबईच जन्म. शिक्षण मुंबईचं.5 वर्ष पूर्ण कधीच झाले lockdown ला गावी आलो आणि आंबा काजू वडिलोपार्जित आहेत ते work from home करत सांभाळले आणि त्यातून उत्पन्न निर्माण केले. विचार केला की कुक्कुटपालन व्यवसाय करावा आणि उत्तम रित्या आपला व्यवसाय चांगला उभा करत आपण कुक्कुटपालन व्यवसाय करत प्रशिक्षण सुद्धा देऊ इतकी मेहनत घेतली.

आज मी मेहनत घेत आहे त्याच मुख्य पाठिंबा कुटुंबाच्या सर्व मंडळींच्या support मुळे आणि बायको मुळे ( मुंबईची मुलगी गावी शेतात काम करते)

सुनिल माळी
8767193991
चिपटे वाडी | पेंडखळे | राजापूर | कोकण

Youtuber :- sunil mali vlog

6 months ago | [YT] | 148

sunil mali vlog

धन्यवाद ❤️🙏🙏सगळ्यांना ❤️❤️❤️❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या बद्दल ❤️❤️❤️❤️❤️

6 months ago | [YT] | 124

sunil mali vlog

कोकणातील तरुण मुलं गावाकडे येऊन व्यवसाय करत आहे ❤️
कोकणात फिरायला आलात तर नक्की राजापूर डेपो च्या बाहेर ह्या तरुण मुलांनी फक्त खा हा व्यवसाय चालू केला आहे ❤️

मुंबईचे मुलं आता गावी स्थलांतर होत आहेत ❤️

ह्या भावांनी मस्त सुरुवात केली आहे ❤️

लवकर ह्या तरुण मुलांची मेहनत जगासमोर घेऊन येणार आहोत ❤️❤️

फक्त खा ❤️
पत्ता :- राजापूर डेपोच्या बाहेर
तालुका - राजापूर ❤️ जिल्हा - रत्नागिरी
कोकण

सुरज म्हादिये +919284307785

7 months ago | [YT] | 220

sunil mali vlog

कोकणातील राजापूर तालुक्यात बाईक, घर फोडीच प्रमाण जास्त प्रमाणात वाढत आहे 🙏

आज दिनांक 27/9/2025

सकाळी 4.20 am ला राजापूर साईनगर येथून सकलेन काझी यांची बुलेट न.MH 08 BF 3888
𝗠𝗛 𝟬𝟴 𝗕𝗙 𝟯𝟴𝟴𝟴 चोरीला गेली आहे . कोणाला दिसली किंवा समजली तर ह्या
7057443334
8459792809
9271975077
या नंबर वर कळवावे.

Bullet पश्चिम महाराष्ट्र च्या दिशेने गेली आहे 🙏अनुस्कुरा घाट चा चेकपॉस्ट cross केला आहे 🙏🙏

पश्चिम महाराष्ट्रातील मंडळींनी चोराला पकडायला मदत करावी 🙏🙏🙏

8 months ago | [YT] | 47

sunil mali vlog

मी सुनिल राजाराम माळी राहणारा चिपटे वाडी, पेंडखळे, तालुका -राजापूर | जिल्हा - रत्नागिरी | कोकण ह्या गावचा रहिवाशी.

मी आणि संकेत किनरे रात्री 9वाजून 10 मिनिट ने जुवळे स्टॉप पासून भू गावच्या दिशेने दोघे एकत्र दुचाकी वाहनावरून जात होतो, अचानक रस्त्यात बिबट्याची पिल्लं आली पण ती पिल्लं आम्हाला भाट वाघची आहे असे वाटले पण ते पिल्लं बाजूच्या झाडीत लगेच निघून गेले आम्ही गाडी थांबवली नव्हती आम्ही गाडी चालवत होतो पण लगेच मागून बिबट्यांच्या डरकाळीचा जोरात आवाज आला आणि आम्ही गाडी थोडी fast केली आणि 50-70 मीटर पळवली आणि पेंडखळे शाळा क्रमांक 1 जवळ गतिरोधक आहे तिथे थोडी गाडी slow झाली आणि पुन्हा मागून येणारे बिबटे डरकाळी फोडत चक्क 200-300 मीटर दुकाची वाहणाच्या 🙏चिपटे वाडी फाटा ( चव्हाण ह्यांचं घर ) तिथं पर्यंत बिबटे मागून आले 🙏.

कस तरी पळ काढत आम्ही सुतार माळ वरील गुरव ह्यांच्या दुकानाजवळ पोहचलो आणि सर्व घटनेची माहिती सांगितली आणि त्यांना सांगितले कि कोणी दुचाकीवरून चिपटे वाडी किंवा जुवळे वाडीत जात असेल तर त्यांना थांबवा पुढे 2-3 मोठे बिबटे आणि 3 पिल्लं आहेत ते सांगितले 🙏
मी आणि संकेत भू च्या दिशेने निघालो आणि संकेत ला सांगितले पेंडखळे गावातील whatsapp ग्रुप वर msg टाक कि ह्या ठिकाणी बिबटे आहेत कोणी जाऊ नये 🙏

पण हा whatsapp msg कोणी लगेच बघू शकत नाही ना 🙏 थोड्या वेळाने 15-20 मिनटं नंतर अनिल चिपटे त्या रस्त्याने म्हणजे चिपटे वाडी ते चिपटे वाडी फाटा ( चव्हाण ह्यांचं घर) ह्या दिशेने कामा निम्मित निघाला पण त्याला काहीच कल्पना नव्हती कि पुढे 3 मोठे बिबटे आणि 3 पिल्लं आहेत 🙏3 मोठ्या बिबट्यांनी अनिल चिपटे ह्याला दुचाकी वाहनावरून येत असल्याचे दिसले आणि 3 मोठ्या बिबट्यांनी दुचाकी वाहनावर उडी मारली आणि अनिल चिपटे गाडी वरून खाली पडला आणि दुखापत झाली 🙏

10 सप्टेंबर 2025 रात्री 9:30 किंवा 9:40pm च्या वेळेस जुवळे स्टॉप ते चिपटे वाडी फाटा ( चव्हाण ह्यांचं घर ) पेंडखळे, तालुका- राजापूर, जिल्हा- रत्नागिरी.

3 बिबट्यांनी दुचाकी वाहनावर हल्ला केला तेव्हा चिपटे वाडीतील रहिवाशी अनिल चिपटे ह्याच्या कंबर पासून ते पायापर्यंत दुखापत झाली आहे, बरोबर चालता येत नाही आहे 🙏.

आज दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी राजापूर civil hospital मधून त्याला रत्नागिरी civil hospital ला पाठवण्यात आले आहे 🙏.

कोकणातील सर्व रहिवाशांनी काळजी घ्यावी 🙏कोकणात जास्त प्रमाणात बिबट्याचा वावर वाढत आहे 🙏.

बिबट्याचा किंवा अन्य प्राण्याचा हल्ला झाल्यास वनविभाग 1926 किंवा अतिआवश्यक पोलीस निरीक्षक 112 ह्या हेल्पलाईन नंबर वर call करा 🙏.

9 months ago | [YT] | 91

sunil mali vlog

माळी परिवारची गौरी गणपती 2025❤️चिपटे वाडी ❤️पेंडखळे ❤️राजापूर ❤️कोकण

9 months ago | [YT] | 62

sunil mali vlog

शुभ कामाची सुरुवात झालेली आहे ❤️येत्या 9 मार्च 2025 ला नाशिक ला येतोय ❤️कुकूटपालन training साठी ❤️

मी येतोय ❤️तुम्ही पण कुकूटपालन training ला येताय ना ❤️

दिलेल्या नंबर वर नक्की संपर्क करा 🙏

‪@dwit-farm_38.‬

1 year ago | [YT] | 104