Mhalsakant Films

कला हेच जीवन


MHALSAKANT FILMS

श्री खंडोबा मंदिर, धामणी
​धामणी येथील श्री खंडोबा मंदिर हे महाराष्ट्रातील भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि जागृत देवस्थान मानले जाते. हे मंदिर पुणे जिल्ह्यात (अनेकदा शिरूर किंवा खेड तालुक्याच्या आसपास उल्लेखले जाते) वसलेले आहे आणि असंख्य कुटुंबांचे कुलदैवत (Kuldaivat) आहे.
​देवाची ओळख (खंडोबा)
​स्वरूप: खंडोबा हे भगवान शंकराचे अवतार, म्हणजेच मार्तंड भैरवाचे रूप मानले जातात.
​अन्य नावे: त्यांना 'म्हाळसाकांत', 'येळकोटी', 'जेजुरीचा राजा' (जेजुरी हे मुख्य स्थान असले तरी) आणि 'खंडेराय' या नावांनीही ओळखले जाते.
​पत्नी: खंडोबांच्या दोन प्रमुख पत्नी आहेत - म्हाळसा (जी एका वैश्य कुटुंबातील होती) आणि बाणाई (जी धनगर समाजातील होती). त्यांच्या या दोन पत्नींमुळे त्यांना सर्व स्तरातील लोकांमध्ये पूजले जाते.
​मंदिराचे महत्त्व आणि यात्रा
​धामणीचा खंडोबा हा नवसाला पावणारा देव म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथे मोठी यात्रा (जत्रा) भरते, ज्यात महाराष्ट्रभरातून लाखो भाविक येतात.
​भंडारा: खंडोबाच्या पूजेत भंडारा (हळदीची पिवळी पूड) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. ही भंडाऱ्याची उधळण हे त्यांच्या पूजेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे, जो समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो.
​नवस: भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी देवाला नवस करतात आणि नवस पूर्ण झाल्यावर येथे येऊन देवाला नैवेद्य आणि भंडार अर्पण करतात.
​हे मंदिर महाराष्ट्राच्या लोकसंस्कृती आणि श्रद्धेचा एक महत्त्वाचा भाग आहे.या खंडोबा च्या काठी चा व यात्रेतील पहिली पूजा करण्याचा मान हा अवसरी खु. च्या राजगुरू यांना आहे.
लेखन.
काळुराम राजगुरू,
पुणे

9 months ago | [YT] | 0

MHALSAKANT FILMS

विवाह एक भीषण परिस्थिती भविष्यात निर्माण होणार...
😔😔😔😔😔
पुढील काळात लग्न न झालेल्या वयस्कर तरुण-तरुणी मोठ्या संख्येने दिसतील. वृध्द झाल्यावर आधाराला कुणी नसेल आणि पुढील पिढीची वंशवृद्धीचं न झाल्याने वृद्धाश्रमा मध्ये जाण्याची किंवा एकाकी आयुष्य काढण्याची वेळ येणार, यात शंका वाटत नाही. अपेक्षांचे ओझे बाळगून भविष्याच्या बाबतीत विचार न करणारी हि पिढी स्वतः बरोबर पालकांना सुद्धा आयुष्याच्या वृद्धत्वाच्या टप्प्यावर अनेक चिंताना जन्म देत आहे.कारण मुला-मुलींचे लग्न झाल्यावर पालकांची गृहस्थाश्रमाची जबाबदारी संपते. पुढील पिढीकडे सूत्रे देऊन पालक आपल्या निवृत्ती आयुष्याचे नियोजन करु शकतात. आता मागील एक पिढी आणि आताची विवाह न झालेली पिढी यांचे निवृत्तीचे आयुष्य खडतर असण्याची शक्यता जास्त आहे. *फक्त पैसा, प्रॉपर्टी, दागदागिने, गाड्या म्हणजे सर्व सुख नाही.* कौटुंबिक आयुष्यात चांगली-वाईट आव्हाने आणि संकटे यांना सामोरे जाताना पतीपत्नी एकमेकांचा मानसिक आधार असतात. जीवनात पूर्णत्वाचा खऱ्या अर्थाने आनंद मिळवायचा असेल तर वाट्याला आलेलं दुःख किंवा प्रतिकुलता सुद्धा सुसह्य होते. ती एकमेकांच्या पूरक भूमिकेमुळे.
*शिक्षणाची पात्रता, आर्थिक कमाई, जमीनजुमला, राहण्यासाठी स्वतःचे घर, सौंदर्याच्या व्यापक कल्पना, ठराविक भौगोलिक क्षेत्रात म्हणजे मुख्यत: पुणे, मुंबई, नाशिक येथेच वास्तव्य असावे.* याचा दुराग्रह, हट्टापायी विवाहाचे वय निघून जात आहे.
तारुण्याची किंवा ठराविक वयात वैवाहिक सौख्याची प्राकृतिक अनुकूलता आणि निरामय आनंदाला ही पिढी पारखी होत आहे. *तेही आपणचं आपल्यावर लादून घेतलेल्या अटीमुळे.*
खरं तर बायोडाटा बघुन किंवा अभ्यासून त्यातील प्रतिकूल मुद्द्यांवर कशी मात करुन विवाहासाठी पार्श्वभूमी तयार करता येईल,याचा विवाहेच्छुक तरुण-तरुणींनी विचार गंभीरपणे करायला हवा. ठराविक बाबींचा अत्याग्रह हा आपल्या वैवाहिक आयुष्याला मारक आणि बाधक ठरत आहे आणि कल्पनांचे इमले रचूनही वास्तवात एकाकीपणे जगायची वेळ येत आहे. आयुष्याची संध्याकाळ जवळ आल्यावर हा विचार करण्यात आपण एवढी मोठी चूक केली त्याचे परिणाम वैयक्तिक आयुष्यावर तर पडणारचं आहेत.पण सामाजिक संतुलन सुध्दा बिघडणार आहे. आपल्या संस्कृतीला सुद्धा याबाबी मारक ठरत आहेत.
स्त्री-पुरुषांच्या आयुष्याची पूर्णता ही वंशवृद्धी, मुलांचे संगोपन, शिक्षण, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम या पायऱ्यांतूनच होत असते.
आपण विवाह संस्थेचा पाया आणि ढाचा उखडून टाकत आहोत. आपले अपेक्षांचे दुराग्रह आपल्याला कुठे घेऊन जात आहेत.यावर गंभीर पणे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
लोकसंख्येत वृद्ध लोकांचे प्रमाण वाढल्याने जपान सारखे प्रगत, विकसित राष्ट्र गंभीर परिणामांना सामोरे जात आहे. घरातील वैयक्तिक विवाहाचा प्रश्न राष्ट्रीय दृष्टिकोनातून किती गंभीर आहे हे तेथील परिस्थितीचा अभ्यास केल्यास कळू शकेल.
शेवटी जी तडजोड वय वाढल्यावर करणे अपरिहार्य आहे. त्यासाठी सगळे तारुण्य पणाला लावून अपेक्षांचे ओझे किती काळ वाहायचे एवढे करुन पुन्हा आपण केलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्याचं नाहीत तर मग इतका वेळ म्हणजे वाया गेलेली अमूल्य तारुण्याची वर्षे, घेतलेले efforts आणि वाढलेल्या वयाचे काय?
कृपया संवादाचे पुल बांधून लवकरात लवकर वैवाहिक आयुष्याची स्थिरता कशी प्राप्त करता येईल.यासाठी काय पावले उचलावीत लागतील याचा मुळापासून विचार व्हावा.
*अशी अपेक्षा*
आज अपेक्षेचे ओझे वाढवून
नाहक मुला-मुलींचे वय निघून जात आहे.याची खंत ना मुलांना ना पालकांना.
आजचा काळ ,आजची परिस्थिती काही वर्षांनी तशीच राहिल,हे सांगता येत नाही.आजचा पैसा,सुख,ऐश्वर्य, आरोग्य काही वर्षांनी तसेच राहिल हे सुध्दा सांगता येत नाही.
*पालकांनो आणि मुला-मुलींनो भविष्याचा विचार करुन आजच निर्णय घ्या.*
अपेक्षांच्या जंजाळात अडकून न राहता समजदारीने निर्णय घ्या.योग्य वेळेत,योग्य वयात विवाहाचा निर्णय घ्या.काळ निष्ठुर आहे,चुकीला त्याच्याकडे माफी नाही.
आणि नंतरच्या पश्तापाला अर्थ नाही.
🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
संकल्पना लेखक. के. राजगुरू. ( पुणे )

1 year ago | [YT] | 0

MHALSAKANT FILMS

*सत्य आहे भारतीय संस्कृती नष्ट होत आहे..... महिला मंडळाने विडा उचललाय का ? हिंदू संस्कृती आणि लग्न व्यवस्था संपवायचा...*

*होय, अगदी बरोबर वाचलत तुम्ही. महिला मंडळानेच विडा उचलला हिंदू संस्कृती संपवण्याचा.*
*जगातील सर्वश्रेष्ठ होती आपली हिंदू संस्कृती. या संस्कृतीचा कणा पुरुषप्रधान वर्चस्व, पुरुषप्रधान निर्णय क्षमता. जोपर्यंत घराघरात पुरुषी कारभार होता तोपर्यंत आदर होता, भावना होत्या. मर्यादा होत्या. यामुळेच संस्कृती टिकून होती. अर्थात यात महिलांचा सहभाग होताच*
*1991 च्या ग्लोबलायझेशन पासून काॅम्प्युटरायझेशन, आयटी क्षेत्रावर ताबा मिळवण्यात महिला यशस्वी झाल्या. त्यातही काही गैर नव्हते. परंतु मुलींना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या नादात त्या मुलींना स्वैर सोडले त्यांच्या आईने, हे वास्तव आहे.*
*आपली मुलगी पैसे कमावते, या गर्वात महिलांना आपली मुलगी स्वैराचार करते याचा अभिमान वाटायला लागला. आपली मुलगी सकाळी उशिरा पर्यंत झोपून रहाते, बाहेरच खाणं ऑर्डर करते, मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला जाते, रात्री उशिरा घरी येते, मुलांसारखी वागते, सॅटर्डे संडे कुठे असते माहीत नाही. विकेंड कसा साजरा करते. बापाने विचारले तर मुलीपेक्षा तिच्या आईलाच जास्त राग येतो. "मला मेलीला, आयुष्यभर घरात कोंडून ठेवलेत पण मी मुलीच्या बाबतीत हे ऐकणार नाही." असेच पुरुषांना ऐकून घ्यावे लागेल.*
*कुलधर्म कुळाचार याचे किती जणींना भान आहे ? वडीलधाऱ्यांचा आदर करावा, रामप्रहरी व तिन्हीसांजा देवासमोर दिवा लावलाच पाहिजे, आपल्या घरातून कोणीही रिकाम्या पोटी जाऊ नये. आपल्या घरी कोणीही अपमानित होऊ नये. घरात पूर्ण कपड्यातचं फिरावे, हे सर्व आईने करावयाचे संस्कार आहेत. पण मुली घरात शाॅर्टवर फिरतात याची बापाला लाज वाटते तर आईला अभिमान वाटतो.*
*आपल्या सर्व अत्रृप्त इच्छा महिला आपल्या मुलींच्या रुपाने पूर्ण करुन घेत आहेत.*
*लग्नाच्या मिरवणुकीत महिला व मुली रस्त्यावर नाचतात, त्यांचे घामाने भिजलेले अंग अनोळखी लोक न्याहाळतात तेव्हा घरच्या कर्त्या पुरुषाची मान शरमेने किती खाली जाते याचा विचार किती महिला करत असतील ? काही बोलावे तर, "आम्ही नाचू नयेच का, आम्ही आनंद व्यक्त करुच नये का ? हे ऐकुन घ्यावे लागेल.*
*मुलींच्या लग्नाचे बहुतेक निर्णय मुलगी व आई दोघीच घेणार, वडीलांनी मध्ये बोलणे गुन्हा होत चाललाय. मुलगी आणि तीची आई यांच्यात एक मैत्रीच नात होत चालल आहे ही चांगली बाब असली तरी, मुलीच्या फाॅरवर्ड विचाराला आई कडून चालना मिळते म्हणून ही मैत्री आहे, एखाद्या आईने चालीरीती शिकवायचा प्रयत्न केला तर लगेच त्या आईला तू जुन्या ,मागासलेल्या विचारांची म्हणून हिणवायचे.*
*स्वतःच्या पायावर उभे असलेल्या मुलींची माहेरी, सासरी मनमानी न विचारलेली बरी. फक्त पॅकेज पाहून मुलगा पसंती, लग्न म्हणजे फक्त धिंगाणा, सासरी गेल्यानंतर जुने मित्र रहाणारच. नवीन नवऱ्याला वेळ देण्याऐवजी मैत्री चा उदो-उदो, सासरची मंडळीला एकदम बे किंमत. मुलाच्या आईवडिलांची स्वतःच्या घरातच निर्वासित अवस्था. एवढे करुनही किती दिवस संसार टिकणार हे कुणी सांगू शकत नाही. कारण एकतर मुलींची सहनशीलता कमी होत चालली त्यात आईची फुस आणि स्वतःच्या पायावर उभे असल्याचा माज. शहरी मुलींची वागणूक पाहिल्यावर कोणत्याही वडीलांना आपल्या मुलीची लाज वाटेल.*
*कोणतीही तमा न बाळगता घटस्फोट होत आहेत वर मुलगा नामर्द होता असे बिनधास्त सांगितले जाते. याला मुलींच्या आईची पाठराखण असते.*
*तालुका किंवा खेड्यातील बायांचा वेगळाच खाक्या, बारावी नापास मुलीलाही पुण्यातला इंजीनियरच हवा. त्यांच्या आईंना इंजीनियरच काम काय असतं ते माहिती नाही, इंजीनियर शब्दाच स्पेलिंग येत नाही. तरीही जावई इंजीनिअर पाहिजे तोही दहा लाखा वरील पॅकेजचा. काहींना वाटेल, मग खेड्यातील मुलींना इंजीनियर मिळूच नये का ? तर मिळावा नं पण त्या मुलाच्या अपेक्षांना तुम्ही उतराना...*
*मुलींच्या आईच्या अपेक्षा पाहून त्या माऊलीला विचारावस वाटत,... बाईग तुझ्या बापान वयाच्या कितव्या वर्षी घर बांधले ? तुझ्या नवऱ्यानं आजवर किती रुपये कमावले ?, तू वयाच्या कितव्या वर्षी लाख रुपये पाहिलेस ? स्वत: एसटी मध्ये अर्ध्या तिकिटासाठी कंडक्टरला भांडतेस, तुझ्या नवऱ्याने रेशनच्या साखरेसाठी खोटे आधारकार्ड बनवून घेतले. आणि तुला जावयाचा थ्री बीएचके हवा, दारात लग्ना आधीच फोर व्हिलर हवी, स्वतःच आयुष्य, "साधा भात फोडणीच वरण..., फोडणीचा भात- साध वरण" खाण्यात गेलं, परवाच्या भाकरीत कालच्या पोळ्यांना एकत्र करुन फोडणीचे तुकडे तू खाल्लेस , हे तुझ्या लेकीला सांगून बाहेरच खाण ऑर्डर करणे थांबवायला सांग.*
*बाईग मुलींच्या संसारात सारखी ढवळाढवळ करतेस, तर तुझ्या मुलाच्या संसारात त्याच्या सासरवाडीची ढवळाढवळ तुला चालेल का ?*
*सर्वच महिला अशा आहेत असे अजिबात नाही. अनेक महिलांनी अत्यंत प्रतिकुल स्थितीतही स्वतःच्या हिमतीवर घर तोलून धरलेली उदाहरणे आहेत तर काही पुरुष अपेक्षांचा डोंगर वाढवतात. बायकोच्या पदरा आडून आपला स्वार्थ साध्य करतात.*
*संसार सुरु करण्यासाठी त्या मुलाची काय दमछाक होत असेल, तोही माणूस आहे. घाण्याच्या बैला पेक्षा जास्त त्याला संसारा भोवती फिरावे लागणार याचा विचार कुणी करीत असेल का ?*
*महिलांनो आणि मुलींनो आपल्या अपेक्षांना आवर घाला. मध्यमवर्गीय संसार थाटण्यात काही कमीपणा नाही. घरातील एकच भाकरी अर्धी-अर्धी खाल्लात तर नवरा बायको चे प्रेम नक्कीच वाढेल. जेमतेम बचत करुन एखादी वस्तू खरेदी करुन पहा, तुमच्या आनंदाला पारावार रहाणार नाही.*
*संस्कृती जपा, कुलधर्म कुलाचार, सणवार साजरे करा. मोठ्यांचे मानसन्मान ठेवा, घराचे घरपण सांभाळा. बचत करा, हौसमौज घरच्यां बरोबर करा, बाहेर नाही. आयुष्य फार सुंदर आहे. फक्त पैसा / पॅकेज म्हणजेच सर्वकाही, हे मनातून काढून टाका. शेवटी लग्न ही एक व्यवस्था आहे आणि संसार म्हणजे तडजोड आहे हे विसरुन चालणार नाही.*
सत्य आहे. संस्कृती कोण नष्ट करतोय...

1 year ago | [YT] | 0

MHALSAKANT FILMS

भारतीय गाणसम्राधनी लता मंगेशकर यांनी अनेक भाषेत गाणी गावून भारताची महान गायिका बनून अजरामर झाली.
परंतु लता दीदी नी कधी हि भीम गीत किंवा भारतीय संविधान नायक बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर गाणे गायीले नाही. का बर असं केले दीदी नी, बाबा साहेबांच्या संविधानाने त्यांना हक्क दिला, मग असा दुजा भाव का? हे लोक पूर्वी पासून जातीवादाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खतपानी घालतात, यांच्या या स्वार्थी व कपटी पणामुळे आज याच मंगेशकर हॉस्पिटल ने पुणे मध्ये उपचारा विना एका मातेचा जीव घेतला, हिच का मंगेशकर कुटुंबा ची मानसिकता, या मंगेशकर कुटूंबातील एका तरी व्यक्ती ने या भिसे ताईला साधी श्रद्धांजली किंवा या घटनेचा निषेध तरी व्यक्त केला का? काही चुकले असेल, तर खेद व्यक्त करितो. या पोस्ट मधून कोणाची भावना दुःखाविण्याचा माझा हेतू नाही पण वस्तू स्तिथी मी मांडण्या चा मी प्रयत्न केला आहे.

1 year ago | [YT] | 0

MHALSAKANT FILMS

-ये महाराष्ट्र को क्या दिखा रहे है 😒😒😒 - महाराष्ट्र एक जमाने सुसंस्कृत राज्य था, लेकिन आजकी सोशल मीडिया अणे के बाद पुरी संस्कृती बिघड गयी है, जिस दिन भारत मे टिक टॉक आया उसी दिनसे पुरी युवा पिढी बिघड गयी, रील बनाके नंगा नाच सुरु हो गया, महाराष्ट्र कि 400 साल पुराणी लावणी को बिघड दिया है, बहुत सारी रील स्टार आज लावणी शो निकालके नंगा नाच करके सुसंस्कृत लावणी को गंधा नाच करके पेश किया जा रहा है,बॉलीवुड एक पोर्न इंडस्ट्री बनते जा रहा हे धीरे धीरे
मुंबई में ये नंगापन कब तक चलेगा कोई तो इन लोगों को भगाओ।
सशक्त महिला और अपने आप को बड़ी बड़ी समाज सेविका बताने वाली महिला आखिर इस अश्लीलता पर कब आवाज उठाएगी । ये पहनावा हमारे देश की संस्कृति नहीं हो सकती हे। महिलाओं पर गंदे गंदे गाने गंदे गंदे फिल्मी सीन से लेकर महिलाओं को इस तरह अश्लीलता में परोसा जाता है जिसका कोई जवाब नहीं पर अफसोस हे कि कोई भी सभ्य समाज की महिलाएं इनका विरोध नहीं करती हैं।
महाराष्ट्र बदलता देखो, बिघडता नहीं 🙏🙏

1 year ago | [YT] | 0

MHALSAKANT FILMS

खोट्या नोंदी करून मागासवर्ग ची जमीन महसूल च्या अधिकाऱ्यांच्या मदतीने बळकविनयाचा प्रयन्त केला म्हणून जमीन मिळविणे साठी अवसरी खु. चे शेतकरी अमरण उपोषणास दि. 7/02/2025 पासून मंचर उपविभागीय कार्यालय मंचर या ठिकाणी करणार आहे,कारण गेली दोन वर्ष हे महसूल अधिकारी शेतकऱ्या ला न्याय देत नाही, म्हणून उपोषण करून जमीन परत मिळविणे साठी उपोषण करण्याचे लेखी निवेदन देताना अखिल मातंग चळवळ महा. राज्य चे पदाधिकारी व शेतकरी श्री. काळुराम राजगुरू.

1 year ago | [YT] | 0

MHALSAKANT FILMS

अवसरी खु. पुणे येथील दलित ची जमीन लुबाडण्यास घोडेगाव तहसीलदार महसूल अधिकाऱ्यांची लेन्डमाफियाना मदत...
सविस्तर बातमी -
अवसरी खु. येथील दलित शेतकऱ्याची जमीन गावातील मराठा समाजातील लेन्डमाफियानी तलाठी व सर्कल च्या मदतीने खोट्या नोंदी करून एकूण 5 एकर जमीन लुबाडण्या चा प्रयन्त केला. याचे अपील उपविभागीय अधिकारी मंचर यांच्या कडे दाखल केले. पीडित ने या गुन्हेगारावर फौंजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागितली होती परंतु आज दि. 02/01/2025 रोजी गुन्हेगार यांच्या वर कोणतीही कार्यवाही न करता व अपील ची कोणतीही सुनावानी न करता अपील बंद करून केस निकालात काढली. पिडत ची सर्व जमीन प्रांत यांनी लेन्डमाफियाना लुबाडन्यास मदत प्रांत मंचर यांनी केली असे दिसून येते. न्याय व जमीन मिळविण्या साठी दलित कुटुंब अमरण उपोषण मंचर प्रांत ऑफिस येथे करणार आहे. जो परेंत लेण्डमाफीया वर अक्ट्रासिटी कायद्या नुसार फौंजदारी गुन्हा दाखल होत नाही व खोट्या नोंदी रद्द होत नाही तो परेंत उपोषण दलित करणार आहे.

1 year ago | [YT] | 0

MHALSAKANT FILMS

पुणे जिल्हा उबाठा जिल्हा शाखा प्रमुख ने अवसरी खु. पुणे, या ठिकाणी, मातंग समाजाची जमिनीवर जबरदस्ती ने ताबा घेतला व जमीन तलाठी, सर्कल तहसीलदार यांना पैसे देऊन मुलाच्या नावे केली आहे.

1 year ago | [YT] | 0

MHALSAKANT FILMS

घोडेगाव पुणे तहसीलदार चा महसूल विभाग यांच्या भोंगळ कारभार मुळे अवसरी खु. येथील मागासवर्ग शेतकरी भूमी हिन होणार आहे,लेण्डमाफी्यांना सरळ सरळ, शेतकऱ्या च्या वडिलोपार्जित जमीन ची असलेल्या नोंदी मध्ये बदल करून माफियाला मदत करत आहे. तलाठी व सर्कल बिनधास्त शेतकऱ्यांच्या खोट्या सही करून शेतकऱ्या ने नोंदीस घेतलेली नोंद हरकत माफी्यांना मंजूर करून देत आहे. तहसीलदार यांना या बाबतची चौकशी करण्याचे आदेश दिले असता हि चौकशी 9 महिने चालते, 9 महिन्यात तलाठी व सर्कल सुनावानीस जबाब नोंदविण्यास हजर राहत नाही तरी घोडेगाव तहसीलदार केस बंद केल्या नंतर सर्कल चा जबाब नोंदवून माफिया व सरकारी कर्मचारी यांना वाचवीत आहे. पोलीस तक्रार हि घेत नाही. कारण सर्व विकले गेले आहे, शेतकऱ्याला माफिया जमिनी चा ताबा सोडण्यासाठी, जीवे मारण्याची धमकी, जातीवाचक शिवीगाळ, गुंडाकडून धमकविणे असे प्रकार घडत आहे. शेतकरी न्यायाची भीक मागत आहे, त्याचे सत्य गाऱ्हाने कोणीच समजून घेत नाही, महाराष्ट्र सरकारला अर्ज करून दमला आहे. पुणे कलेक्टर या सर्वावर फौंजदारी गुन्हा दाखल करा असे सांगत आहे, पण पोलीस फौंजदारी गुन्हा सोडा साधी तक्रार हि माफीया विरुद्ध नोंदवून घेत नाही. शेवटी शेतकऱ्या ने आत्म हत्या करण्याचा निर्णय घेतला आहे, जर शेतकऱ्या ने काही बरे वाईट केले तर याला जबाबदार प्रशाशन व लेण्डमाफिया असणार....

1 year ago | [YT] | 0