G मराठी न्यूज

“मी Ganeshshevare नाशिक येथील पत्रकार असून स्थानिक घडामोडी, राजकीय घटना व सामाजिक विषयांवर Gmarathinews या YouTube channel वर व्हिडीओ सादर करतो.”
ईमेल ganeshshevare @gmail. com / मोबाईल (संपर्क): 9623809761/ 8857000626 प्रोफेशनल वापरासाठी
लोकेशन: India / Maharashtra / Nashik


G मराठी न्यूज

पिंपळगाव टोलनाक्यावर पोलीस अधीक्षकांची गाडी अडवली टोल नाक्यावरील गुर्मी वाढली...


कोणत्या ना कोणत्या कारणाने  सतत वादग्रस्त असलेल्या पिंपळगाव टोल नाक्यावर गेल्या काही दिवसापासून टोल नाक्यावरून गांजाचे झाड झाले गायब प्रकरण हे ताजे असताना आता पुन्हा नवीन प्रकरण समोर आले आहे ते म्हणजे चक्क नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या गाडीचा ताफा अडवण्यात आला त्यामुळे पुन्हा एकदा हा वादग्रस्त टोलनाका चर्चेत आला आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची गाडी  पिंपळगाव कडून नाशिकच्या दिशेने जात असताना पिंपळगाव टोल नाक्यावर आली असता स्वतंत्र लेन बंद होती त्यामुळे ते दुसऱ्या लेन मधून जात असताना त्यांची गाडी पाच कर्मचाऱ्यांनी जवळपास  पंधरा ते वीस मिनिटं अडवली तर त्यातील एकाने थेट पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्याशीच अरेरावी सुरू केली त्यामुळे नाईलाजाने त्या पाचही कर्मचाऱ्यांना पिंपळगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून योग्य तपास करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. 




चौकट...

पिंपळगाव टोल नाक्यावर वाढली गुंडा गर्दी 

पिंपळगाव  च्या टोलनाक्याचा इतिहास बघता आता पर्यंत 5 ते सहा लोकप्रतिनिधी ना मारहाण येथील टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे तर चार दिवसांपूर्वी एका दैनिकाच्या उपसंपादकाला देखील दम दाटी येथील कर्मचाऱ्यांनी केली त्याची तक्रार देखील पिंपळगाव पोलीस ठाण्यात दाखल आहे हे प्रकरण ताजे असताना आता थेट पोलीस अधीक्षक यांनाच अरेरावी त्यामुळे या गुंडेशाही विरोधात  पोलीस अधीक्षक नेमकी  काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे

3 years ago | [YT] | 13