.


KB Marathi News

माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असणार चला बघूया

1 year ago | [YT] | 1

KB Marathi News

माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्व कारखानदारांनी शेतकऱ्याच्या ऊसाला जास्त भाव दिल्या कारणाने अभिजीत पाटील यांच्या विरोधात उभे आहेत माढा मध्ये कोण आमदार होणार

1 year ago | [YT] | 6

KB Marathi News

*अभिजीत पाटलांचे बळ वाढले तर शिंदेंना धक्का*
By मुख्य संपादक: विश्वजीत खांडेकर


-November 11, 202409



(प्रमुख उपस्थित: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील तसेच खासदार धैर्यशील मोहिते-पाटील)

प्रतिनिधी /-

संपूर्ण राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हाला मोठी पसंती असल्याचे पाहायला मिळत आहे. माढा मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी या चिन्हाला मतदारांची मोठी पसंती असून या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत पाटील यांना रोज अनेक दिग्गज नेत्यांकडून पाठिंबा दिला जात आहे. तसेच त्यांच्या सभांनाही मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. माढा मतदारसंघांमध्ये अभिजीत पाटील यांनी प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असून बबनराव शिंदे यांच्या यांचे पुत्र श्री रणजीत शिंदे यांना प्रचारात पिछाडीवर सोडले आहे. अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित अरण येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय कोकाटे व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भारत शिंदे यांनी अभिजीत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. संजय कोकाटे यांनी गत पंचवार्षिक निवडणुकी बबनराव शिंदे यांचे प्रमुख विरोधक म्हणून त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

गेल्या आठ दिवसांपासून अभिजीत पाटील यांना अनेक गटांचा पाठिंबा मिळाला असल्याचे दिसत आहे. निवडणुकांमध्ये आमदार बबनराव शिंदे यांना सहकार्य करणाऱ्या अनेक जणांनी यंदा परिवर्तनाचा निर्धार करत अभिजीत पाटील यांना पाठिंबा दिल्याने आमदार बबनराव शिंदे यांच्या गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. अशातच तसेच शेवट पर्यंत प्रयत्न करूनही तुतारी चिन्ह न मिळाल्याने अपक्ष लढण्याची नामुष्की ओढावलेल्या पुत्र रणजीत शिंदे यांच्यासाठी हा फार मोठा धक्का मानला जात असून यामुळे अभिजीत पाटील यांचा विजय सोपा मानला जात आहे.

यावेळी उपस्थित भारतनाना पाटील, संजय बाबा कोकाटे, भारत आबा शिंदे, बाळासाहेब पाटील, राजाभाऊ गायकवाड, अनिल पाटील, मधुकर अण्णा देशमुख, बाबूतात्या सुर्वे, रामकाका म्हस्के, पोपट तात्या अनपट, रावसाहेब नाना देशमुख, बाळासाहेबतात्या ढवळे, बलभीम आप्पा लोंढे, अमोल पाटील, प्रशांत पाटील, रंधवे सर, संजय मस्के, विलास बाप्पा देशमुख, गोविंदभाई देशमुख, ऋषिकेश बोबडे, जगदाळे दीपक आबा देशमुख, आनंद कानडे, भगत सर, विजय पवार, बेंबळे गावचे सरपंच सौदागर जाधव यासह अनेक मान्यवर उपस्थित होते..

1 year ago | [YT] | 1

KB Marathi News

गुडघ्याच्या सर्जरी पेशवे उत्तम ! विश्वदिप आयुर्वेदिची रिमेक थेरपी

2 years ago | [YT] | 3

KB Marathi News

*विरवडे बुद्रुक येथील सकल मराठा समाज बांधवांचे दोन दिवसीय उपोषण*

*शासनाने हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला*


*मोहोळ प्रतिनिधी*

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून 50 टक्के च्या आत सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी विरवडे बुद्रुक येथील मराठा बांधव दोन दिवसीय उपोषणासाठी बसले आहेत.
अंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलकांवर केलेला लाठीचार्ज निषेधार्थ तसेच श्री. मनोज दादा जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने उपोषण सुरू आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा विषय पेटला आहे.मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी.
शासनाने सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी दोन दिवसीय उपोषण शासनाने हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला
या उपोषणामध्ये उपोषणकर्ते श्रीधर घन:शाम पाटील ,किरण अवताडे, संतोष अवताडे , बालाजी गव्हाणे, अनिकेत कोकाटे ,ओम चटके, प्रमोद भालचंद्र आवताडे, भागवत इंगळे आणि समाज बांधव सहभागी झाले आहेत...

2 years ago | [YT] | 5

KB Marathi News

भगीरथ भालके यांनी BRS पक्षामध्ये प्रवेश करावा का ?

2 years ago | [YT] | 5

KB Marathi News

आषाढी यात्रेत व्हीआयपी दर्शन बंद

2 years ago | [YT] | 3

KB Marathi News

परिवर्तनाच्या लढ्याला अभिजीत आबांचा धक्का गुणकारी ठरणार

2 years ago | [YT] | 0

KB Marathi News

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अनोखा विक्रम, चार पिढ्यांनी एकत्र केली पूजा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वडील संभाजी शिंदे, पुत्र श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे उपस्थित*

#pandharpur #Eknath Shinde #आषाढीएकादशी
पंढरपूर - आषाढी एकादशीच्या मंगलदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पांडुरंगाची महापूजा केली

- यंदा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावचे वारकरी श्री. मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी सौ. जिजाबाई नवले या वारकरी जोडप्याला शासकीय पूजेत मनाचे वारकरी म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला. यावेळी त्यांची पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे यांच्यासह श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह- अध्यक्ष ह.भ. प. श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. गजानन गुरव आणि मंदिर समितीचे इतर सदस्य देखील उपस्थित होते.

https://youtu.be/CSIDR08WMig

3 years ago | [YT] | 76

KB Marathi News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अनोखा विक्रम, चार पिढ्यांनी एकत्र केली पूजा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वडील संभाजी शिंदे, पुत्र श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे उपस्थित #pandharpur #Eknath Shinde #आषाढीएकादशी

3 years ago | [YT] | 72