महाराष्ट्रातील सामाजिक,शैक्षणिक ,कृषी,क्रिडा सह विवीध क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेणारे न्यूज चॕनेल..आजच सबस्क्राइब करा..बेल आयकाॕन ला क्लिक करा व शेअर करा.
जन्मदात्या पित्याने सात वर्षाच्या चिमुकलीला केनॉलमध्ये फेकले.. चर्चेला उधाण
नांदेड - ( जिल्हा प्रतिनिधी - अहमद शेख )
एका जन्मदात्या पित्याने आपल्या सात वर्षाच्या मुलीला तेलगंणा राज्यात नेऊन केनॉलमध्ये फेकून देऊन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तेलंगणा राज्यातील पोलिसांनी मुखेड तालुक्यातील रहिवासी असलेल्या आरोपी पित्याला ताब्यात घेतले आहे. हत्येच कारण अद्याप ही अस्पष्ट आहे, मात्र आरोपीला तीन आपत्य आहेत आणि सरपंच पदाची तयारी सुरु केली होती. निवडणुकीत अडथळा होऊ नये या कारणातून पित्याने मुलीची हत्या केल्याची चर्चा मुखेड तालुक्यात सुरु आहे. दरम्यान या घटनेने परिसर हादरून गेला आहे. पांडुरंग कोंडामंगले (वय 32) अस आरोपी पित्याच नाव आहे.
आरोपी पांडुरंग कोंडामंगले हा मुखेड तालुक्यातील केरूर गावातील रहिवासी आहे. त्याचा बाऱ्हाळी येथे कटिंगची दुकान असून त्याला तीन आपत्य आहे. तीन दिवसा पूर्वी पांडुरंग कोंडामंगले याने साहित्य खरेदीसाठी जात असल्याचे पत्नीला सांगून सात वर्षाची चिमुकली प्राची कोंडमंगले हिला सोबत घेऊन गेला. त्यानंतर तेलंगणा राज्यातील कट्टापल्ली परिसरात बोधन रोडवरील कॅनलमध्ये फेकून दिले. त्यानंतर तो घरीएकटाच परत आला. इकडे केनॉलमध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी तपास सुरू केला. पुढील चौकशीत संशय बळावल्याने ३० जानेवारी रोजी तेलंगणा पोलिसांनी मुखेड शहरात येऊन पांडुरंग कोंडामंगले यांना ताब्यात घेतले आणि अटक केली. या घटनेनेनंतर विविध चर्चेला उधाण आलं. आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याच बोलल्या जातं आहे. तर दुसरीकडे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत पांडुरंग कोंडामंगले हा सरपंच पदाचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची त्याची तयारी असल्याची चर्चा होती. पण तीन असल्याने आपल्या निवडणुकीत तिसरे अपत्य अडसर ठरु नये म्हणून तिचा बळी घेतल्याची चर्चा देखील सुरु आहे. हत्येच नेमकं कारण काय याचा तपास पोलीस करत आहे. या घटनेने नांदेड जिल्हा हादरला आहे.
मनिषा स्वप्निल तळेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
केम ( प्रतिनिधी ) केम तालुका करमाळा येथील सौ मनिषा स्वप्निल तळेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ४०वर्ष त्यांच्या पश्चात पती एक मुलगा सासु,सासरे असा परिवार आहे त्या सेवानिवृत्त शिक्षक देवीदास तळेकर यांच्या सुन होत्या त्या स्वामी समर्थ भक्त म्हणून परिचित होत्या त्यांच्या निधनाने केम परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता.
देशमुख पट्टा वि का स सेवा संस्था मर्या कचरेवाडी संस्थेच्या चेअरमन पदी श्री रमेश बबनराव लवटे यांची बिनविरोध निवड
माळशिरस ( प्रतिनिधी - आनिल खंडागळे )
दि.३/१२/२०२५ रोजी संस्थेची सभा कार्यालयात श्री जाधव भाऊसो यांच्या अध्यक्षतेखाली खेडीमेळीच्या वातावरणात पार पडली. सदर सभेसाठी श्री तुकाराम देशमुख कचरेवाडी चे माजी सरपंच नवनाथ भाऊ कचरे , बाजीनाना सर्जे ,अभिजीत पाटील ,सुरेश लवटे ,बंटी लवटे, उमेश लवटे ,रामभाऊ कचरे, भरत कचरे ,संजय तरडे, गोरे सर,बाबा दनाने, विकास तेलंगे पाटील ,माणिकराव पाटील, ॲड नवनाथ देशमुख ,वैभव कोळेकर, पांडुरंग , नवनाथ कचरे ,(रेशन दुकान) सचिव सुनील सर्जे व तानाजी देशमुख हे हजर होते, नूतन चेअरमन श्री रमेश बाबुराव लवटे यांचा सर्व सभासदांच्या वतीने फेटा बांधून सन्मान करण्यात आला.
आमदार चिखलीकरांना लोह्यात धक्का ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष कल्याण सुर्यवंशी भाजपात
नांदेड ( जिल्हा प्रतिनिधी - अहमद शेख )
प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे उपाध्यक्ष तथा लोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष कल्याण सुर्यवंशी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कल्याण सुर्यवंशी यांचा भाजप प्रवेश म्हणजे आ. चिखलीकरांना मोठा धक्का समजला जात आहे. कल्याण सुर्यवंशी यांना मानणारा लोहा शहर व तालुक्यात मोठा वर्ग आहे. मागील अनेक दिवसांपासून आ. चिखलीकर यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. परंतु, अखेर कल्याण सुर्यवंशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व आ. चिखलीकर यांना सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण नेतृत्व मान्य करत भाजपात प्रवेश केला. खा. अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या गळ्यात भाजपचा रुमाल घालून त्यांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी भाजपचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर, कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघाचे भाजप प्रभारी एकनाथ पवार, जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे आदींची उपस्थिती होती.
जगभरातून श्री.सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दिनिमित्त भाविक दाखल
नांदेड ( जिल्हा प्रतिनिधी - अहमद शेख )
भगवान श्री सत्य साईबाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने पुट्टपार्थी, आंध्र प्रदेश येथे ११व्या श्री सत्य साई जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत आज ओडिशाचे राज्यपाल डॉ. हरी बाबू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, श्री सत्यसाई सेवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष निमिष पंड्या, व्यवस्थापकीय विश्वस्त आर. जे. रत्नाकर, माजी केंद्रीय मंत्री खा.डॉ. भागवत कराड यांच्यासह अनेक मान्यवर आणि जगभरातून आलेले भाविक उपस्थित होते.
अध्यक्षपदासाठी एकुण २१२ तर सदस्यपदासाठी २ हजार १५३ नामनिर्देशनपत्र दाखल.
नामनिर्देशनपत्राची १८ नोव्हेंबर 2025 रोजी होणार छाननी
नांदेड , दि.१७ ( जिल्हा प्रतिनिधी - अहमद शेख )
नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व एका नगरपंचायतींच्या सन 2025 मधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी सोमवार 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात करण्यात आली होती. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत नांदेड जिल्ह्यात अध्यक्ष पदासाठी एकुण 212 तर सदस्य पदासाठी 2 हजार 153 नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात आली आहेत.
नामनिर्देशनपत्रांची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी 18 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी 21 नोव्हेंबर 2025 पर्यंत तर अपील असलेल्या ठिकाणी 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 26 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिध्द होईल, अशी माहिती नगरपालिका प्रशासन जिल्हा सहआयुक्त गंगाधर इरलोड यांनी दिली आहे.
नांदेड जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निहाय सोमवार 10 ते 17 नोव्हेंबर 2025 रोजी शेवटच्या दिनांकापर्यंत एकुण नामनिर्देशनपत्राची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
कुंडलवाडी नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकुण 10 तर सदस्यपदासाठी एकुण 155 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
किनवट नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकुण 28 तर सदस्यपदासाठी एकुण 267 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
लोहा नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकुण 5 तर सदस्यपदासाठी एकुण 106 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
हदगाव नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 182 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
उमरी नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकुण 7 तर सदस्यपदासाठी एकुण 104 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
भोकर नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकुण 32 तर सदस्यपदासाठी एकुण 208 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
मुखेड नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकुण 12 तर सदस्यपदासाठी एकुण 122 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
हिमायतनगर नगरपंचायत अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 189 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
धर्माबाद नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकुण 15 तर सदस्यपदासाठी एकुण 160 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
कंधार नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकुण 8 तर सदस्यपदासाठी एकुण 120 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
मुदखेड नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 206 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
देगलूर नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकुण 11 तर सदस्यपदासाठी एकुण 189 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
बिलोली नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 145 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
करमाळा तालुक्यातील केम येथील श्रीराम तर्कसे यांचे पाळलेले मांजर रविवार दि. २नोव्हेंबर पासून घरातुन गेले होते. संपूर्ण कुटुंब मांजराच्या शोधात होते पत्नी सौ. रोहिणी, मुलगा ऋग्वेद, ओम भिल्ल, समर्थ आणि शिव रामदासी हे सर्व जण अव्याहत पणे मांजर शोध मोहिमेवर होते. गावातील बऱ्याच लोकांनी त्याला पकडण्याचा, शोधण्याचा माहिती देण्याचा प्रयत्न केला ते अतिशय घाबरलं असल्यामुळे जवळ येत नव्हते. पंधरा दिवस ते गोडसे गल्ली ते केंगार घर परिसरात फिरत राहिले अखेर पोटात काहीच नसल्याने ते आज जलील मोमीन यांचे घराजवळ आले ते अंगात त्राण नसल्याने भेळकांडत होते. जलील याला आठवलं गावातील ग्रुप वर मांजर हरवल्याची पोस्ट त्यांनी वाचली होती. लगेच त्यांनी मिरजेत फोन केला योगायोगाने चि. ऋग्वेद केम मध्ये त्याला शोधतच होता त्याला मी फोन केला तो लगेच गेला आणि त्याचा आवाज ऐकताच मांजर त्याच्याकडे हळू हळू ओरडत येऊ लागले. त्या मोमीन परिवाराला सुद्धा ते दृश्य पाहून डोळ्यात पाणी आले. जनावरे सुद्धा मालकावर अंत:कारणा पासून प्रेम करतात याची आज प्रचती आली. आम्हाला खूप लोक वेडेपणा समजत होते,दुसरे पाळण्याचा सल्ला देत होते पण बहुतेक लोक येणार, सापडणार असे सांगून आमचा उत्साह टिकवून ठेवत होते. आणखी काही दिवस गेले असते तर कदाचित विपरीत घडले असते पण नियतीला हरवायचा आमचा निश्चय यशस्वी झाला. आणि आमच्या मन्याने काळावर विजय मिळवून आमच्या सहवासाची वीण आणखी घट्ट केली. पूर्व जन्माचे ऋणानुबंध..... ज्या सर्वांनी मदत केली, आधार दिला त्या सर्वाना दंडवत श्री. जलील मोमीन आणि त्याच्या परिवाराचे शतशः आभार. मानले प्राणी मात्रावर दया करा ते आपले उपकार विसरत नाहीत असा संदेश त्यांनी दिला.
हिमायतनगरमध्ये भाजपात इनकमिंग सुरुच डॉ.राजेंद्र वानखेडे नंतर प्रमुख कार्यकर्ते पक्षात दाखल
नांदेड ( जिल्हा प्रतिनिधी - अहमद शेख )
माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या समर्थ नेतृत्वावर विश्वास ठेवून हिमायतनगर येथे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील सुप्रसिध्द नेतृत्व असलेल्या डॉ.राजेंद्र वानखेडे यांनी दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षा प्रवेश केला. त्यानंतर हिमायतनगर शहरासह तालुक्यातून भाजपात इनकमिंग सुरु झाली असून दि.15 रोजी प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे भाजपाची ताकद मोठया प्रमाणात वाढली आहे. माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सुभाष बलपेलवाड ,रुपेश ढोणे, विकास ढोणे, लक्ष्मीकांत ढोणे ,साईड ढोणे, पवन ढोणे, राजू ढोणे ओंकार बजेवाड, शैलेश तोटेवाड , पोशट्टी जाधव, प्रफुल्ल मुधळकर, मंगेश ढोणे, ओंकार पारडकर ,नीलकंठ पवार, मारुती सुरोशे ,इत्यादी कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश केला आहे. हिमायतनगर शहर व तालुक्यातील मागील दोन दिवसातील या पक्ष प्रवेश सोहळयामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद या भागात मोठया प्रमाणात वाढली आहे. सद्या सुरु असलेल्या हिमायतनगर नगर पंचायत व त्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची बाजू भक्कम होणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी या डॉ.राजेंद्र वानखेडे यांच्यासह भारतीय जनता पक्षात आलेल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचे स्वागत केले आहे. यावेळी नांदेडचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, भाजपाचे उत्तर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किशोर देशमुख, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, डॉ.अंकुश देवसरकर आदींची उपस्थिती होती.
Live Maharashtra Zone News
तुम्हाला काय वाटते? लिहा कमेन्टबॉक्स मध्ये....
1 month ago | [YT] | 42
View 5 replies
Live Maharashtra Zone News
जन्मदात्या पित्याने सात वर्षाच्या चिमुकलीला केनॉलमध्ये फेकले.. चर्चेला उधाण
नांदेड - ( जिल्हा प्रतिनिधी - अहमद शेख )
एका जन्मदात्या पित्याने आपल्या सात वर्षाच्या मुलीला तेलगंणा राज्यात नेऊन केनॉलमध्ये फेकून देऊन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी तेलंगणा राज्यातील पोलिसांनी मुखेड तालुक्यातील रहिवासी असलेल्या आरोपी पित्याला ताब्यात घेतले आहे. हत्येच कारण अद्याप ही अस्पष्ट आहे, मात्र आरोपीला तीन आपत्य आहेत आणि सरपंच पदाची तयारी सुरु केली होती. निवडणुकीत अडथळा होऊ नये या कारणातून पित्याने मुलीची हत्या केल्याची चर्चा मुखेड तालुक्यात सुरु आहे. दरम्यान या घटनेने परिसर हादरून गेला आहे. पांडुरंग कोंडामंगले (वय 32) अस आरोपी पित्याच नाव आहे.
आरोपी पांडुरंग कोंडामंगले हा मुखेड तालुक्यातील केरूर गावातील रहिवासी आहे. त्याचा बाऱ्हाळी येथे कटिंगची दुकान असून त्याला तीन आपत्य आहे. तीन दिवसा पूर्वी पांडुरंग कोंडामंगले याने साहित्य खरेदीसाठी जात असल्याचे पत्नीला सांगून सात वर्षाची चिमुकली प्राची कोंडमंगले हिला सोबत घेऊन गेला. त्यानंतर तेलंगणा राज्यातील कट्टापल्ली परिसरात बोधन रोडवरील कॅनलमध्ये फेकून दिले. त्यानंतर तो घरीएकटाच परत आला. इकडे केनॉलमध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी तपास सुरू केला. पुढील चौकशीत संशय बळावल्याने ३० जानेवारी रोजी तेलंगणा पोलिसांनी मुखेड शहरात येऊन पांडुरंग कोंडामंगले यांना ताब्यात घेतले आणि अटक केली. या घटनेनेनंतर विविध चर्चेला उधाण आलं. आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याच बोलल्या जातं आहे. तर दुसरीकडे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत पांडुरंग कोंडामंगले हा सरपंच पदाचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची त्याची तयारी असल्याची चर्चा होती. पण तीन असल्याने आपल्या निवडणुकीत तिसरे अपत्य अडसर ठरु नये म्हणून तिचा बळी घेतल्याची चर्चा देखील सुरु आहे. हत्येच नेमकं कारण काय याचा तपास पोलीस करत आहे. या घटनेने नांदेड जिल्हा हादरला आहे.
5 months ago | [YT] | 7
View 0 replies
Live Maharashtra Zone News
मोडनिंब जि.प.व पं.स.गणासाठी भाजपा,राष्ट्रवादी (शरद पवार ) राष्ट्रवादी ( अजित पवार ) शिवसेना ( उबाठा ) शिवसेना (एकनाथ शिंदे ) की अपक्ष ? कोण मारणार बाजी ? तुम्हाला काय वाटते? लिहा कमेंट बाॕक्स मध्ये ...
6 months ago | [YT] | 40
View 1 reply
Live Maharashtra Zone News
तारीख: ८ डिसें, २०२५
मनिषा स्वप्निल तळेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
केम ( प्रतिनिधी )
केम तालुका करमाळा येथील सौ मनिषा स्वप्निल तळेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ४०वर्ष त्यांच्या पश्चात पती एक मुलगा सासु,सासरे असा परिवार आहे त्या सेवानिवृत्त शिक्षक देवीदास तळेकर यांच्या सुन होत्या त्या स्वामी समर्थ भक्त म्हणून परिचित होत्या त्यांच्या निधनाने केम परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता.
7 months ago | [YT] | 18
View 0 replies
Live Maharashtra Zone News
देशमुख पट्टा वि का स सेवा संस्था मर्या कचरेवाडी संस्थेच्या चेअरमन पदी श्री रमेश बबनराव लवटे यांची बिनविरोध निवड
माळशिरस ( प्रतिनिधी - आनिल खंडागळे )
दि.३/१२/२०२५ रोजी संस्थेची सभा कार्यालयात श्री जाधव भाऊसो यांच्या अध्यक्षतेखाली खेडीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सदर सभेसाठी श्री तुकाराम देशमुख कचरेवाडी चे माजी सरपंच नवनाथ भाऊ कचरे , बाजीनाना सर्जे ,अभिजीत पाटील ,सुरेश लवटे ,बंटी लवटे, उमेश लवटे ,रामभाऊ कचरे, भरत कचरे ,संजय तरडे, गोरे सर,बाबा दनाने, विकास तेलंगे पाटील ,माणिकराव पाटील, ॲड नवनाथ देशमुख ,वैभव कोळेकर, पांडुरंग , नवनाथ कचरे ,(रेशन दुकान) सचिव सुनील सर्जे व तानाजी देशमुख हे हजर होते,
नूतन चेअरमन श्री रमेश बाबुराव लवटे यांचा सर्व सभासदांच्या वतीने फेटा बांधून सन्मान करण्यात आला.
7 months ago | [YT] | 7
View 0 replies
Live Maharashtra Zone News
आमदार चिखलीकरांना लोह्यात धक्का
ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष कल्याण सुर्यवंशी भाजपात
नांदेड ( जिल्हा प्रतिनिधी - अहमद शेख )
प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे उपाध्यक्ष तथा लोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष कल्याण सुर्यवंशी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कल्याण सुर्यवंशी यांचा भाजप प्रवेश म्हणजे आ. चिखलीकरांना मोठा धक्का समजला जात आहे.
कल्याण सुर्यवंशी यांना मानणारा लोहा शहर व तालुक्यात मोठा वर्ग आहे. मागील अनेक दिवसांपासून आ. चिखलीकर यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. परंतु, अखेर कल्याण सुर्यवंशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व आ. चिखलीकर यांना सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण नेतृत्व मान्य करत भाजपात प्रवेश केला. खा. अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या गळ्यात भाजपचा रुमाल घालून त्यांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी भाजपचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर, कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघाचे भाजप प्रभारी एकनाथ पवार, जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे आदींची उपस्थिती होती.
7 months ago | [YT] | 4
View 0 replies
Live Maharashtra Zone News
जगभरातून श्री.सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दिनिमित्त भाविक दाखल
नांदेड ( जिल्हा प्रतिनिधी - अहमद शेख )
भगवान श्री सत्य साईबाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने पुट्टपार्थी,
आंध्र प्रदेश येथे ११व्या श्री सत्य साई जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेत आज ओडिशाचे राज्यपाल डॉ. हरी बाबू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, श्री सत्यसाई सेवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष निमिष पंड्या, व्यवस्थापकीय विश्वस्त आर. जे. रत्नाकर, माजी केंद्रीय मंत्री खा.डॉ. भागवत कराड यांच्यासह अनेक मान्यवर आणि जगभरातून आलेले भाविक उपस्थित होते.
7 months ago | [YT] | 10
View 0 replies
Live Maharashtra Zone News
अध्यक्षपदासाठी एकुण २१२ तर सदस्यपदासाठी २ हजार १५३ नामनिर्देशनपत्र दाखल.
नामनिर्देशनपत्राची १८ नोव्हेंबर 2025 रोजी होणार छाननी
नांदेड , दि.१७ ( जिल्हा प्रतिनिधी - अहमद शेख )
नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व एका नगरपंचायतींच्या सन 2025 मधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी सोमवार 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात करण्यात आली होती. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत नांदेड जिल्ह्यात अध्यक्ष पदासाठी एकुण 212 तर सदस्य पदासाठी 2 हजार 153 नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात आली आहेत.
नामनिर्देशनपत्रांची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी 18 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी 21 नोव्हेंबर 2025 पर्यंत तर अपील असलेल्या ठिकाणी 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 26 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिध्द होईल, अशी माहिती नगरपालिका प्रशासन जिल्हा सहआयुक्त गंगाधर इरलोड यांनी दिली आहे.
नांदेड जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निहाय सोमवार 10 ते 17 नोव्हेंबर 2025 रोजी शेवटच्या दिनांकापर्यंत एकुण नामनिर्देशनपत्राची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
कुंडलवाडी नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण 10 तर सदस्यपदासाठी एकुण 155 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
किनवट नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण 28 तर सदस्यपदासाठी एकुण 267 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
लोहा नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण 5 तर सदस्यपदासाठी एकुण 106 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
हदगाव नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 182 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
उमरी नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण 7 तर सदस्यपदासाठी एकुण 104 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
भोकर नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण 32 तर सदस्यपदासाठी एकुण 208 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
मुखेड नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण 12 तर सदस्यपदासाठी एकुण 122 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
हिमायतनगर नगरपंचायत
अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 189 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
धर्माबाद नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण 15 तर सदस्यपदासाठी एकुण 160 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
कंधार नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण 8 तर सदस्यपदासाठी एकुण 120 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
मुदखेड नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 206 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
देगलूर नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण 11 तर सदस्यपदासाठी एकुण 189 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
बिलोली नगरपरिषद
अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 145 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.
8 months ago | [YT] | 3
View 0 replies
Live Maharashtra Zone News
अखेर प्रयत्न जिंकले!
करमाळा ( तालुका प्रतिनिधी - संजय जाधव )
करमाळा तालुक्यातील केम येथील श्रीराम तर्कसे यांचे पाळलेले मांजर रविवार दि. २नोव्हेंबर पासून घरातुन गेले होते.
संपूर्ण कुटुंब मांजराच्या शोधात होते पत्नी सौ. रोहिणी, मुलगा ऋग्वेद, ओम भिल्ल, समर्थ आणि शिव रामदासी हे सर्व जण अव्याहत पणे मांजर शोध मोहिमेवर होते. गावातील बऱ्याच लोकांनी त्याला पकडण्याचा, शोधण्याचा माहिती देण्याचा प्रयत्न केला ते अतिशय घाबरलं असल्यामुळे जवळ येत नव्हते.
पंधरा दिवस ते गोडसे गल्ली ते केंगार घर परिसरात फिरत राहिले अखेर पोटात काहीच नसल्याने ते आज जलील मोमीन यांचे घराजवळ आले ते अंगात त्राण नसल्याने भेळकांडत होते.
जलील याला आठवलं गावातील ग्रुप वर मांजर हरवल्याची पोस्ट त्यांनी वाचली होती. लगेच त्यांनी मिरजेत फोन केला योगायोगाने चि. ऋग्वेद केम मध्ये त्याला शोधतच होता त्याला मी फोन केला तो लगेच गेला आणि त्याचा आवाज ऐकताच मांजर त्याच्याकडे हळू हळू ओरडत येऊ लागले.
त्या मोमीन परिवाराला सुद्धा ते दृश्य पाहून डोळ्यात पाणी आले.
जनावरे सुद्धा मालकावर अंत:कारणा पासून प्रेम करतात याची आज प्रचती आली.
आम्हाला खूप लोक वेडेपणा समजत होते,दुसरे पाळण्याचा सल्ला देत होते पण बहुतेक लोक येणार, सापडणार असे सांगून आमचा उत्साह टिकवून ठेवत होते. आणखी काही दिवस गेले असते तर कदाचित विपरीत घडले असते पण नियतीला हरवायचा आमचा निश्चय यशस्वी झाला. आणि आमच्या मन्याने काळावर विजय मिळवून आमच्या सहवासाची वीण आणखी घट्ट केली. पूर्व जन्माचे ऋणानुबंध.....
ज्या सर्वांनी मदत केली, आधार दिला त्या सर्वाना दंडवत
श्री. जलील मोमीन आणि त्याच्या परिवाराचे शतशः आभार. मानले
प्राणी मात्रावर दया करा ते आपले उपकार विसरत नाहीत असा संदेश त्यांनी दिला.
8 months ago | [YT] | 5
View 4 replies
Live Maharashtra Zone News
हिमायतनगरमध्ये भाजपात इनकमिंग सुरुच
डॉ.राजेंद्र वानखेडे नंतर प्रमुख कार्यकर्ते पक्षात दाखल
नांदेड ( जिल्हा प्रतिनिधी - अहमद शेख )
माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या समर्थ नेतृत्वावर विश्वास ठेवून हिमायतनगर येथे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील सुप्रसिध्द नेतृत्व असलेल्या डॉ.राजेंद्र वानखेडे यांनी दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षा प्रवेश केला. त्यानंतर हिमायतनगर शहरासह तालुक्यातून भाजपात इनकमिंग सुरु झाली असून दि.15 रोजी प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे भाजपाची ताकद मोठया प्रमाणात वाढली आहे.
माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सुभाष बलपेलवाड ,रुपेश ढोणे, विकास ढोणे, लक्ष्मीकांत ढोणे ,साईड ढोणे, पवन ढोणे, राजू ढोणे ओंकार बजेवाड, शैलेश तोटेवाड , पोशट्टी जाधव, प्रफुल्ल मुधळकर, मंगेश ढोणे, ओंकार पारडकर ,नीलकंठ पवार, मारुती सुरोशे ,इत्यादी कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश केला आहे.
हिमायतनगर शहर व तालुक्यातील मागील दोन दिवसातील या पक्ष प्रवेश सोहळयामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद या भागात मोठया प्रमाणात वाढली आहे. सद्या सुरु असलेल्या हिमायतनगर नगर पंचायत व त्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची बाजू भक्कम होणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी या डॉ.राजेंद्र वानखेडे यांच्यासह भारतीय जनता पक्षात आलेल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचे स्वागत केले आहे.
यावेळी नांदेडचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, भाजपाचे उत्तर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किशोर देशमुख, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, डॉ.अंकुश देवसरकर आदींची उपस्थिती होती.
8 months ago | [YT] | 2
View 0 replies
Load more