जनसामान्यांचा आवाज
भूमिपुत्र हे एक युट्यूब चॅनल आहे. आम्ही जन आंदोलने, जनतेच्या हक्कांसाठी लढणारे, पक्ष, संघटना व कार्यकर्ते यांकडून आलेले व्हिडिओ आहे तसेच अपलोड करून जनतेपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही स्वतः ला कोणतेही न्यूज चॅनल समजत नाही. जनतेचा आवाज जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत आणि कायम राहणार आहोत.
Bhumiputra
Protests took place across Tamil Nadu condemning the ED raids on the residences on former Keralam Chief Minister Pinarayi Vijayan and his family, and the brutal repression of protesting #CPIM workers in Delhi.
केरळचे माजी मुख्यमंत्री पिनारयी विजयन आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या निवासस्थानांवर ईडीने टाकलेले छापे, तसेच दिल्लीत आंदोलन करणाऱ्या #CPIM कार्यकर्त्यांवर झालेल्या क्रूर दडपशाहीचा निषेध करण्यासाठी तामिळनाडूभर निदर्शने करण्यात आली.
50 minutes ago | [YT] | 2
View 0 replies
Bhumiputra
CPI(M) workers came out on the streets across Kerala to protest against the politically motivated Directorate of Enforcement’s (ED) raid on the house of former Kerala Chief Minister and CPI(M) Polit Bureau member Pinarayi Vijayan. Even as the raid was ongoing at his rented residence in Thiruvananthapuram, party workers gathered in large numbers, raising slogans against the Modi government and the ED.
केरळचे माजी मुख्यमंत्री आणि सीपीआय(एम) पॉलिट ब्युरो सदस्य पिनारयी विजयन यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजकीय हेतूने टाकलेल्या छाप्याच्या निषेधार्थ केरळभर सीपीआय(एम) कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. तिरुवनंतपुरममधील त्यांच्या भाड्याच्या निवासस्थानी छापा सुरू असतानाच, पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आणि त्यांनी मोदी सरकार व ईडीच्या विरोधात घोषणाबाजी केली.
1 hour ago | [YT] | 4
View 1 reply
Bhumiputra
CPI(M) workers came out on the streets across Kerala to protest against the politically motivated Directorate of Enforcement’s (ED) raid on the house of former Kerala Chief Minister and CPI(M) Polit Bureau member Pinarayi Vijayan. Even as the raid was ongoing at his rented residence in Thiruvananthapuram, party workers gathered in large numbers, raising slogans against the Modi government and the ED.
2 hours ago | [YT] | 13
View 0 replies
Bhumiputra
२९ मे पासून सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे राज्य अधिवेशन; महाराष्ट्रातील डाव्या पक्षांचे नेते येणार
नंदुरबार : १९७८ पासून आजपर्यंत मार्क्सवाद - फुले - आंबेडकरवाद या क्रांतिकारी तत्त्वज्ञानावर आधारित वाटचाल करणाऱ्या, जल, जंगल व जमीन या आदिवासी अधिकारांसाठी लढणाऱ्या शेतीमालाच्या रास्त भावासह शेतकरी शेतमजुरांच्या हितासाठी दिल्ली किसान आंदोलनापर्यंत संघर्षरत सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे आजच्या संदर्भात राजकीय भूमिका व धोरण ठरवण्यासाठी दिनांक २८ व २९ मे रोजी राज्य प्रतिनिधी अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनाची जाहीर सभा २९ मे २०२६ रोजी क्रीडा संकुल मैदान, शहर पोलीस स्टेशनसमोर, नेहरू चौक, नंदुरबार येथे होणार आहे.
वाघाळे जिल्हा नंदुरबार येथे क्रांतीबा ज्योतिबा फुले नगर क्रांतिवीर बिरसा मुंडा भवन या ठिकाणी होणाऱ्या या २२ व्या राज्य अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून ४२८ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आजच्या आजच्या सामाजिक राजकीय आर्थिक परिस्थितीच्या संदर्भात तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी संदर्भात चर्चा होणार आहे. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या आगामी धोरण व वाटचाली संदर्भात निर्णय घेतले जाणार आहेत.
या अधिवेशनात सामाजिक, राजकीय परिस्थिती बरोबर जंगल, जमीन च्या प्रश्नांवर चर्चा होणार असून पुढील दिशा ठरवली जाणार.
अधिवेशन व जाहीर सभेसाठी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड करणसिंग कोकणी, कॉ किशोर ढमाले, कॉ रणजीत गावित, कॉ प्रतिमा परदेशी, आर टी गावित यांच्यासह महाराष्ट्रातील डाव्या पक्षांचे नेते कॉ. सुभाष लांडे, (भाकपा), कॉ.बाळासाहेब सुरडे, भाकपा (माले), कॉ सुनील मालुसरे, (माकप) कॉ राजेंद्र बावके, (भाकप माले) आयु.श्याम दादा गायकवाड, रिपाई (सेक्युलर)किशोर कर्डक, (फॉरवर्ड ब्लॉक) कॉ. भीमराव बनसोड (लाल निशान)हे मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. तरी संविधान व महामानवांच्या विचार कार्याला मानणाऱ्या जनतेने हजारोंच्या संख्येत उपस्थित रहावे. असे आवाहन सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षा च्या वतीने जिल्हा अध्यक्ष आर.टी.गावीत व जिल्हा सेक्रेटरी दिलीप गावित यांनी केले आहे.
11 hours ago | [YT] | 23
View 0 replies
Bhumiputra
सियाराम मिल मृत कामगाराच्या आरोपीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा - कॉ. राजेंद्र साठे
सियाराम मिल कंपनी गेटवर मृतक हेमराज हुकरे यांची श्रद्धांजली सभा
अमरावती : सियाराम सिल्क मिल नांदगाव पेठ औद्योगिक क्षेत्र, अमरावती मधील हेमराज हुकरे नामक कामगाराचा कंपनी व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे 14 मे रोजी अपघात होऊन 18 मे रोजी मृत्यू झाला. मृत्यूला जबाबदार कंपनी व्यवस्थापन व सुपरवायझर यांचे वर सदोष मनुष्य वधाच्या गुन्हा दाखल करावा अशी मागणी कंपनी गेटवर झालेल्या वस्त्रोद्योग कामगार युनियन सीआयटीयू तर्फे घेण्यात आलेल्या शोक सभेत सिटू राज्य पदाधिकारी कॉ. राजेंद्र साठे यांनी केली.
त्यांनी पुढे सांगितले की, हेमराज हुकरे यांची प्रकृती अत्यवस्थ असल्यानंतर सुद्धा सुपरवायझर यांनी जोर जबरदस्ती करून आपल्या गाडीवर कंपनीत आणले. मशीनवर उभे राहून काम करण्याकरता भाग पाडले. प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे त्यांनी तीनदा विभागीय व्यवस्थापक यांना त्यांच्या केबिनमध्ये जाऊन विनंती केली, त्यानंतर सुद्धा त्याच्यावर बळजबरी करून जबरदस्ती काम करण्यास भाग पाडले. त्यातून त्याला भोवळ येऊन मागे पडला व त्याच्या डोक्याला जबर जखम झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेला कारणीभूत असलेल्या व्यक्तींवर कारवाई होण्यासोबतच त्याच्या परिवाराला 50 लाख रुपये सानुग्रह राशी व त्याच्या आईला दहा हजार रुपये महिना पेन्शन लागू करावे, अशी मागणी करण्यात आली.
श्रद्धांजली कार्यक्रमाला कॉ. प्रमोद कावळे, अमरावती सिटू जिल्हा कॉ. सचिव अंकुश वाघ, जिल्हा सहसचिव ओम प्रकाश वाघमारे, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष निमकर, कामगार प्रतिनिधी आकाश बावणे, जमीर शेख, ज्ञानेश्वर गायकवाड, आशिष जामुनकर, श्याम टाले, विठ्ठल कुमरे सहा इतर कामगार प्रामुख्याने उपस्थित होते.
#amravati #CITU #protest #Andolan #nagpur #workers #worker #maharashtra #navnathmore #अमरावती #कामगार
11 hours ago | [YT] | 2
View 0 replies
Bhumiputra
A protest was held in front of the Tenkasi District Collector’s office under the leadership of #CPIM Tenkasi District Secretary Comrade Uchchimakali, opposing the decision to impose time restrictions and bathing charges at the Courtallam waterfalls.
11 hours ago | [YT] | 9
View 0 replies
Bhumiputra
The farcical raids and the baseless allegations will crumble before the defiant spirit of the millions under the Red Flag.
12 hours ago | [YT] | 16
View 0 replies
Bhumiputra
बीड हत्याकांड प्रकरणी किनवटमध्ये संताप, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मातंग समाज व जातीअंत संघर्ष समिती व मागणी
किनवट, ता. २७ : बीड येथे मातंग समाजातील तरुण उमेश दळवी यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ किनवट येथे मातंग समाज बांधव आणि जातीअंत संघर्ष समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयात आज(ता. २७) निवेदन देण्यात आले. आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, उमेश दळवी यांची काही समाजकंटकांनी अमानुषपणे हत्या केली असून ही घटना केवळ एका व्यक्तीची हत्या नसून मानवतेला काळिमा फासणारी आहे. या घटनेमुळे मातंग समाजात तीव्र संतापाची लाट पसरली असून राज्यातील दलित समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अशा घटना घडणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच पीडित कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत आणि संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.
उमेश दळवी हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा. दोषींना फाशीची शिक्षा द्यावी. पीडित कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत व कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरी द्यावी. पीडित कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. या निवेदनावर जितेंद्र कुलसंगे, माजी नगराध्यक्ष के. मूर्ती, प्राचार्य डॉ. आनंद भालेराव, कॉम्रेड जनार्दन काळे, माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, गंगाधर मुकेनपेल्लीवार, दयानंद काळे, बालाजी कांबळे, बालाजी गायकवाड, ॲड.मिलिंद सरपे यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
13 hours ago | [YT] | 3
View 0 replies
Bhumiputra
राज्यातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार प्रश्नी सिटूचे १,२,३ जून २०२६ रोजी मुंबईत आक्रोश आंदोलन
महाराष्ट्रातील सुमारे ४ कोटी पेक्षा जास्त संख्येने असलेल्या संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या ज्वलंत मागण्यांसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनस् (सिटू) च्या वतीने १,२,३ जून २०२६ रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर कामगारांचा आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये तिन्ही दिवसांत ३० हजारांपेक्षा जास्त कामगार सहभागी होतील.
महाराष्ट्र सरकारने अनेक उद्योगातील कामगारांचे किमान वेतन गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून सुधारणा केलेली नाही, त्यामुळे कामगारांना अल्प वेतनावर काम करावे लागत आहे. महागाई लक्षात घेऊन आठ तासाच्या कामासाठी ३० हजार रुपये किमान वेतन कायद्याने निश्चित करावे.
राज्यामध्ये खाजगी क्षेत्र तसेच सरकारचे विविध खात्यात, योजना, नगरपालिका महानगरपालिका मध्ये लाखोच्या संख्येने कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत. वर्षानुवर्षे काम करूनही त्यांना कायम केले जात नाही. या कामगार कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे व समान कामाला समान वेतन देण्यात यावे.
राज्यामध्ये एकात्मिक बाल विकास योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, या व अन्य अनेक योजनांमध्ये काही लाख कर्मचारी काम करत आहेत. सरकारी योजनेचे काम करत असतानाही त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा दिलेला नाही व अल्प मानधनावर त्यांच्याकडून काम करून घेतले जाते आणि वेळेवर आणि नियमित कामाचा मोबदला/मानधन/पगार दिला जात नाही. म्हणून यांना कायम करण्यात यावे व सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि लाभ द्यावेत.
राज्यामध्ये तीन कोटीपेक्षा जास्त असंघटित कामगार काम करतात. केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने असंघटित कामगारांसाठी अनेक आश्वासन दिले परंतु प्रत्यक्षामध्ये अजूनही असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळेही स्थापन करण्यात आलेली नाहीत. तसेच कल्याणकारी योजना लागू करण्यासाठी एक रुपयाचीही तरतूद करण्यात आलेली नाही व असंघटित कामगारांची फसवणूक करण्यात येत आहे. या तीन कोटीपेक्षा जास्त संख्येने असलेल्या असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्यासाठी निधीची तरतूद करा.
संघटित व असंघटित क्षेत्रातील लाखो कामगार ई.एस.आई.सी, प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन या लाभापासून वंचित आहेत. ई.एस.आय चे दवाखाने व हॉस्पिटल्स अद्यावत करावीत, राज्यातील सर्व कामगारांना ई.एस.आई.सी लागू करावी, प्रॉव्हिडंट फंड व पेन्शन सर्व कामगारांना लागू करावे.
केंद्र सरकारने कामगार संघटनाचा तीव्र विरोध असतानाही चार श्रमसंहिता लागू केले आहेत. महाराष्ट्र सरकारने यापूर्वी चार श्रमसंहिता लागू करणार नाही असे आश्वासन दिले असतानाही आता मात्र या चार श्रम संहिता लागू करण्यासाठी पावले उचलली आहेत, त्यामुळे या चार श्रमसंहिता महाराष्ट्रात लागू करू नयेत.
राज्यात महागाई व बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पेट्रोल डिझेल गॅस याची टंचाई निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस दर वाढवले जात आहेत. मात्र कामगारांचे उत्पन्न वाढत नाही अशा परिस्थितीत महागाई आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत.
सदर आंदोलनामध्ये राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, छ. संभाजीनगर, जालना, नांदेड, सोलापूर, ठाणे, पालघर, अहिल्यानगर, सांगली, सातारा, नागपूर, वर्धा, अमरावती, बुलडाणा, रायगड, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, जळगाव, धुळे, नंदुरबार, रत्नागिरी, हिंगोली, लातूर, धाराशिव, गोंदिया, परभणी येथून मोठ्या संख्येने व अन्य जिल्ह्यांतून कामगार आंदोलनात सहभागी होणार आहेत. तसेच खाजगी औद्योगिक क्षेत्रातील औद्योगिक कामगार, कंत्राटी व अस्थायी, शिकाऊ कामगार, अंगणवाडी, आशा, गटप्रवर्तक, शालेय पोषण, स्त्री परिचर, १०८ ॲम्बुलन्स पायलट व टेक्निशियन, आरोग्यमित्र इत्यादी योजना कर्मचारी, असंघटित क्षेत्रातील घर कामगार, बांधकाम मजूर, माथाडी कामगार, ऊसतोड मजूर, रिक्षाचालक वाहतूक कामगार, बिडी कामगार, यंत्रमाग कामगार, पदपथ विक्रेते/हॉकर्स, रेडिमेड इत्यादी असंघटित क्षेत्रातील कामगार हजारोच्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या संदर्भात कामगार वर्गांच्या मागण्याची निवेदने माननीय मुख्यमंत्री, कामगार मंत्री, आरोग्य मंत्री, शिक्षण मंत्री, पर्यावरण मंत्री इत्यादींना या अगोदरच दिलेली आहेत.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या :
१. ८ तासाचे कामासाठी दरमहा रुपये ३०,००० किमान वेतन लागू करा. ज्यादा कामाचा मोबदला दुप्पटदाराने द्या
२. खाजगी, निमशासकीय, शासकीय, सार्वजनिक सेवा, स्थानिक स्वराज्य संस्था इ. विभागातील कंत्राटी शिकाऊ, निश्चित कालीन कामगार कर्मचाऱ्यांना कायम करा. समान कामाला समान वेतन व लाभ लागू करा.
३. अंगणवाडी,आशा, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार, राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी इत्यादी योजना कर्मचाऱ्यांना कायम करा. त्यांना ई.एस.आय.सी, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी, पेन्शन इत्यादी सामाजिक सुरक्षा लागू करा.
४. संघटित कामगारांसाठी स्वतंत्र सामाजिक सुरक्षा कायदा करा, कल्याणकारी मंडळे कार्यान्वित करा, त्यासाठी आर्थिक तरतूद करा.
५. कार्पोरेट धार्जिणे व कामगार विरोधी चार श्रमसंहितांची राज्यात अंमलबजावणी करू नका.
६. बांधकाम कामगारांच्या नोंदणी/नुतनीकरण सुलभ करा. लाभाचे रक्कम दुप्पट करा, पुर्वी प्रमाणे मेडिक्लेम योजना लागू करा.
७. फेरीवाला धोरण- २०१४ ची अंमलबजावणी करा व त्यांच्या व्यवसायाला संरक्षण द्या.
८. विडी कामगारांसाठी रोख मजूरी, सुधारित किमान वेतन रु. ४०२ व पेन्शन रु १०,००० द्या.
९. यंत्रमाग कामगारांना सुधारित किमान वेतन व कल्याणकारी मंडळ स्थापन करा.
१०. रिक्षा चालकांच्या आनंद दिघे महामंडळाच्या नोंदणीसाठी रु ८०० आकारण्यात येते त्याऐवजी फक्त एक रुपया मध्ये नोंदणी करावी.
११. घरकामगार मंडळासाठी पुरेसा निधी उपलब्ध करा.
१२. महागाई रोखण्यासाठी तातडीने पावले उचला, स्वयंपाकासाठी व वाहनांसाठी गॅसची उपलब्धता करा.
सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये सभा, मेळावे, बैठका सुरू आहेत. आंदोलनात सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांची नोंदणी व संमती पत्र घेणे सुरू आहे. आंदोलनात सीटू चे अखिल भारतीय स्तरावरील अनेक उच्चपदस्थ नेते सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत.
सरकार स्थापनेपासून वेळोवेळी कामगारांच्या प्रश्नाबद्दल चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांना निवेदन दिली परंतु चर्चेसाठी त्यांनी वेळ दिला नाही, त्यामुळे हे आक्रोश आंदोलन आयोजित करावे लागत आहे. सरकारने कामगारांचे प्रश्न, दुःख व समस्या समजून घेऊन त्यावर मार्ग काढावा असे संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
आपला नम्र
डॉ.डी.एल. कराड - राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष सीटू
अॅड. एम.एच. शेख - राज्य महासचिव सीटू
कॉ. के.आर. रघु - राज्य खजिनदार
13 hours ago | [YT] | 16
View 0 replies
Bhumiputra
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, राज्यस्तरीय अभ्यास शिबीर
14 hours ago | [YT] | 17
View 0 replies
Load more