वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत लातूरमधील प्रसिद्ध ‘आरसीसी’ कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकरला आज सोमवारी अटक केली. या प्रकरणात मोटेगावकरचा सक्रिय सहभाग असल्याचे पुरावे सीबीआयला मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या अटकेमुळे महाराष्ट्रातील सहा जणांचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी पदभार स्विकारला आहे आणि यानंतर आज शिवजयंतीनिमित्त शिवनेरी गडावर आयोजित शासकीय कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. दरम्यान, या कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. त्यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले स्वराज्य आजही सुशासनाची प्रेरणा देते. शिवरायांच्या विचारांवर चालत बलशाली व स्वाभिमानी महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. किल्ले शिवनेरीवर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते.
छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
टी20 वर्ल्डकप 2026 साठी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला गेलेल्या भारत विरूद्ध पाकिस्तान या हाय-व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी करत पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला. या सामन्यात ईशान किशनच्या अर्धशतकाच्या मदतीने भारताने पाकिस्तानसमोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले. दरम्यान, गोलंदाजी करताना हार्दिक पांड्या आणि बुमराह जोडीने पाकिस्तानच्या फलंदाजीचे अक्षरशः कंबरडे मोडल्याने 114 धावांवर पाकिस्तान संघ सर्वबाद झाला अन् 61 धावांनी भारताचा विजय झाला.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना रविवारी १५ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. भारत- पाकिस्तान सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना हा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक ६:३० वाजता होईल.
आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा थरार 7 फेब्रवारीपासून सुरू झाला असून, उद्घाटन सामन्यातच टीम इंडियाने विजयी सलामी दिली आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या लढतीत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अमेरिकेचा 29 धावांनी पराभव केला. 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अमेरिकन संघाला निर्धारित 20 षटकांत 132 धावांपर्यंतच मजल मारता आली.
जळगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठीची निवड प्रक्रिया काल, गुरुवार दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेत पार पडली. या विशेष सभेत जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी दीपमाला मनोज काळे यांची तर उपमहापौर पदासाठी मनोज सुरेश चौधरी यांची निवड करण्यात आली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल 28 जानेवारी रोजी सकाळी विमान अपघातात दुर्दैवीपणे निधन झाल्याने संपुर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या धक्कादायक अपघाताची माहिती मिळताच पवार कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. दरम्यान, आज सकाळी अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडी या त्यांच्या मूळगावी अंत्यदर्शनासाठी नेण्यात आलं होतं. त्यानंतर, बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. शोकाकूल वातावरणात साश्रू नयनांनी अजित दादांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी ‘अजित दादा अमर रहे...अमर रहे, अजित दादा परत या...परत या' अशा घोषणा देण्यात आल्या.
Suvarna Khandesh Live News

#shivrajmategaonkar #neetpaperleak #cbi #paperleak
2 weeks ago | [YT] | 3
View 0 replies
Suvarna Khandesh Live News
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनःपुर्वक शुभेच्छा.
#maharastradin #1maymaharashtraday #maharastraday #marathi #maharastra
1 month ago | [YT] | 3
View 0 replies
Suvarna Khandesh Live News
राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी पदभार स्विकारला आहे आणि यानंतर आज शिवजयंतीनिमित्त शिवनेरी गडावर आयोजित शासकीय कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. दरम्यान, या कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
#chhatrapatishivajimaharaj #eknathshinde #devendrafadnavis #sunetrapawar #eknathshinde #shivjayanti
3 months ago | [YT] | 5
View 0 replies
Suvarna Khandesh Live News
छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. त्यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले स्वराज्य आजही सुशासनाची प्रेरणा देते. शिवरायांच्या विचारांवर चालत बलशाली व स्वाभिमानी महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. किल्ले शिवनेरीवर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते.
#chhatrapatishivajimaharaj #eknathshinde #devendrafadnavis #sunetrapawar #eknathshinde #shivjayanti #shivjayanti2026
3 months ago | [YT] | 8
View 0 replies
Suvarna Khandesh Live News
छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
#chhatrapatishivajimaharaj #eknathshinde #devendrafadnavis #sunetrapawar #eknathshinde #shivjayanti #shivjayanti2026
3 months ago | [YT] | 0
View 0 replies
Suvarna Khandesh Live News
टी20 वर्ल्डकप 2026 साठी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला गेलेल्या भारत विरूद्ध पाकिस्तान या हाय-व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी करत पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला. या सामन्यात ईशान किशनच्या अर्धशतकाच्या मदतीने भारताने पाकिस्तानसमोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले. दरम्यान, गोलंदाजी करताना हार्दिक पांड्या आणि बुमराह जोडीने पाकिस्तानच्या फलंदाजीचे अक्षरशः कंबरडे मोडल्याने 114 धावांवर पाकिस्तान संघ सर्वबाद झाला अन् 61 धावांनी भारताचा विजय झाला.
#indvspak #indiavspakistan #worldcup2026 #t20worldcup
3 months ago | [YT] | 0
View 0 replies
Suvarna Khandesh Live News
भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना रविवारी १५ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. भारत- पाकिस्तान सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना हा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक ६:३० वाजता होईल.
#indvspak #worldcup2026 #t20worldcup2026 #colombo
3 months ago | [YT] | 1
View 0 replies
Suvarna Khandesh Live News
आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा थरार 7 फेब्रवारीपासून सुरू झाला असून, उद्घाटन सामन्यातच टीम इंडियाने विजयी सलामी दिली आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या लढतीत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अमेरिकेचा 29 धावांनी पराभव केला. 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अमेरिकन संघाला निर्धारित 20 षटकांत 132 धावांपर्यंतच मजल मारता आली.
#t20worldcup #worldcup2026 #suryakumaryadav #indvsusa #cricketupdates
3 months ago | [YT] | 6
View 0 replies
Suvarna Khandesh Live News
जळगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठीची निवड प्रक्रिया काल, गुरुवार दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेत पार पडली. या विशेष सभेत जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी दीपमाला मनोज काळे यांची तर उपमहापौर पदासाठी मनोज सुरेश चौधरी यांची निवड करण्यात आली.
#jalgaonmahanagarpalika #mayor #deepmalakale #manojchudhary #jalgaonnews
3 months ago | [YT] | 1
View 0 replies
Suvarna Khandesh Live News
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल 28 जानेवारी रोजी सकाळी विमान अपघातात दुर्दैवीपणे निधन झाल्याने संपुर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या धक्कादायक अपघाताची माहिती मिळताच पवार कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. दरम्यान, आज सकाळी अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडी या त्यांच्या मूळगावी अंत्यदर्शनासाठी नेण्यात आलं होतं. त्यानंतर, बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. शोकाकूल वातावरणात साश्रू नयनांनी अजित दादांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी ‘अजित दादा अमर रहे...अमर रहे, अजित दादा परत या...परत या' अशा घोषणा देण्यात आल्या.
#ajitpawar #baramatinews #planeaccident #rip
4 months ago | [YT] | 10
View 0 replies
Load more