Amcha Maharashtra

"Amcha Maharashtra: A news channel dedicated to bringing you the latest updates, in-depth analysis, and authentic stories from every corner of Maharashtra. From politics to culture, agriculture to urban development, and local to global perspectives, we ensure our viewers stay informed and connected to the pulse of the state. 'Amcha Maharashtra'—your trusted source for real and reliable news.
Amcha Maharashtra News
Maharashtra Samachar
Maratha Bulletin
Lok Maharashtra
Desh Maharashtra News
Maha Varta
Maharashtra Today
Maharashtra Express
Pudhari News
Maharashtra News
Lokshahinews #marathinewslive #maharashtranews
#maharashtrapolitics #marathinews #devendrafadnavis
#cmdevendrafadanvis #eknathshinde #ajitpawar #mahayutigovernment
#mahayuti #mua #nanapatole #uddhavthackeray #sharadpawar
#manojjarange #thackerayusshinde #beed #santoshdeshmukh
#dhananjaymunde #christmas #merrychristmas
youtube.com/@AmchaMaharashtra4727


Amcha Maharashtra

काल एका जुन्या मैत्रिणीचा मेसेज आला.

'सर असं करतील वाटलं नव्हतं.'

साधारण अठरा वर्षांपूर्वीचा काळ. आम्ही शाहू मध्ये होतो. तेव्हा शाहू कॉलेज म्हणजे लातूर मधलं अग्रणी. खाजगी ट्युशन्स तेव्हाही होत्याच. पण Shahu was the centre and soul of Latur pattern. बारा तासांचं हेक्टीक कॉलेज करून जवळपास सगळे विद्यार्थी पुन्हा बाहेरच्या ट्युशन्सना जायचे. प्रत्येक विषयाचे क्लासेस ठरलेले होते. केमिस्ट्री साठी सगळे मोट्याकडे जायचे. म्हणजे मोटेगावकर कडे. विद्यार्थ्यांमध्ये या विभूतीचं हेच नाव प्रचलित होतं. सगळ्याच बाबतीत अतिहुशार असल्यामुळे आम्ही काही कधी तिकडे फिरकलो नाही. त्यामुळे रेणूकाईचा (RCC) फर्स्ट हँड एक्सपिरिअन्स माझ्याकडे नाही. पण मैत्रिणींमुळे कळायचं, त्या माणसाचा प्रचंड ऑरा होता. विद्यार्थ्यांना खेचून आणण्याची हातोटी, विषयावरचं प्रभुत्व, हसत खेळत शिकवण्याची कला. सगळं. सतत त्याच्या क्लासची चर्चा सुरु असायची पोरा-पोरींमध्ये. सर असं म्हणाले, सरांनी तसं केलं And what not. अफाट क्रेझ होती या मास्तरची. मला आठवतंय साध्या पत्र्याच्या हॉलमध्ये चालायचे तेव्हा क्लासेस.

आमची बारावी झाली. तेव्हा नीट नव्हती. सगळ्यांसाठी CET होती. काही अत्युच्च कोटीच्या तेजस्वी लोकांसाठी AIEEE होती. असो. त्यानंतरच्या दहा वर्षांमध्ये लातूरचा अॅकडमीक चेहराच बदलला. आता शाहू सेंटर राहिलेलं नव्हतं. RCC सेंटर झालेलं होतं. ट्युशनचे हॉल जाऊन मोठमोठे कॉम्प्लेक्स उभे राहिले होते. आमच्यावेळी बऱ्यापैकी शुकशुकाट असलेला सूतमील एरिया आता ट्युशन एरिया झालेला होता. केंद्रस्थानी RCC ची भव्य इमारत. आजूबाजूला त्यांचं एम्पायर. होस्टेल्स, हॉटेल्स, फूड जॉइन्ट्स कुठलंच क्षेत्र RCC ने सोडलं नाही. लोंढ्यांसारखी पोरं यायला लागली राज्यभरातून. या RCC पासून हातभर अंतरावर राहते मी. इथे घरोघरी हॉस्टेल आणि मेस आहेत. सगळीकडे विद्यार्थीच विद्यार्थी. प्राईम टाईमला इथून चालणंही मुश्किल व्हावं इतकी गर्दी. गँग वॉर, खून सगळं इथे झालेलं आहे. त्यामुळे सतत पोलिस तैनात असतात.

वीस वर्षांत या रेणूकाई क्लासेसने लातूरवर अक्षरशः अधिराज्य गाजवलं. त्याच्या बरोबरीचे सगळे मागे पडले. आमच्यावेळचे इतर नावाजलेले क्लासेस आता फारसे चर्चेतही नाहीत. सगळीकडे फक्त RCC. इथे नीट वगैरे तर सोडा, पाचवी-सहावी पासून नीट-जेईई साठीचे फाऊंडेशन क्लासेस सुद्धा चालतात. आणि त्यासाठीही तूफान गर्दी असते. फीसही तशीच रग्गड असते. क्लास सुटायच्या वेळेला तिथून गाडी हाकणं म्हणजे दिव्य !

पत्र्याच्या हॉलपासून अवाढव्य एम्पायर पर्यंतची ही जी रॉकेटच्या स्पीडने झालेली प्रगती आहे ती मोटेगावकरच्या करिश्म्याने झाली असावी असा जुन्या विद्यार्थ्यांचा भाबडा समज असू शकतो. पण हे चित्र कायम शंकास्पद वाटावं असा या RCC चा दबाव आणि प्रभाव लातूरमध्ये आहे.

आमच्यावेळची काही हजारातली फीस ते आताची लाखोंची पॅकेज्ड फीस या प्रवासात नैतिकतेच्या, गरीब विद्यार्थ्यांच्या स्वप्नांच्या चिंध्या उडत गेल्या हे मात्र खरं !

पी. व्ही. कुलकर्णी, मोटेगावकर आणि इतर सगळे यांचा आता खोलात जाऊन तपास व्हावा आणि राजकीय हस्तक्षेपाने प्रकरण दाबलं जाऊ नये इतकी अपेक्षा.

संजीवनी देशपांडे

1 month ago | [YT] | 88

Amcha Maharashtra

📢📢📢खूप लवकर आपल्या अमचा महाराष्ट्र चॅनलवर एक नवीन अपडेटसह कमबॅक दिसणार आहे.
फेस व्हिडिओज आणि व्हॉइस ओव्हर
व्हिडिओजपासून नवीन सुरुवात होईल.
स्टे ट्यून्ड! 💥💥💪

1 month ago | [YT] | 93

Amcha Maharashtra

बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मंगळवारी रात्री मध्य कोलकाता मध्ये काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर खळबळ उडाली. या व्हिडिओंमध्ये काही दुकानांवर बुलडोझर चालवतानाचे दृश्य दिसत आहेत. बुलडोझरसह आलेल्या काही लोकांच्या गटाने ऐतिहासिक हॉग मार्केट परिसरात तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या कार्यालयाला लक्ष्य केल्याचा आरोप आहे.

या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांना आपली दुकाने घाईघाईने बंद करावी लागली. टीएमसीसह पक्षाच्या अनेक नेत्यांनी, ज्यात महुआ मोइत्रा यांचाही समावेश आहे, भाजपवर हे व्हिडिओ शेअर करत बुलडोझर कारवाई केल्याचा आरोप केला आहे.

टीएमसीचे न्यू मार्केट युनियन कार्यालय हे मुख्य लक्ष्य असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात कार्यालयाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे. परिसरातील तोडफोडीचे फोटो आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून स्थानिक दुकानदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

#Kolkata #WestBengal #TMC #BulldozerAction #MahuaMoitra

1 month ago | [YT] | 33

Amcha Maharashtra

TMC BJP #Bangal election #UddhavThackeray Maharashtra Rajthackeray shivsena MNS Congress RahulGandhi marathi NCP Ajit Pawar eknathshinde Devendrafadnavis SanjayRaut

2 months ago | [YT] | 57

Amcha Maharashtra

Ashok Kharat Case | फार्म हाऊसवरील भोंदू खरातचा काळा खेळ उघड! व्हिडीओत महिलांबरोबर आक्षेपार्ह कृत्य; स्वयंपाक्याने केले चित्रीकरण

नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून, आता त्याच्या फार्महाऊसवरील कथित काळे कारनामे उघडकीस आले आहेत. खरातच्या फार्म हाऊसवर काम करणार्‍या स्वयंपाकी कर्मचार्‍याने घरातील काही संशयास्पद हालचालींचे व्हिडीओ चित्रीकरण केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. या व्हिडीओमध्ये खरात महिलांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

विशेष म्हणजे, या स्वयंपाकी कर्मचार्‍याला खरातच्या जवळच्या एका व्यक्तीने मुद्दाम त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी फार्महाऊसवर कामावर ठेवले होते, हेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर खरातच्या ऑफिसबॉयनेही अनेक महत्त्वाची माहिती उघड करत फार्महाऊसवरील संशयास्पद हालचालींचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज विशेष तपास पथकाच्या हाती लागले असून, त्यातून आणखी गंभीर आणि धक्कादायक पुरावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिस कोठडीत असताना अशोक खरात तपासात सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला चौकशीदरम्यान उत्तर देण्यास टाळाटाळ करणारा खरात आता ‘काही आठवत नाही’, अशी भूमिका घेत असल्याने त्याची गजनी ट्रिक चर्चेचा विषय ठरली आहे. यापूर्वीही प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण देत तपास चुकवण्याचा प्रयत्न त्याने केला होता.

अटकेच्या दिवशीच जमीन व्यवहार
भोंदू अशोक खरात प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक वळण समोर आले आहे. पोलिसांनी अशोक खरातला अटक केलेल्या दिवशीच त्याची पत्नी कल्पना खरात हिच्या नावे नवी मुंबईजवळील उरण येथे मोठा जमीन व्यवहार पूर्ण झाल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. उरण परिसरात तब्बल 20 गुंठे जमीन 58 लाख 50 हजार रुपयांना खरेदी करण्यात आली. विशेष म्हणजे, ज्या दिवशी अशोक खरातला अटक झाली, त्याच दिवशी हा व्यवहार अधिकृतरीत्या कागदोपत्री पूर्ण करण्यात आला. एकीकडे पत्नी कल्पना खरात शिर्डीतील भूखंड बळकावण्याच्या प्रकरणात फरार असून राहाता न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

खरातला मदत करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई : बावनकुळे
भोंदू खरातला मदत करणार्‍या महसूल अधिकार्‍यावर निश्चितच कारवाई होईल व त्यांना बडतर्फ करण्यात येईल. अंतिम अहवाल प्राप्त होताच कठोर पावले उचलली जातील. तसेच, या प्रकरणात इतर विभागातील अधिकारी सहभागी असतील तरी त्यांची माहिती एसआयटीकडे पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘कोणीही दोषी सुटणार नाही,’ महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.भोंदू अशोक खरातने काळ्या कारनाम्यांनी उभारलेल्या साम्राज्यामागील धागेदोरे आता उलगडू लागले असून, त्याला मदत करणार्‍या बड्या अधिकार्‍यांवरही कडक कारवाईचे संकेत मिळत आहेत.

खरातकडून हवेतून काजू कतली काढून कोट्यवधींची लूट!
अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची मानसिक फसवणूक करत कोट्यवधी रुपये उकळणार्‍या भोंदू अशोक खरातच्या कारनाम्यांचा संपूर्ण घटनाक्रम उघडकीस आला असून, समाजमनाला हादरवणारा हा प्रकार ठरत आहे. 2017 मध्ये एका चार्टर्ड अकाऊंटंटशी संपर्क साधताना खरातने सुरुवातीला अत्यंत विश्वासार्ह वर्तन करत त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर चमत्कार दाखवण्याच्या नावाखाली मोकळा हात दाखवत हवेतून काजू कतली काढल्याचा बनाव केला आणि ‘हा प्रसाद’, असे म्हणत संबंधित सीएला प्रभावित केले.

2 months ago | [YT] | 26

Amcha Maharashtra

मराठी सक्तीच्या मुद्द्यात संजय निरुपम यांचे थेट विधान, बैठकपूर्वी म्हणाले, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सर्व..
1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यानंतर आता मोठा वाद निर्माण झाला. बरेच रिक्षा आणि टॅक्सीचालक आपल्या गावी परतत आहेत. शिवसेना नेते संजय निरुपम यांनी यादरम्यानच अत्यंत मोठे विधान केले.
1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यामध्ये सरकारमध्ये दोन गट बघायला मिळत आहेत. मुंबईतील अमराठी रिक्षा आणि टॅक्सीचालक संतापले आहेत. शिवसेना नेते संजय निरुपम यांनी या निर्णयाला विरोध केला. मनसे कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांना टार्गेट करत हल्ला केला. या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध भूमिका घेतली. मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत मंत्रालयात आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे. रिक्षा टॅक्सीचालक संघटनेच्या प्रतिनिधिंसोबत ही बैठक होणार आहे. या बैठकीकडे राज्याच्या नजरा आहेत. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात ही बैठक होणार आहे. कामगार नेते शशांक राव आणि संजय निरुपम या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता ही बैठक होणार आहे. आता नुकताच संजय निरुपम यांनी या बैठकीपूर्वी अत्यंत मोठे विधान केले.
संजय निरुपम यांनी म्हटले की, महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान झालाच पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे. महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांनी मराठी भाषा बोलली पाहिजे. मराठीमध्ये संवाद केला पाहिजे, यामध्ये काहीही मतभेद नाहीत, काहीही वाद नाही. फक्त जीआरमध्ये एक तरतुद आहे 1 मे पासून प्रत्येक रिक्षाचालक आणि टॅक्सीचालकाने आरटीओमध्ये मराठी भाषेचे जे ज्ञान आहे त्याची तपासणी होईल. मराठी भाषेची त्यांची एक परीक्षा होईल.
समजा त्यामध्ये ते नापास झाले तर.. त्या जीआरमध्ये असे सांगितले गेले की, त्यांचे परमिट रद्द केले जाईल, त्यांचे लायसन्स जप्त होईल आणि जो बॅच असतो तो देखील जप्ती होईल. हा एक मोठ्या वादाचा विषय आहे. मी माझ्या पक्षाचे जे नेते आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना एक पत्र पाठवले आणि सांगितले की, तुम्ही जो मराठी सक्तीचा जो प्रस्ताव ठेवत आहेत तो थोडा अन्यायकारक आहे.
पुढे संजय निरुपम यांनी म्हटले, कारण जे रिक्षाचालक आणि टॅक्सीचालक आहेत, ते सर्व मराठी बोलू शकत नाहीत, असे नाही. खूप सारे मराठी बोलू शकतात. समजा ज्यांना मराठी बोलता येत नाही. समजा तुमच्या परीक्षेत नापास झाले तर त्यांच्या परमिट रद्द करण्याचा जो राज्य शासनाकडून निर्णय घेण्यात आला. त्याच्यामुळे एक दुश्परिणाम होऊ शकतो. लोकांसोबत उपाशी राहण्याचे संकट येऊ शकते.

2 months ago | [YT] | 10

Amcha Maharashtra

Bacchu Kadu And Eknath Shinde: प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार?; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदे-बच्चू कडूंच्या भेटीत काय काय घडलं?
Bacchu Kadu And Eknath Shinde: प्रहार संघटना ही शिवसेनेत विलीन करावी असा प्रस्तावही शिवसेनेकडून बच्चू कडू यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.

Bacchu Kadu And Eknath Shinde: शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad Election 2026) नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांची नावं आघाडीवर आहेत. मात्र या दोघांच्या नावावर शिंदेंचे मंत्री आणि नेत्यांनीच विरोध दर्शवला आहे. राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी द्यावी, असा अनेकांचा सूर आहे. तसेच बच्चू कडू यांचा शिवसेनेशी काय संबंध? असाही पक्षातील नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. उमेदवारी द्यायची झाल्यास बच्चू कडू यांच्यासमोर शिवसेनेने एक अट ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रहार संघटना ही शिवसेनेत विलीन करावी असा प्रस्तावही शिवसेनेकडून बच्चू कडू यांना दिल्याचे कळते.
बच्चू कडू यांनी 23 एप्रिल रोजी एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. बच्चू कडूंच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडूनच विलिनीकरणाची अट ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रहार जनशक्ती पक्षाची (Prahar Janshakti Party) बच्चू कडूंकडून 1999 ला स्थापना करण्यात आली. एकनाथ शिंदेंच्या बंडावेळी बच्चू कडूंनी साथ दिली होती. मात्र 2024 च्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 2024 ला प्रहार जनशक्तीने 38 जागा लढवल्या होत्या. पण सर्व जागी पराभूत त्यांचे उमेदवार पराभूत झाले. 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रहार जनशक्तीला 1.55 टक्के म्हणजेच 3.07 लाख मतं मिळाली होती. आता बच्चू कडू शिवसेनेने घातलेली अट मान्य करुन विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही?, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. (Prahar Janshakti Party Merge Shivsena)

10 पैकी 9 जागा सहज महायुतीला जिंकता येणार- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी दोनवेळा मतदान करावं लागणार आहे. 9 जागांसाठी एकदा मतदान होणार तर प्रज्ञा सातव यांची रिक्त झालेल्या जागेसाठी मतदान होईल. दोन्ही मतदान जरी एका दिवशी होणार असलं, तरी आमदारांना दोन वेळा मतदान करावं लागणार आहे. 9 जागांसाठी 29 चा कोटा असणार आहे. तर एका जागेसाठी 51 टक्के मतांची मर्यादा असणार आहे. या समीकरणामुळे 10 पैकी 9 जागा सहज महायुतीला जिंकता येणार तर महाविकास आघाडीला 1 जागेवर समाधान मानावं आहे.
विधान परिषदेतील पुढील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)
उद्धव ठाकरे (शिवसेना - उबाठा)
नीलम गोऱ्हे (शिवसेना)
शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी - शरद पवार गट)
अमोल मिटकरी (राष्ट्रवादी - अजित पवार गट)
गोपीचंद पडळकर (भाजप)
रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
राजेश राठोड (काँग्रेस)
प्रवीण दटके (भाजप)
रमेश कराड (भाजप)
विधान परिषदेची पोटनिवडणूक- (Vidhan Parishad Byelection 2026)
प्रज्ञा सातव
विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)
निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
मतदानाची तारीख: 12 मे 2026
मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026
नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची नावं आघाडीवर, मात्र दोघांनाही विरोध, VIDEO:

2 months ago | [YT] | 19

Amcha Maharashtra

The legend Asha Bhosle महाराष्ट्र आणि संपूर्णदेशाचा गर्व ♥️🌹🌹💐🕊️🕊️

2 months ago | [YT] | 1,046

Amcha Maharashtra

ईशान्येश्वर मंदिरातील पुजाऱ्यासह बनावट अंगठ्या पुरवणाऱ्या सराफ व्यवसायिकाची भोंदू खरात समक्ष चौकशी, धक्कादायक माहिती आली समोर
नाशिकमधील भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाच्या तपासात दररोज काही धक्कादायक बाबी समोर येत आहेत.

Ashok Kharat Nashik Crime नाशिक :नाशिकमधील भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाच्यातपासातदररोजकाही धक्कादायक बाबी समोर येत आहेत. अशातचआता अशोक खरात विरोधात पुरावे संकलित करण्याच्या कामाने वेग घेतला आहे. अशोक खरातच्या (Ashok Kharat Case) तपासात तब्बल 160 GB डिजिटल पुरावे तपास यंत्रणांनी गोळा केल्याची माहिती समोर आली आहे. तरदुसरीकडे भोंदु खरातच्या मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरातील पुजाऱ्याची पुन्हा एकदा SIT कडून चौकशी करण्यातआल्याचीमाहितीआहे. अशोक खरात (Ashok Kharat Nashik Crime) पूजाविधी सांगून भक्तांना काही खडे, रत्न आणि बनावट अंगठी देऊन फसवणूक करत होता. अशोक खरातच्या संबंधित असलेल्या एका सराफ व्यावसायिकाची देखील एसआयटीने चौकशी केल्याची माहिती आहे.
Ashok Kharat Nashik Crime: वेगवेगळ्या प्रकारे फसवत आर्थिक फायदा केल्याचे पुरावे

मिळालेल्यामाहितीनुसार, मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरातील पूजाविधी करून भक्तांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी SIT कडून तपास सुरू आहे. मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरातील पुजारी आणि सराफ व्यवसायिकाची खरात समक्ष चौकशी करून घेतले असून SIT ने जाब विचारत जबाब नोंदवलाआहे. पूजा विधीच्या नावाने आणि इतर देवतांची आराधना करत सुरू असलेले आर्थिक व्यवहार कशाच्या आधारे सुरू होता, याची पुजाऱ्याकडून चौकशी SIT कडून सुरू आहे. तर देवाचा अवतार असल्याचं सांगत भक्तांना वेगवेगळ्या प्रकारे फसवत आर्थिक फायदा केल्याचे पुरावे याचौकशीमधून समोर आलेआहे.

Vijay Wadettiwar : अशोक खरातच्या जागी जर एखादा मुसलमान असता तर....

अशोक खरातच्या जागी जर एखादा मुसलमान असता तर सर्व मुसलमानांची वरात काढली असती. मात्र जात-धर्म न पाहता नालायक व्यक्तीला नालायक म्हणण्याची हिंमत समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे, असंमतकाँग्रेसनेते विजय वडेट्टीवार यांनीव्यक्तकेलेआहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपुरात तीन दिवसीय महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे, या महोत्सवा अंतर्गत संध्याकाळी चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे श्रीमंत कोकाटे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं, या व्याख्यानाचे उद्घाटक म्हणून माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार हे उपस्थित होते, त्यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Ashok Kharat: तब्बल 160 GB डिजिटल पुरावे जप्त

डिजिटल पुराव्यातून खरातच्या काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड होणार आहे. फॉरेन्सिक अहवाल एसआयटी (SIT)कडे सादर केल्यानंतर आता तपासाला आणखी वेग आला आहे. एकूण ४ डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण झाली आहे. पुराव्यांमुळे खरातभोवतीचा कारवाईचा फास अधिक घट्ट झाला आहे. 32GB क्षमतेचे तसेच 19 फोल्डर डेटा असणारे 3 पेन ड्राईव्ह तसेच 64GB क्षमतेचे OTG पेन ड्राइव्ह आणि लॅपटॉपसह सर्व डेटा SIT कडून स्कॅन करण्यात येत आहे. फोरेन्सिक आणि सायबर टीम कडून सबळ डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. न्यायालयात पुरावे सादर करण्यासाठी एसआयटी (SIT)ने साक्षीदार आणि पिढीताचे जबाबही नोंदविण्यात आले आहे. वेगवेगळ्या अशा एकूण १६० जीबीच्या डिजिटल पुराव्यांमध्ये खरातचे हे काळे कारनामे दडले असून, खरातच्या गळ्याभोवतीचा फास या पुराव्यांमुळे घट्ट झाला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

2 months ago | [YT] | 28

Amcha Maharashtra

एकनाथ शिंदेंची गुप्तपणे भेट घेणाऱ्या फक्त 8 खासदारांची नावं समोर आली, पण एकजण सेफ राहिला, ठाकरे गटात अंतर्गत धुसफूस: प्रताप सरनाईक
बुधवारी रात्री ठाण्यात एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या काही खासदारांची गुप्त बैठक झाल्याचे वृत्त समोर येताच राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
Pratap Sarnaik on Operation Tiger: राज्यात ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT) खासदारांना फोडण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पडद्यामागून यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे हे ठाकरे गटाच्या खासदारांशी गुप्तपणे सातत्याने संपर्कात आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटाच्या काही खासदारांची गुप्त बैठक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या बैठकीला ठाकरे गटातील 9 पैकी 8 खासदार उपस्थित असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या वृत्ताला ठाकरे गटाच्या खासदारांनी स्पष्ट नकार दिला आहे. आता या प्रकरणावरून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटात अंतर्गत धुसफूस सुरु असल्याचा दावा केलाय.

प्रताप सरनाईक म्हणाले की, आम्हाला बैठका घ्यायच्या असतील तर आम्ही उघडपणे घेऊ. उबाठामध्ये सर्व आमदार, खासदारांमध्ये खदखद आहे. जिल्हा परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या वेळी आम्ही महाराष्ट्रात फिरत होतो, तेव्हा तिथले स्थानिक आमदार, खासदार, नेते मंडळी आम्हाला सांगायचे की, तुम्ही एकनाथ शिंदेंचे अनुयायी म्हणून महाराष्ट्रात फिरत आहात. परंतु, आम्हाला बघा कसे वाळीत टाकले आहे. आम्हाला निवडणुकीत कुठलेही सहकार्य झाले नाही. त्यामुळे ठाकरे गटात खतखद आहे आणि तो असंतोष वेगळ्या माध्यमातून बाहेर पडत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे अनेक लोक रोजच आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. खासदारांनी स्वतः इच्छा दाखवली आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांची इच्छा जर मान्य केली तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. परंतु छुप्या पद्धतीने बैठका घेण्याचे काम एकनाथ शिंदे कधीही करत नाही, असे त्यांनी म्हटले.

Pratap Sarnaik on Operation Tiger: त्यांचे आपापसात काही मतभेद
प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की, आता सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत. आता काही निवडणुका नाहीत. त्यामुळे अशा बातम्या पेरून पक्षात वेगळं वातावरण निर्माण करायचं आणि आपली ताकद वाढवायची, यासाठी हा कोणाचातरी प्रयत्न असणार आहे. उबाठामध्ये अंतर्गत युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू नसतं तर आरोप-प्रत्यारोप झाले नसते. आताच मला कोणीतरी सांगितलं की, अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की, आठ लोकांची नावे येत आहेत. परंतु, अनिल देसाई यांचे नाव येत नाही. याचा अर्थ त्यांचे आपापसात काही मतभेद आहेत, असे त्यांनी यावेळी म्हटले.

Pratap Sarnaik on Operation Tiger: ऑपरेशन टायगर 365 दिवस सुरू
राज्यात ऑपरेशन टायगर सुरु आहे. 365 दिवस सुरू असतं. 24 तास सुरू असतं. परंतु, ऑपरेशन टायगर म्हणजे फक्त खासदार नव्हे तर सर्वसामान्य शिवसैनिक ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, जो बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा आहे, जो शिंदे साहेबांच्या विचारांना मानणार आहे, त्याला ऑपरेशन टायगर म्हणतात. आमच्या दृष्टीने खासदार किंवा सर्वसामान्य शिवसैनिक हे एकच आहे, असे देखील प्रताप सरनाईक म्हणाले.

Pratap Sarnaik on Operation Tiger: भाजप आमच्या कामांमध्ये हस्तक्षेप करत नाही
भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी ऑपरेशन टायगर थांबवण्यास सांगितले, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत विचारले असता प्रताप सरनाईक म्हणाले की, आमचा पक्ष बाळासाहेबांच्या विचारांना, एकनाथ शिंदेंच्या विचारांना मानणारा आहे. भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व हे आमच्या कुठल्याही कामांमध्ये कधीही हस्तक्षेप करत नाही. पक्षांतर्गत काही निर्णय घ्यायचे असतील तर ते एकनाथ शिंदे हे स्वतः घेतात, असे त्यांनी म्हटले.

2 months ago | [YT] | 30